Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली में चंद्रकांत पाटील ने महाविकास आघाडी के नेताओं पर तंज कस

SMSarfaraj Musa
Mar 20, 2026 13:33:58
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, मंत्री चंद्रकांत पाटलांचा,जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांना इशारा एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही,अजून लई बाकी आहे..अश्या शब्दात मध्ये भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सांगली जिल्ह्यातल्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत एवढा अट्टाहास कशासाठी आणि हा ट्रम्पचा पराभव केलाय का ? आणि आमचा पराभव करायला तीन पिढ्याच वैर विसरून एकत्र यावे लागेल,असा टोला देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांना लगावत,सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकी वेळी आमच्याकडून काही चुका,अरेरावीची भाषाअसेल अशा गोष्टी घडल्याचा पराभव झाला,अशी प्रांजल कबुली मंत्री चंद्रकांत पाटलांनी यावेळी देत,पण यापुढे तुम्ही तुमच्या खासदारकीची आणि आमदारकीची चिंता करा,असा इशारा देखील पाटील यांनी विशाल पटल्ा व जयंत पाटलांना दिला आहे,ते सांगलीत बोलत होते. चंद्रकांत पाटील - पालकमंत्री, सांगली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Mar 20, 2026 13:48:44
Bhandara, Maharashtra:भोंदूगिरी करणारे सर्वच जेरबंद होतील... अशोक खरात प्रकरणात महसूल मंत्री बावनकुळे यांचे वक्तव्य... नाशिक मध्ये बलात्कार प्रकरणांमध्ये पोलिसांनी अशोक खरात या ज्योतिसाला अटक केली असून या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांच्या वतीने केली जात आहे.. यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई सरकारच्या वतीने करण्यात येईल आणि सर्व दोषींना जेरबंद करण्यात येईल असे आश्वासन दिले.. तर अशा पद्धतीने अनेक भोंदू बाबा आश्रम उघडतात त्यामध्ये काय कार्य करतात हे अनेक वेळा पोलिसांना देखील माहित नसते असेही बावनकुळे म्हणाले..
1014
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 20, 2026 12:31:28
Ambernath, Maharashtra:बदलापूर-अंबरनाथकरांचा प्रवास गतिमान होणार. कासगाव-कामोठे नव्या रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हेला मंजुरी. या भेटीत नव्या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणाला मंजुरी देण्यात आलीय. या नव्या रेल्वे मार्गामुळे बदलावूरहून नवी मुंबईला अवघ्या 30 मिनिटांत जाता येईल. याशिवाय नव्या कनेक्टिव्हिटीतमुळे वांगणी-बदलापूर परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. बदलापूर आणि अंबरनाथ शहराची लोकसंख्या जवळपास 10 लाखांच्या घरात आहे. या शहरातील नागरिकांना नवी मुंबईला जाण्यासाठी ठाणे मार्गे रेल्वेने प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी जवळपास दीड तास लागतो. त्यामुळे वांगणी आणि बदलापूरच्या दरम्यान कासगाव रेल्वे स्थानक तयार करून कासगाव-कामोठे नवा रेल्वे मार्ग तयार केल्यास हे अंतर अवघ्या अर्ध्या तासांत पार करता येणं शक्य आहे. तशी मागणी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी लावून धरली होती. नुकताच नवी दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली अशी माहिती राम पातकर यांनी दिली आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास त्याचा फायदा वांगणी, बदलापूर अंबरनाथ तसेच उल्हासनगर पर्यंतच्या प्रवाशांना होऊन वेळेत मोठी बचत होईल असा विश्वास पातकर यांनी व्यक्त केलाय.
1062
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 20, 2026 12:17:03
Wardha, Maharashtra:- ग्रामपंचायत भवनात राष्ट्रनेत्यांचे फोटो नसल्याने आमदार राजेश बकाने संतप्त - ४८ तासांत फोटो लावण्याचे आदेश; निष्काळजीपणावर तीव्र नाराजी - ग्रामपंचायत भवनांमध्ये देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांची अधिकृत छायाचित्रे लावलेली नसल्याचे आमदार राजेश बकाने यांच्या निदर्शनास आले.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आमदार बकाने यांनी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला तात्काळ जाब विचारला. शासनाच्या प्रोटोकॉलनुसार ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रनेत्यांची छायाचित्रे लावणे आवश्यक असताना ती अनुपस्थित आढळल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.यावेळी त्यांनी हा विषय गांभीर्याने घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्याकडे तक्रार नोंदवली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना ४८ तासांच्या आत सर्व ग्रामपंचायत भवनांमध्ये आवश्यक छायाचित्रे लावण्याचे कडक निर्देश दिले. - ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका करत, अशा प्रकारची हलगर्जीपणा पुन्हा आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही आमदार बकाने यांनी दिला.
