Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

मंत्रिमंडल जल्द तंतुवाद्य क्लस्टर के लिए निधि और सुविधाओं पर निर्णय लेगा

SMSarfaraj Musa
Feb 21, 2026 09:15:19
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - तंतुवाद्य कला जोपासण्यासाठी क्लस्टरला निधी,जागा,सुविधा देण्याचा मंत्रिमंडळात लवकरच निर्णय घेऊ- संस्क Rheती कार्यमंत्री आशिष शेलार अँकर - एआयच्या जगात,जीआय टॅगीग असणाऱ्या तंबोरा आणि तंतुवाद्यचं देखील महत्त्व आहे,ही कला जोपासण्यासाठी तंतुवाद्य क्लस्टरसाठी जागा,निधी आणि सुविधा देण्यासाठी मंत्रिमंडळात निर्णय घेतले जाईल,अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.तंतूवाद्यांचे माहेरघर असणाऱ्या सांगलीच्या मिरजेतील सतारमिकार व्यवसायिकांची मंत्री आशिष शेलार यांनी भेट घेतली,यावेळी तंतुवाद्य निर्मिती मध्ये असणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या,यावेळी मंत्री शेलार यांना सितार वादनाचा मोह आवरता आला नाही,हातात सीतारा घेऊन मंत्री शेलार यांनी तंबोऱ्याचे तार छेडत सितार वाजवले.. बाईट - आशीष शेलार - सांस्कृतिक कार्यमंत्री.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Feb 21, 2026 10:49:10
Navi Mumbai, Maharashtra:प्रभाग समित्यानवरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात जुम्पली. नवी मुंबई मनपाच्या 8 प्रभाग समित्यांची घोषणा करण्यात आलेय. मात्र या प्रभाग समित्या जाहीर करताना शिवसेना शिंदे गटाला केवळ 1 प्रभाग समिती मिळेल याची काळजी घेत इतर सर्व प्रभाग समित्यावर भाजपाचे वर्चस्व असेल अशी रचना करण्यात आलेय. पॅनल क्रमांक 1, 6 आणि 14 मिळून प्रभाग समिती बनविण्यात आली असून यावर तीव्र आक्षेप विरोधीपक्षाने घेतलाय. केवळ शिवसेनेला प्रभाग समिती मिळू नये म्हणून पॅनलची मोडतोड करण्यात आली असून प्रभाग समिती तुम्हाला ठेवा पण नागरिकांची कामं होतील अशी रचना करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी केलेय. तर निवडणुकीत प्रभाग करताना अनेक ठिकाणी मोडतोड करण्यात आली होती त्यामुळे नागरिकांना गैरसोय होणार नसून ज्यांना काम करायचेय ते सदस्य नक्कीच काम करू शकतील अशी प्रतिक्रिया महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केलेय.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Feb 21, 2026 10:47:11
Buldhana, Maharashtra:ही घटना सरकारला देखील काळीमा फासणारी गोष्ट आहे सरकार चां देखील अपमान आहे शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रकरण हात बाहेर जाऊ देऊ नये सगळ्यांवर मोका लावणे गरजेचे आहे मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे आज सहा वाजेपर्यंत सर्व आरोपीवर गुन्हे दाखल झाले नाही तर पंचवीस तारखे नंतर सर्व राज्याचे मराठे या गावात येऊन आंदोलन करतील अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे त्याच्या कुटुंबाला वाटत असेल तर चौकशी झाली पाहिजे आमचा चांगला माणूस यात गेला आहे महादाव मुंढे चे प्रकरणात नार्को टेस्ट झाल्यावर सगळ पुढे येईल धन जय मुंढे आणि यांनी असे प्रकार केले आहेत देशमुख कुटुंबाचे प्रकरण खूप गंभीर घ्यावे लागेल नाही तर देशमुख कुटुंबाला धोका होईल वाल्मीक कराड ने सुप्रीम कोर्टात जावे की ट्रम्प कडे जावे त्यांना सुटीच नाही
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 21, 2026 10:34:54
Akola, Maharashtra:मोबाईलवर सध्या रील्सचा मोठा ट्रेंड सुरू आहे. स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी अनेक जण समाजमाध्यमांचा आधार घेत आहेत. मात्र एका रीलची किंमत तब्बल २० लाख रुपये मोजावी लागेल, याची कल्पना अकोल्यातील एका महिलेलाही नव्हती. हो… २० लाखांची रील, ऐकून धक्का बसलाच ना? अकोला शहरातील जुन्या शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ फेब्रुवारी रोजी एका घरात मोठी चोरी झाली. घरातून तब्बल १९ लाखांचे सोन्याचे दागिने आणि ९० हजारांची रोकड असा एकूण जवळपास २० लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणी फिर्यादी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या ९ दिवसांत या गुन्ह्याचा उलगडा केला. तपासादरम्यान समोर आलेल्या बाबी धक्कादायक होत्या. फिर्यादी महिलेची शेजारी राहणाऱ्या एका महिलेशी ओळख झाली होती. हळूहळू दोघींमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली. आरोपी महिलेने विश्वास संपादन केला आणि दोघी मिळून रील्स तयार करू लागल्या. घटनेच्या दिवशीही रील बनवण्याच्या बहाण्याने आरोपी महिलेंनी फिर्यादी महिलेला आपल्या घरी बोलावलं आणि रील शूट करताना तिने फिर्यादीचे लक्ष विचलित केले आणि संधी साधत अलमारीतून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे २० लाखांचा ऐवज