Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

सोलापुर में आज अनियमित बारिश की संभावना, मौसम विशेषज्ञों ने चेतावनी दी

AAABHISHEK ADEPPA
Feb 04, 2026 03:31:25
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात आज अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज, हवामान तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला अंदाज - सोलापुरात हवेचा दाब कमी झाल्याने अवकाळी पाऊस पडण्याचा व्यक्त करण्यात आला अंदाज - शहराचे किमान आणि कमाल तापमान गेल्या आठवड्याभोरा पासून स्थिरच असल्याने थंडीचा प्रभावही कमीच - पश्चिमी चक्रवातामुळे हवेचा दाब आणखी खाली येण्याची हवामान तज्ञांनी वर्तवली शक्यता - जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्यासारखी परिस्थिती असल्याने ज्वारी, द्राक्षे, हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Feb 04, 2026 05:08:17
Washim, Maharashtra:वाशिम शहरातून जाणारा अकोला ते नांदेड राष्ट्रीय मार्गाला जोडणारा रस्ता सध्या नागरिकांसाठी मोठा धोका ठरत आहे. राष्ट्रीय महामार्ग ६१ शी जोडणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रस्त्याच्या भरावासाठी मोठ्या प्रमाणात काळी माती वापरली जाते असल्याने हा रस्ता टिकणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. वारंवार तक्रारी करूनही जिल्हा प्रशासनाकडून ठोस उत्तर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. महामार्गविभागाने तातडीने तांत्रिक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करून रस्त्याचे काम दर्जेदार करण्यात येईल अशी मागणी होत असून परिसरातील नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 04, 2026 05:00:30
Nagpur, Maharashtra:नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी गट नोंदणी संदर्भातील वडेट्टीवार गटाच्या अर्जात 6 त्रुटी असल्याचे त्यांना पत्रद्वारे कळवले आहे... त्यामुळे वडेट्टीवार गटाचा गट नोंदणीचा मुद्दा पुन्हा लांबणीवर गेला आहे... त्या सहा त्रुटींची पूर्तता केल्यास तुमची गट नोंदणी करता येईल असेही विभागीय आयुक्तांनी पत्राद्वारे वडेट्टीवार गटाचे प्रस्तावित गटनेते सचिन कत्याल यांना कळविले आहे... त्रुटी 1) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे निवडून आलेल्या 27 सदस्यांपैकी वडेट्टीवार गटाच्या गट नोंदणीच्या वेळेला फक्त 17 काँग्रेस सदस्य उपस्थित होते.. एक बसपा सदस्य होता 2) वडेट्टीवार गटाने उपस्थित केलेल्या त्यांच्या 17 सदस्यांमध्ये चंदा वैरागडे, शिला सीडाम, संजीवनी वासेकर आणि राहुल चौधरी या चार सदस्यांचाही समावेश केला आहे.. मात्र या चारही सदस्यांचा उल्लेख धानोरकर गटाच्या गट नोंदणीसाठीच्या अर्जामध्येही आहे... या चार सदस्यांच्या स्वाक्षरी दोन्ही गटांच्या अर्जामध्ये दिसून येत असल्यामुळे हे चार सदस्य नेमके कोणाच्या गटात आहेत या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाला स्पष्टता नाही... 3) वडेट्टीवर गटाने बहुजन समाज पक्षाच्या सोनिया उंदीरवाडे ह्याही त्यांच्या सोबत काँग्रेसच्या गटात सहभागी आहेत असा दावा केला आहे.. मात्र सोनिया उंदीरवाडे हे काँग्रेस सोबत गटात सहभागी होण्यासंदर्भात बहुजन समाज पक्षाची भूमिका काय या संदर्भातील स्पष्टता देणारे कुठलेही डॉक्युमेंट वडेट्टीवार गटाने सादर केलेले नाही... 4) वडेट्टीवार गटाने त्यांच्या गटात ज्या राहुल चौधरीचा उल्लेख केला आहे, ते गट नोंदणीच्या प्रक्रियेत दोन फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित नव्हते... 5) वडेट्टीवार गटाच्या गट नोंदणी संदर्भातील अर्जावर काँग्रेसचे चंद्रपूर शहर अध्यक्ष संतोष लहामगे यांनी आक्षेप नोंदवले असून गट नोंदणी संदर्भात वडेट्टीवार गटातील नगरसेवकांची बैठक केव्हा आणि कोणत्या अधिकाराने झाली यासंदर्भात संतोष लहामगे यांचे आक्षेप आहे..
