Back
बदलापुर में गरीब महिलाओं के अंडाशय की तस्करी का अंतरराज्यीय रैकेट उजागर
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 21, 2026 10:03:49
Ambernath, Maharashtra
गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी
बदलापुरातील धक्कादायक प्रकार
पोलिसांकडून तीन महिलांना अटक
आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय
Anchor - बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार समोर आलाय. याबाबत माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी दलालांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. हे आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय
Vo बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवल्यानंतर ज्युवेली गावात राहणाऱया सुलक्षणा गाडेकर आणि तिची उल्हासनगरातील साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे अशा तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. बदलापूरच्या ज्युवेली गावातील नॅनो सिटी इथं सुलक्षणा गाडेकर ही महिला राहते. तिने गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स घरातच साठवले होते. गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून ती हे इंजेक्शन्स देत होती. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी देखील करवून घ्यायची. गर्भाशयात स्त्री बिजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवायची. तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचं. त्यानंतर त्याची सर्रासपणे विक्री करण्यात येत होती.पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून सुलक्षणा गाडेकर हिच्यासह तिचे साथीदार अश्विनी चाबूकस्वार, मंजुषा वानखेडे यांना ताब्यात घेतलय. पोलिसांनी गाडेकर यांच्या घरी छापा मारून गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रं, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. या बादलापुरातील अंडाशय तस्करीमागे आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय व्यक्त होतोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात 300हून अधिक महिला पीडित असून त्यांना अंडाशयामागे वीस हजार रुपये दिले. तर मध्यस्थ महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये देण्यात येत असल्याचा संशय आहे. या अंडाशयांची केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विक्री केली जात होती. पोलिसांनी मात्र या संपूर्ण तस्करी बद्दल काहीही बोलण्यास नकार दिलाय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 11:48:090
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 21, 2026 11:46:020
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 11:37:520
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 11:31:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 11:19:310
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 21, 2026 11:19:090
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 11:08:150
Report
PNPratap Naik1
FollowFeb 21, 2026 11:01:130
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 21, 2026 10:49:100
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 21, 2026 10:47:110
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 21, 2026 10:34:540
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 10:33:360
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 21, 2026 10:22:100
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 21, 2026 10:12:150
Report