Back
वडगांव मावळ नगरपंचायत चुनाव: 28 निर्दलीयों के मैदान से विपक्षी नेताओं की प्रतिष्ठा दांव पर
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 20, 2025 07:05:37
Pune, Maharashtra
Headline : वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीत बंडखोरांना अर्ज मागे घेण्यासाठी मावळ मधील नेत्यांचा कस लागणार
तब्बल 28 अपक्ष उमेदवार वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी रिंगणात
Anchor:
वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत असल्याचं चित्र दिसत असलं, तरी प्रत्यक्ष रिंगणात, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेनेचे शिंदे आणि उबाठा गट देखील आहेत. यासोबत तब्बल २८ अपक्ष उमेदवार मैदानात उतरलेत. त्यामुळे बंडखोरांना मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके तसेच भाजप माजीमंत्री बाळा भेगडे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा कस लागणार आहे. अखेरच्या दिवशी झालेल्या अर्जांच्या तुफान सादरीकरणानंतर एकूण ८९ अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर नगराध्यक्षपदासाठी ६ आणि नगरसेवकपदासाठी ७१ अर्ज वैध ठरले. काही उमेदवारांचे दोन-दोन अर्ज असल्याने प्रत्यक्ष अर्जदारांची संख्या, नगराध्यक्षपदासाठी ५, तर नगरसेवकपदासाठी ६४ इतकी आहे. यात भाजप–शिवसेना युतीचे १७, राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, तर वेगवेगळ्या गटांचे प्रत्येकी १-१ उमेदवार आहेत. मात्र सर्वाधिक लक्ष वेधत आहेत ते २८ अपक्ष उमेदवार. उद्या २१ तारखेला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून, किती अपक्ष निवडणूकितून माघार घेतात वडगावची खरी निवडणूक कोणत्या दिशेने जाते याचं चित्र स्पष्ट होणार असलं तरी आमदार सुनील शेळके आणि माजीमंत्री बाळा भेगडे या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागलीये, कारण की पंचवार्षिक मध्ये येथे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता एकहाती होती..राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखेल का? की भाजप शिवसेना युती शिरजोर होईल हें निवडणुकीच्या निकालात स्पष्ट होईल...
104
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 08:15:210
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 20, 2025 08:03:4924
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 20, 2025 07:55:34106
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 07:55:1555
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 07:54:5757
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 07:51:0968
Report
PNPratap Naik1
FollowNov 20, 2025 07:49:4650
Report
SKShubham Koli
FollowNov 20, 2025 07:49:3478
Report
ABATISH BHOIR
FollowNov 20, 2025 07:49:2090
Report
AKAMAR KANE
FollowNov 20, 2025 07:48:51151
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 20, 2025 07:48:05125
Report
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 07:47:39140
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 20, 2025 07:47:2285
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 20, 2025 07:15:37189
Report