Back
शिंदे-शहा की बैठक से महायुती को जीत की दिशा स्पष्ट
AKAMAR KANE
Nov 20, 2025 07:48:51
Nagpur, Maharashtra
On शिंदे शाह भेट
* एकनाथ शिंदे यांना परवा भेटलो होतो, ते कुठेही नाराज नव्हते.. काल ते अमित शहा यांना भेटले.. नगर विकास खातं तसेच केंद्र सरकार सोबतच्या समन्वयाचे विषय यासाठी एनडीएचे नेता म्हणून त्यांनी भेट घेतली.. Nda ची परंपरा आहे की विशिष्ट कालावधीनंतर नेते भेटत असतात...
* ते नाराज असल्याची बातम्या कपोल कल्पित आहे..
* महाराष्ट्रात महायुती 51 टक्के मतांनी विजयी झाली पाहिजे, यासाठी त्यांनी भेट घेतली होती, तीच त्यांची भूमिका आहे..
On शिंदे नाराज
* समन्वय समितीमध्ये ठरवले आहे की एकमेकांच्या पक्षातील पक्षप्रवेश करायचे नाही.. मात्र जेव्हा काही कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळत नाही, तेव्हा कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. माझ्या कामठी मतदारसंघातूनही भाजपचे पदाधिकारी शिंदे यांच्या पक्षात गेले आहे..
* सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षांतर सुरू आहे... त्यामुळे कुठेही महायुतीत गडबड झाली आहे अशी स्थिती नाही...
On डोंबिवली पक्षप्रवेश
* डोंबिवली मध्येही शिंदे कडे किंवा भाजपकडे उमेदवारी मिळत नाही म्हणून काही कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झाले आहे
* एकनाथ शिंदेंना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे. भाजपलाही आपला पक्ष वाढवायचा आहे..
* पक्षप्रवesha संदर्भातल्या नाराजी बददल ते अमित शहाकडे जातील असे वाटत नाही, त्याबद्दल त्यांना तक्रार करायची असेल, तर माझ्याकडे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करतील..
On आरक्षण मर्यादा याचिका
* सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी पर्यंत सर्व निवडणुका घ्या असे निर्देश दिले.. ओबीसींचा 27% आरक्षण कायम राहिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे..
* 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या जेव्हा सुप्रीम कोर्ट असे सांगतो, तेव्हा 27% आरक्षण कायम राहिला पाहिजे अशी अपेक्षा आहे..
(On redevlopment संदर्भातील निर्णय)
* राज्य सरकारने निर्णय घेतला की रीडेव्हलपमेंटच्या वेळेला 600 फुटापर्यंत भाडेकडूना घर दिल तर मुद्रांक शुल्क लागणार नाही.. मुंबई उपनगर परिसरातील सर्व भाडेकडून साठी हे अत्यंत दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय आहे..
* 15/ 10 / 2024 पर्यंत ज्यांनी ज्यांनी लेआऊट मध्ये घर घेतले आहे, घर बांधले आहे.. त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही तुकडे बंदी कायदा रद्द केला आहे.. या तारखेपर्यंतचे सर्व बांधकाम नियमित केले जाईल. कुठलाही शुल्क घेतला जाणार नाही साठ लाख कुटुंबांना या निर्णयाचा फायदा होईल..
(on सेवानिवृत्त अधिकारी)
* महसूल विभागातील रखडलेल्या पदोन्नती केल्या आहे, मोठ्या संख्येने नायब तहसीलदार पासून अतिरिक्त जिल्हाधिकारी पर्यंत पदोन्नती दिल्या आहे.. गेल्या अनेक वर्षांचा बॅकलॉग भरून काढला आहे. साडेपाचशे पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचे प्रमोशन केले आहे.. त्यामुळे आता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा घेण्याची आम्हाला गरज उरणार नाही...
(on vertical 7/12)
या राज्यात व्हर्टीकल सातबारा योजना लागू होत आहे. विधिमंडळासमोर कायदा आणणार आहोत... एखाद्या प्लॉटवर उंच बिल्डिंग बांधली असेल... त्या जमिनीची मालकी मूळ जमीन मालकाकडे आहे आणि फ्लॅट ची रजिस्ट्री झालीय... अशा सर्व फ्लॅटधारकांना त्या जमिनीचा शेअर.. प्रत्येक फ्लॅटचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल... याची समिती आम्ही नेमली आहे..अप्पर सचिव खर्गे आहे.. या सातबाराला व्हर्टिकल सातबाराला आम्ही अंतिम पूर्व असा आम्हाला दिसत आहे
--
(On नागपूर काँग्रेस )
* वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात पक्षप्रवेश झाले, राजेंद्र मुळक यांच्या मतदारसंघात पक्षप्रवेश झाले, सुनील केदार यांच्या मतदारसंघातही पक्षप्रवेश झाले..
* भाजपमध्ये येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा म्हणणं आहे की काँग्रेसमध्ये समन्वय नाही, कोणी कोणाला विचारत नाही..
* वडेट्टीवार नाना पटोले यांना पाहायला तयार नाही, नाना पटोले वडेट्टीवार यांना विचारत नाही. दोन्ही मिळून सुनील केदारला विचारत नाही.. सर्व मिळून राहुल गांधींना विचारत नाही..
* काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहे, म्हणून ते मजबूत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजपमध्ये कार्यकर्त्यांना मोकळीक आहे, ते आपल्या तक्रारी नेत्यांसमोर सांगू शकतात. काँग्रेसमध्ये त्यांची अडचण होत होती..
* 2029 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात छोटी पार्टी राहील...
On नवाब मलिक निवडणूक प्रमुख
* राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या काय निर्णय करायचा, तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्यांना त्या संदर्भात सांगू शकत नाही.. नवाब मलिक यांना अजित दादा यांनी पक्षात घेतलं आहे, आता जबाबदारी देताना नवाब मलिक यांच्यावर कोणते आरोप झाले आहे, त्या संदर्भात नबाब मलिक योग्य निर्णय करतील...
On उर्दू प्रचार पत्रक
* जेव्हा आम्ही मुस्लिम उमेदवार उभा करतो, तेव्हा तो मुस्लिम मतदारांना आमचे मुद्दे समजले पाहिजे यासाठी काही पत्रक उर्दू भाषेमध्ये छापतात त्याला विरोध कसा करायचा...
* कुणाला भाषेवरून थांबवता येत नाही.. स्थानिक उमेदवाराने केलेला तो प्रकार आहे...
(On मुंबई रेल्वे स्थानक वायरल व्हिडिओ)
* धर्मांतरण करण्यासाठी प्रवत्त करणे योग्य नाही. जो असे करत असेल त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. या संदर्भात मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनात तुम्हाला दिसून येईल की आम्ही कठोर पावले उचलली आहे...
On शिक्षक मागणी
* शिक्षकांच्या मागणी संदर्भात संबंधित मंत्र्यांना सोबत मी बोलणार आहे...
151
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 09:18:420
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 20, 2025 08:49:46125
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 20, 2025 08:49:1755
Report
SKShubham Koli
FollowNov 20, 2025 08:48:3336
Report
ABATISH BHOIR
FollowNov 20, 2025 08:47:30182
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 08:15:21172
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 20, 2025 08:03:49109
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 20, 2025 07:55:34171
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 07:55:15113
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 07:54:57168
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 07:51:0993
Report
PNPratap Naik1
FollowNov 20, 2025 07:49:46105
Report
SKShubham Koli
FollowNov 20, 2025 07:49:34133
Report
ABATISH BHOIR
FollowNov 20, 2025 07:49:20134
Report