Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

उरुण-ईश्वरपुर नगरपरिषद चुनाव: राष्ट्रवादी शरद पवार गट ने मलगुडे का नामांकन दाखिल किया

SMSarfaraj Musa
Nov 16, 2025 09:03:06
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - उरुण-ईश्वरपुरसाठी राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल.. अँकर - सांगलीच्या उरूण ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आनंदराव मलगुडे यांना उमेदवारी देण्यात आली असून आमदार जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.उरुण ईश्वरपूरनगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस संयुक्तपणे आघाडी करत निवडणूक लढवत आहेत.तर त्यांच्या विरोधात महायुती आणि जयंत पाटलांचे विरोधक एकत्रित आले आहेत.त्यामुळे अत्यंत चुरशीने नगराध्यक्ष पदासह इतर जागांसाठी लढत होत आहे. बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी शरद पवार पक्ष.
130
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Nov 16, 2025 10:36:15
Parbhani, Maharashtra:अँकर- हरिनामाचा व्यासंग लागलेल्या पांडुरंग नावाच्या एका कुत्र्याचे अकाली निधन झाल्याने सार गाव हळहळल,आज ही या गावातील नागरिकांना अश्रू अनावर होत आहेत. या श्वानाची उतराई म्हणून ग्रामस्थांनी टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत या श्वानाची अंत्ययात्रा काढली आणि गावातील मंदिराच्या पाठीमागे त्यांचा दफनविधी केला. या कलियुगात वृद्ध आई वडिलांना अनाथ आश्रमात टाकण्याची स्पर्धा लागली असतांना हे गावकरी मात्र एका कुत्र्यासाठी का हळहळ व्यक्त करीत आहेत,बघुयात हा खास रिपोर्ट या गावावर शोककळा पसरलीय,त्यामुळे गावातील लोक असे सुन्न झाले आहेत. गावातील विष्णू मांडे यांनी एका कुत्र्याच्या पिल्याची आई मरण पावल्या नंतर तिच्या एका पिल्याचा सांभाळ केला,त्याच्या घरच्या लोकांनी या कुत्र्याचे पांडू असे नाव ठेवले,सदर कुत्रा अतिशय इमानदार होता, घराच्या रखवाली बरोबर मांडे यांच्या आजारी मुलाचा तो सांभाळ करायचा,पण त्याला अध्यात्माचा व्यासंग लागला. माणोली गावात दररोज सकाळी 4 वाजता अध्यात्मिक प्रभात फेरी काढण्याची प्रथा आहे त्यात तो सहभागी होत असे, सकाळी मंदिरातील घंटा वाजला की तो मंदिरात यायचा, कीर्तन,प्रवचन,हरिपाठाचा पांडूला लळा लागला होता,तो तासन्तास तेथे बसून राहत असल्याने आणि धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याने येथील ग्रामस्थानी त्याला पांडूरंगाच्या नावाने हाक मारायला सुरुवात केली. पण अज्ञात वाहनांच्या धडकी पांडुरंगाचा अपघात झाला, त्याला वाचवण्याचा ग्रामस्थानी खूप प्रयत्न केला,पण पांडुरंगाला वाचविण्यात यश आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीये, पांडुरंगाला माणसाचा ला माणसांचा लळा लागला होता,गावात कुणाचा अंतविधी असेल तर तो तिकडे हजर असायचा,धार्मिक कार्यक्रमात त्याची आवर्जून उपस्थिती असायची,गावातील प्रत्येकाचा तो लाडका झाला होता,पण त्याच्या अश्या एकाएकी जाण्याचा ग्रामस्थांना धक्का बसलाय, गावातील नागरिकांनी पांडुरंगाच्या अंत्यविधीला मोठी गर्दी केली होती, टाळ मृदुंगासह दिंडी काढीत गावकर्यांनी त्याला अखेरचा निरोप देत,गावातील मंदिराच्या पाठीमागेच त्याचा दफणविधी केला. पांडुरंग हा गावकऱ्यांचा खूप लाडका होता,रखवाली बरोबरच तो अनेक अनपेक्षित मदत ग्रामस्थांना करायचा, त्यामुळे गावकऱ्यांना त्याचा लळा लागला होता,आजच्या युगात वृध्द आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवीन्याची स्पर्धा लागलेली असतांना माणोली गावकर्यांनी दाखवलेली श्वानाप्रतीची ही माया अनेकांची मन जिंकणारी अशीच आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 16, 2025 10:32:49
