Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

पंढरपुर के जिजामाता उद्यान में गुणवत्ता की कमी पर हंगामा

SKSACHIN KASABE
Feb 24, 2026 04:36:36
Pandharpur, Maharashtra
पंढरपूर शहर के जिजामाता उद्यान के काम में गुणवत्ता की कमी का आरोप मनसे नेता दिलीप धोटरे ने लगाया है। अभी उद्यान शुरू होना है, पर इस उद्यान के पेविंग ब्लॉक, कंपाउंड वॉल, खेल मैदान आदि पर धोटरे ने आपत्ति जताई है। नगरपालिका ने इस काम की क्वालिटी कंट्रोल से चौकसी करनी चाहिए। संबंधित ठेकेदार दोषी पाए जाने पर उसके विरुद्ध कानूनी कार्रवाई की जाए, अन्यथा मनसे की ओर से आंदोलन किया जाएगा।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Feb 24, 2026 06:48:39
Buldhana, Maharashtra:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बाईट पॉईंटर... #हनुमंत पवार मारहाण, काँग्रेसची भूमिका घाशीराम कोतवाल यांच्या स्वरूपात देवेंद्र फडणवीस काम करत आहेत राज्य मध्ये कुठलीही कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही.. भाजपने पुण्याचा तालिबान केलाय... (१.३३ सेकंद) #शरद पवार महाविकास आघाडीचे राज्यसभेचे उमेदवार, यावर... मित्र पक्षाची बैठक होईल, बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करू.. यासंदर्भात काँग्रेसचा दावा आहे, शिवसेनेची भूमिका आहे..राष्ट्रवादीची भूमिका समजून घेऊन निर्णय घेतला जाईल... (२४ सेकंद) #राज्यसभेसाठी पार्थ पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब... तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, मात्र राज्यसभेवर पाठवताना महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, सभ्यता आहे ती ध्यानात घेऊन नाव सुचवाव ही अपेक्षा... (१५ सेकंद) #नरहरी झिरवाळ क्लिनचीट... हे क्लिनचीट बहाद्दर सरकार आहे.. मुख्यमंत्री स्वतः आणि सरकार भ्रष्ट असल्यामुळे ते प्रत्येक भ्रष्टाचाराला पाठीशी घालतात... (२३ सेकंद) #एअर ॲम्बुलन्स अपघात.. ताबडतोब चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, बारामतीच्या विमानात अपघात आणि आता झालेल्या अपघाताचे काही साम्य आहे का..हे देखील तपासले पाहिजे... (२१ सेकंद) #सांगली महापालिकेमध्ये काँग्रेसमध्ये गटबाजी... चंद्रपूर मध्ये 27 नगरसेवक आम्ही एक संघ आहोत, सांगलीतील खासदार आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम हे सर्व नगरसेवक एकसंघ ठेवतील... (३७ सेकंद) #राजीव गांधी प्रमाणे सुसाईड बॉम्ब नुसार अजित दादांचे हत्या झाली का, अमोल मिटकरी यांचा संशय... अनेक प्रश्न उपस्थित होत आहे मात्र यांचे उत्तर शोधणारा तपास पुढे जात नाही हे दुर्दैव आहे.. सर्व शंका तंत्रशुद्ध आहेत स्वभाविक आहेत... (३२ सेकंद) #बांगलादेशी वर कारवाईसाठी किरीट सोमय्या मालेगाव मध्ये... किरीट सोमय्या यांनी मालेगाव किंवा इतर ठिकाणी जाण्याआधी त्यांनी दिल्लीत जावं, बारा वर्षापासून मोदी सरकार आहे त्यांनी एकही बांगलादेशी पकडला नाही याचा जाब विचारावा, त्यांना हिंदू मुस्लिम जातीय दंगल निर्माण करण्याची मोठी हौस आहे.. त्यांनी त्यांच्या हौशीवर वावर घालावा... (३७ सेकंद) #राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू उद्या शेगाव दौऱ्यावर... त्यांचे जिल्हात स्वागत आहे, बुलढाणा जिल्ह्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांनी निर्णय घ्यावा, बुलढाणा जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये खारपान पट्ट्यापासून शेतमालाच्या प्रक्रिया प्रकल्प याबाबतीत त्यांच्याकडून अपेक्षा आहेत.. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे, कुपोषण आहे.. जलजीवन मिशन मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे.. या सगळ्या मुद्द्यांवर महामहीम निर्देश देतील अशी आशा आहे... (५३ सेकंद) बाईट - हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 24, 2026 06:33:03