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 04, 2026 04:50:05
Amravati, Maharashtra:अमरावती और यवतमाळ जिल्ह्यातील 16 हजार शासकीय कार्यालयांचा 24 तासासाठी विज पुरवठा खंडित; 439 कोटी थकीत वीजबिलांवर महावितरणचा इशारा. 12 फेब्रुवारीला 16,981 शासकीय कार्यालयांचा 24 तास वीजपुरवठा बंद केला जाणार असून 22 जानेवारीला 4 तास टोकन डिस्कनेक्शननंतरही बिल भरण्याकडे दुर्लक्ष केल्यास हा वीजपुरवठा खंडित होणार आहे. अमरावती जिल्ह्यात 8,191 कार्यालयांकडे 132.28 कोटी थकबाकी आहे तर यवतमाळ जिल्ह्यात 8,790 कार्यालयांकडे 306.52 कोटी थकबाकी आहे. 5,427 कार्यालयांनी एप्रिल 2025 पासून एकदाही बिल भरले नाही. त्यामुळे कारवाईनंतरही थकबाकी राहिल्यास कायमस्वरूपी वीज खंडितीचा करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 04, 2026 04:46:28
Kalyan, Maharashtra:तरुणीचा चेहरा ब्लर करावा कल्याण कोळसेवाडी पोलिसाचा अजब कारभार. लैंगिक अत्याचारातील आरोपीचे न्यायालयाने जामीन रद्द करत नॉन-बेलेबल वॉरंट काढूनही आरोपी फरार कल्याण कोळसेवाडी परिसरातील तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केलेल्या बलराज सिंगने बनावट कागदपत्रांद्वारे जामीन मिळवत न्यायालयाची दिशाभूल केल्याचे उघड झाले.न्यायालयाने जामीन रद्द करून नॉन-बेलेबल वॉरंट जारी केले असतानाही ५–६ महिन्यांपासून आरोपी फरार असल्याने संतप्त पीडितेने कोळसेवाडी पोलीस ठाण्याबाहेर रात्री ठिय्या आंदोलन केले माध्यमांच्या प्रश्नानंतर पोलिसांनी हरियाणात जाऊन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान आरोपीच्या पाठीशी राजकीय वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला असून, लवकर अटक न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर या प्रकरणी कलर कोरसडी पोलिसांनी अनेक वेळा पोलिसांची टीम हरियाणा येथे गेली असता आरोपी आपला मोबाईल बंद करून त्या ठिकाणी दुसरीकडे पळ काढत असल्याने आरोपीला पकडणे कठीण होत असल्याचे सांगत लवकरच त्याच्यावरती कारवाई करणार असल्याचे सांगितले मात्र सहा महिन्यापासून अनेक वेळा न्यायालयाने आदेश देऊनही आरोपी सापडत नसल्याने न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली पोलीस दाखवत असल्याचं सांगितलं जात आहे
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 04, 2026 04:19:15
Washim, Maharashtra:जिले में हवामानातील बदलांमुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होताना दिसत आहे.याचा थेट परिणाम शासकीय रुग्णालयांवर होत असून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.सर्दी,ताप,खोकला, अंगदुखी तसेच पोटदुखीच्या तक्रारी घेऊन नागरिक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल होत आहेत.विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्ध रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील ओपीडी तसेच औषध वितरण कक्षातही मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.दरम्यान,नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, स्वच्छता पाळावी आणि आजाराची लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 04, 2026 04:18:43
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस भूमीअभिलेख कार्यालयात दोन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. मालमत्तेच्या फेरफार कामासाठी आलेल्या एका महिले कडून پाच हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. तक्रारदार महिलेच्या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचत ही धडक कारवाई केली. या कारवाईत उपअधिक्षक सखाराम नरसिंग पवार आणि नझुल परिरक्षण भूमापक आशिष काशिनाथ शेलोकर यांना پाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. लाच स्वीकारल्यानंतर दोघांनीही रक्कम आपसात वाटून घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 04, 2026 04:15:55
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 04, 2026 04:06:49
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 04, 2026 04:06:00