Washim, Maharashtra:वाशीम: ॲंकर:नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी वाशीम शहरात उपक्रमांना सुरुवात झाली आहे.श्री बाकलीवाल विद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे ‘एका मताचे सामर्थ्य’ या विषयावर पोस्टर निर्मिती व पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्व दर्शवणारी आकर्षक पोस्टर्स व पत्रे तयार करून मतदार जागृतीचा संदेश दिला.‘एक मत बदलू शकते भविष्य’,‘मतदान हा हक्क नव्हे तर कर्तव्य’ अशी प्रभावी घोषवाक्ये विद्यार्थ्यांच्या पोस्टर्समध्ये झळकली.प्रशासनाने २ डिसेंबर रोजी मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले असून वाशीमकरांच्या सहभागातून व्यापक जनजागृती होण्याची अपेक्षा व्यक्त केली.या कार्यक्रमास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर,मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गायकवाड यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 16, 2025 10:31:25
Chendhare, Alibag, Maharashtra:स्लग - सुनील तटकरे यांना भरत गोगावले यांचा मोठा धक्का ...... होम पीच रोह्यात राष्ट्रवादीत पडझड ..... माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ........ समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश ....... अँकर - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे होम पीच असलेल्या रोह्यात मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. रोहा शहराच्या माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांच्यासह माजी नगराध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिल्पा धोत्रे यांना रोहा नगर परिषदेसाठी शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिल्पा धोत्रे या सुनील तटकरे यांच्या अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला रोह्यात मोठा धक्का बसल्याचे मानलं जात आहे. बाईट १ - भरत गोगावले, मंत्री बाईट २- शिल्पा धोत्रे
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 16, 2025 10:31:08
Latur, Maharashtra:अतःिवृष्टीच्या अनुदानाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी सुरु असतानाच दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी जाहीर रब्बीसाठीच्या हेक्टरी दहा हजाराच्या अनुदानाचा घोळ झाला आहे.अनुदानाबाबतचा निर्णय प्रशासनातील अधिकाऱ्यांना नीट समजून न आल्यामुळे काही भागात शेतकऱ्यांना बाधित क्षेत्राच्या शंभर टक्के तर काही भागात साठच टक्के अनुदान खात्यावर जमा झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला असून उर्वरित चाळीस टक्के अनुदान आता मिळणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून लवकरच सर्व अनुदान जमा होईल, असे शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यात येत आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 16, 2025 10:19:20
Nashik, Maharashtra:- तीस दिवसांमध्ये १लाख ११ हजार ४२४ झाडं लावली - पुढच्या काळात उष्माघाताने लोक मरतील, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते - आज वृक्ष लागवड करण्याची गरज - आज नरेंद्र महाराज यांच्या दक्षिणपीठ येथे होणार हा उपक्रम चांगला - हे साधू महंत जनजीवन वाचावे यासाठी काम करत आहे. - माझे आणि नरेंद्र महाराज यांची जुनी ओळख - भारताचा अनुकरण इतर देश करता - कोळसा जाळण्याची गरज भविष्यात राहणार नाही, तसा कायदा येईल - इलेक्ट्रिक वाहन हाच पर्याय - हा कायदा होईल, - देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते, एक पेड माँ के नाम तसा हा उपक्रम - विश्व वाचावे हा उपक्रम राबवला त्याचे आभार - वृक्ष तोड हे योग्य नाही. त्यावर कायदा होईल ऑन अहिल्यानगर बिबट्या - तेथे एक बिबट्या मारला - साध्या खूप संख्या बिबट्याची वाढली - जसे कुत्रे फिरतात तसे बिबट्या वाढतील - आज जे हल्ले होता ते दुःख दायक. - उद्या पुण्यात होणारी बैठक त्यावर नाशिक, अहिल्यानगर नाशिक येथे होणारी बिबट्याची दहशत यावर सविस्तर चर्चा करणार - AI च्या माध्यमातून यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न - नसबंदी हा अंतिम टप्पा, गरज असेल तर होईल. - बिबट्या वनतारा, आफ्रिका येथे पाठू, मात्र हा निर्णय केंद्र सरकारचा
