Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

फडणवीस का संतोष बांगर को निशाने वाला बयान: पैसे पहुँचाने वालों के बारे में कड़ा तंज

GDGAJANAN DESHMUKH
Nov 27, 2025 12:30:44
Parbhani, Maharashtra
अँकर- पंतप्रधान मोदी यांनी तुमच्यासाठी दिलेला पैसा तुमच्या पर्यन्त पोहोचवणारी माणस लोक चांगले असले पाहिजे, त्यांची काही चूक झाली तर आम्हाला त्यांचा कान धरता येईल, येथे तर फक्त आणि फक्त माल कमवण्यासाठी आलेत असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष बांगर यांना नाव न घेता लगावला आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Nov 27, 2025 12:20:46
Pune, Maharashtra:अहिल्यानगर सोलापूर रोडवर आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी राम खाडे यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यात राम खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर आणि नंतर पुण्यामध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणात राम खाडे यांच्यासोबत असलेल्या सहकार्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांनी हल्ला घडवून आणला असल्याचा आरोप केला आहे यावर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली असून हे आरोप हास्यास्पद असल्याचं सांगत लोकप्रतिनिधींवर उठ सुट कुठलेही आरोप करायचे असाच प्रकार असल्याचे म्हटले आहे कोणी कोणाचेही घोटाळे बाहेर काढतो आणि त्यातून झाल्य wfादातून हा हल्ला झाला असावा मात्र यात कारण नसताना माझं नाव गोवल जात आहे या प्रकरणाची कुठलीही चौकशी लावा आपण तयार असल्याचं देखील धस धस यांनी म्हटलं आहे
107
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 27, 2025 12:20:27
Oros, Maharashtra:विजय केनवडेकर प्रेस काल माझ्या घरात येऊन केलेला प्रकार हा निंदनीय होता.. माझ्या घरात मी नसताना माझे वयोवृद्ध आई होती असे असताना माझ्या घरात निलेश राणे बाहेरून शुटिंग करत आले. माझे घरात ते अनधिकृत पने आले. माझ्या घरात सापडलेले पैसे हे के के बिल्डिंरस चे होते याच निलेश राणेंसाठी अम्ही निवडणुकीसाठी काम केले आहे. सात मजली माझा इमारत उभी होत आहे.आम्ही कष्टकरी म्हणून काम करतो.रवींद्र चव्हाण यांनी मला वडिलांसारखा हात दिला. नारायण राणे यांनी माझ्यावर मुलांसारख प्रेम केलं रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर संबंध आहात म्हणून मला त्रास दिला जातो. माझ्या घरात अनधिकृत पाने घरात घुसले.नितेश राणे यांनी मला धीर दिला आहे. राजकारण दोन तारखेला संपेल..आम्हाला उगाच दहशतीखाली ठेवलं आहे. पोलिसांना अजूनही मी आव्हान करतो माझ्या घरत अजूनही झडती करू शकता. माझ्या बिल्डरच्या व्यवसायातील हे पैसे आहेत.त्या पैशाचा व भाजपाचा काही संबंध नाही माझ्यावर कितीही दबाव आणला तरी मी घाबरणार नाही मी अधिक जोमाने भाजपच काम करणार. मी कुणाला पैसे दिलं हे पुराव्यासहित सिद्ध करून दाखवा *माझ्या घरात अनधिकृत पने घुसल्याचा मी तक्रार करणारा आहे* कोणी कितीही दबाव आणला तरीमी भारतीय जनता पार्टी मरे पर्यंत सोडणार नाही माझ्याजवळ अनेकांच्या कुंडल्या आहेत निलेश राणे यांचे कान फुंकणारे बरेच जण आहेत निलेश राणे यांच्यासोबत मी दहा वर्षे काम केलं
38
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 27, 2025 12:20:14
Pandharpur, Maharashtra:राज्यात एकीकडे भाजप आणि शिवसेनेकडून हिंदुत्ववादी मतांना साद घातली जात आहे. दुसरीकडं नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार यांनी दलित आणि मागासवर्गीय मतं आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा देशाचा आत्मा आहे. हाच विचार महाराष्ट्राची विचारधारा आहे. भविष्यात देखील हीच विचारधारा राहील. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आत्मा आहे. याच्या शिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही. मागासवर्गीय समाजातील पानपट्टी चालवणाऱ्या अण्णा बनसोडेला आपण विधानसभेचा उपाध्यक्ष केले. हसन मुश्रीफ यांना मंत्री केले. सना मलिकला आमदार केले. इद्रिस नायकवाडीला विधान परिषदेत आमदार केले. केवळ एक अल्पसंख्यांक आमदार तिथे आहे. अशी उदाहरणे देऊन अजित पवार यांनी दलित मुस्लिम समाजाची भाजप पासून दूर जाणारी मते आपल्याकडे वळवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे
