Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421506

अंबरनाथ-बदलापूर स्टेशन के बीच तकनीकी खराबी, लोकल ट्रेनें रुकावट में

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 07, 2026 10:05:41
Ambernath, Maharashtra
अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड अप आणि डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकातून सीएसएमटीकडे जाणारी 2 वाजून 11 मिनिटांची लोकल बदलापूर स्थानकातच रखडली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Mar 07, 2026 11:16:04
Chandrapur, Maharashtra:राज्य सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी चंद्रपुरात अन्नत्याग सत्याग्रह करणाऱ्या बंडू धोत्रे यांच्या उपोषण मंडपापुढे सद्बुद्धी महायज्ञाचे आयोजन, चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारडोंगरी लोहखाण रद्द करण्यासह मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी एकूण 17 मागण्यांसह सत्याग्रहाला बसले आहेत बंडू धोत्रे, आजचा तिसरा दिवस असूनही महाराष्ट्र शासन, वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाने चालविले आहे दुर्लक्ष चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या घनदाट जंगलात प्रस्तावित लोहारडोंगरी लोहखाण रद्द करा या मागणीसाठी चंद्रपूरचे वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाचा आजचा तिसरा दिवस असूनही महाराष्ट्र शासन, वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी इको प्रो संघटनेने गेली काही वर्षे प्रमुख मागण्यांसह पाठपुरावा चालवला आहे. या मागण्या त्वरित मान्य करा ,लोहारडोंगरी खाण रद्द करा यासाठी राज्य शासनाला सद्बुद्धी यावी म्हणून हा अन्नत्याग सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे. उपोषण मंडपापुढे सद्बुद्धी महायज्ञाचे आयोजन करून परमेश्वर राज्य शासनाला सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करण्यात आली. बाईट १) डॉ. योगेश्वर दूधपचारे, पर्यावरण अभ्यासक बाईट ३) प्रा. दिलीप चौधरी ,जिल्हाध्यक्ष ,संभाजी ब्रिगेड आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 07, 2026 11:10:10
Akola, Maharashtra:८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिवस , महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस. अशाच एका जिद्दीची आणि संघर्षाची प्रेरणादायी कहाणी अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथील अत्यंत सामान्य कुटुंबातील प्रज्ञा इंगळे हिची Indo‑Tibetan Border Police या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात निवड झाली आहे. तिचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून ती आता सिक्कीम येथे देशसेवे बजावणार आहे. हलाखीच्या परिस्थितीतही प्रज्ञाने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश मिळवले असून छोट्याशा डोंगरगावातून सैन्य दलात दाखल होणारी ती पहिली महिला ठरली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रज्ञाच्या वडिलांना तिचा अभिमान वाटत आहे तर मुलीचा यश पाहून वडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रज्ञा सैन्य भरतीसाठी सातत्याने प्रयत्न करत होती. अभ्यास आणि सराव यासाठी ती दररोज पहाटे पाच वाजता उठून रनिंग व व्यायाम करत असे. अनेक वेळा अपयश आले, पण “फौजी” होण्याचे स्वप्न तिने कधीच सोडले नाही. कठोर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आज तिचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण झाले आहे. प्रज्ञाचे वडील गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई मोलमजुरी करते. प्रज्ञाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे झाले, तर पुढील शिक्षण शहरात झाले. अत्यंत साध्या परिस्थितीतूनही प्रज्ञाने मिळवलेले हे यश संपूर्ण डोंगरगावसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. तिच्या कामगिरीबद्दल गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. शालिनी इंगळे, प्रज्ञाची आई. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रज्ञा इंगळेची ही यशोगाथा अनेक मुलींना प्रेरणा देणारी ठरली आहे. मनात जिद्द, मेहनत आणि देशसेवेची भावना असेल तर कोणतीही अडचण ध्येयाच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही, हे प्रज्ञाने सिद्ध करून दाखवले आहे. जयेश जगड, झी मिडिया, अकोला
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 07, 2026 10:48:51
Jalna, Maharashtra:जालना : सालगड्याच्या मुलानं मिळवलं UPSC मध्ये यश,812 वा रँक मिळवून मिळवलं यश अँकर : जालन्यातील एका सालगड्याच्या मुलानं यूपीएससी परीक्षा सर करत यश मिळवलं आहे.जालन्यातील जळगाव सपकाळ येथील भिकन रोजेकर असं यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.भिकनचे वडील जगन रोजेकर हे सालगडी म्हणून काम करतात तर आई बेबीताई यामोलमजुरी करतात.त्यांच्याकडे अवघी 2 एकर जमीन असून सध्या ते टिनपत्रांच्या शेडमध्ये राहतात.भिकनने याआधी 4 वेळा यूपीएससी परीक्षा दिली मात्र यश मिळालं नाही अखेर पाचव्या प्रयत्नात मात्र त्याने देशातून 812 वा रँक मिळवत यशाला गवसणी घातली.दरम्यान भिकने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानं त्याचं अवघ्या जिल्ह्यातून कौतुक होत असून त्याचा जळगाव सपकाळ वासियांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 07, 2026 10:18:14
