Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

65 गांवों में पानी की बहाली: म्हैसाळ विस्तारीत सिंचन योजना का ब्रेकथ्रू उद्घाटन

SMSarfaraj Musa
Mar 01, 2026 09:18:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
जतच्या 65 गावांच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मिटणार ,म्हैसाळ विस्तारीत सिंचन योजनेच्या बोगदा ब्रेक-थ्रू चा जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या सांगलीच्या जत तालुक्यातील 65 गावांसाठी महत्वकांक्षी असणारया म्हैसाळ विस्तारीत सिंचन योजनेच्या बोगदा ब्रेक-थ्रू चा शुभारंभ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला आहे. मिरज तालुक्यातल्या बेळंक येथे कामाचं शुभारंभ झाला आहे, यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सदाभाऊ खोत, यांच्यासह जत तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या 65 गावांसाठी पाणी पुरवठा करणारी तुमचा सिंचन योजना आहे. या योजनेमुळे 65 गावांचा दुष्काळ कायमस्वरूपी मिटणार आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Mar 01, 2026 10:34:55
Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवली परिसर के महात्मा फुले पुलिस थाना के पुराने भवन में लॉकअप की दुरवस्था सामने आई थी, जिससे सुरक्षा पर प्रश्न उठ रहे थे. DCP अतुल झेंडे ने संबंधित विभाग के अधिकारीयों के साथ प्रत्यक्ष निरीक्षण किया और पावसाळे से पहले दुरुस्ती व देखभाल करने के निर्देश दिए.LOCKअप की दीवारों में दरारें, छत की क्षति औरOverall हालत खराब होने से सुरक्षा के खतरे थे. निरीक्षण के दौरान उन्होंने कहा कि सुरक्षा की दृष्टि से लॉकअप की तात्कालिक देखभाल और दुरुस्ती जरूरी है, बारिश शुरू होने से पहले मरम्मत का काम शुरू किया जाएगा और संबंधित विभाग को निर्देश दे दिए गए हैं. जल्द ही इन मरम्मत के कामों की शुरुआत होगी और आरोपी व पुलिस कर्मियों की सुरक्षा को प्राथमिकता दी जाएगी.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 01, 2026 10:33:34
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहराजवळील शेरी फाट्याजवळ bhiषण अपघातात तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार दुचाकीला आयशर वाहनाची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला.मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये दर्शन रामेश्वर वैष्णव (वय अंदाजे १६ वर्ष),साई रामेश्वर वैष्णव (वय अंदाजे १२ वर्ष) आणि गणेश दीपक आपतुरकर (वय अंदाजे १६ वर्ष) यांचा समावेश आहे.अपघात इतका भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या गंभीर जखमी मुलाचा तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांपैकी दोघे सख्खे भाऊ असल्याचेही समजते.घटनेनंतर संबंधित आयशर वाहन ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई तेल्हारा पोलीस स्टेशन करत आहे. तिघांवरही तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.सदर तिन्ही अल्पवयीन मुले माळेगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. ते तेल्हारा येथे येत असताना हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.या दुर्दैवी घटनेमुळे वैष्णव व आपतुरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून माळेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 01, 2026 10:11:05
Ambernath, Maharashtra:आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली बदलापूर रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांबाबत माहिती घेतली, यावेळी रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृहे बांधणे, पिण्याच्या पाण्याची सोय, फलाटांवर छत बांधकाम, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, कल्याण स्थानकावर लोकल अनावश्यक थांबवल्याने होणारा विलंब कमी करणे, बदलापूर-सीएसएमटी दरम्यान 15 डब्यांच्या लोकलची संख्या वाढवणे, लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढवणे आणि कर्जत-कसारा दरम्यान मेल/एक्सप्रेस तसेच मालगाड्यांसाठी वेगळ्या मार्गिकेचे काम लवकर पूर्ण करणे अशा मागण्यां त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केल्या. तसेच स्वतः डी आर एम यांनी फलाटावरच्या सर्व व्यवस्थांची पाहणी तात्काळ करावी अशी मागणी केली.