Back
जत नगर परिषद चुनाव: पाटील बनाम पडळकर, विरोधी फूट से भाजपा को फायदा?
SMSarfaraj Musa
Nov 20, 2025 07:15:37
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
अँकर - नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगलीतलं राजकीय वातावरण चांगलंचं तापलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी सर्व विरोधक एकवटलेत तर दुसऱ्या बाजूला जयंत पाटलांचे कट्टर विरोधक गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मात्र विरोधकां मध्ये फूट पडली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या निवडणुकांची चर्चा जिल्ह्यात चांगलीचं रंगलीय..
व्ही वो - सांगलीचे उरूण-ईश्वरपूर आणि जत नगर परिषदेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीमध्ये चर्चेचे विषय बनलय, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर. कारण या दोन्ही नेत्यांच्या मधला संघर्ष उभ्या महाराष्ट्राने गेल्या काही महिन्यांपासून पाहिला आहे. एकमेकांची ऊनी-दुनी काढण्यापासून खालच्या पातळीवर टीकेचा प्रयोग दोन्ही नेत्यांकडुन झालंय, त्यामुळे पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष टोकाला पोहोचला.
व्ही वो - दोघांच्या मधल्या संघर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणखी गडद होईल, यातून जयंत पाटील, गोपीचंद पडळकर यांना घेरण्यासाठी प्रयत्न करतील. कारण जत मध्ये जयंत पाटलांची मोठी ताकद आहे. साथ महाविकास आघाडीची आणि पडळकरांचे स्थानिक कट्टर विरोधक माजी आमदार विलासराव जगताप यांच्याशी जयंत पाटलांचा असणारा सख्य, यामुळे पडळकरांसमोर जयंत पाटील मोठा आव्हान उभे करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
व्ही वो - मात्र,जयंत पाटलांना पडळकरांच्या विरोधात जत नगर परिषदेसाठी मोट बांधता आली नाही. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांच्या माध्यमातून जयंत पाटलांनी प्रयत्न देखील केला. पण त्यात यश मिळालं नाही. शिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि पडळकर यांचे कट्टर विरोधक विलासराव जगताप यांनी देखील वेगळी चूल मांडली, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जत तालुक्याचे नेते सुरेश शिंदे यांनी महाविकास आघाडी सोबत न जाता विलासराव जगतापांच्या सोबत जाणं, पसंत केला. तर माजी आमदार विक्रम सावंत यांनी देखील काँग्रेसच्या माध्यमातून पडळकरांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली, त्यामुळे या ठिकाणी पडळकर यांना विरोधकांकडून जे आव्हान निर्माण करायचं होतं, ते होऊ शकलं नाही. त्यामुळे पडळकरांच्या नेतृत्वाखाली भाजपा स्वबळावर निवडणूक लढवत आहे.
व्ही वो - मात्र दुसऱ्या बाजूला जयंत पाटलांना सर्व विरोधकांनी घेरले आहे. जयंत पाटलांचा विरोधात उरुन ईश्वरपूर नगरपालिका महायुतीची वज्रमूठ झाल्याचे पाहायला मिळतंय. आमदार सदाभाऊ खोत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, भाजपा�े जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंद पवार और जयंत पाटलांच्या सर्व विरोधकांनी एकत्रित येत भाजपाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय, याचे नेतृत्व पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे करताय.
व्ही वो - इतकंच नव्हे तर जयंत पाटलांना विरोधकांकडून घेरलं जात असताना महाविकास आघाडीतील काँग्रेस, जयंत पाटलांच्या सोबतीला उभी राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालं नाही. काँग्रेसने ईश्वरपूर नगरपालिका मध्ये आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही,इतकंच नव्हे तर काँग्रेस कडून निवडणूक देखील लढवली जात नाही. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेबाबत उरुण ईश्वरपुर मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र पाटलांकडून काँग्रेस सोबत असल्याचा दावा केला जातोय.
व्ही वो - जयंत पाटील यांना विरोधकांनी घेरलंय,याउलट गोपीचंद पडळकर यांच्यासमोर विरोधकां फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपापल्या बालेकिल्ल्यात आता आपलं अस्तित्व राखण्याच्या लढाईत जयंत पाटील विरोधकांचे चक्रव्यूह भेदणार की विरोधक त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार,हे निकालानंतरच स्पष्ट होईल.. ईश्वरपूर आणि जत नगरपालिका निवडणूक चांगलीचं रंगणार,हे नक्की..
189
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 08:15:2117
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 20, 2025 08:03:4961
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 20, 2025 07:55:34171
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 07:55:1583
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 07:54:57135
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 07:51:0993
Report
PNPratap Naik1
FollowNov 20, 2025 07:49:4679
Report
SKShubham Koli
FollowNov 20, 2025 07:49:34126
Report
ABATISH BHOIR
FollowNov 20, 2025 07:49:20134
Report
AKAMAR KANE
FollowNov 20, 2025 07:48:51151
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 20, 2025 07:48:05165
Report
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 07:47:39140
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 20, 2025 07:47:22104
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 20, 2025 07:05:37104
Report