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात ५४५ गावांत संभाव्य पाणीटंचाई; १९ कोटींचा टंचाई निवारण आराखडा तयार, मेळघाटला सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनतो. यंदाही जिल्ह्यातील तब्बल ५४५ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईचा धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १९ कोटी ७ लाख ५५ हजार रुपयांचा टंकाई निवारण कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात तब्बल ७२२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नळयोजनांची दुरुस्ती, जलस्त्रोतांचे अधिग्रहण, खासगी विहिरींचे अधिग्रहण तसेच गरज भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजनांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात ५३७ नळयोजना, १ हजार ७७२ हातपंप, ३९९ विद्युत पंप तसेच १ हजार १७० सार्वजनिक आणि २ हजार ५६ खासगी विहिरींच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र उन्हाळा तीव्र होत असताना पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आधीच तयारी सुरू केली आहे. दरम्यान मेळघाटातील संपूर्ण पाणीटंचाईवर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली असून या संपूर्ण पाणीटंचाईला शासन जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटला आहे. गेल्या अनेक वर्षापासून मेळघाटात योजना राबवल्या जात आहेत मात्र तरीही इथे पाणीटंचाई कायम असून गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी मी मेळघाटच्या पाणीटंचाईचा दौरा केला असून तिथे पाणीटंचाई असल्याचं आदिवासी बांधवांनी सांगितला आहे. मेळघाटातील जलजीवन मिशनच्या योजना पैसे नसल्याने कंत्राटदारांनी बंद केल्याने मेळघाटात अजून भीषण पाणीटंचाई झाली असल्याचा गंभीर आरोप बळवंत वानखडे यांनी केला आहे. तसेच जलजीवन मध्ये सातत्याने भ्रष्टाचार होत असल्याचंही खासदार बळवंत वानखडे यांनी म्हटला. Upcoming काळात जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये १४३ खासगी विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय २८६ ठिकाणी नळयोजनांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. दरम्यान, सर्वाधिक संभाव्य टंचाई चिखलदरा आणि धारणी या मेलघाटातील तालुक्यांमध्ये भासण्याची शक्यता आहे. चिखलदरा तालुक्यातील ८३ तर धारणी तालुक्यातील ७५ गावांचा टंचाईग्रस्त गावांमध्ये समावेश आहे. विशेषतः चिखलदऱ्यातील १५ गावांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकूणच, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने १९ कोटी ७ लाख ५५ हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता देत ७२२ उपाययोजना राबविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना होणारी पाण्याची गैरसोय काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मेळघाटात सध्या विहिरीत आणि हॅन्ड पंपला पाणी नसल्याचं आदिवासी बांधव सांगत असून महिलांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वन वन फिरावं लागत असल्याचं आदिवासी बांधव सांगत आहे तसेच सिंगल फेज विद्युत पुरवठा असल्याने थ्री फेज विद्युत पुरवठ्याची मागणी आदिवासी बांधवत करत आहेत त्यामुळे आदिवासींना पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो. दरम्यान मेळघाटातील आदिवासींच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि मेळघाटातील समस्या समोर आणण्यासाठी बच्चू कडू यांनी मेळघाटात संघर्ष यात्रेचा आयोजन केले आहे. वनविभागाच्या जाचकटीमुळे मेळघाटातील आदिवासींना पाणी मिळत नसल्याचं बच्चू कडू यांनी म्हटला आहे त्यामुळे प्रशासनाने आमच्या डोक्यात फक्त गांधी आहे अस समजू नका, छत्रपतींची तलवारही निघू शकते असे म्हणत बच्चू कडूंनी प्रशासनाला ईशारा दिला आहे. फक्त बैठक घेऊन चालणार नाही असेही कडू म्हणाले आहे. उन्हाळा तीव्र होण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईचा अंदाज घेत ७२२ उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे. मात्र या योजना प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे राबवल्या जातात यावरच ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी धावपळ कमी होणार कि वाढणार हे अवलंबून असेल.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 07, 2026 09:45:20