39
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 16, 2025 10:16:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात उभारण्यात आलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. दरम्यान याच पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी ट्विट करत तब्बल 13 महिन्यांनी उद्घाटन कार्यक्रमासाठी वेळ मिळाला असल्याचे म्हणत टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण म्हणाले: स्वामी रामानंद तीर्थ यांनी मोलाचे काम केले. स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामची ज्योत पेटवली. वाल्लभभाई पटेल यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांनी साथ दिली. त्यांना जेल मध्ये जावे लागले. आज मराठवाडा स्वतंत्र दिसत आहे. मनपाने 300 वर्ष जुन्या तलावाचे पुनरजीवन केले. 300 वर्षा पूर्वी माहीत होते कमळचे सरकार येणार आहे. कितीही चिखल असला तरी कमळ फुलते, पण कमळ स्वतःला डाग लागू देत नाही. मी घेतलेले तिकीट आज घेतले तरी ते त्यांनी पुढे ग्राह्य धरावे. मी 20 रुपये अतुल सावे यांच्याकडून उसने घेतले आहेत.
39
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 16, 2025 10:15:42
Bhandara, Maharashtra:मागच्या काळामध्ये कितीतरी बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे..... निवडणुकीत पैसे लागतात पण पैशाच्या पुढे कोणी समजत असेल की मी निवडून आलो असा अजिबात होत नाही .... "समजने वाले को इशारा काफी है".... Anchor :- राष्ट्रवादी अजित पवार गटाची नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. आणि या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी अनेकाना टोला देखील लगावला आहे...... कोणी समजू नका कोणी बाहुबली आहे... आणि हे निवडून येणार आहेत... मागच्या काळामध्ये कितीतरी बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे. ते आम्हाला माहित आहे. कोणी काही असा विचार करू नका दोन पैसे लागतात पैसे ह्या माध्यम आहे.. निवडणुकीत पैसे लागतात पण पैशाच्या पुढे कोणी समजत असेल की मी निवडून आलो असा अजिबात होत नाही जितके लागतात तितके खर्च करावी लागते. आणि ते होणारच फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही लोक पैसे घेतात वोट दुसऱ्याला देतात ज्याला द्यायचा त्याला देतात "समजने वाले को इशारा काफी है"
24
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 16, 2025 10:04:58
Washim, Maharashtra:वाशिम शहरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. पद्मतीर्थाजवळील स्मशानभूमीत आज नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. ‘मोक्षधाम’ परिसरातील जागेत मातीखाली पुरलेल्या अर्भकाला एका कुत्र्याने उकरून काढल्याचे प्रथम नागरिकांच्या निदर्शनास आले. त्या कुत्र्याने अर्भकाचे लचके तोडत असल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहताच उपस्थितांनी तात्काळ धाव घेत हस्तक्षेप केला. त्यांनी अर्भक कुत्र्याच्या तावडीतून सोडवून घेऊन पुन्हा त्या ठिकाणी पुरून ठेवले.घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अर्भकाला स्मशानभूमीत टाकून देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी जोर धरत आहे.
