Back
रील बनवाने के बहाने दोस्त ने धोखा दिया: अकोला में 20 लाख की चोरी
JJJAYESH JAGAD
Feb 21, 2026 10:34:54
Akola, Maharashtra
मोबाईलवर सध्या रील्सचा मोठा ट्रेंड सुरू आहे. स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी अनेक जण समाजमाध्यमांचा आधार घेत आहेत. मात्र एका रीलची किंमत तब्बल २० लाख रुपये मोजावी लागेल, याची कल्पना अकोल्यातील एका महिलेलाही नव्हती. हो… २० लाखांची रील, ऐकून धक्का बसलाच ना?
अकोला शहरातील जुन्या शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ फेब्रुवारी रोजी एका घरात मोठी चोरी झाली. घरातून तब्बल १९ लाखांचे सोन्याचे दागिने आणि ९० हजारांची रोकड असा एकूण जवळपास २० लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणी फिर्यादी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या ९ दिवसांत या गुन्ह्याचा उलगडा केला. तपासादरम्यान समोर आलेल्या बाबी धक्कादायक होत्या. फिर्यादी महिलेची शेजारी राहणाऱ्या एका महिलेशी ओळख झाली होती. हळूहळू दोघींमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली. आरोपी महिलेने विश्वास संपादन केला आणि दोघी मिळून रील्स तयार करू लागल्या. घटनेच्या दिवशीही रील बनवण्याच्या बहाण्याने आरोपी महिलेंनी फिर्यादी महिलेला आपल्या घरी बोलावलं आणि रील शूट करताना तिने फिर्यादीचे लक्ष विचलित केले आणि संधी साधत अलमारीतून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे २० लाखांचा ऐवज चोरला. यानंतर आरोपी महिलेने चोरीचे दागिने आणि रोकड आपल्या मित्रांकडे लपवून ठेवली आणि सर्व काही सामान्य असल्याचे भासवत शांत बसली. मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी महिला आणि तिच्या साथीदारांची चौकशी सुरू केली. सखोल तपасानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. जुन्या शहर पोलिसांनी आरोपींकडून सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करून एक महिला आणि तिच्या तीन साथीदारांना अटक करून पुढील तपास करत आहे.
Final Vo : रीलच्या बहाण्याने मैत्री, आणि मैत्रीच्या आडून विश्वासघात… अकोल्यातील ही घटना सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावासोबत सावध राहण्याचा इशारा देणारी ठरते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 11:48:090
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 21, 2026 11:46:020
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 11:37:520
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 11:31:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 11:19:310
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 21, 2026 11:19:090
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 11:08:150
Report
PNPratap Naik1
FollowFeb 21, 2026 11:01:130
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 21, 2026 10:49:100
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 21, 2026 10:47:110
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 10:33:360
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 21, 2026 10:22:100
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 21, 2026 10:12:150
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 21, 2026 10:03:490
Report