Back
डोंगरगाव की प्रज्ञा इंगळे ITBP में भर्ती, महिला दिवस पर प्रेरणा का सबक
JJJAYESH JAGAD
Mar 07, 2026 11:10:10
Akola, Maharashtra
८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिवस , महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस. अशाच एका जिद्दीची आणि संघर्षाची प्रेरणादायी कहाणी अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथील अत्यंत सामान्य कुटुंबातील प्रज्ञा इंगळे हिची Indo‑Tibetan Border Police या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात निवड झाली आहे. तिचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून ती आता सिक्कीम येथे देशसेवे बजावणार आहे. हलाखीच्या परिस्थितीतही प्रज्ञाने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश मिळवले असून छोट्याशा डोंगरगावातून सैन्य दलात दाखल होणारी ती पहिली महिला ठरली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रज्ञाच्या वडिलांना तिचा अभिमान वाटत आहे तर मुलीचा यश पाहून वडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येत आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रज्ञा सैन्य भरतीसाठी सातत्याने प्रयत्न करत होती. अभ्यास आणि सराव यासाठी ती दररोज पहाटे पाच वाजता उठून रनिंग व व्यायाम करत असे. अनेक वेळा अपयश आले, पण “फौजी” होण्याचे स्वप्न तिने कधीच सोडले नाही. कठोर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आज तिचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
प्रज्ञाचे वडील गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई मोलमजुरी करते. प्रज्ञाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे झाले, तर पुढील शिक्षण शहरात झाले. अत्यंत साध्या परिस्थितीतूनही प्रज्ञाने मिळवलेले हे यश संपूर्ण डोंगरगावसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. तिच्या कामगिरीबद्दल गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शालिनी इंगळे, प्रज्ञाची आई.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रज्ञा इंगळेची ही यशोगाथा अनेक मुलींना प्रेरणा देणारी ठरली आहे. मनात जिद्द, मेहनत आणि देशसेवेची भावना असेल तर कोणतीही अडचण ध्येयाच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही, हे प्रज्ञाने सिद्ध करून दाखवले आहे.
जयेश जगड,
झी मिडिया,
अकोला
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 07, 2026 12:20:540
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 07, 2026 11:54:350
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 07, 2026 11:54:160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 07, 2026 11:51:150
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 07, 2026 11:47:300
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 07, 2026 11:16:040
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 07, 2026 10:48:510
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 07, 2026 10:18:140
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 07, 2026 10:05:410
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 07, 2026 09:48:140
Report
KPKAILAS PURI
FollowMar 07, 2026 09:45:200
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 07, 2026 09:33:410
Report
KPKAILAS PURI
FollowMar 07, 2026 09:33:100
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 07, 2026 09:31:140
Report