22
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 16, 2025 09:50:13
29
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 16, 2025 09:47:31
Satara, Maharashtra:सातारा: कोल्हापूर राजे घराण्यातील खा.शाहू महाराज यांनी आज साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष सांगणाऱ्या प्रतापगडाची पाहणी केली. या पाहणी वेळी त्यांनी गडावरील भवानी मातेच्या मंदिरात जाऊन विधीवत पूजा आरती केली. या नंतर त्यांनी गडावरील सुरू असलेल्या सुशोभीकरणाची पाहणी करत अनेक त्रुटीं निदर्शनास आणतं त्यावर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी श्रीमंत छत्रपती कल्पना राजे भोसले यांना फोन करून या गडाबाबतची माहिती घेतली. छत्रपती शाहू महाराज गडावर येणार म्हटल्यावर अनेक शिवभक्त बरोबर मावळ्यांनी गडांवर गर्दी केली होती. यावेळी बोलताना शाहू महाराज काय म्हणाले आपण पाहूया..
61
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 16, 2025 09:47:19
Baramati, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उद्या इंदापूर नगरपरिषद पदाच्या नगराध्यक्ष पदासाठी स्थानिक आघाडीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दिलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या विरुद्ध जिल्हाध्यक्ष गारटकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे इंदापूर मध्ये अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भरत शहा यांच्या विरोधात प्रदीप गारटकरचा सामना पाहायला मिळणार आहे. याशिवाय जिल्हाध्यक्ष गारटकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पुणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का मानला जातोय. मी आजपर्यंत काम केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात माझीच उमेदवारी आहे. मला नैतिकता सांगते की आपण या ठिकाणी राजीनामा देऊनच पुढे जाऊ या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा मी राजीनामा देतो अशी प्रतिक्रिया गारटकर यांनी दिली आहे. बाईट _ प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इंदापूर नगर परिषदेसाठी माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज भरत शहा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. या उमेदवारीला जिल्हाध्यक्ष गारटकर यांच्या विरोध होता; परंतु नेतृत्वाने भरत शहा यांना उमेदवारी दिली. विरोध असल्यास आपण पक्ष सोडून स्थानिक आघाडी करून नगरपरिषद निवडणूक लढवू असे इशारा मागील दोन दिवसांपूर्वी गारटकर यांनी दिला होता. अखेर पक्षाने शहा यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने गारटकर यांनी हा निर्णय घेतला.
88
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 16, 2025 09:46:05
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या सिडको चौकात आज वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालं, वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रासाठी भरीव योगदान दिले आहे हे विसरणे शक्य नाही आणि त्यामुळे प्रेरणा मिळावी म्हणून वसंताराव नाईकांच्या पुतळ्याची उभारणी केली असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, यावेळी शहरासाठी निधी देण्याची मागणी पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगर वर आमचेही प्रेम आहे असं सांगत टोला लागावला. सगळ्यांना जय सेवालाल नाईक साहेबांनी समाजासाठी खूप काम केले, महाराष्ट्र च्या इतिहासात नाईक साहेब सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले आहेत. 1972 च्या दुष्काळात त्राहिमाम झाले होते, त्यावेळी नाईक साहेबांनी दुष्काळ मुक्त करण्यासाठी जलसंधारण काम सुरू केले. दुष्काळ निवारण सुरू केले, महाराष्ट्राला स्वयं पूर्ण करेल नाहीतर राजीनामा देईल म्हणणारे वसंतराव नाईक होते. त्यांचा आदर्श घेऊन आपण जलयुक्त शिवार योजना सुरू केली... पोहरादेवी ला पहिला पुतळा आम्ही लावला तो वसंतराव नाईक साहेबांचा लावला. काळाच्या ओघात समाज मागे राहिला त्या समाजाला आपल्याला गत वैभव द्यायचे आहे... शिरसाठ साहेब काळजी करू नका, संभाजी नगर ह्रदयात आहे त्याला कमी पडू देणार नाही.
