Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

जयकुमार गोरे ने राष्ट्रवादी नेता पर कड़ा हमला, साफ संदेश राजनीति का रंग साफ

SKSACHIN KASABE
Feb 02, 2026 03:31:03
Pandharpur, Maharashtra
सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ करण्याचे वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीच्या खासदाराची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार धुलाई केली आहे. सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार निमित्ताने भाजपची मुलुखमौदानी तोफ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची पळता भुई थोडी केली आहे. सोलापूर महापालिकेत एम आय एम पेक्षा यांची लायकी खाली आहे. आमचा सुपडा साफ करणाऱ्या मोहिते पाटील यांना छत भाजपाने दिलें आहे. ते काढल्या नंतर काय अवस्था होईल. संपलेले घराणे ज्या पक्षाने उभे केले. तुमचं जीवन ज्यानी उभे केल त्यांच्यावर टीका करता. अनेक लोकांचे संसार देशोधडीला लावले बँका कारखाने बुडवले जेवढे करता तेवढे पाप केले तरीही छाती वर करून कसे बोलता. असा प्रश्न त्यांनी मोहिते पाटील यांना विचारला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Feb 02, 2026 05:46:17
Kolhapur, Maharashtra:महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. हा अस्थिकलश मार्केट यार्ड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेकांनी दिवंगत अजित पवार याच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. या अस्थिकलशाचे दर्शन घेत असताना अनेकांना अश्रू आणावर झाले. दरम्यान यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र शुकसागरात बुडाला असल्याचं म्हटल आहे. तसेच हा अपघातच असल्याचे यापूर्वीच शरद पवार यांनी स्पष्ट केल्यामुळे यावर चर्चा करणे योग्य नसल्याचे सांगितलं. तसंच हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांच्या नाते संबंधांविषयी हसन मुश्रीफ यांना प्रश्न विचारताच ते भावुक झाले..
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 02, 2026 05:35:42
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर: खुल्या बाजारात तुरीच्या दरात मोठी वाढ झाली असून वाशिम जिल्ह्यात नव्या तुरीचे दर प्रतिक्विंटल ९ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीला कमाल ९,१५० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. अतिवृष्टीमुळे यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून बाजारात आवक कमी आहे. त्यामुळे दरवाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात ३.३७ लाख टन तुरीची हमीभावाने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा निर्णय जाहीर केला असून लवकरच शासकीय खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 02, 2026 05:18:21
Amravati, Maharashtra:अमरावती महापालिकेत आज ठरणार भाजपचा महापौर पदाचा उमेदवार; मिलिंद बांबल, ऋषिकेश देशमुख, आशिष अतकरे ही 3 नावे चर्चेत अमरावतीत भाजपचा महापौर करण्याच्या हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आला असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काल नागपुरात बैठक संपन्न झाली असून या बैठकीत मिलिंद बांबल, ऋषिकेश देशमुख, आशिष अतकरेया 3 नावांवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. कोअर कमिटीकडे अंतिम मान्यतेसाठी ही तीनही नावे पाठवली असून आज 11 वाजता कोर कमिटीची बैठक होणार असून यावेळी भाजप पुरुष महापौर देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 2 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असून 6 फेब्रुवारी रोजी अमरावतीला नवा महापौर मिळणार आहे मॅजिक फिगर जुडविण्यासाठी राजकीय हालचाली वाढल्या असून आकड्यांचे राजकीय गणित सुरू झाले आहे. दरम्यान महापालिकेत एकूण सदस्य 87 आहे तर बहुमतासाठी 44 सदस्यांची गरज आहे. भाजप कडे 25, युवा स्वाभिमान 15 तर शिंदेंच्या शिवसेनेकडे 3 नगरसेवक आहे. त्यामुळे भाजप, युवा स्वाभिमान आणि शिवसेनेचे एकूण 43 नगरसेवक होत असून BSP चे 3 नगरसेवक काय भूमिका घेतात हे महत्वाचे आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 02, 2026 05:03:44
