Back
गांव ने पांडुरंग कुत्रे की अंतिम यात्रा में दिखाई अनोखी श्रद्धांजलि
GDGAJANAN DESHMUKH
Nov 16, 2025 10:36:15
Parbhani, Maharashtra
अँकर- हरिनामाचा व्यासंग लागलेल्या पांडुरंग नावाच्या एका कुत्र्याचे अकाली निधन झाल्याने सार गाव हळहळल,आज ही या गावातील नागरिकांना अश्रू अनावर होत आहेत. या श्वानाची उतराई म्हणून ग्रामस्थांनी टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत या श्वानाची अंत्ययात्रा काढली आणि गावातील मंदिराच्या पाठीमागे त्यांचा दफनविधी केला. या कलियुगात वृद्ध आई वडिलांना अनाथ आश्रमात टाकण्याची स्पर्धा लागली असतांना हे गावकरी मात्र एका कुत्र्यासाठी का हळहळ व्यक्त करीत आहेत,बघुयात हा खास रिपोर्ट
या गावावर शोककळा पसरलीय,त्यामुळे गावातील लोक असे सुन्न झाले आहेत. गावातील विष्णू मांडे यांनी एका कुत्र्याच्या पिल्याची आई मरण पावल्या नंतर तिच्या एका पिल्याचा सांभाळ केला,त्याच्या घरच्या लोकांनी या कुत्र्याचे पांडू असे नाव ठेवले,सदर कुत्रा अतिशय इमानदार होता, घराच्या रखवाली बरोबर मांडे यांच्या आजारी मुलाचा तो सांभाळ करायचा,पण त्याला अध्यात्माचा व्यासंग लागला. माणोली गावात दररोज सकाळी 4 वाजता अध्यात्मिक प्रभात फेरी काढण्याची प्रथा आहे त्यात तो सहभागी होत असे, सकाळी मंदिरातील घंटा वाजला की तो मंदिरात यायचा, कीर्तन,प्रवचन,हरिपाठाचा पांडूला लळा लागला होता,तो तासन्तास तेथे बसून राहत असल्याने आणि धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याने येथील ग्रामस्थानी त्याला पांडूरंगाच्या नावाने हाक मारायला सुरुवात केली. पण अज्ञात वाहनांच्या धडकी पांडुरंगाचा अपघात झाला, त्याला वाचवण्याचा ग्रामस्थानी खूप प्रयत्न केला,पण पांडुरंगाला वाचविण्यात यश आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीये,
पांडुरंगाला माणसाचा ला
माणसांचा लळा लागला होता,गावात कुणाचा अंतविधी असेल तर तो तिकडे हजर असायचा,धार्मिक कार्यक्रमात त्याची आवर्जून उपस्थिती असायची,गावातील प्रत्येकाचा तो लाडका झाला होता,पण त्याच्या अश्या एकाएकी जाण्याचा ग्रामस्थांना धक्का बसलाय, गावातील नागरिकांनी पांडुरंगाच्या अंत्यविधीला मोठी गर्दी केली होती, टाळ मृदुंगासह दिंडी काढीत गावकर्यांनी त्याला अखेरचा निरोप देत,गावातील मंदिराच्या पाठीमागेच त्याचा दफणविधी केला.
पांडुरंग हा गावकऱ्यांचा खूप लाडका होता,रखवाली बरोबरच तो अनेक अनपेक्षित मदत ग्रामस्थांना करायचा, त्यामुळे गावकऱ्यांना त्याचा लळा लागला होता,आजच्या युगात वृध्द आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवीन्याची स्पर्धा लागलेली असतांना माणोली गावकर्यांनी दाखवलेली श्वानाप्रतीची ही माया अनेकांची मन जिंकणारी अशीच आहे.
58
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowNov 16, 2025 12:16:44116
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 16, 2025 12:15:41103
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 16, 2025 11:47:3346
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 11:47:17187
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 11:31:17190
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 11:19:46100
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 11:07:5553
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 16, 2025 11:03:01144
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 11:02:38129
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 11:00:36117
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 16, 2025 10:32:49128
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 16, 2025 10:31:25111
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 16, 2025 10:31:08138
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 16, 2025 10:19:40104
Report