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास काही केल्या कमी होताना दिसत नाही... शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडलीय. रस्त्यावरून जाणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने पुन्हा एकदा एका व्यक्तीवर हल्ला करत त्याचा पायाचा चावा घेतला आहे. भटक्या कुत्र्याचे टोळकं व्यक्तीवर हल्ला करून त्यांच्या पायाचा चावा घेत असतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील भटक्य कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिकेने भटक्या कुत्र्यांची नसबंदी योग्य प्रकारे केली नसल्याने शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न लवकर मार्गी लावावा असा अशी मागणी पिंपरी चिंचवडकर करत आहेत.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 07, 2026 09:33:41
Pune, Maharashtra:अमेरिका इराण इजरायल युद्धाचा मोठा फटका भारतीय शेतमालाला बसत असून कोट्यावधी रुपयांचा शेतीमाल जहाजांमध्ये अडकून पडलाय तर काही शेतीमाल पुन्हा माघारी भारतीय बाजारपेठेत शेतीमालाचे बाजारभाव गडगडलेत तर दुसरीकडे या युध्दाचा निर्यातदारांना मोठा फटका सहन करावा लागतोय निर्यात झालेला शेतीमाल हा ओमानच्या समुद्र ध्वनीत अडकून पडला असून अडकून पडलेला शेतमाल हा नाशवंत असल्याने याचा मोठा फटका निर्यातदार व्यापाऱ्यांसोबत शेतकऱ्यांनाही सहन करावा लागणार आहे तर अडकून पडलेल्या कंटेनर वरती शिपिंग कंपन्यांनी एक्स्ट्राचे शुल्क आकारले असून जवळपास चार हजार डॉलर सर चार्ज लावला आहे त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालून शिपिंग कंपन्यांना हा सर चार्ज कमी करण्याची विनंती करावी अशी मागणी आखादी देशात शेतामाल निर्यात करणारे निर्यातदार आशिष हांडे यांनी व्यक्त केलीय,यासंदर्भात त्यांनी शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सह केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्राद्वारे विनंती केलीय.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 07, 2026 09:33:10
Pimpri-Chinchwad, Maharashtra:शेअर मार्केट तसेच आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पिंपरी चिंचवड शहरातील एका व्यक्तीची तब्बल 11 कोटी 13 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सात आरोपींना पिंपरी-चिंचवड शहर सायबर पोलिसांनी महाराष्ट्र आणि राजस्थानातून अटक केली असून या प्रकरणात १ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम होल्ड करण्यात आली आहे. शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून आरोपींनी वेगवेगळ्या कारणांनी फिर्यादी कडे वारंवार पैसे मागवले. आरोपींनी फिर्यादींकडून एकूण 11कोटी 13 लाख रुपये घेतले, मात्र कोणताही परतावा दिला नाही. त्यामुळे फिर्यादीच्या तक्रारीवरून सायबर पोलिसात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी अभय बाबासाहेब पाटील, शिवतेज राजेंद्र पोटे, महेश करबसपा उडचणे ,राहुल बहादुरप्रसाद मौर्य , युवराज ऊर्फ संतोष सतीश मुदलीयार, पंकज मंगु गिरीगोस्वामी , प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी, या सात आरोपीला अटक केली असून या कारवाईत पोलिसांनी १ कोटी ८० लाख रुपये होल्ड करून पुढील तपास पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 07, 2026 09:31:04
Bhandara, Maharashtra:नवजात बाळ विक्री रॅकेटचा भंडाफोड… गोंदियाच्या डॉक्टरसह सहा जणांना अटक.... अल्पवयीन मुलीची प्रसूती आणि बाळ विक्री… डॉक्टरवर पोस्कोचा गुन्हा भंडारा जिल्ह्यात नवजात बालिकेच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळ विक्री केल्याचं धक्कादायक प्रकार समोर आलं आहे... पोलिसांनी या प्रकरणात डॉक्टरसह सहा जणांना अटक केली असून, या रॅकेटमधून आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत..... पाहूया हा विशेष रिपोर्ट... गोंदिया येथील डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी नवजात बाळ भंडारा येथील पांढराबोडी येथे अडीच लाखात विक्री केली होती... हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी डॉक्टर सह 6 आरोपींना अटक केली. तपास पुढे सुरू असताना आणखी एक बाळ विक्री प्रकरण उघड झाले. डिसेंबर महिन्यात आणखी एका नवजात बाळाची विक्री केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या बाळाला देखील ताब्यात घेतले. तपासात हे बाळ एका अल्पवयीन मुलीचे असल्याचे निष्पन्न झाले. परराज्यातील ही मुलगी गोंदिया येथे बालाजी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी आली होती. या प्रकरणात डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी प्रसूती करून हे बाळ भंडारा जिल्ह्यातील मोहगाव येथे चार लाख रुपयांत विक्री केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे मुलगी अल्पवयीन असतानाही प्रसूतीपूर्वी पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे भंडारा पोलिसांनी रामनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर नितेश वाजपेयी यांच्यावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळ विक्री केल्याचा गंभीर आरोप डॉक्टरवर आहे. मात्र डॉक्टर नितेश वाजपेयी हे स्त्रीरोगतज्ञ नसतानाही प्रसूती कशी झाली, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात प्रसूती करणाऱ्या इतर डॉक्टरांची भूमिका काय होती आणि त्यांच्यावर पोलिस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 07, 2026 09:06:46