74
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 16, 2025 09:36:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये भाजप कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं हे विभागीय कार्यालय आणि इथून पुढे भाजपचे सर्व कार्यक्रम इथून होईल असे फडणवीस म्हणाले. तर विरोधकांवर यावेळी कडाडून टीका केली... सीएम भाषण पॉइंटर्स कार्यालय रूपाने भाजपचा आज इथं गृह प्रवेश झालाय बिहार च्या जनतेने मोदी जी यांच्यावर विश्वास ठेवला, विरोधी पक्षाचा सुपडा साफ केला बहुमत मिळाले त्याबद्दल बिहारी जनता आभार आणि पंतप्रधान यांचे अभिनंदन.... सातत्याने जे फेक नारेटिव्ही तयार होताय त्याला जनता उत्तर देतेय, कॉंग्रेस जनतेत येणार नाही जनतेसाठी काम करणार नाही तो पर्यंत त्यांची अशीच माती होईल वोट चोरी, सह इतर मुद्दे सातत्याने मांडतात मात्र पुरावे मागितले की देत नाही अजूनही सुधारले नाही तर येणाऱ्या निवडणुकीत माती होईल असे भाकीत मी व्यक्त करतो भाजपच्या वाटचालीत प्रमोड जी गोपीनाथ जी यांचे योगदान आहे पक्षाचे कार्यालय असावे हे ते सातत्याने म्हणायचे, जसे शक्य झाले तसे कार्यालय चालवले... हे कार्यालय विभागीय मुख्यालय आहे, या कार्यालयाचा उपयोग करून जण सामान्य अडचणी सोडवणे आणि पक्षाचा विस्तार करणे ध्येय ठेवा, संभाजी नगर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवतोय... शरद पवार, उबठा, काँग्रेस च्या इथल्या लोकांना लाज ही वाटत नाही, 800 कोटींचा भर महापालिकेवर टाकलेला मात्र तो हिस्सा आपण भरला.. आंदोलन करणारे लोक हे सरकार आल्यावर महापालिकेने पैसे भरावे म्हणून मागे लागले ले योजना थांबली होती पुन्हा आपली सरकार आल्यावर आपण काम योजना सुरू केली, काम सुरुय, लवकर मुबलक पाणी मिळेल, जे लोक आंदोलन करताय हे सगळे लोक खोटारडे आहेत, संभाजी नगरात हजारो कोटींची गुंतवणूक आली हजारो लोकांना काम मिळतंय, देशाचे e v कॅपिटळ संभाजी नगर होईल आम्हाला अभिमान आहे आपण एनडीआरएफ चे तर पैसे दिलेत पण hेक्टरी दहा हजार रुपये पुन्हा वरचे आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले आणि आता आपले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील त्या ठिकाणी जवळपास 70 टक्के पैसे पोचलेत आणि पुढच्या तीन-चार दिवसात शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचतील यावंवेळी कधी नव्हे ते आमचे उद्धवजी मराठवाड्यात दौरा करण्याकरता आले आणि मराठवाड्यात थांबले आणि त्यांनी दौरा केला पण दुर्दैव बघा आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल गावांमध्ये गेल्यानंतर माणसंच नसायचे आमचे अंबादास दानवे माणस कुठे गेले अरे माणस आणा अरे माणसा आणा असे म्हणायचे याचं कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही लोकांना माहिती आहे आपत्तीमध्ये ही भारतीय जनता पार्टी महायुतीच त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय की आता या कार्यालयाचे उद्घाटन झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चाललेले आहेत आता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत मग जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या आहेत या सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला प्रचंड विजय मिळवायचाय मघाशी अध्यक्ष म्हणाले मी अध्यक्षला एवढंच सांगू इच्छितो जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला महायुती करायची आहे जिथे शक्य नाही तिथे आपण करू शकणार नाही पण एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या ठिकाणी आपली महायुती जरी झाली नाही तरी आपल्यासमोर लढणारे पक्ष आपले मित्र पक्ष आहेत ते आपले शत्रू नाहीयेत विरोधकही नाही आहेत ते आपले मित्र पक्ष आहेत हे आपण लक्षात ठेवूनच या ठिकाणी ही लढाई करायची आहे त्यामुळे पुढच्याही काळामध्ये या महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तुमच्यामुळे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या महिन्यातील भाजपच नंबर एकचा पक्ष असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जो काही या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तुमच्यामुळे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या महिन्यातील भाजपच नंबर एकचा पक्ष असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या कार्यालयाकरिता ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्या सगळ्यांचं अभि अभिनंदन करतो..
172
comment0
Report
Advertisement
Back to top