Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

खेत में कीटनाशक की विषबाधा से युवक किसान की मौत, सुरक्षा नियम कड़ाई से पालन जरूरी

JJJAYESH JAGAD
Oct 07, 2025 03:20:43
Akola, Maharashtra
शेतातील पिकावर कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाल्याने उपचार घेत असलेल्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गणेश कात्रे (वय २८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कात्रे हे २२ सप्टेंबर रोजी आपल्या शेतात तुरीच्या पिकावर कीटकनाशकाची फवारणी करत होते. त्या दरम्यान अचानक त्यांना चक्कर येऊन उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी दर्यापूर येथून अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचालित सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खरीप हंगामात कीटकनाशक फवारणीचा हंगाम सुरू असून गेल्या काही दिवसांत अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यातील काही Shेतकऱ्यांना फवारणीदरम्यान विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या विषबाधेच्या घटनांमुळे ग्रामीण भागात चिंता व्यक्त केली जात असून, फवारणीदरम्यान आवश्यक सुरक्षिततेचे नियम पाळावेत, अशी सूचना आरोग्य व कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Oct 07, 2025 05:18:30
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 07, 2025 05:03:38
Jalna, Maharashtra:जालना | कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे दोन कंटेनर गोरक्षकांनी पकडले दोन कंटेनरमधील 40 ते 50 जनावरांची सुटका तालुका पोलिसात गुन्हा दाखल जालन्यातील रोहनवाडी-ईस्लामवाडी रोडवर ही कारवाई करण्यात आली.सिल्लोडकडून उदगीरकडे जनावरे घेऊन जात असल्याची माहिती काही गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्रीच्यावेळी इंदेवाडी येथील नागरिकांनी कंटेनर अडवून पाहणी केली असता दोन कंटेनरमध्ये दाटीवाटीने जनावरं कोंबल्याचं आढळून आलं.. यावेळी गोरक्षकांनी तालुका पोलिसांना याची माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी जात कंटेनर ताब्यात घेतले.यावेळी कंटेनरमधील 40 ते 50 जनावरांची सुटका केली असून त्यांना जवळील गौ-शाळेत सोडण्यात आलं आहे..या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Oct 07, 2025 04:47:41
Oros, Maharashtra:आगामी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत रंगत वाढताना दिसत आहे. या निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्ष पदावर ठाम दावा केला असून, “आमचा नगराध्यक्ष असावा” अशी भूमिका माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केली आहे. “सावंतवाडी ही एकमेव नगरपरिषद आहे, जिथे आरक्षण नसतानाही महिला नगराध्यक्षा राहिल्या आहेत. शिवसेनेत अनेक सक्षम, कार्यक्षम व लोकप्रिय चेहरे आहेत. गेली अनेक वर्षे सावंतवाडी शहराचा पाठिंबा आम्हाला लाभला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पद महायुतीतून शिवसेनेकडेच सोडण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.” महायुतीच्या बैठकीत या विषयावर अधिकृतरीत्या चर्चा होणार असून, पदवाटपात सेनेला न्याय द्यावा, अशी मागणी ते करणार आहेत.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 07, 2025 04:45:15
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 07, 2025 04:34:06