Kalyan, Maharashtra:खडकपाडा पोलिसांनी सराईत इराणी चोरटा मोहम्मद इराणीला सापळा रचत आंबिवली येथील इराणी वस्तीतून बेड्या ठोकल्या आहेत.इराणीच्या अटकेचा थरार CCTV कॅमेरात कैद झाला आहे .या कारवाईमुळे आंबिवलीतील इराणी वस्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे . ठाणे येथील मानपाडा चितळसर पोलीस ठाण्यात चैन स्नेचिंगचा एक गुन्हा दाखल होता .या गुन्ह्यात मोहम्मद इराणी हा पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते .यात दरम्यान मोहम्मद इराणी हा कल्याण जवळील आंबिवली येथील इराणी वस्तीत लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली चितळसर पोलिसांनी याबत खडकपाडा पोलिसांना माहिती दिली .या माहितीच्या आधारे DCPअतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने आंबिवली इराणी वस्तीत सापळा रचला मोहम्मद इराणी दिसताचं इराणीने पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी मोठा धाडसाने मोहम्मद इराणी याला बेटा ठोकल्यात इराणी यांच्या अटकेचा हा थरात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं मोहम्मद इराणी याला खडकपाडा पोलिसांनी मानपाडा चित्तळसर पोलीसांच्या ताब्यात दिलं आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 07, 2026 09:02:50
Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते. बाइट - अमेरिका इजराईल मिलून इराणवर हल्ला सुरू केला आहे... याची झळ आता भारतापर्यंत पोहोचली आहे...सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे हे होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.. - इजराईलने युद्ध छेडण्याच्या दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधान जाऊन येतात... आमच्या देशाच्या पंतप्रधानांना ट्रॅप केल.... त्यामुळे याचा फटका आपल्या देशाला बसत आहे... - अमेरिकेच्या परवानगी नंतर रशियापासून भारत फक्त 30 दिवस तेल घेण्यास सांगितलं.म्हणजे भारताला चालवणार निर्देश देणारा अमेरिकेचे ट्रम्प कोण लागले आहे...त्याचा इशाऱ्यावर भारत चालत आहे....... भारताने करार करतांना अमेरिकेसमोर झुकलं असं दिसून येत आहे.... हे भारताला नुकसान पोचवणार आहे.. - कमर्शिकल गॅस कनेक्शन धारकांना सिलेंडर भरून मिळणार नाही मग हॉटेल इंडस्ट्री कोल्याप्रॅस होऊन कोरोना सारखी परिस्थिती निर्माण होईल.... - महागाई वाढेल, राज्यकर्त्यांना लाज वाटत नाही, आपलं धोरण चुकत आहे हे दुरुस्त करा असं वाटत नसेल, तर भारताची अधोगतीकडे वाटचाल चालली आहे हे आता सिद्ध झाल. रोहित पवार - राहुल गांधी भेट रोहित पवार अजित अजित पवार यांच्या विमाना अपघात प्रकरणात भेटत आहेत ... या प्रकरणाची सत्यता बाहेर काढण्यासाठी राहुल गांधी सुद्धा रोहित पवार यांच्याबरोबर राहतील असा विश्वास आहे... हा अपघात नसून घातपात आहे हे आता या बाबी समोर आल्या आहेत त्यावरून देशातील लोकांना कळून चुकल आहे...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 07, 2026 09:01:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिका क्षेत्रातल्या महापालिका शाळांचे काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून घेण्यात आली आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गटनेते युवराज गायकवाड यांनी सांगलीतल्या महापालिका शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेतलाय.यावेळी शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारया पोषण आहाराच्या दर्जाची देखील पाहणी केली,यावेळी थेट विद्यार्थ्यांसोबत पोषण आहाराचा आस्वाद देखील घेतला. महापालिकेच्या शाळांना भौतिक सोयी सुविधा पालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात नसल्याचा आरोप करत येत्या महासभेमध्ये यावर आवाज उठवला जाईल,असं विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 07, 2026 08:48:49
Beed, Maharashtra:बीड़ शहरातील अंकुश नगर भागात संदीप दहिफळे नामक तरूणाला तीन ते चार जणांनी अडवून धारदार शस्त्राने वार केला आणि लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केली. यामध्ये तरूणाला गंभीर इजा झाली असुन शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असुन सध्या बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार चार जणांनी धारदार शस्त्राने पाठीवर आणि धातीवर वार केले आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. छातीला, पोटाला आणि हाताला गंभीर इजा झाली आहे. या प्रकरणात MLC नोंद झाली असुन अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. गुन्हा दाखल करून न्याय देण्याची मागणी तरूणाच्या वडिलांनी केली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top