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 01, 2026 10:04:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - अजितदादांच्या विमान अपघाताचा धसका नेत्यांच्या मनात ! भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली भीती.. अँकर - अजितदादांच्या विमान अपघाताचा धसका राजकीय नेत्यांनी किती घेतला आहे, याची प्रचिती सांगली मध्ये आली आहे, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी, हेलिकॉप्टर प्रवासावरून मनात निर्माण झालेली भीती जाहीरपणे बोलून दाखवली. हेलिकॉप्टर बसायची भीती,पोटात गोळा आला होता,अशी भावना बोलुन दाखवली आहे.मिरज तालुक्यातील बेळंकी येथे आयोजित कार्यक्रमासाठी गोपीचंद पडळकर हे हेलिकॉप्टरने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत पोहोचले होते, तत्पूर्वी विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांच्यासोबत एका बैठकीमध्ये सुजय विखे पाटलांनी हेलिकॉप्टर आणि विमान प्रवास बंद केल्याचं सांगितल्यावर आपल्या पोटात गोळा आला,पण जतला पाणी मिळणार आहे म्हणून आपण हेलिकॉप्टरने आल्याचं सांगत अजितदादांच्या विमान अपघातानंतर राजकीय नेत्यांच्या मनात कशा पद्धतीची भीती निर्माण झाल्याचे पडळकर यांच्या वक्तव्यामुळे समोर आले आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 01, 2026 09:33:44
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 01, 2026 09:31:57
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग भाजपाचे नेते व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे,काँग्रेस सहयोगी खासदार विशाल पाटलांना भाजपात येण्याचे जाहीर आमंत्रण खासदार विशाल पाटलांना सल्ला देत राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतःला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचे केले आवाहन मिरज तालुक्यातल्या बेळंकी येथील जत विस्तारित सिंचन योजनेच्या कार्यक्रमात खासदार विशाल पाटील आणि राधाकृष्ण पाटील आले,एकाच व्यासपीठावर विशाल पाटील तुम्ही तरुण आहात,तुम्हाला छक्के-पंजे समजायचे आहेत,निरंतर आणि विकासाच्या प्रक्रियेत स्वतःला सामावून घ्या वसंतदादा पाटील व कुटुंबाशी जवळचं नाते असल्याचे सांगात,मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी खासदार विशाल पाटलांना भाजपात येण्याची दिले जाहीर आमंत्रण
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 01, 2026 09:09:16
Kalyan, Maharashtra:अंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर मासळी विक्री करणाऱ्या मच्छीमारांवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिलेकडून तब्बल पाच वेळा दगडफेक करण्यात आल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अंबिवली स्थानकाबाहेरच्या परिसरात रोजप्रमाणे मच्छीमार मासळी विक्री करत असताना अचानक एका महिलेने रेल्वे ब्रिज वरून लपून दगडफेक सुरू केली. तिचा नेम चुकल्याने सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. पण अचानक झालेल्या या प्रकारामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर संतप्त मच्छीमारांनी संबंधित महिलेला रंगेहात पकडून कल्याण खडकपाडा पोलीस यांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 01, 2026 07:49:39
Amravati, Maharashtra:अंजनगाव सुर्जी परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका चोरी करने का प्रयत्न; शिक्षण विभाग की भरारी पथक ने कारवाई करते हुए केंद्रप्रमुखों समेत तीन लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती विभाग के आदेशानुसार जिल्हा परिषदे के उपशिक्षणधिकारी राजन नारायण शिरभाते और उनके सहयोगी भरारी पथक 27 फरवरी को दुपारी 4:40 बजे से Center पर गहन जांच के लिए पहुंचे। जांच के दौरान केंद्र व्यवस्थापन में गड़बड़ी दिखी। पेपर समाप्त होने के बाद उत्तरपत्रिका सील करने की प्रक्रिया समय पर होना अनिवार्य है, किंतु शाम तक उत्तरपत्रिका सील नहीं की गई थीं। निरीक्षण के दौरान अनिल हाडोले नामक कर्मचारी (जहां हमाल के रूप में काम करते थे) को शकास्पद हरकत करते देखा गया, जिसे रोककर पूछताछ के दौरान shirt के अंदर छिपाकर रखी दो उत्तरपत्रिका मिलीं; इनमें से एक इंग्लिश माध्यम की और दूसरी उर्दू माध्यम की थी। इस वक्त परीक्षक सुधीर दा. खोडे और सह-परीक्षक सुशील कुमार अभ्यंकर घटनास्थल पर मौजूद थे, फिर भी उन्होंने कोई कार्रवाई नहीं की। शिक्षण अधिकारी राजनी