Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

नागनाथ नगर में बगाड यात्रा पर लाखों भक्तों की भीड़, उत्साह रोमांचक

SMSarfaraj Musa
Mar 21, 2026 01:00:43
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागनाथनगरीत बगाड सोहळा उत्साहात संपन्न.. अँकर - "नागनाथाच्या नावानं चांगभलं"च्या गजरात सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागनाथनगर येथे बगाड पळविण्याचा सोहळा पार पडला आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत बगाड पळवण्याची परंपरा जोपासण्यात आली. विटा नजीकच्या नागनाथनगर येथील ग्रामदैवत आणि जागૃત देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहेे. या यात्रेनिमित्त बगाड पळवण्याची ऐतिहासिक परंपरा आहे, नवस फेडण्यासाठी लाकडी चाकांच्या बैल जोडीला नारळाचे तोरण बांधून बगाड पळवण्यात येतात. गेल्या दोनशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आज देखील जोपासण्यात येत असून गुलाल व भंडार्‍याची उधळण करत पार पडलेल्या पगार पळवण्याच्या सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी नागनाथ नगरीत उपस्थिती लावली होती.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Mar 21, 2026 01:16:11
Akola, Maharashtra:कैप्टन अशोक खरात प्रकरणाला आता राजकीय रंग चढताना दिसत आहे. या प्रकरणी खरात याची नार्को टेस्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांनी केली आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतल्याचे त्यांनी स्वागत केले आहे. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी न्यायालयीन पद्धतीने व्हावी आणि गरज पडल्यास कॅप्टन अशोक खरात तसेच त्याच्यासोबत ज्या नेत्यांचे फोटो समोर आले आहेत, त्या सर्वांचीही नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत, खरात यांच्या संपर्कात ८ ते ९ मंत्री होते असा आरोप केला जात आहे. त्यामुळे त्या मंत्र्यांची नावे जनतेसमोर आणावीत, अशी मागणीही मिर्झा यांनी केली आहे. याचबरोबर मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे कॅप्टन अशोक खरात राहत असल्याचं माहिती समोर आली असून त्या हॉटेलमधील वास्तविक्यासंदर्भातही चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
1049
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 20, 2026 17:01:15
Virar, Maharashtra:हितेंद्र ठाकूरांबाबत महासभेत अपशब्द, बविआ- भाजप नगरसेवक एकमेकांना भिडले विरार वसई विरार महापालिकेची महासभा सुरू असताना बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना भाजपा नगरसेवकांनी अपशब्द उच्चारल्याने तणाव निर्माण झाला होता. संतप्त बविआ आणि भाजप नगरसेवक एकमेकांना भिडले. यामुळे महासभेचे कामकाज ठप्प झाले होते. वसई विरार महापालिकेच्या महासभेत बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विषय सुरू होता. प्रकल्पबाधीत लोकांचे पुर्नवसन करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले. ते झाल्यानंतर भाजप नगरसेवकांनी देश का नेता कैसा हो..नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा दिल्या. त्यावेळी बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्याबाबत भाजप नगरसेवकांनी अपशब्द उच्चारले. त्याांना नगरसेवक निशात चोरघे यांनी आक्षेप घेतला आणि एकच गोंधळ उडाला. सर्व सदस्य आपल्या आसनावरून उठले आणि एकमेकांना भिडले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने कामकाज सुमारे १५ मिनिटे ठप्प झाले होते. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करत नियंत्रणात आणले. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले.
1077
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 20, 2026 15:30:49
Satara, Maharashtra:सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या हायव्होल्टेज ड्राम्यात आता नाट्यमय वळण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे हे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या ठिकाणी पोहोचत असताना त्यांना दारातून स्थानिक गुन्हे शाखेने अपहरणाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्यानंतर त्यांना महाबळेश्वर मध्ये हलविण्यात आले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी झुंडशाहीचा استخدامها करून आपल्याला मारहाण केली आणि मतदानापासून वंचित ठेवले,असा खळबळजनक आरोप या दोन्ही सदस्यांनी केला आहे. रुग्णालयात उपचार घेत असताना अनिल देसाई यांनी संताप व्यक्त केला. आम्हाला जाणीवपूर्वक मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठी ही अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केवळ दडपशाहीच केली नाही, तर आम्हाला मारहाणही केली आहे. लोकशाहीत मतदानाचा अधिकार असताना अशा प्रकारे पोलीस बळाचा वापर करणे म्हणजे झुंडशाही आहे.