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहर मनपा महापौर-उपमहापौर निवडणूक 10 फेब्रुवारीला होणार , 5 फेब्रुवारी आहे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, आतापर्यंत चंद्रपूर शहर मनपा नगर सचिवांच्या कार्यालयातून 10 उमेदवारी अर्जांची उचल झाली आहे. सर्वाधिक 8 अर्ज भाजप गोटातून नेले असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. तर काँग्रेसकडून 2 अर्ज उचलण्यात आले आहेत. 5 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरता येणार असून अर्ज भरतेवेळी महापौर पदाचा उमेदवार, सूचक आणि अनुमोदक स्वतः उपस्थित राहण्याची अट आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील सत्तेचा तिढा गुंतत चालला असताना कोणते पक्ष, कोणते गट, महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 04, 2026 04:05:37
Nashik, Maharashtra:नाशिक breaking - नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिला तडका फडकी राजीनामा - महापौर और उपमहापौर नाम निश्चिती वर सुनील केदार नाराज असल्याची माहिती - प्रदेश पातळीवरून आलेले महापौर आणि उपमहापौर नाव ऐनवेळी बदलण्यात आल्याने सुनील केदार यांनी राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती - महापौर पदासाठी हिमगौरी आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची झाली आहे निवड - महापौर ,उपमहापौर नाव निश्चित केल्यानंतर नाशिक भाजपात असलेली अंतर्गत नाराजी समोर - तसेच काही दिवसांपूर्वी सुनील केदार यांनी शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्यासाठी देखील दिला होता प्रस्ताव - याच प्रस्तावनानंतर आम्हाला सत्तेत कुणाची गरज नाही असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते - याच सगळ्या घडामोडीनंतर सुनील केदारे यांनी प्रदेश कामिटी ला पाठवला आपला पदाचा राजीनामा - नवीन व्यवस्था होईपर्यंत कामकाज करण्याची देखील सुनील केदारे दिली माहिती
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 04, 2026 04:05:24
Kolhapur, Maharashtra:विनापरवाना दारूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या व्यक्तीला करवीर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडील टेम्पोच्या हौद्यातील दीड लाखाची देशी विदेशी दारू आणि आठ लाखांचा टेम्पो जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या पथकाने बालिंगा इथ केलीय. वाईन शॉप, बीअर बारना अधिकृत दारूचा पुरवठा करण्याच्या बहाण्याने त्याच वाहनातून अनधिकृत दारू पोहोचविण्याचे काम शुभम कांबळेकडून केले जात होते. त्याने यापूर्वी अशी विक्री केल्याचा पोलिसांना संशय आहे. तो टेम्पो चालक आहे. टेम्पो मालकालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले आहे. दारूचा साठा व टेम्पो जप्त करून चालक कांबळे याला अटक केली.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 04, 2026 04:04:51
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 04, 2026 03:46:42
Navi Mumbai, Maharashtra:Anchor - नवी मुंबई मधील तुर्भे स्टोअर येथे शिवसेना शिंदे गटाच्या विजयी यात्रे दरम्यान कार्यकर्त्यांचा उन्माद नेत्यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झालेय. शिवसेना शिंदे गटाच्या विजयी यात्रे दरम्यान कार्यकर्ते आणि विजयी उमेदवाराच्या मुलाने निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप कार्यालय्या बाहेर येऊन अपमानजनक घोषणाबाजी तसेच कार्यालय्या बाहेर बिस्कीट फेकून संतापजनक कृत्य केलेय. याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करुन यामधील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने आजपासून नवी मुंबई पोलीस मुख्यालया बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेय. यामध्ये विजयी नगरसेवकाचा मुलगा महेश कुलकर्णी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेय. याप्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 04, 2026 03:46:15
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी हळद काढणीला सुरुवात झाली असून मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतात काम सुरू आहे.निसर्गाच्या लहरीपणाचा काहीसा परिणाम जाणवला असला,तरी यंदा हळदीचे उत्पादन समाधानकारक होणार असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.शिरपूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर हळदीची लागवड करण्यात आली असून हे पीक शेतकऱ्यांचे मुख्य वार्षिक उत्पन्नाचे साधन मानले जाते.सध्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने हळद काढणी केली जात असून मजुरांकडून हळदीची वेचणी व साफसफाईचे काम सुरू आहे.जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून हवामानाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top