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तब्बल १.७५ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. अ वर्ग खरेदीदार परवाना धारक व्यापाऱ्याने अडत्यांच्या माध्यमातून ८४२८.६६ क्विंटल सोयाबीन उधारीवर खरेदी करत बाजार फी आणि देखरेख शुल्क थकीत ठेवल्याने शेतकरी, अडते आणि व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘सालासार ट्रेडर्स’चे व्यापारी सुनील अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अडत्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मागील तीन महिन्यांत अडत्यांमार्फत ८४२८.६६ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली. खरेदीवेळी “२० फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपूर्ण रक्कम अदा करू” असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र मुदत संपल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांचे मोबाईल बंद लागले असून निवासस्थानही रिकामे आढळले. या प्रकरणात शेतकरी, अडते, बाजार समिती आणि शासन अशी मिळून सुमारे १.७५ कोटी रुपयांची देणी थकीत असल्याचे समोर आले आहे. तसेच बाजार समितीची तब्बल ९.१९ लाख रुपयांची बाजार फी व देखरेख शुल्कही न भरल्याचे निदर्शनास आले आहे. मागील तीन महिन्यांपासून इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरू असताना अडते आणि संचालक मंडळ काय करत होते? याबातOptional:काय पुढे? (आम्ही उपलब्ध तपशील) या विषयांवर अधिक चौकशी सुरु आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल झाली असून गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. शेतकरी व व्यापारी समाजाकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलीस प्राप्त तक्रारीनुसार सर्व आर्थिक व्यवहारांची छाननी करत असून संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, या कथित १.७५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांचा प्रश्न असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे. आता पोलीस तपासातून नेमकी सत्यस्थिती काय समोर येते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 24, 2026 06:16:07
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीतील आयरे गाव परिसरातील समर्थ कॉम्प्लेक्स येथे रेरा घोटाळ्यातील ६५ इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नावर भाजपच्या वतीने बैठक पार पडली. या बैठकीत भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी ठाम भूमिका घेत, उल्हासनगरच्या धर्तीवर शासन निर्णय काढून संबंधित इमारती अधिकृत करण्याची मागणी केली. समर्थ कॉम्प्लेक्स येथे राहिवासी व भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत म्हात्रे यांनी सांगितले की, रेरा घोटाळ्यात नागरिकांची फसवणूक झाली असून त्यामध्ये रहिवाशांचा कोणताही दोष नाही. त्यामुळे इमारतींवर कारवाई करण्याऐवजी शासनाने त्यांना अधिकृत करून दिलासा द्यावा. आम्हाला क्लस्टर योजना नको, इमारती तोडू नका. रहिवाशांना बेघर करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. जर प्रशासनाने कारवाईचा मार्ग स्वीकारला, तर त्याचे परिणाम भोगण्यास तयार राहावे. भाजप रहिवाशांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे,असा इशारा त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला दिला. तसेच, आम्ही सुरुवातीपासून या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहोत. आम्हाला कोणताही श्रेयवाद करायचा नाही. मात्र काही जण नोटिसा पाठवून, क्लस्टरचे आश्वासन देत येथे येतात आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात,असा टोला त्यांनी नाव न घेता आमदार राजेश मोरे यांना लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बैठकीदरम्यान रहिवाशांनीही आपली व्यथा मांडत, अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे कर व इतर शुल्क भरत असूनही इमारतींना अनधिकृत ठरवण्याची कारवाही अन्यायकारक असल्याचे सांगितले. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली. दरम्यान, या प्रकरणी पुढील काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 24, 2026 06:15:38
Chendhare, Maharashtra:माणगाव बायपासच्या कामात स्थानिकांचा खोडा; तक्रारी करून कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न; कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार समोर; एप्रिल अखेर बायपासचे काम पूर्ण करण्याचा मानस; कामात सहकार्य करण्याचं आवाहन. मुंबई गोवा महामार्गाच्या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या माणगाव येथील बायपासचे काम एप्रिल अखेर पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी वायुवेगाने काम सुरू आहे. मात्र या कामात स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात अडथळा येत असल्याची तक्रार आहे. यामुळे काम रखडण्याची शक्यता आहे. वेगवेगळी कारणे पुढं करून स्थानिकांकडून कामात खोडा घातला जात आहे, कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार देखील घडले आहेत. यापूर्वी दोन ठेकेदार जाचाला कंटाळून काम सोडून गेले आता तिसऱ्या ठेकेदाराकडून काम केले जात आहे. कामाचा उरक चांगला असला तरी स्थानिकांच्या जाचामुळे कामावर परिणाम होत आहे. चांगल्या दर्जाचे काम वेळेत व्हावे यासाठी स्थानिकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 24, 2026 05:49:56
