Back
चंद्रपुर नगरपालिका: 5 मार्च को विशेष सभा, 16 स्थायी समिति सदस्य तय, गठबंधन के संकेत
AAASHISH AMBADE
Mar 01, 2026 07:49:06
Chandrapur, Maharashtra
अखेर तारीख ठरली, चंद्रपूर मनपाची विशेष सभा ५ मार्च रोजी, स्थायी समिती गठनासाठी 16 सदस्यांची केली जाणार निश्चिती, विरोधी आणि सत्ताधारी यांच्याकडे समसमान आठ-आठ मते असल्याने स्थायी समिती अध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम, भाजप आणि उबाठा शिवसेना यांच्यातील कराराप्रमाणे स्थायी समिती अध्यक्षपद मिळणार आहे उबाठा सेनेला.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या १६ स्थायी समिती सदस्य निवडीसाठी ५ मार्च रोजी विशेष सभा बोलावण्यात आली असून, या सभेच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील दोन्ही गटांमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळणार आहे. भाजपामध्ये आमदार मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार तर काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार हे आपआपल्या गटातील नगरसेवकांची स्थायी समितीत वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक १० फेब्रुवारी रोजी पार पडली. त्यानंतर आठवडाभरात स्थायी समिती सदस्य, सभापती तसेच स्वीकृत सदस्यांची निवड होणे अपेक्षित असताना महापौर संगीता खाडेकर यांनी राजकीय कारणांनी बराच वेळ मारून नेला. २३ दिवसांनंतर स्थायी समिती सदस्यांची निवड होणार आहे. ही निवड लवकरात लवकर करण्यात यावी, यासाठी सत्तारूढ पक्षातील जोरगेवार गट आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी दबाव वाढविला. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन नरमले. आणि ५ मार्च रोजी विशेष सभा बोलावली आहे. सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. तसेच होळी व रंगपंचमी आटोपताच स्थायी समिती सदस्य निवडीसाठी दोन्ही प्रमुख राजकीय पक्षाच्या गटांमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळणार आहे. काँग्रेसकडे २७ चे संख्याबळआहे. बहुजन समाज पक्षाचा एक नगरसेवक काँग्रेसच्या गटात असल्याने हा गट २८ चा झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला स्थायी समितीतील ७ जागा मिळणार आहेत. तर एक जागा काँग्रेसच्या मित्र पक्षाला मिळेल. काँग्रेसकडील ७ पैकी प्रत्येकी ३ जागा धानोरकर आणि वडेट्टीवार गटालाजातील तर एक जागा बसपाला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपाकडे स्वतःचे २३ नगरसेवक आहेत. शिंदे सेनेचा एक नगरसेवक भाजपाच्या गटात असल्याने भाजपा-सेना युतीचा २४ चा गट आहे. त्यामुळे भाजपाला स्थायी समितीच्या ६ जागा मिळतील. या ६ जागांसाठी आमदार मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. दोघांतील वाद पाहता स्थायी समिती सदस्यांच्या निवडीचा विषय पुन्हा प्रदेश नेतृत्वाकडे जाण्याची शक्यता आहे. ४ नगरसेवकांमागे १ स्थायी समिती सदस्य निवडला जाणार आहे. स्थायी समितीसाठी संख्याबळ असलेल्या सर्व राजकीय पक्षाच्या गटनेत्याकडून बंद लिफाफ्यात नावे मागितली जातील. हा बंद लिफाफा विशेष सभेत फोडून स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.भाजप आणि उबाठा शिवसेना यांच्यातील कराराप्रमाणे स्थायी समिती अध्यक्षपद उबाठा सेनेला मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 09:18:110
Report
ABATISH BHOIR
FollowMar 01, 2026 09:09:160
Report
KPKAILAS PURI
FollowMar 01, 2026 08:31:130
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 01, 2026 07:49:460
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 01, 2026 07:49:390
Report
AKAMAR KANE
FollowMar 01, 2026 07:49:280
Report
AKAMAR KANE
FollowMar 01, 2026 07:49:210
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 07:48:440
Report
JMJAVED MULANI
FollowMar 01, 2026 07:18:270
Report
KJKunal Jamdade
FollowMar 01, 2026 07:18:110
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 01, 2026 07:16:130
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 01, 2026 06:48:290
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 01, 2026 06:46:060
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 01, 2026 06:33:010
Report
