Back
अकोला में भीषण सडक हादसा: तीन नाबालिग बच्चों की मौत, आयशर टक्कर से त्रासदी
JJJAYESH JAGAD
Mar 01, 2026 10:33:34
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहराजवळील शेरी फाट्याजवळ bhiषण अपघातात तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार दुचाकीला आयशर वाहनाची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला.मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये दर्शन रामेश्वर वैष्णव (वय अंदाजे १६ वर्ष),साई रामेश्वर वैष्णव (वय अंदाजे १२ वर्ष) आणि गणेश दीपक आपतुरकर (वय अंदाजे १६ वर्ष) यांचा समावेश आहे.अपघात इतका भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या गंभीर जखमी मुलाचा तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांपैकी दोघे सख्खे भाऊ असल्याचेही समजते.घटनेनंतर संबंधित आयशर वाहन ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई तेल्हारा पोलीस स्टेशन करत आहे. तिघांवरही तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.सदर तिन्ही अल्पवयीन मुले माळेगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. ते तेल्हारा येथे येत असताना हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.या दुर्दैवी घटनेमुळे वैष्णव व आपतुरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून माळेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 01, 2026 11:50:160
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 01, 2026 11:04:160
Report
AKAMAR KANE
FollowMar 01, 2026 11:03:230
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 01, 2026 11:02:570
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 11:00:120
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 01, 2026 10:50:370
Report
ABATISH BHOIR
FollowMar 01, 2026 10:34:550
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 01, 2026 10:34:420
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 01, 2026 10:11:050
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 10:04:300
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 01, 2026 09:33:440
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 09:31:570
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 09:18:110
Report
ABATISH BHOIR
FollowMar 01, 2026 09:09:160
Report