Shirdi, Maharashtra:नगरपालीकांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने शिर्डीमध्ये विखे समर्थकाने सुजय विखेंना टोलाणारी बॅनरबाजी केली आहे. शिर्डी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी जाहीर झाल्यामुळे अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी पडले. शिर्डीचे माजी नगराध्यक्ष तथा विखे पाटलांचे कट्टर समर्थक कैलास कोटे यांनी शिर्डीच्या शिवेवर बॅनरबाजी केली. 'शाळा सुटली, पाटी फुटली. आई मला दादांनी मारलं. आई, दादाचं वाक्य खरं ठरलं' अशा आशयाच्या बॅनरबाजीमुळे शिर्डीतील राजकारण तापलं असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर गटबाजीत चव्हाट्यावर आली आहे. सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या भाषणाचा दाखला देत नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे कैलास कोते यांनी ही बॅनरबाजी केली. 'शिर्डी नगरपरिषदेत नगराध्यक्ष आरक्षण एस.सी. महिला जाहीर झालं. लोणी ते शिर्डी पायी पदयात्रा निमित्त सुजय दादा विखे पाटील यांचे हार्दिक स्वागत. दादा तुमच्या भावी कार्यास शुभेच्छा! जय हिंद.. जय महाराष्ट्र' असा उल्लेख करत त्यांच्याच समर्थकाने बॅनरच्या माध्यमातून सुजय विखेंना टोला लगावला. मात्र सुजय विखे यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ समोर आला असून त्यात 'आदिवासी समाजाला अर्थात अनुसूचित जमातीला शिर्डीसाठी आरक्षण जाहीर झाल्यास लोणी ते शिर्डी पायी चालत येणार' असल्याचं वक्तव्य विखेंनी केलं होता. त्यामुळे चूक लक्षात येताच विखे समर्थकाने रात्रीच हा बॅनर हटवला. सुजय विखे यांचा दोन महिन्यांपूर्वीच्या भाषणाचा व्हिडिओ. सुजय विखे काल सायंकाळी शिर्डीमध्ये एका कार्यक्रमाला येण्यापूर्वीच शिर्डीच्या वेशीवर ही बॅनरबाजी करण्यात आली होती. सुजय विखे यांनी भाषणादरम्यान त्या बॅनरचा उल्लेख करत शिर्डीतील स्थानिक राजकारणावर भाष्य केलंय. 'उपरवाले की लाठी में आवाज नहीं रहती.. बापूंची संधी हुकल्याचे मलाही वाईट वाटलं, मी त्यांना तिकीट देणार होतो पण आता काय करू शकतो?' अशा शब्दांत सुजय विखे यांनी समर्थकाच्या बॅनरबाजीवर मिश्किल भाष्य केलं.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 07, 2025 04:33:48
Latur, Maharashtra:लातूर शहरातील गांधी मार्केट परिसरातील महापालिकेच्या जीर्ण अवस्थेत असलेला पार्किंगचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅब कोसळताच वर उभी असलेली मालवाहतूक गाडी थेट खड्ड्यात कोसळली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी गाडी खड्ड्यात कोसळल्याने चालक ही त्यामध्ये अडकला होता. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून त्या चालकाला सुखरूप गाडीच्या बाहेर काढले. या घटनेमुळे महापालिकेच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, जीर्ण अवस्थेतील इतर पार्किंग बांधकामांचीही तात्काळ तपासणी करण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 07, 2025 04:15:42
Nagpur, Maharashtra:नागपूर बबनराव तायवाडे, ओबीसी. - मागील दोन-तीन दिवसांमध्ये आमच्या आरक्षणावर काही गदा आले आम्ही ओबीसीचा १९९४ चा शासन निर्णय चॅलेंज करू आणि ओबीसीचे आरक्षण संपवू... - हे वाक्य त्यांचं बालिशपणाचा आहे कारण ओबीसी समाजाला मिळालेल्या 27 टक्के आरक्षण 40 ते 42 वर्षाच्या आता परिश्रमानंतर मिळाला आहे..1952 पासून आरक्षण मिळण्यापेक्षा असताना 1994 ला मिळालं... मंडला आयोगाचा अहवाल आला, आणि सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर 52 टक्के ओबीसी समाजाला मंडल आयोगानुसार 27 टक्के आरक्षण मिळाला... वारंवार दहशत निर्माण করারे काम सुरू आहे. - राज्य सरकार आणि केंद् सरकारच्या शिफारशीनुसार या आरक्षण मिळालं, हे संपणार म्हणणे चुकीच आहे असं म्हणणं हे वक्तव्य चुकीचे आहे, - on भुजबळ वडेट्टीवार यांच्यवर आरोप - रोज काहीतरी अशी वक्तव्य करत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांनाच कळतो अशा पद्धतीने ते वागत असतात आंदोलन करता म्हणून त्यांच्या पाठीमागे मोठे जनता असताना त्यांना खुश करण्यासाठी बदनाम करण्याचं काम ते करत असतात.. - राजकारणात कोणी कोणाला संपवत नाही प्रत्येक व्यक्ती आपापल्या ताकतीने उभा राहत असतो... - समाजाला खुश करण्यासाठी असे वक्तव्य करत