1085
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 20, 2026 15:17:10
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर -गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेने आणखी एका बिबट्याला जखमी केले आहे. या महामार्गावर भरगाव वेगातील वाहनांच्या धडकेत वन्यजीवांच्या जखमी वा मृत होण्याच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. घनदाट जंगलाचा परिसर असलेल्या या महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे वन्यजीव उपशमन योजना राबविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. अपघाताची माहिती मिळताच वनपथक घटनास्थळी दाखल झाले. घनदाट जंगलाच्या परिसरातल्या या राष्ट्रीय महामार्गावर जखमी अवस्थेतील बिबट्याला तज्ञांच्या उपस्थितीत बेशुद्धीचे इंजेक्शन मारून त्याला निपचित करण्यात आले. या बिबट्याला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात रवाना करण्यात आले आहे. वन्यजीवप्रेमीनी या मार्गावर वन्यजीव अपघात टाळण्यासाठी निश्चित केलेल्या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी रेटली आहे.
1090
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 20, 2026 13:48:44
Bhandara, Maharashtra:भोंदूगिरी करणारे सर्वच जेरबंद होतील... अशोक खरात प्रकरणात महसूल मंत्री बावनकुळे यांचे वक्तव्य... नाशिक मध्ये बलात्कार प्रकरणांमध्ये पोलिसांनी अशोक खरात या ज्योतिसाला अटक केली असून या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांच्या वतीने केली जात आहे.. यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई सरकारच्या वतीने करण्यात येईल आणि सर्व दोषींना जेरबंद करण्यात येईल असे आश्वासन दिले.. तर अशा पद्धतीने अनेक भोंदू बाबा आश्रम उघडतात त्यामध्ये काय कार्य करतात हे अनेक वेळा पोलिसांना देखील माहित नसते असेही बावनकुळे म्हणाले..
1029
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 20, 2026 13:33:58
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, मंत्री चंद्रकांत पाटलांचा,जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांना इशारा एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही,अजून लई बाकी आहे..अश्या शब्दात मध्ये भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सांगली जिल्ह्यातल्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत एवढा अट्टाहास कशासाठी आणि हा ट्रम्पचा पराभव केलाय का ? आणि आमचा पराभव करायला तीन पिढ्याच वैर विसरून एकत्र यावे लागेल,असा टोला देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांना लगावत,सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकी वेळी आमच्याकडून काही चुका,अरेरावीची भाषाअसेल अशा गोष्टी घडल्याचा पराभव झाला,अशी प्रांजल कबुली मंत्री चंद्रकांत पाटलांनी यावेळी देत,पण यापुढे तुम्ही तुमच्या खासदारकीची आणि आमदारकीची चिंता करा,असा इशारा देखील पाटील यांनी विशाल पटल्ा व जयंत पाटलांना दिला आहे,ते सांगलीत बोलत होते. चंद्रकांत पाटील - पालकमंत्री, सांगली.
1042
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 20, 2026 12:31:28
Ambernath, Maharashtra:बदलापूर-अंबरनाथकरांचा प्रवास गतिमान होणार. कासगाव-कामोठे नव्या रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हेला मंजुरी. या भेटीत नव्या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणाला मंजुरी देण्यात आलीय. या नव्या रेल्वे मार्गामुळे बदलावूरहून नवी मुंबईला अवघ्या 30 मिनिटांत जाता येईल. याशिवाय नव्या कनेक्टिव्हिटीतमुळे वांगणी-बदलापूर परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. बदलापूर आणि अंबरनाथ शहराची लोकसंख्या जवळपास 10 लाखांच्या घरात आहे. या शहरातील नागरिकांना नवी मुंबईला जाण्यासाठी ठाणे मार्गे रेल्वेने प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी जवळपास दीड तास लागतो. त्यामुळे वांगणी आणि बदलापूरच्या दरम्यान कासगाव रेल्वे स्थानक तयार करून कासगाव-कामोठे नवा रेल्वे मार्ग तयार केल्यास हे अंतर अवघ्या अर्ध्या तासांत पार करता येणं शक्य आहे. तशी मागणी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी लावून धरली होती. नुकताच नवी दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली अशी माहिती राम पातकर यांनी दिली आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास त्याचा फायदा वांगणी, बदलापूर अंबरनाथ तसेच उल्हासनगर पर्यंतच्या प्रवाशांना होऊन वेळेत मोठी बचत होईल असा विश्वास पातकर यांनी व्यक्त केलाय.
1062
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 20, 2026 12:17:03
Wardha, Maharashtra:- ग्रामपंचायत भवनात राष्ट्रनेत्यांचे फोटो नसल्याने आमदार राजेश बकाने संतप्त - ४८ तासांत फोटो लावण्याचे आदेश; निष्काळजीपणावर तीव्र नाराजी - ग्रामपंचायत भवनांमध्ये देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांची अधिकृत छायाचित्रे लावलेली नसल्याचे आमदार राजेश बकाने यांच्या निदर्शनास आले.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आमदार बकाने यांनी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला तात्काळ जाब विचारला. शासनाच्या प्रोटोकॉलनुसार ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रनेत्यांची छायाचित्रे लावणे आवश्यक असताना ती अनुपस्थित आढळल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.यावेळी त्यांनी हा विषय गांभीर्याने घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्याकडे तक्रार नोंदवली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना ४८ तासांच्या आत सर्व ग्रामपंचायत भवनांमध्ये आवश्यक छायाचित्रे लावण्याचे कडक निर्देश दिले. - ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका करत, अशा प्रकारची हलगर्जीपणा पुन्हा आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही आमदार बकाने यांनी दिला.