Dhule, Maharashtra:राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 असलेल्या नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. महामार्गावरील पोलीस चौकीजवळ उभ्या असलेल्या एसटी बसला मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे बस समोर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली आणि दोन अवजड वाहनांच्या मध्ये अक्षरश चिरडली गेली. हा अपघात इतका भयानक होता की, समोरच्या ट्रकचा 10 ते 12 फुटांचा लोखंडी रॉड अँगल.बसचे लोखंडी पत्रे फाडून थेट केबिनमध्ये घुसला. यामुळे बसच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला असून चालक महेंद्र लांजा गावित यांचा पाय केबिनमध्ये अडकून पडला होता. स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून चालकाला सुखरूप बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच जामनपाडा सरपंच प्रियंका गावित यांचे बंधू मनोहर गावित यांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी तातडीने आपल्या खासगी वाहनातून गंभीर जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर उपचार मिळू शकले. घटनास्थळी परिवहन विभागाचे निरीक्षक मुकेश देवरे दाखल झाले असून ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णत ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 02, 2026 05:03:28
Chandrapur, Maharashtra:टायटल: चंद्रपूर मनपा सत्ता स्थापनेत महत्त्वाची घडामोड; भाजप-शिवसेनेचा एकत्रित गट स्थापनेसाठी 24 नगरसेवक नागपूरकडे रवाना; शेखर शेट्टी यांनी गटनेतेपदी निवड निश्चित. अँकर: चंद्रपूर शहर मनपा सत्ता स्थापनेत महत्त्वाची घडामोड पुढे आली आहे. भाजपचे 23 आणि शिवसेनेचा 1 असे 24 नगरसेवक एकत्रित गट स्थापनेसाठी नागपूरकडे रवाना झाले आहेत. प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेले शेखर शेट्टी यांची गटनेतेपदी निवड निश्चित झाली आहे. नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी हे सर्व नगरसेवक एका बसमधून रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर मनपावर भाजपचा महापौर बसेल असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 02, 2026 04:35:53
Washim, Maharashtra:कारंजा तालुक्यातील कामरगाव–कुऱ्हाड शेत रस्त्यावर लघु पाटबंधारे विभागाकडून ओव्हरफ्लोचे पाणी सोडल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. फेब्रुवारी महिन्यातही शेतकऱ्यांना पाण्यातूनच शेतात जावे लागत असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. शेत रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, याबाबत शेतकऱ्यांनी कारंजा तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप असून, रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून ओव्हरफ्लोचे पाणी थांबवावे, अन्यथा उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनला दिला आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 02, 2026 04:32:26
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 02, 2026 04:20:18
Vasai-Virar, Maharashtra:वसईत सापडले मानवी अवशेष, अंधश्रद्धा भानमतीचा प्रकार की खून... माणिकपूर पोलिसांचा तपास सुरू... माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं आहे. माणिकपूर परिसरातील नवपाडा मध्ये बारकुल्या नावाची चाळ आहे आणि या चाळीच्या वर ही पाण्याची टाकी आहे गेल्या 30 वर्षापासून ही टाकी वापरात नव्हती परंतु सध्या या टाकीचा दुरुस्तीसाठी बिल्डिंग वर पत्र टाकण्याचा काम सुरू होतं. पाण्याची टाकी वापरत नसल्याने ती तोडण्याचा काम सुरू होतं. त्याच वेळेला मजुरांना मानवी शरीराची कवटी आणि काही हाड सापडली त्यामुळे भीतीच वातावरण पसरलं. त्या संपूर्ण प्रकरणाची माहिती देऊन पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी दिवसा तपास पूर्ण करण्याचा विचार केला. दोन वर्षांपूर्वी या इमारतीमध्ये गॅस लिक होऊन गुदमरून दोन ते तीन मजुरांचा मृत्यू झाला होता. जवळपास आठ ते दहा लोकं चाळीमध्ये राहतात. महानगरपालिकेचे पाणी वर चढवलं जातं त्यामुळे टाकीचा वापर केला नव्हता. ही हाडे नेमकी कोणाची आहेत हे फॉरेन्सिक तपासानंतरच स्पष्ट होईल. काहींचा असा अंदाज आहे की भानामती अंधश्रद्धेच्या दृष्टीकोनातून ही हाडे कोणीतरी आणली असावी का, तपास केला जाणार आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 02, 2026 03:33:52
Nashik, Maharashtra:नाशिकरोडमध्ये अल्पवयीन मुलगी बेपत्ता.... अज्ञात व्यक्तीवर फूस लावून पळवून नेल्याचा संशय... नाशिक मध्ये अल्पवयीन मुलं-मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले... दररोज दोन ते तीन मुलं मुली बेपत्ता होण्याच्या घटना समोर येत आहेत... नाशिक मध्ये अल्पवयीन मुलं व मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून रोज नाशिक मधून दोन ते तीन अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होता आहे नाशिक रोड परिसरातून एक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलगी राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडली. मात्र त्यानंतर ती परतलीच नाही.कुटुंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र मुलगी आढळून न आल्याने अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात
0
comment0
Report
Advertisement
Back to top