97
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 27, 2025 11:35:16
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पन्नास कोटी रुपये घेतले असा आरोप भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलाय, मला मुंबईत एकदा आमदार बांगर यांनीच 50 कोटी घेतल्याचे सांगितलं होतं असा गंभीर आरोप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली असून एकनाथ शिंदे यांच्या पक्षफुटीची चर्चा रंगलीय... बिंदू- बहुमत चाचणीला उद्धव ठाकरे कडे असलेले संतोष बांगर मुख्यमंत्री यांना पाठिंबा देण्यासाठी 24 तासात तिकडे दिसले, साडे तीन वर्षांच्या नंतर आमदार बांगर त्यांच्या स्वभावामुळे वारंवार चर्चेत आले,पण आता नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हिंगोली नगर पालिकेत आमदार बांगर यांनी त्यांच्या भावजईला निवडणुकीच्या रिंगणात उतरवीत, हिंगोली नगर परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे, आमदार बांगर यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावल्याने भाजपचे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे आक्रमक झाले असून मागील काही दिवसांपासून आमदार बंगर आणि मुटकुळे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत,पण आज आमदार मुटकुळे यांनी पक्षफुटीवेळी आमदार बांगर यांनी 50 करोडो रुपये घेऊन एकनाथ शिंदे यांना साथ दिल्याचा गंभीर आरोप केल्याने संतोष बांगरसह शिंदे सेनाच चर्चेत आली आहे. गोषवारा- तानाजी मुटकुळे- आमदार भाजप,हिंगोली तथ्य- आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलेल्या आरोपाबद्दल आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माध्यमाला बोलण्यास नकार दिला. पण हिंगोलीचे पूर्वाश्रमीचे खासदार तथा विधान परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी मात्र आमदार संतोष बांगर यांनी कुठलेही पैसे घेतले नाहीत तर ते एकनाथ शिंदे यांच्या वर विश्वास ठेवून शिंदे गटात गेले असल्याचं स्पष्टीकरण दिलं. बिंदू- हेमंत पाटील- विधान परिषद सदस्य-शिंदे गट आमदार तानाजी मुटकुळे यांनी आमदार बांगर यांच्यावर केलेला हा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटात गेलेल्या 40 आमदारांना दुखावणारा असाच असून महायुतीमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे यांनाही अडचणीचा वाटणारा असाच आहे, अगोदरच नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजप कडून वारंवार दुखावले जात आहेत, अश्या होऊ लागलेल्या आरोपानंतर आमदार बांगर आणि एकनाथ शिंदे नेमकी कोणती भूमिका घेतात किंवा काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गजानन देशमुख झी मीडिया हिंगोली
111
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 27, 2025 11:02:45
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली कांग्रेसची भाजप झाली,नाराज कांग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप, कॉग्रेसच्या निष्ठावंतांना डावडल, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामा पोस्टाने राहुल गांधींना पाठवले... ANC - कल्याण डोंबिवली काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत धुसफुस समोर आली आहे असून नव्याने जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून कॉग्रेस कार्यकर्तेन मध्ये नाराजगी समोर आली आहे जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी राजीनामा देताच नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ पातकर यांची काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर पक्षातील अनेक निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सामूहिक राजीनामे दिले. राजाभाऊ पातकर हे भाजप मधून विधानसभा निवडणुकीत कांग्रेस मध्ये आले आहेत आणि कल्याण जिल्हा अध्यक्ष म्हूणन नेमणूक केल्याने नाराजी कार्यकर्त्यात दिसून येत आहे. ...पातकर यांच्या नियुक्तीला विरोध करत कल्याण–डोंबिवलीतील विविध विभागांमधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पोस्टाद्वारे थेट राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे व काँग्रेस प्रदेश अध्यक्षांकडे पाठवले आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये उफाळलेली ही घुसमट पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून निर्माण झालेला हा वाद मिटवण्यासाठी आता प्रदेश नेतृत्व कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
