Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

नवी मुंबई में शिवसेना शिंदे गट समर्थकों ने भाजपा कार्यालय के बाहर बिस्किट फेंके, भिड़ंत

SNSWATI NAIK
Feb 04, 2026 03:46:42
Navi Mumbai, Maharashtra
Anchor - नवी मुंबई मधील तुर्भे स्टोअर येथे शिवसेना शिंदे गटाच्या विजयी यात्रे दरम्यान कार्यकर्त्यांचा उन्माद नेत्यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झालेय. शिवसेना शिंदे गटाच्या विजयी यात्रे दरम्यान कार्यकर्ते आणि विजयी उमेदवाराच्या मुलाने निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप कार्यालय्या बाहेर येऊन अपमानजनक घोषणाबाजी तसेच कार्यालय्या बाहेर बिस्कीट फेकून संतापजनक कृत्य केलेय. याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करुन यामधील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने आजपासून नवी मुंबई पोलीस मुख्यालया बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेय. यामध्ये विजयी नगरसेवकाचा मुलगा महेश कुलकर्णी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेय. याप्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Feb 16, 2026 08:03:06
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांनी आपल्या पदाचा पदभार आज स्वीकारला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक आमदार विनय कोरे यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नूतन महापौरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागतही केलं. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा पहिल्यांदाच महापौर झाल्याचा आनंद सर्वांना झाल्याच सांगत नगरसेवकांनी कस काम केलं पाहिजे त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरपूर निधी देता येईल असे म्हटले. पदग्रहण समारंभा नंतर बोलताना नूतन महापौर रूपाराणी निकम यांनी महापालикेच्या कारभारात भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जाणार नाही अस स्पष्ट केले
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 16, 2026 07:31:34
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर शहराच्या जवळ असलेल्या भिंगार परिसरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आलं आहे. भिंगार परिसरातील असलेल्या वडारवाडी, नागरदेवळे परिसरामध्ये सकाळपासून बिबट्या फिरत असल्याचं नागरिकांना आढळून आल होतं. भर नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याची माहिती मिळतात भिंगार कॅम्प पोलीस तसेच नगर तालुका पोलीस घटनास्थळाला दाखल झाले. यानंतर वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माहिती कळल्यानंतर पथक दाखल झाले. सकाळपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या एका घराशेजारील बाथरूम मध्ये अडकला, तब्बल तीन तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर डार्ट मारुन बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश आलं. बेशुद्ध झाल्यानंतर जाळी टाकून त्याला जेरबंद करण्यात आल. बिबट्या पकडल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 16, 2026 07:04:46
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेत अनेकांना नेतृत्व करण्याची संधी मिळावी यासाठी भाजपाने सव्वा वर्षाचा एक स्वीकृत नगरसेवक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या पदाच्या खांडोळीनंतर स्वीकृत नगरसेवक पदाची देखील खांडोळी केली जात आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाजपा कार्यालयात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी याच्या पाच वर्षात बारा स्वीकृत नगरसेवक होतील अशी माहिती दिली आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 16, 2026 06:34:06
Satara, Maharashtra:कराड,सातारा- शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मलकাপूर शहरात व्हॅलेंटाईन डे ला घडली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला एका शिक्षकानेच ‘प्रपोज’ करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर शहरातील एका शाळेत पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलविले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली. मात्र शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबवले. “मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्स ॲपवर ऑनलाईन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो,” असे म्हणत तिचा हात पकडल्याचा आरोप आहे.घाबरलेल्या मुलीने हात झटकून वर्गात धाव घेतली. ही घटना तिने मैत्रिणी आणि कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. कराड शहर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 16, 2026 05:46:53
Beed, Maharashtra:बीडच्या तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरडी बुद्रुक या शिवारात एका पारधी वस्तीवर झालेल्या हल्ल्यात महिला आणि पुरुषांना मारहाण करण्यात आली. या घटनेत संसार उपयोगी साहित्याची नासधूस करत रब्बीची पिके उपटण्यात आली. या प्रकरणात पोलीस ठाण्यात 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेवराई तालुक्यातील टाकरवन शिवारात काही लोक पारधी वस्तीच्या परिसरात शेळ्या मेंढ्या चारत होते. यावेळी वस्ती वरील पायल काळे या मुलीने त्यांना विरोध केला. या कारणावरून जातिवाचक शिवीगाळ करत हल्ला करण्यात आला. यादरम्यान हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या इतरांवर देखील हल्ला चढविण्यात आला. यावेळी संसार उपयोगी सर्व साहित्याचे मोठे नुकसान करत नवी कोरी दुचाकी फोडण्यात आली तर शेतातील काढणीला आलेले गव्हाचे पीक उपटून टाकण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी जमाव पांगवला. तर या प्रकरणात एकूण 25 हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदविला गेला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 16, 2026 05:46:35
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 16, 2026 05:16:51
Nagpur, Maharashtra:नागपूर - जानेवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या टीईटी उत्तीर्ण शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाने दिलासा - नोव्हेंबर २०२५ प्रसिद्ध पदोन्नती यादीत नाव समाविष्ट करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा अंतरिम आदेश - गडचिरोली जिल्हा परिषदेला यादीत समावेशाचे निर्देश, अंतिम निर्णयापर्यंत आदेश लागू राहणार - ३३ शिक्षकांची उच्च न्यायालयात याचिका, १७ जानेवारी २०२६ रोजी टीईटी उत्तीर्ण, - २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पदोन्नती यादी प्रसिद्ध, त्या यादीत दहा ते बारा वर्षे अनुभव असलेल्या शिक्षकांचे नाव यादीत आहे... - २० ते २५ वर्षे सेवा असलेल्या शिक्षकांचा दावा केला होता, जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी सेवा जेष्ठता यादी मध्ये समावेश करण्याची विनंती केली होती मात्र ती अमान्य केल्यामुळे याचिका दाखल करण्यात आली. - राज्य सरकार आणि जिल्हा परिषद सीईओंना नोटीस, १२ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे खंडपीठांना निर्देश..
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 16, 2026 04:49:39
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 16, 2026 04:49:00
0
comment0
Report
Advertisement
Back to top