चोरला. यानंतर आरोपी महिलेने चोरीचे दागिने आणि रोकड आपल्या मित्रांकडे लपवून ठेवली आणि सर्व काही सामान्य असल्याचे भासवत शांत बसली. मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी महिला आणि तिच्या साथीदारांची चौकशी सुरू केली. सखोल तपасानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. जुन्या शहर पोलिसांनी आरोपींकडून सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करून एक महिला आणि तिच्या तीन साथीदारांना अटक करून पुढील तपास करत आहे. Final Vo : रीलच्या बहाण्याने मैत्री, आणि मैत्रीच्या आडून विश्वासघात… अकोल्यातील ही घटना सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावासोबत सावध राहण्याचा इशारा देणारी ठरते.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 21, 2026 10:33:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:देशातील उत्पादकता हळूहळू कमी होण्याची भीती आहे - मंत्री आशिष शेलार. देशातल्या वाढत्या डिजिटल ऍडीकशनमुळे देशातील उत्पादकता, नाविन्यपूर्णता आणि उद्यमशीलता हळूहळू कमी होतय,का काय अशी भीती निर्माण झाल्याचं मत राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला, सांगलीच्या मिरजेमध्ये गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने फ्लोक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं, त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना मंत्री आशिष शेलार यांनी, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या देशाच्या आर्थिक अहवालामध्ये डिजिटल ऍडीकशन मुळे उत्पादकता हळूहळू कमी होते का काय आणि हे देशाच्या आर्थिक प्रगतीत गतिरोधक बनतय की, काय ? अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं, भीती मंत्री शेलार यांनी यावेळी व्यक्त केली.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 21, 2026 10:22:10
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेची पहिलीच महासभा मोठ्या गोंधळात पार पडली. सत्ताधारी भाजपने स्थापित केलेल्या तदर्थ समिती वरून विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला. कोरोना काळात प्रशासकीय कार्यकाळात नगररचना, आरोग्य आणि अभियांत्रिकी विभाग तसेच या विभागा व्यतिरिक्त इतर विभागाने केलेल्या कामांची इतंभूत माहिती मिळवून त्यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने या समितींची स्थापना करण्यात आलेय. मात्र महासभेतील ठरावावर देखिल एक तदर्थ समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती म्हणजे आयुक्त आणि सर्व सदस्यांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार असून वेळ पडल्यास या समिती विरोधात शासनाकडे दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी व्यक्त केलेय. तर प्रशासकीय कार्यकाळातील माहिती नवी मुंबईकर जनतेला कळावी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी या समित्या असून महासभेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी तदर्थ समिती स्थापन केली असल्याची प्रतिक्रिया महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केलेय.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 21, 2026 10:03:49
Ambernath, Maharashtra:गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी बदलापुरातील धक्कादायक प्रकार पोलिसांकडून तीन महिलांना अटक आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय Anchor - बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार समोर आलाय. याबाबत माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी दलालांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. हे आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय Vo बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवल्यानंतर ज्युवेली गावात राहणाऱया सुलक्षणा गाडेकर आणि तिची उल्हासनगरातील साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे अशा तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. बदलापूरच्या ज्युवेली गावातील नॅनो सिटी इथं सुलक्षणा गाडेकर ही महिला राहते. तिने गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स घरातच साठवले होते. गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून ती हे इंजेक्शन्स देत होती. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी देखील करवून घ्यायची. गर्भाशयात स्त्री बिजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवायची. तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचं. त्यानंतर त्याची सर्रासपणे विक्री करण्यात येत होती.पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून सुलक्षणा गाडेकर हिच्यासह तिचे साथीदार अश्विनी चाबूकस्वार, मंजुषा वानखेडे यांना ताब्यात घेतलय. पोलिसांनी गाडेकर यांच्या घरी छापा मारून गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रं, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. या बादलापुरातील अंडाशय तस्करीमागे आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय व्यक्त होतोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात 300हून अधिक महिला पीडित असून त्यांना अंडाशयामागे वीस हजार रुपये दिले. तर मध्यस्थ महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये देण्यात येत असल्याचा संशय आहे. या अंडाशयांची केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विक्री केली जात होती. पोलिसांनी मात्र या संपूर्ण तस्करी बद्दल काहीही बोलण्यास नकार दिलाय.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 21, 2026 09:36:25
Amravati, Maharashtra:स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजीत चव्हाट्यावर; मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ विवेक कलोती नाराज अँकर :- अमरावती महापालिका निवडणूक संपली असून आता स्वीकृत नगरसेवक निवडीनिर्मीया प्रक्रिया ही संपली आहे मात्र या निवडीच्या प्रक्रियेनंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून मुख्यमंत्र्यांचे मामे भाव विवेक कलोती हे सध्या नाराज असल्याचा पाहायला मिळत आहे. ज्यांनी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप विरोधात आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती विरोधात काम केलं त्यांनाच भाजपने स्वीकृत नगरसेवक केलं असल्याचा गंभीर आरोप विवेक कोलोती यांनी केला आहे. भाजपमधल्या लोकांनी काम न केल्याने माझा निवडणुकीमध्ये पराभव झाल्याचाही कलोती यांचा आरोप असून ज्यांना स्वीकृत नगरसेवक केलं त्या प्रशांत देशपांडे यांनी उमेदवारी दिली नाही म्हणून त्यांनी भाजप विरोधात काम केलं असल्याचा आरोप कलोती यांनी केल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 21, 2026 09:32:42
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील sheतकरी राजू कालापाड यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. मुलीचे लग्न १४ मार्चला होणार होते व आज लग्नसामग्री खरेदीसाठी जाण्याची तयारी होती.मात्र आर्थिक अडचणी व कर्जाच्या ताणातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. राजू कालापाड यांच्याकडे अवघी एकर शेती होती आणि अपेक्षित उत्पादन न झाल्याने कर्ज वाढले होते.त्यामुळे ते पत्नीसमवेत पुण्यात मजुरी करत होते व लग्नासाठी काही दिवसांपूर्वी गावी आले होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी व दोन लहान मुले असा परिवार आहे.घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.घटनेचा अधिकचा तपास करित असल्याचे मालेगाव पोलीसांनी सांगितले. बाईट: प्रमोद नवघरे,शेजारी बाईट:पांडुरंग इंगळे,सहायक पोलीस निरीक्षक मालेगाव
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 21, 2026 08:50:20
Malegaon, Maharashtra:*Breaking पॅकेज स्टोरी... विशाल मोरे, मालेगाव* अखेर दादा भुसेंनी संजय राऊत यांच्याविरुद्धचा खटला घेतला मागे. संजय राऊत यांनी मालेगावकरांची व शेतकऱ्यांची केली दिलगिरी व्यक्त. संजय राऊत यांनी दिला माफीनामा. मंत्री दादा भुसे यांनी गिरणा साखर कारखाना प्रकरणी संजय राऊत यांच्यावर बदनामीकारक फौजदारी खटला दाखल केला होता. मालेगाव कोर्टात ते गैरहजर राहिल्याने त्यांना दोन वेळा 1 हजार तर दोन वेळा 5 हजार असा दंड ठोठावण्यात आला होता. त्यामुळे आज ते मालेगाव कोर्टात हजर झाले. मात्र या प्रकरणात वेगळा ट्विस्ट निर्माण झाला असून संजय राऊत यांनी मालेगाव करांची आणि शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त केल्याने दादा भुसे यांनी खटला मागे घेतला. मंत्री दादा भुसे आम्हाला दोघांना न्यायालयाने पहिले आणि विषय संपला आहे. ज्यांच्यामुळे हा विषय आला ते अद्वय हिरे दुसऱ्या पक्षात गेले. दादा भुसे आणि माझे चांगले संबंध आहेत. माझ्याकडून चुकीच्या आधारावर वक्तव्य केलं आहे. अद्वय हिरे यांनी चुकीची माहिती दिली. आता आम्हाला हे संपवायचे आहे. गिरणा सहकारी कारखान्याच्या शेअर्समध्ये 178 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप खा.संजय राऊत यांनी केला होता.. तशी बातमी सामना या वृत्तपत्रातून छापली होती.. या बातमीने मंत्री दादा भुसे यांची बदनामी झाल्याने मंत्री भुसे यांनी राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.. मात्र या बातमीची खा.संजय राऊत यांनी सत्यता पडताळून बघितली त्यात चुकीचा आधार होता.. म्हणून आज मा.