1033
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 20, 2026 11:51:32
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील मोखाळा महामार्गावर हिट अँड रन चा प्रकार, कुटुंबाने एकुलता एक कमावता मुलगा गमावला, दुमाजी सहारे यांच्या अपघाताचा तपास करण्यात सावली पोलिसांची दिरंगाई अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील मोखाळा महामार्गावर हिट अँड रन चा प्रकार पुढे आला आहे. यात सहारे कुटुंबाने एकुलता एक कमावता मुलगा गमावलाय. मयत युवक दुमाजी सहारे यांच्या अपघाताचा तपास करण्यात सावली पोलिसांनी दिरंगाई चालविली आहे. अपघाताला 14 दिवस उलटूनही आरोपी फरार आणि वाहन निश्चित करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. अपघाताच्या वेळी गावात शिवजयंती मिरवणूक असल्याने बंदोबस्तावरील पोलिसांच्या डोळ्यादेखत घटना घडली आहे. पोलिसांशी असलेल्या संबंधातून अवैध दारू वाहतूक करणारे आरोपी आणि वाहनाला अभय मिळाल्याने आरोपीनी युवकाला उडवून पळ काढल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. आपल्यावर आलेले संकट सांगताना धाय मोकलून रडणाऱ्या मातेच्या प्रश्नांची उत्तरे चंद्रपूर पोलिसांकडे मात्र नाहीत.  केवळ तपास वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याचे उत्तर त्यांना दिले जात आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या फुटेजमध्ये वाहनाच्या प्रचंड वेगाची कल्पना येत आहे. सहारे कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे. बाईट १) ललिता सहारे, मयताची आई बाईट २) आचल कोडीवार, मयताची बहीण आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
1014
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 20, 2026 11:21:15
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्रह होते, कोणा-कोणाचे उंबरे झिजवले याचे साक्षीदार आपण - राष्ट्रवादीचे माजी खासदार संजयकाका पाटलांचा गौप्यस्फोट.. अँकर - भाजपात जाण्यासाठी जयंत पाटलांनी किती वेळा उंबरे झिजवले याचा साक्षीदार संजयकाका पाटील आहे, अशा शब्दात जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्राही होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केलाय, जयंत पाटील च्या राजकारण अडचणीत आणणारा असून जयंत पाटलांनी आगीशी खेळू नये, तसेच तुमचा काळा इतिहासा काढायला भाग पडू नका, असा इशारा देत, आपणाला त्यांनी भाजपासोबत पाठवलं हे, जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या डोकेवर हात ठेवून शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान देखील, संजयकाका पाटील यांनी जयंत पाटलांना दिले आहे. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून जयंत पाटलांनी संजयकाका पाटळांच्यावर टीका करताना, भाजपातील माहिती काढण्यासाठी संजयकाका पाटील यांना आपणचं भाजपा सोबत पाठवलं होतं, असं विधान केले होतं, यावरून संजयकाका पाटलांनी जयंत पाटलांना हा इशारा दिला आहे. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील विरुद्ध संजयकाका पाटील असा नवा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस, बाईट - संजयकाका पाटील - माजी खासदार - राष्ट्रवादी अजित पवार.