81
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 27, 2025 11:00:16
Navi Mumbai, Maharashtra:अँकर -- मुंबई विमानतळावरील कामगारांसाठी स्वस्त कॅन्टीनची मागणीसाठी सात दिवसांत तोडगा निघाला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलनाचा आमदार मुराजी पटेल यांमी इशारा दिला. शिवसनेच्या एअरपोर्ट एम्प्लॉईज् एव्हिएशन युनियनच्या वतीने अध्यक्ष आणि आमदार मुरजी पटेल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या व्यवस्थापनाला कामगारांच्या हक्कांसाठी जाब विचारण्यात आला. टी-१ टर्मिनलवरील कार्यालयात विमानतळ सीईओ यांचीही थेट भेट घेऊन महत्त्वाच्या मागण्या सादर करण्यात आल्या. मुंबई विमानतळावर कार्यरत सुमारे 10000 कामगारांसाठी स्वस्त दरात कॅन्टीनची सुविधा, तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी युनियनने केली. या मागण्यांवर एअरपोर्ट अथॉरिटी सात दिवसांत तोडगा काढू दरम्यान, सात दिवसांत मागण्यांचा तोडगा न निघाल्यास शिवसेना स्टाईलमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल, असा कडक इशारा आमदार मुरजी पटेल यांनी व्यवस्थापनाला दिला.
205
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 27, 2025 10:33:52
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात बोगस दिव्यांग दाखले देण्याचं रॅकेट दलालांमार्फत चालवलं जात आहे...यामध्ये या सरकारी रुग्णालयातील अधिकाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचा गंभीर आरोप आज शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे... या पत्रकार परिषदेत त्यांनी सीपीआर रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडून दिव्यांग दाखल्यांसाठी कशी साखळी कार्यरत आहे याचा पुराव्यानिशी भांडाफोड केला आहे... या दलालांच्या साखळीत सामील असलेल्या भ्रष्ट आणि नालायक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील यावेळेस संजय पवार यांनी केली आहे... सरकारी कर्मचारी शिक्षक अशा लोकांना रेट कार्ड ठरवून हे बोगस दिव्यांग दाखले दिले गेले आहेत... या सर्व दिव्यांग दाखल्यांची फेर तपासणी करावी अशी मागणी सुद्धा संजय पवार यांनी केली आहे.. या विभागाचे मंत्री प्रकाश अबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई केली नाही तर शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा सुद्धा उपनेते संजय पवार यांनी दिला आहे..
152
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 27, 2025 10:31:47
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर पोर्तातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. वर्षभरात कोट्यवधी लोक विठोबाच्या दर्शनासाठी पंढरीत येतात. स्थानिक नागरिकांसोबतच रोज येणाऱ्या भाविकांसाठी दर्जेदार सुविधा देण्याचे काम निवडून येणाऱ्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना करावे लागणार आहे. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी अनेक वर्ष नगरसेवक नगराध्यक्ष राहिलेल्या लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी शामल शिरसट यांना उमेदवारी दिली आहे. भाजप नेते माजी आमदार प्रशांत परिचारक केंद्रात राज्यात असलेले भाजपची सत्ता, विकास कामासाठी निधी आणण्याची ताकत या मुद्द्यावर भाजप आपले मत मागत आहे. परिचारक यांचे कट्टर विरोधक दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी आघाडी करून भाजप समोर तगडे आव्हान उभे केले आहे. यापूर्वी 2021 ची पोट निवडणूक आणि 20204 ची विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांचा अगदी थोड्या मताने पराभव झाला होता. नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नी डॉ प्रणिता भालके यांनी उमेदवारी दाखल केली आहे. सलग दोन पराभवानंतर भालके यांना एका विजयाची अपेक्षा आहे. जनतेतून आपल्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी असल्याचे डॉ प्रणिता भालके सांगतात. धूळ, खड्डे, रहडलेली विकासकामे, तीर्थक्षेत्र असूनही योग्य रित्या न झालेला विकास ही मुद्दे त्यांनी मांडले आहेत. भाजप आणि भालके यांच्यातील ही काटे की टक्कर आहे. सलग दोन पराभवानंतर भालके विजयी होणार की भाजप सलग तिसरा पराभव करणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