न्यायालयात संजय राऊत यांनी माफीनामा लिहून देत समस्त मालेगावकर जनता, शेतकरी व सभासद यांची दिलगिरी व्यक्त केल्याने मंत्री दादा भुसे यांनी अब्रुनुकसानीचा खटला आज न्यायालयात मागे घेतला असल्याची ॲड. सुधीर अक्कर यांनी याबाबत माहिती दिली.. जेव्हा खटला दाखल केला होता त्यावेळचे लेख बघा, आता शेपटी घालायचे काम सुरू आहे. संजय राऊत नाक घासून माफी मागणार आईं अशा प्रकारचे आरोप त्यांनी दादा भुसे यांच्यावर केले होते. संजय राऊत तुम्हाला अशीच माफी मागावी लागणार आहे. राऊत तुम्हाला रोज माफी मागावी लागणार आहे. मालेगाव कोर्टात त्यांना माफी मागावी लागते. तुम्ही तिथे गेले आहात तर एक काम करा तिथे टिपू सुलतान यांचा जय जय कार करणारे आहे एकंदरीत आता हे प्रकरण बरेच दिवस चर्चेत राहील आणि सर्वच राजकीय स्तरातून यावर आता प्रतिक्रिया आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 21, 2026 08:48:40
Shirdi, Maharashtra:Anc - शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात दर अर्ध्या तासाने कपडे बदलून भाविकांच्या गर्दीत मिसळून चोरीचा डाव आखणाऱ्या आंध्र प्रदेशातील टोळीचा शिर्डी पोलिसांनी पर्दाफाश केलाय. दोन महिला, एक पुरुष आणि एका बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींकडून महागड्या कंपनीचे मोबाइल आणि रोख रक्कम जप्त केली आहे.. V/O - साई मंदिर परिसरात एका भाविकाची पर्स ब्लेडने कापली गेल्याची tक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना चक्रावून टाकणारी माहिती समोर आली.. काही महिला आणि पुरुष साई मंदिर परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना सीसीटीव्हीत दिसून आले.. संशयितांना ताब्यात घेतले असता एक पुरुष आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.. उर्वरित एक पुरुष, दोन महिला आणि एक अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेण्यात आले.. झडतीदरम्यान त्यांच्याकडून 10 मोबाइल फोन, 1170 रुपये रोख रक्कम, ब्लेड्स आणि कटर तसेच अल्पवयीन बालकाकडूनही एक मोबाइल हस्तगत करण्यात आलाय.. बालकाला तातडीने चिल्ड्रन होममध्ये दाखल करण्यात आले आहे.. ही टोळी भाविकांसारखाच वेश परिधान करून गर्दीत मिसळत होती.. महिलांनी सुरुवातीला पंजाबी ड्रेस घातला होता, तर नंतर साडी परिधान करून पुन्हा परिसरात वावरल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.. चोरट्यांची ही पद्धत पाहून पोलिसही अचंबित झाले.. या वेशांतराच्या माध्यमातून पोलिस आणि मंदिर सुरक्षारक्षकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा डाव होता.. मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमुळे शिर्डीत या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश झालाय..
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 21, 2026 08:38:00
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली में शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान के पाचव्या वर्धापन दिनानिमित्त किल्ले संवर्धन मोहीम यांचा शुभारम्भ करण्यात आला आहे. सांगलीतील इतिहास कालीन राजवाडा परिसरातील गणेश दुर्ग किल्ल्याचा स्वच्छता मोहीम राबविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारम्भ करण्यात आला. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आणि गणपती पंचांयतन संस्थांनच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी गड संवर्धन करण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली, त्याचबरोबर जिल्ह्यातील बारा गड संवर्धन आणि स्वच्छता करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 21, 2026 08:35:46
Beed, Maharashtra:बीड: देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत त्याच्या गावी तीन वेळा येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केलाय. कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती त्यांनी सीआयडीला देखील दिल्याचं सांगितले. कृष्णा आंधळे मोबाईल वापरत नाही. मात्र त्याला जेल बंद कसे करायचे याचा विचार गरजेचा आहे. आमच्या कुटुंबाला या आरोपी पासून धोका आहे. हे आरोपी शैतानी वृत्तीचे असून कृष्णा आंधळेला अटक करून त्याची दिंड जिल्हाभरात काढावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी पार पडली. याच सुनावणी वेळी धनंजय देशमुख यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिलीय. तर सुप्रीम कोर्टात येत्या 26 तारखेला वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. याबाबत कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. आमचे म्हणणे आम्ही न्यायालयात देणार असल्याचं देशमुख यांनी यावेळी म्हटलं. मागील दीड वर्षांपासून देशमुख कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top