1068
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 20, 2026 11:17:30
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर तीर्थक्षेत्र कॉरिडॉर साठी ज्या बाधित नागरिकांची संमती आहे त्यांचे भूसंपादन होईल आमदार समाधान आवताडे यांची माहिती पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये कॉरिडॉर करण्याचे राज्य governmentचे नियोजन आहे पालकमंत्र्यांच्या बैठकीत याचा प्राथमिक आराखडा मंजूर झालेला आहे साधारणता या कामासाठी वर्षभराचा कालावधी अजून लागू शकतो यामध्ये उच्चस्तरीय समितीचे मान्यता मंत्रिमंडळाची मान्यता आणि त्यानंतर निधीची तरतूद होईल त्यामुळे यासाठी कालावधी लागू शकतो मात्र ज्या नागरिकांची संमती आहे त्यांच्या घर अथवा दुकानांचे भूसंपादन करायला काही हरकत नाही त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पंढरपूर कॉरिडॉर करण्याला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता आमदार अवताडे यांनी बोलून दाखवली आहे
1010
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 20, 2026 11:04:52
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया खरात प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. त्यांना तपास करू द्यावा राज ठाकरे यांच्या टिकेवर मंत्री शेलारांचे प्रत्युत्तर सोलापूरच्या आयटी पार्कसोबत एआय पार्क करण्याचा विचार मुख्यमंत्री महोदयांनी आमचे सगळे स्थानिक आमदार पालकमंत्री यांच्या मागणीवरून सोलापूरच्या आयटी पार्कची घोषणाअर्थसंकल्पीय भाषणात केली. माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून मला या विषयात एक शिष्ट मंडळ यांच्यासोबत आज बैठकही माझी आहे. प्रयत्न आमचा हाच राहील की तातडीने या कामाला सुरुवात व्हावी जागा पण निश्चित झालेलीच आहे आणि यातल्या असलेल्या अन्य सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून सोलापुरामध्ये आयटी पार्क आणि एआयचा सुद्धा ज्या पद्धतीची आवश्यकता आणि तंत्रज्ञान विकसित होतय त्या पद्धतीने आयटी पार्क, एआय पार्क असं काही करता येईल का या बद्दलचा निर्णय होईल. पोलिसांना आपलं काम करावं द्या, योग्य चौकशी होईल. आकड्यांच्या बाबतीमध्ये स्टॅटिस्टिक्स आणि स्टॅटिस्टिकल लाय असे दोन प्रकार आहेत. राज्य सरकार जे कर्ज काढण्याच्या नियमानुसार आहे, त्या बाबतीत आधीच्या अभ्यासातून सगळ्या भांडवली गुंतवणुकीची स्थिती तपासली जाते, भांडवली गुंतवणूक, मालमत्ता निर्मिती, पायाभूत सुविधांवरील खर्च आदींचा आढावा घेऊन विकासाचा क्रम ठरतो. आशिष शेलार या विषयांवर महत्त्वपूर्ण भूमिका घेतील. राज ठाकरे यांची ईराण युद्धावरील टिप्पणीवर मी प्रतिक्रिया देणार नाही. कुठलाही पक्ष, संस्था, संघटना किंवा व्यक्ती राज्याच्या विकासासाठी जनतेची मतं व सहभागिता घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही.
1012
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 20, 2026 11:04:08
Kolhapur, Maharashtra:जलसंपदा विभागानं कोल्हापूरचा पाणीपुरवठा तोडल्यावर महापालिका देखील आक्रमक झालीय. जलसंपदा विभागाकडे 7 कोटी 24 लाख घरफळा आणि 3 कोटी 33 लाख पाणीपट्टी असा एकूण दहा कोटी 57 यांचे महापालिकाेचे देणेक आहे. ही देणी न दिल्याने आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी हर्षजित घाटगे यांनी महापालिकेतील अधिकारी और कर्मचाऱ्यांची फौजच जलसंपदा विभागाचे कार्यालय सिल करण्यासाठी थेट पाठवून दिली, यानंतर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढत त्यांची कार्यालय देखील सिल केली. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. दरम्यान पाणीपट्टी देण्यापोटी जलसंपदा विभाग कोल्हापूर महानगरपालिकेचे पंपिंग स्टेशन सील करून कारवाई करत असेल तर महापालिका सुद्धा जलसंपदा विभागाचे कोट्यावधींचं देणं आहे. हे देणे दिलं नसल्याने त्यांचे ऑफिस सील केले आहेत अस महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी म्हटल आहे.
1078
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 20, 2026 11:02:44
Varasoli, Maharashtra:अलीबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत आज जणु होड्यांची जत्राच भरली होती. निमित्त होतं शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचं. आजकाल शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा जपली आहे. आज खाडीत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळाला. यानिमित्ताने एकवीरा देवीच्या पालखीची होडीतून मिरवणूक काढण्यात आली. कोळी बांधव आपल्या होड्या रंगीबेरंगी पताकानी सजवून सहकुटुंब फेरफटका मारत होते. पारंपारिक वाद्यांच्या तालावर नाचत मनसोक्त आनंद घेत होते. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धा आयोजित केल्या जातात. आज ही स्पर्धा अनुभवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
1068
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 20, 2026 11:02:24
1095
comment0
Report
Advertisement
Back to top