169
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 27, 2025 10:18:09
Dharashiv, Maharashtra:उमरगा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या शिवसेनेच् बॅनर चर्चेत. एकाच बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे, सोनिया गांधी व राहुल गांधींचे फोटो. ट्विट करत रावसाहेब दानवे यांनी साधला शिवसेनेवर निशाणा. शिवसेना बॅकफूटवर प्रतिक्रिया द्यायला टाळाटाळ. उमरग्यात शिवसेनेच्या प्रचार बॅनरने वातावरण चांगलेच तापलं आहे. धनुषबाण चिन्हासोबतच सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे फोटो… आणि शिवसेना–कांग्रेसची एकजूट दाखवणारा संदेश. या पोस्टरराजकारणावरून रावसाहेब दानवे यांनी सोशल मीडियावर थेट निशाणा साधला. “काँग्रेस नको म्हणून सुरज गोवा-टी गोवा असा पळपुटा प्रवास केला… आणि आता सोनिया गांधी–राहुल गांधींसोबत धनुषबाण एकाच बॅनरवर,” अशा शब्दांत दानवे यांनी शिवसेनेला टोला. दनवे यांच्या या ट्वीटनंतर शिवसेना मात्र बचावात्मक भूमिकेत दिसली. वाद वाढला तरी स्थानिक शिवसेना पदाधिकारी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत आहेत. उमरग्यातील निवडणुकीत हा बॅनर आता चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे. युतीच्या चर्चांपासून ते चिन्हांच्या राजकारणापुर्यंत… पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. उमरगा नगरपरिषद निवडणूक… प्रत्यक्ष उमेदवारांपेक्षा बॅनरच जास्त चर्चेत! शिवसेना–काँग्रेस एकत्र की फक्त बॅनरपर्यंत प्रेम? या राजकीय कुरघोडी आणखी तापण्याची चिन्हं…
147
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 27, 2025 10:05:01
Oros, Maharashtra:नितेश राणे -byte आम्ही राजकीय पक्षाचे सदस्य आहोत पण आमच वैयक्तिक आयुष्य आहे आमचे व्यवसाय आहेत. आम्ही समाजकारण करून राजकारण करतो. विजय केनवडेकर अनेक वर्षापासून व्यवसाय करत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून त्यांच्या घरात उलाढाल आहे. मग काय चुकीच आहे. भाजपाला अशा पद्धतीने निवडणुका लढविण्याची काही गरज नाही. आमच्या कडे मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे. फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत. आम्हाला अशा पद्धतीने निवडणूक लढवण्याची गरज नाही. आम्ही विकासावर आमच्या सरकारच्या योजनांवर निवडणुका लढवत आहोत सगळ्या प्रकारावर राज्य निवडणूक आयोग आणि पोलिस चौकशी करतील ज्यांच्या घरी पैसे सापडले त्यांच्या व्यवसाय आणि बॅगराऊंड आपण बघणार आहोत की नाही सगळी चौकशी निःपक्षपाती होईल आता सगळ्या तक्रारी वर चौकशी होईल हमाम मे सब नंगे होते है विचार पूर्वक सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. प्रत्येक घरात मोदी साहेबांच्या योजनेचे लाभार्थी आहेत त्यामुळे पैसे वाटण्याची गरज नाही कोणी किती प्रयत्न केले तरी निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर होतील आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार चौकशी होईल तेव्हा निवडणूक आयोग ह्या प्रकारच उत्तर देईल चव्हाण साहेबांवरील आरोप हा राजकीय आरोप आहे उदय सामंत पण येऊन गेले ते सहज आलेले की सॅन्टाक्लॉज बनून आलेले अस आम्ही विचारू का ? चव्हाण साहेबांनी कोकणात भाजपा रुजवली लोकसभा विधानसभा निवडणुकांतील महायुती म्हणून विजय मिळविला तेव्हा चव्हाण साहेब होते ना ? आम्ही आमची आमची निवडणूक लढवत आहोत मैत्री पूर्ण लढत आहोत आम्ही मालवण शहराच्या विकासावर बोलतोय आमची भाषण बघा फक्त विकास च दिसेल भाजपा चे राणे साहेब नेते आहेत . आमच्या उमेदवारांना राणे साहेबांनी आशीर्वाद दिलाय तुमचे चॅनल चालाव म्हणून आमचा खटाटोप आहे.
