Back
मूठिजापूर कृषि उत्पन्न बाजार समिति में 1.75 करोड़ के कथित आर्थिक घोटाले का मामला
JJJAYESH JAGAD
Feb 24, 2026 06:33:03
Akola, Maharashtra
Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तब्बल १.७५ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. अ वर्ग खरेदीदार परवाना धारक व्यापाऱ्याने अडत्यांच्या माध्यमातून ८४२८.६६ क्विंटल सोयाबीन उधारीवर खरेदी करत बाजार फी आणि देखरेख शुल्क थकीत ठेवल्याने शेतकरी, अडते आणि व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘सालासार ट्रेडर्स’चे व्यापारी सुनील अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अडत्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मागील तीन महिन्यांत अडत्यांमार्फत ८४२८.६६ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली. खरेदीवेळी “२० फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपूर्ण रक्कम अदा करू” असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र मुदत संपल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांचे मोबाईल बंद लागले असून निवासस्थानही रिकामे आढळले. या प्रकरणात शेतकरी, अडते, बाजार समिती आणि शासन अशी मिळून सुमारे १.७५ कोटी रुपयांची देणी थकीत असल्याचे समोर आले आहे. तसेच बाजार समितीची तब्बल ९.१९ लाख रुपयांची बाजार फी व देखरेख शुल्कही न भरल्याचे निदर्शनास आले आहे. मागील तीन महिन्यांपासून इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरू असताना अडते आणि संचालक मंडळ काय करत होते? याबातOptional:काय पुढे? (आम्ही उपलब्ध तपशील) या विषयांवर अधिक चौकशी सुरु आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल झाली असून गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. शेतकरी व व्यापारी समाजाकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलीस प्राप्त तक्रारीनुसार सर्व आर्थिक व्यवहारांची छाननी करत असून संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, या कथित १.७५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांचा प्रश्न असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे. आता पोलीस तपासातून नेमकी सत्यस्थिती काय समोर येते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowFeb 24, 2026 08:19:500
Report
UPUmesh Parab
FollowFeb 24, 2026 08:16:230
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 24, 2026 08:02:290
Report
PNPratap Naik1
FollowFeb 24, 2026 08:01:390
Report
PNPratap Naik1
FollowFeb 24, 2026 08:01:210
Report
APAMOL PEDNEKAR
FollowFeb 24, 2026 07:47:520
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 24, 2026 07:32:480
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 24, 2026 07:32:040
Report
AKAMAR KANE
FollowFeb 24, 2026 07:30:270
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 24, 2026 07:17:060
Report
YKYOGESH KHARE
FollowFeb 24, 2026 07:04:110
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 24, 2026 07:03:540
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 24, 2026 06:48:390
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 24, 2026 06:16:24Jalna, Maharashtra:जालना : थेट समृद्धी महामार्गाच्या लेणवर येऊन द्राक्षांची विक्री, जालन्यातील कडवंची गावाजवळचा घातक प्रकार समोर. हायवे पोलिस करतात काय?
0
Report