Yeola, Maharashtra:कांदा व मका या शेतीमालाच्या बाजारभावात झालेल्या तीव्र घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून आजच्या बाजारभावात उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कांदा व मका उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलावादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडले यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले असून शासनाने त्यांच्या विविध मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी भूमिका उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी घेतली आहे मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, आजपर्यंत विक्री झालेल्या तसेच पुढील विक्री होणाऱ्या कांद्याला प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे, तसेच गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून खरेदी केलेल्या मक्याचे थकीत पेमेंट तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, यांचा समावेश आहे. याशिवाय मका हमीभाव खरेदी केंद्राची खरेदी मर्यादा वाढवून हमीभाव खरेदी प्रक्रियेला गती द्यावी, तसेच अन्य प्रलंबित प्रश्नांसह एकूण आठ मागण्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला आहे
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 24, 2026 05:38:32
Shirdi, Maharashtra:Akole News Flash मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने पुन्हा एकदा लाँगमार्चची हाक.. काही वेळातच राजूर येथून निघणार लाँग मार्च... राजुर येथून निघणाऱ्या लाँग मार्च मध्ये जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक जमा होण्यास सुरुवात... पालकमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही न्याय मागणार , तिथं न मिळाल्यास आम्ही अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन बसणार , आंदोलकांचा इशारा... मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांचे वतीने लॉंगमार्चचे आयोजन... शेतकरी, कर्मचारी, कामगार आणि श्रमिक मोठ्या संख्येने होणार सहभागी... काही वेळातच होणार लाँग मार्चला राजूर येथून सुरुवात.... किसान सभेचे डॉ.अजित नवले यांच्या नेतृत्वात लाँग मार्चचे आयोजन... आंदोलनकर्त्यांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी.... मागण्या - शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या... अंगणवाडी मदतनीस , शालेय पोषण आहार कर्मचारी वेतनवाढ मागणी... मागील लाँग मार्चवेळी पालकमंत्र्यांनी दिलेली पण न पाळलेली आश्वासने... नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे संदर्भातील भूमिका , इतर स्थानिक प्रश्न...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 24, 2026 05:38:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठा आरक्षण बाबत एक धक्कादायक माहिती पुढं आली आहे, मनोज जरांगे यांचे मुंबई येथील आंदोलन संपल्यावर तात्काळ हैद्राबाद गॅजेतीयर लागू करू आणि त्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देऊ असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते मात्र तब्बल 6 महिन्यांतरही या गॅजेट च्या अनुषंगाने कार्यपद्धती राज्य सरकारने ठरवली नाहीय, महत्वाचं म्हणजे कार्यपद्धती ठरवली नसल्याने अर्ज कमी येताय आणि प्रमाणपत्र कमी वाटप झाले यांची कबुली सरकारने 20 फेब्रुवारीला काढलेल्या आदेशात दिली आहे, त्यामुळं याबाबत सरकारने आता एक नवी समिती स्थापन केलीय, आणि या समितीने कार्यपद्धती ठरवायची आहे.. संभाजी नगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या देखरेखे खाली ही समिती स्थापन करण्यात आलीय... ही समिती कार्यपद्धती ठरवेल आणि त्यानंतर राज्य सरकार त्याला मंजुरी देईल आणि त्यानंतर प्रमाणपत्र वाटपाला वेग येईल त्यामुळं सरकारने आश्वासन तत्काळ बाबत दिले होते मात्र तब्बल 6 महिन्यानंतर आता कुठं कार्यपद्धती ठरकण्याच्या हालचाली सुरू आहेत, ही उदासीनता नाहीतर आणखी काय असा सवाल आता केल्या जातोय, मराठा आरक्षण साठी मंत्रिमंडळ उपसमिती चे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता दिरंगाई बाबत खुलासा करावा अशी मागणी होतेय...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 24, 2026 05:17:57