84
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 27, 2025 09:55:09
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - उद्याच्या दिवस महत्वाचा आहे, सर्वोच न्यायालयात आरक्षण बाबतीत सुनावणी आहे - उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार, उपमुख्यमंत्री भाषण पॉईंटर्स --- उद्याच्या दिवस महत्वाचा आहे, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण बाबतीत सुनावणी आहे तोपर्यंत कुठल्याही निवडणुका जाहीर करू नका असं सूचना असल्याचे ऐकायला मिळतंय मागील 9 वर्षात निवडणूक नव्हती, पण ते करताना कुठल्या समजावर अन्याय होता कामा नाही काल संविधन दिन झाला, बाबासाहेब यांनी या देशाला संविधन दिलं सगळ्या पक्षाचे नेते वेगवेगळ्या भागात जातायत, आपल्या कामं सांगताय, शेवट जनता सर्वस्व आहे. काकासाहेब यांच्या पक्ष प्रवेशानिमित्ताने आपले सर्वांचे स्वागत करतोय आम्ही शिवशाहूफुलेंच्या विचारांनी चालणारे आहोत स्व. यशवंतराव यांनी राजकारणातला सुसंस्कृतपणा शिकवलं कोणत्याही ही क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर राहिला पाहिजे हे त्यांनी शिकवलं यशवंतराव, वसंतराव यांचा काळ आपण पहिला, त्यांनी भरभरून देण्याचं कामं केलं ग्रामीण भागाला समृद्ध करण्याचे कामं, ताकद देण्याचे कामं त्यांनी आपल्यापरीने केलं या तालुक्याची परिवाराप्रमाणे काळजी घेणारे काकासाहेब हे तीन पिढ्यानी माहिती विदयार्थी दशेपासून नेतृत्वगून त्यांच्या अंगात आहेत 24 वर्ष जनतेने त्यांना सरपंच म्हणून वडाळाच्या जनतेने दिलं सोलापूर जिल्हा परिषदमध्ये नेतृत्व त्यांनी केलं, कृषी सभापती म्हणून केलेलं कामं राज्यात दिशादर्शक ठरलं सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून केलेलं कामं वाखण्यजोगे होते प्रत्येकाला न्याय देण्याचे काम हे काकासाहेब साठे यांनी केलं विकास करत असताना पैशाचे सोंग करता येतं नाहीत हेच राजू खरे यांनी देखील बोलून दाखवलं* मे महिन्यात कधी पाऊस पडलेलं आपणा पहिलं का? सोलापूर हा रब्बीचा जिल्हा आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या अंगात मेहनत घेण्याची तयारी आहे आमदार राजू खरे यांनी सांगितलं मला की अतिवृष्टीमध्ये पाच मंडळाचा समावेश झाला पण चार मंडळाचा समावेश नव्हतं मी तात्काळ कामं करणारा माणूस आहे , उद्या या परवा या हे असं सांगणं मला जमत नाही एका भगिनींने तीचे एक कामं मला सांगितलं, मुंबईत गेल्यावर की अधिकाऱ्यांना बोलणार आहे सोन्यासारखा मुलं तीच्या जवळ राहिलं नाही, काय झालं हे मी बघायला सांगितलं सोलापूर dcc ची अवस्था काय आहे आज? पुढारी त्याला जबाबदार नाहीत का? पुण्याची dcc आमच्याकडे आहे, तिथं बघा कस कामं सुरूय प्रत्येकाचा काळ असतो, उज्वला थिटे इथे बसल्या त्यांचं बाबतीत काय झालं बघितलं लोकशाही इथं आहे, सर्वांना निवडणुकीत उभं राहायचं अधिकार आहे. दमदाटी करून चालत नाही संविधान, कायदा हा सर्वांना सारखा आहे दमदाटी करून चालत नाही प्रत्येकाचा फुगा फुटत असतो मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं आता एका ठिकाणी ज्वालामुखी फुटला, तिथल्या लोकांना श्वास ही घेता येतं नाही शिव शाहू फुले यांनी मांडलेले विचार