Back
अंबरनाथ चुनाव: 29 पॅनेल के उमेदवारों से शिंदे की समीक्षा, शिवसेना स्वतंत्र लड़ाई की तैयारी?
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 07, 2025 01:16:01
Ambernath, Maharashtra
खासदार डॉ. श्रीकांत शिंदें अंबरनाथच्या २९ पॅनेलचा आढावा
प्रभागातील इच्छुकांशी खासदारांचा संवाद
शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची तयारी?
यावरील माहिती:
अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमधील सर्व २९ पॅनेल मधील इच्छुकांशी संवाद साधला. अंबरनाथ शहरातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी शिंदे अंबरनाथमध्ये आले होते.
यानंतर अंबरनाथच्या ग्लोब हॉलमध्ये शिंदे यांनी सर्व २९ पॅनेल मधील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांच्याशी प्रभाग निहाय संवाद साधला. यावेळी प्रभागातील सध्याची राजकीय परिस्थिती, प्रभागात आजवर झालेली कामं, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये झालेलं मतदान आणि पक्षांतर्गत वातावरण याचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला. प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीची माहितीही त्यांनी घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समवेत उपस्थित होते.दरम्यान शिंदे यांनी सर्व २९ प्रभागांमधील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यामुळे आता शिवसेना अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करतेय का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowOct 07, 2025 03:41:170
Report
ABATISH BHOIR
FollowOct 07, 2025 03:41:050
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 07, 2025 03:40:390
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 07, 2025 03:40:280
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 07, 2025 03:32:420
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 07, 2025 03:32:270
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 07, 2025 03:32:170
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 07, 2025 03:32:070
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowOct 07, 2025 03:21:400
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 07, 2025 03:21:150
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 07, 2025 03:21:010
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 07, 2025 03:20:430
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 07, 2025 03:17:300
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 07, 2025 03:17:130
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 07, 2025 03:17:010
Report