1033
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 20, 2026 11:51:32
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील मोखाळा महामार्गावर हिट अँड रन चा प्रकार, कुटुंबाने एकुलता एक कमावता मुलगा गमावला, दुमाजी सहारे यांच्या अपघाताचा तपास करण्यात सावली पोलिसांची दिरंगाई अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील मोखाळा महामार्गावर हिट अँड रन चा प्रकार पुढे आला आहे. यात सहारे कुटुंबाने एकुलता एक कमावता मुलगा गमावलाय. मयत युवक दुमाजी सहारे यांच्या अपघाताचा तपास करण्यात सावली पोलिसांनी दिरंगाई चालविली आहे. अपघाताला 14 दिवस उलटूनही आरोपी फरार आणि वाहन निश्चित करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. अपघाताच्या वेळी गावात शिवजयंती मिरवणूक असल्याने बंदोबस्तावरील पोलिसांच्या डोळ्यादेखत घटना घडली आहे. पोलिसांशी असलेल्या संबंधातून अवैध दारू वाहतूक करणारे आरोपी आणि वाहनाला अभय मिळाल्याने आरोपीनी युवकाला उडवून पळ काढल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. आपल्यावर आलेले संकट सांगताना धाय मोकलून रडणाऱ्या मातेच्या प्रश्नांची उत्तरे चंद्रपूर पोलिसांकडे मात्र नाहीत.  केवळ तपास वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याचे उत्तर त्यांना दिले जात आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या फुटेजमध्ये वाहनाच्या प्रचंड वेगाची कल्पना येत आहे. सहारे कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे. बाईट १) ललिता सहारे, मयताची आई बाईट २) आचल कोडीवार, मयताची बहीण आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
1014
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 20, 2026 11:21:15
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्रह होते, कोणा-कोणाचे उंबरे झिजवले याचे साक्षीदार आपण - राष्ट्रवादीचे माजी खासदार संजयकाका पाटलांचा गौप्यस्फोट.. अँकर - भाजपात जाण्यासाठी जयंत पाटलांनी किती वेळा उंबरे झिजवले याचा साक्षीदार संजयकाका पाटील आहे, अशा शब्दात जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्राही होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केलाय, जयंत पाटील च्या राजकारण अडचणीत आणणारा असून जयंत पाटलांनी आगीशी खेळू नये, तसेच तुमचा काळा इतिहासा काढायला भाग पडू नका, असा इशारा देत, आपणाला त्यांनी भाजपासोबत पाठवलं हे, जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या डोकेवर हात ठेवून शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान देखील, संजयकाका पाटील यांनी जयंत पाटलांना दिले आहे. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून जयंत पाटलांनी संजयकाका पाटळांच्यावर टीका करताना, भाजपातील माहिती काढण्यासाठी संजयकाका पाटील यांना आपणचं भाजपा सोबत पाठवलं होतं, असं विधान केले होतं, यावरून संजयकाका पाटलांनी जयंत पाटलांना हा इशारा दिला आहे. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील विरुद्ध संजयकाका पाटील असा नवा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस, बाईट - संजयकाका पाटील - माजी खासदार - राष्ट्रवादी अजित पवार.
1068
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 20, 2026 11:17:30
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर तीर्थक्षेत्र कॉरिडॉर साठी ज्या बाधित नागरिकांची संमती आहे त्यांचे भूसंपादन होईल आमदार समाधान आवताडे यांची माहिती पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये कॉरिडॉर करण्याचे राज्य governmentचे नियोजन आहे पालकमंत्र्यांच्या बैठकीत याचा प्राथमिक आराखडा मंजूर झालेला आहे साधारणता या कामासाठी वर्षभराचा कालावधी अजून लागू शकतो यामध्ये उच्चस्तरीय समितीचे मान्यता मंत्रिमंडळाची मान्यता आणि त्यानंतर निधीची तरतूद होईल त्यामुळे यासाठी कालावधी लागू शकतो मात्र ज्या नागरिकांची संमती आहे त्यांच्या घर अथवा दुकानांचे भूसंपादन करायला काही हरकत नाही त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पंढरपूर कॉरिडॉर करण्याला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता आमदार अवताडे यांनी बोलून दाखवली आहे
1010
comment0
Report
Advertisement
Back to top