बघा साधू संतांनी जो विचार मांडलं त्याचं विचारधारेची कस धरून पुढे जावं लागेल व्यसनाधिंन होऊन चालणार नाही उज्वला ताई आम्ही कायम महिलांचा सन्मान करणारे आहोत महिलांना संधी दिल्यास ते सोनं करतात महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जिथं महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं पवार साहेबांनी सुरवात केली त्यात आम्ही भर घातली म्हणूनच आम्ही लाडकी बहिणी योजना सुरु केली, ज्याची चर्चा झाली महिला थोड्या प्रमाण حتىँजा स्वयपूर्ण झाल्या 45 हजार कोटी रुपये चांद्यापासून बांदापर्यंत देतोय राजू खरे यांनी सांगितलं की त्यांनी वजन कमी केलं, तुम्ही शरीराचा वजन कमी करा पण जनमाणसातले वजन वाढवा* तुम्ही खंत बोलून दाखवली त्यातून कसा मार्ग काढायचं यासाठी मला थोडं वेळ द्या* मी ताम्रपत्र घेऊन जन्माला आलेलो नाही, मिळाल्या पदाचा वापर सामान्य जनतेसाठी करायचा असतो ही शिकवण यशवंतराव यांनी दिली ते पुढे घेऊन आम्ही चाललोय जो कामं करतो कुठंतरी चुकत असतो, जो कामं करत नाही तो चुका कस करेल आम्ही सहा वाजल्यापासून कामं सुरु करतो, पवार साहेबांची परंपरा आम्ही पुढे नेतोय कृषिमंत्री दत्ता भरणेला केलं, त्याला सांगितलं कापूस, भाजीपाला काही पिकवणारा शेतकरी असो त्याला मदत झाली पाहिजे 70 टक्के उस जो काढतो, AI चा वापर केला तर 100 टक्के पेरा निघेल कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा लागेल, तंत्रज्ञानचा वापर करावा लागेल काळानुसार आम्हाला बदलावं लागेल, त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे जे दमदाटी तुम्ही सर्वानी म्हटलं, पण ज्या गावचं बोरी त्याचं गावचं बभाळी असते कोणी अरे केलं तर कारे करणारे असतात पण आपण कायदा मोडता कामा नये आमच्या लाडक्या बहिणी इथं आहे. उज्वला थिटे ही इथं आहे भाऊ म्हणून आम्ही कायम आमच्या बहिणीचं संरक्षण करण्याच काम केलं सोलापूर जिल्हा राज्यभरात ओळखला जातो तुमच्या विमानतळ, हायवे सगळ्याच कामं आन्ही हात घेतलंय पुढच्या निवडणुकीत चांगल्या विचारांच्या लोकांना पुढे येऊ द्या नव्याना संधी द्या आणि जुन्याचा अनुभव देखील घ्या
120
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 27, 2025 09:46:38
Shirdi, Maharashtra:नेवासा नगरपंचायत निवडणुक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असुन आजी - माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली...ठाकरेंच्या पक्षाऐवजी क्रांतिकारी शेतकरी पक्ष, आम आदमी पार्टी और मित्रपक्षांच्या वतीने माजी आमदार शंकरराव गडाख यांचा पॅनल निवडणुकीत उतरलाय...मोहिनीराज मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात आले..नेवासा नगरपंचायत निवडणुकात बहूरंगी लढत होत असली तरी महायुती आणि क्रांतिकारी Shетकरी पक्षात प्रमुख लढत होणार असे चित्र सध्या दिसत आहे। विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलीय...नेवासा शहराच्या विकासासाठी संघर्ष अटळ आहे। गरज पडल्यास मी रस्त्यावर उतरायला तयार आहे। ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असल्याचेही गडाख यांनी यावेळी सांगितलय...
172
comment0
Report
Advertisement
Back to top