शिरभाते ने दी गई शिकायत के आधार पर अंजनगाव सुर्जी पुलिस ने निम्न व्यक्तियों के विरुद्ध मामला दर्ज किया: 1. सुधीर दा. खोडे (परीक्षक) 2. सुशील कुमार अभ्यंकर (सह-परीक्षक) 3. अनिल हाडोले (हमाल) 4. दो अज्ञात विद्यार्थी (जिन्हें उत्तरपत्रिका प्रदान की गई थी) इन सभी के विरुद्ध भारतीय कानून (BNS) और महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व अन्य परीक्षाओं में व्यवसायिक दोषों रोकथाम अधिनियम 1982 के तहत मामला दर्ज किया गया है। शिक्षण मंडळ की भूमिका—परीक्षा मंडळ के नियम के अनुसार प्रश्नपत्रिका से लेकर उत्तरपत्रिका पोस्ट तक सब कुछ परीक्षक की जिम्मेदारी है। इस केंद्र पर नियम तोड़कर विद्यार्थियों की उत्तरपत्रिकाओं के विनिमय या फेरफार की आशंका प्राथमिक जांच में मिली है। पुलिस अधिक जांच कर रही है और केंद्र पर उत्तरपत्रिका सौंपने वाले विद्यार्थियों की पहचान करने का काम जारी है। परीक्षा केंद्र में हो रहे गैरप्रकारों को नजरअंदाज करना और लापरवाही करना गंभीर मामला है; दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई के लिए पुलिस को विस्तृत रिपोर्ट दी जा चुकी है।
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 01, 2026 07:49:06
Chandrapur, Maharashtra:अखेर तारीख ठरली, चंद्रपूर मनपाची विशेष सभा ५ मार्च रोजी, स्थायी समिती गठनासाठी 16 सदस्यांची केली जाणार निश्चिती, विरोधी आणि सत्ताधारी यांच्याकडे समसमान आठ-आठ मते असल्याने स्थायी समिती अध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम, भाजप आणि उबाठा शिवसेना यांच्यातील कराराप्रमाणे स्थायी समिती अध्यक्षपद मिळणार आहे उबाठा सेनेला. चंद्रपूर महानगरपालिकेच्या १६ स्थायी समिती सदस्य निवडीसाठी ५ मार्च रोजी विशेष सभा बोलावण्यात आली असून, या सभेच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील दोन्ही गटांमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळणार आहे. भाजपामध्ये आमदार मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार तर काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार हे आपआपल्या गटातील नगरसेवकांची स्थायी समितीत वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक १० फेब्रुवारी रोजी पार पडली. त्यानंतर आठवडाभरात स्थायी समिती सदस्य, सभापती तसेच स्वीकृत सदस्यांची निवड होणे अपेक्षित असताना महापौर संगीता खाडेकर यांनी राजकीय कारणांनी बराच वेळ मारून नेला. २३ दिवसांनंतर स्थायी समिती सदस्यांची निवड होणार आहे. ही निवड लवकरात लवकर करण्यात यावी, यासाठी सत्तारूढ पक्षातील जोरगेवार गट आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी दबाव वाढविला. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन नरमले. आणि ५ मार्च रोजी विशेष सभा बोलावली आहे. सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. तसेच होळी व रंगपंचमी आटोपताच स्थायी समिती सदस्य निवडीसाठी दोन्ही प्रमुख राजकीय पक्षाच्या गटांमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळणार आहे. काँग्रेसकडे २७ चे संख्याबळआहे. बहुजन समाज पक्षाचा एक नगरसेवक काँग्रेसच्या गटात असल्याने हा गट २८ चा झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला स्थायी समितीतील ७ जागा मिळणार आहेत. तर एक जागा काँग्रेसच्या मित्र पक्षाला मिळेल. काँग्रेसकडील ७ पैकी प्रत्येकी ३ जागा धानोरकर आणि वडेट्टीवार गटालाजातील तर एक जागा बसपाला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाकडे स्वतःचे २३ नगरसेवक आहेत. शिंदे सेनेचा एक नगरसेवक भाजपाच्या गटात असल्याने भाजपा-सेना युतीचा २४ चा गट आहे. त्यामुळे भाजपाला स्थायी समितीच्या ६ जागा मिळतील. या ६ जागांसाठी आमदार मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. दोघांतील वाद पाहता स्थायी समिती सदस्यांच्या निवडीचा विषय पुन्हा प्रदेश नेतृत्वाकडे जाण्याची शक्यता आहे. ४ नगरसेवकांमागे १ स्थायी समिती सदस्य निवडला जाणार आहे. स्थायी समितीसाठी संख्याबळ असलेल्या सर्व राजकीय पक्षाच्या गटनेत्याकडून बंद लिफाफ्यात नावे मागितली जातील. हा बंद लिफाफा विशेष सभेत फोडून स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.भाजप आणि उबाठा शिवसेना यांच्यातील कराराप्रमाणे स्थायी समिती अध्यक्षपद उबाठा सेनेला मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top