असतात, त्यांच्या समाजातील लोकांना खुश करण्यासाठी ते अशे वक्तव्य करत असतात. On वडेट्टीवार - दोन सप्टेंबर च्या जीआरमुळे आरक्षणाला धक्का लागला नाही, तर कुणबीच नाही तर एससी एसटी सर्व जातीचे जात प्रमाणपत्र देणे आणि वैधता तपासणी यासाठी कायदा आणि नियमावली आहे. - त्यामुळे या जीआरमध्ये नवीन कुठली नवीन पद्धत नसल्याने या जीआरमुळे आरक्षणाला धोका निर्माण होत नाही. On जरांगे गेम - कोणी कोणाची गेम करेल एवढी ताकद नाही, आम्ही काही भांडे घासायला बसलेले नाही भविष्य नेत्यांमध्ये सुद्धा मोठी ताकद आहे. साडेचारशे जातींचा सभा आहे मतभेद असू शकतात मात्र मला वेद नाही त्यामुळे आम्ही कोणत्याही ओबीसी नेत्याला संपू देणार नाही...आम्ही सगळे त्यांच्यासोबत आणि पाठीशी उभे राहू. अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप दोन्ही नेत्यांकडून थांबवल्या गेले पाहिजे आणि दुफळी निर्माण झाली ती कुठेतरी थांबली पाहिजे. - नजरंग यांनी सत्तेतील सर्वच नेत्यांवर टीक केली आहे त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करून लक्ष केंद्रित करण्याचा काम करत नेहमीच्या स्वभाव झालेला आहे. on शपथ पत्र - शपथपत्रा सोबत वंशावळ जोडायची आहे, जोडलेली वंशावळ खरी आहे का तपासून अहवाल तहसीलदार यांना देणार आहे. शपथ पत्र हे खोटं सुद्धा ठरू शकतो आणि खोटं सादर केल्यास त्याची डबल यंत्रणा असेल आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूद शासनाकडे आहे, किती प्रमाणcertificates देणाऱ्यांना दोन वर्षापर्यंत शिक्षा आहे. On ओबीसी कोणावर विश्वास ठेवावा - जे लोक कायद्याचा अभ्यास करतात नेहमीचा अभ्यास असणाऱ्या लोकांना हे माहीत असते... संभ्रम निर्माण होत आहे, राजकारणी लोकांवर जनता विश्वास ठेवत असते... सोशल मीडियावर काही प्रमाणपत्र व्हायरल होत असेल त्यातून समाजाचे शबन होत असेल त्यापेक्षा राजकारणी लोकांनी ते कोणाला दिलं हे सगळं तपासलं पाहिजे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 07, 2025 04:05:50
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाइट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री On मंत्रिमंडळ बैठक - मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिले जलसंपदा आणि नंतर कृषी विभागाचे नुकसान भरपाई यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होत आहे - नुकसान भरपाई चे 80 टक्के आकडे आले आहेत, दाहा-वीस टक्के आकडे बाकी आहेत - आज उद्या राज्यातील सर्व पंचनामाचे आकडे राज्य सरकारकडे येतील, मग राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसून जो काही शेतकऱ्यांना मदत करायची आहे, त्याची घोषणा करतील - केंद्र सरकारकडे अपेक्षित प्रस्ताव जातील - मुख्यमंत्री, आमचे सरकार हे शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई, मदत करण्याकरिता त्या ठिकाणी ताकद देणार आहे, जे काही करावे लागेल ते करणार - नियोजन सुरू आहे...शेतकऱ्यांना मदत करण्याची पूर्ण भूमिका आहे On CJI राष्ट्रवादी आंदोलन - खरंतर ही निषेधार्य घटना आहे, जेवढा निषेध केला पाहिजे तेवढं गंभीर घेतलं पाहिजे तेवढे सरकारने घेतला आहे आणि भूषण गवई साहेबांसारखे अत्यंत प्रतिष्ठित आणि देशाच्या इतिहासात अत्यंत प्रभावी आणि ज्यांनी त्यांच्या उच्च क्षमतेतून प्रचंड मोठमोठे निर्णय देशाकरिता घेतले. - नागपूर हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांच्या निर्णय घेतले आहे. - भ्याड हल्ला करणे हे योग्य नाही, याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. पण शरद पवार साहेबांनी अशा घटनेवर आंदोलन करायचं की नाही करायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे, ते प्रगल्भ नेते आहेत. - सर्व गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे, शरद पवार साहेबांना माझी विनंती आहे की, असे गुन्हे घडत असताना यावर आंदोलनाचा पवित्रा घेऊन यामध्ये उपयोग नाही. सर्वांनी मिळून या घटनेमध्ये आपण पोलिसांना मदत करणे आणि असे गुन्हे पुन्हा होणार नाही याची काळजी घेणे हे महत्त्वाचा आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 07, 2025 04:00:35