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:कन्नडच्या नादरपुर शिवारात बिबट्याचा वावर; बिबट्या सीसीटिव्ही मध्ये कैद; ANC  कन्नड तालुक्यातील नादरपुर शिवारात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  गावात  पाळीव कुत्र्यावर  बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली, ही संपूर्ण घटना शेतामध्ये लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पहाटेच्या शांत वातावरणात बिबट्याने गोठ्याच्या परिसरात प्रवेश करून घातल्याचे स्पष्टपणे चित्रीकरणात दिसून येते. सकाळी ही घटना निदर्शनास येताच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नादरपूर येथील शेतकरी दादाराव दत्तू निकम यांच्या शेतामध्ये असलेल्या जनावरांच्या बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे हे निदर्शनास आली.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 24, 2026 05:04:49
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:साखर विक्रीच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप करत सांगलीमध्ये राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या समोर कोल्हापूरच्या जयसिंगपूर येथील एका कुटुंबाने आंदोलन केले आहे. धरणे आंदोलन करत राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या महिला अधिकारी व पतीकडून संगनमताने दोन कोटी 87 लाखांची फसवणूक केल्याची आरोप करण्यात आला आहे. विक्रम पाटील नामक व्यक्तीने अधिकारी असणारया पत्नीच्या संगनमताने गणेश शुगरच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप रणजीत जाधव यांच्याकडून करण्यात आला आहे. तर राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांकडून या आंदोलनाची दखल घेत, योग्य ती चौकशी करून वरिष्ठांकडे याबतचा अहवाल पाठवला जाईल, असे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान आर्थिक फसवणुकीचा आरोप झालेल्या विक्रम पाटील यांनी, रणजीत जाधव यांच्या आरोपांचा खंडन करत कोणत्याही प्रकारची फसवणूक करण्यात आली नसून या आरोपांच्या बाबतीत कोल्हापूर न्यायालयामध्ये खटला सुरू असल्याचं स्पष्टीकरण विक्रम पाटील यांनी दिले आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 24, 2026 05:03:42
Junnar, Pune, Maharashtra:जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथे चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकत 25 लाखांचा ऐवज लांपास केलाय, घरातील व्यक्तींना मारहाण करत 15 तोळे सोन्याचे दागिने तर 10 तोळे चांदिचे दागिन्यांसह काही रोख रक्कम हि चोरट्यांनी चोरून नेलीय. राजेंद्र कोरडे, नितीन कोरडे दिपाली कोरडे यांना मारहाण करत मुलांच्या अंगावरील दागिने हि ओरबाडून घेत मारहाण केलीय, चोरीचा हा थरार 20 मिनिटे सुरू होता, यात चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला तर चार चोरट्यानी बाहेरून दरवाजा बंद करत हा सशस्त्र दरोडा टाकलाय, दरोड्याच्या या घटनेमुळे परिसरात खबर ATIचं वातावरण पसरलं असून या चोरट्यांना जेरबंद करण्याच मोठ आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांपुढे असणार आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 24, 2026 05:02:43
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 24, 2026 04:49:42
Amravati, Maharashtra:बोगस जन्म दाखल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी अमरावती महापालिकेत घेतली बैठक सापडली वादाच्या भोवऱ्यात; सोमय्यांना बैठक घेण्याचा अधिकार आहे ka काँग्रेसचा सवाल महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावतांनी आयुक्तांना पत्र देत बैठकीची वैधता आणि कायदेशीर आधार या मुद्द्यांना घेऊन खुलासा मागितला आहे. स्पाइनलॅस ऍडमिनिस्ट्रेशन' म्हणत काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी महापालिका आयुक्त सौम्य चांडक यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे. अमरावती महापालिकेत किरीट सोमय्या यांनी नियमबाह्य बैठक घेतल्यावरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून महाराष्ट्रात हजारो माजी खासदार आहे ते अशी बैठक घेऊ शकतात का असा सवाल डॉ. सुनील देशमुख यांनी प्रशासनाला उपस्थित केला आहे. बैठक पूर्णतः असविधानिक, आणि आक्षेप घेणारी असल्याचेही डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे. किरीट सोमय्यांची बैठकीवरून महापौर आणि आयुक्तांमध्ये एकमेकांवर ढकलाढकली सुरू आहे, असंही सुनील देशमुख म्हणाले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top