Amravati, Maharashtra:सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे घटना, न्यायव्यवस्था, संविधान आणि लोकशाही मूल्यांवर थेट हल्ला आहे – यशोमती ठाकूर अतः सर्वोच्च न्यायालयात अत्यंत निंदनीय असा प्रकार घडला आहे. सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावर एका मनुवादी विचारांच्या वकीलाने बूट भिरकावल्याची घटना घडली असून हा प्रकार भारतीय लोकशाहीसाठी गंभीर इशारा आहे. वर्णवर्चस्ववादी आणि मनुवादी विचारसरणीच्या प्रवाहातून उद्भवलेली ही घटना न्यायव्यवस्था, संविधान आणि लोकशाही मूल्यांवर थेट हल्ला आहे. काँग्रेस पक्षाच्या माजी मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अशा उजव्या विचारसरणीच्या आणि मनुवादी प्रवृत्तीच्या विरोधात काँग्रेस पक्ष सतत आणि निकराने लढा देत राहील. संविधानाचे रक्षण, लोकशाहीचे जतन आणि सर्वसामान्य जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. भारतीय लोकशाहीचे मूलभूत तत्त्व म्हणजे समानता, न्याय आणि बंधुता आणि या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. असेही ठाकूर मानल्या आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 07, 2025 03:50:07
Pune, Maharashtra:नुकताच बंगळुरू येथे पार पडलेल्या हॉर्टीकनेक्ट इंडिया 2025 या आंतरराष्ट्रीय फुल उत्पादकांच्या भव्य प्रदर्शनात, महाराष्ट्राच्या मावळातील गुलाब उत्पादक शेतकरी मुकुंद ठाकर यांचा कर्नाटकी पगडी घालून विशेष सन्मान करण्यात आला. डच गुलाबांच्या टॉप ग्राफ्टिंग नर्सरीचे मालक म्हणून मुकुंद ठाकर यांनी जागतिक दर्जाच्या गुलाबांचे उत्पादन करून, केवळ महाराष्ट्रात नव्हे तर परदेशातील फुल उत्पादकांच्या समोर देखील आदर्श निर्माण केला आहे. हॉर्टीकनेक्ट कमिटीने गौरव करताना मुकुंद ठाकर यांचा प्रवास हा दूरदृष्टी, चिकाटी आणि उत्कृष्टतेचं प्रतिक आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय फुलोद्योग जगाच्या नकाशावर झळकत आहे. या प्रदर्शनात देशभरातील शेकडो शेतकरी, संशोधक आणि निर्यातदार सहभागी झाले होते.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 07, 2025 03:49:51
Nashik, Maharashtra:नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीर जुडीला २०० रुपये असा दर मिळालाये .विशेष म्हणजे गेल्या गुरुवारी नाशिक बाजार समितीत झलेल्या चायना कोथिंबीर प्रति जुडीला लिलावात १७० रुपये (शेकडा १७ हजार ५० रुपये) असा बाजारभाव मिळालेला होता. काही दिवसांपूर्वी संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील कोथिंबिरीचे उभे पीक नष्ट झाल्यांने आवक घटल्याने कोथिंबीर मालाला यावर्षी २०० रुपये प्रति जुडी (२० हजार रुपये शेकडा) असा हंगामातील उच्चांकी दर मिळाला आहे. गेल्या आठवड्यात पावसामुळे पीक खराब झाले, त्यात कोजागरी पौर्णिमा असल्याने, सोमवारी बाजार समितीत कोथिंबीर आवक कमी आल्याने बाजार तेजीत आले. बाजार समितीत जवळपास ५३ हजार जुड्यांची आवक आली होती.
2
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 07, 2025 03:48:48
Baramati, Maharashtra:सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सुप्रिया सुळेंचं बारामतीत मौन आंदोलन...बारामतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर करणार आंदोलन.... सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये मौन आंदोलन करणार आहेत. बारामती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सकाळी साडेनऊ वाजता मौन आंदोलन केलं जाणार आहे. सुप्रिया सुळे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top