Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

DCP के निरीक्षण के बाद महात्मा फुले थाने लॉकअप की दुरवस्था ठीक करने के निर्देश

ABATISH BHOIR
Mar 01, 2026 10:34:55
Kalyan, Maharashtra
कल्याण-डोंबिवली परिसर के महात्मा फुले पुलिस थाना के पुराने भवन में लॉकअप की दुरवस्था सामने आई थी, जिससे सुरक्षा पर प्रश्न उठ रहे थे. DCP अतुल झेंडे ने संबंधित विभाग के अधिकारीयों के साथ प्रत्यक्ष निरीक्षण किया और पावसाळे से पहले दुरुस्ती व देखभाल करने के निर्देश दिए.LOCKअप की दीवारों में दरारें, छत की क्षति औरOverall हालत खराब होने से सुरक्षा के खतरे थे. निरीक्षण के दौरान उन्होंने कहा कि सुरक्षा की दृष्टि से लॉकअप की तात्कालिक देखभाल और दुरुस्ती जरूरी है, बारिश शुरू होने से पहले मरम्मत का काम शुरू किया जाएगा और संबंधित विभाग को निर्देश दे दिए गए हैं. जल्द ही इन मरम्मत के कामों की शुरुआत होगी और आरोपी व पुलिस कर्मियों की सुरक्षा को प्राथमिकता दी जाएगी.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Mar 01, 2026 11:50:16
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - ज्या पद्धतीने टिपू सुलतानचा इतिहास लिहिला तो मुळातच चुकीचा लिहिला गेला आहे - मंत्री जयकुमार गोरे जयकुमार गोरे पालकमंत्री, सोलापूर *ऑन संभाजी महाराज बलिदान मास* आज शिवाजी महाराजांच्या विचाराने राज्य आणि केंद्र काम करतंय. संभाजी महाराजांनी जो त्याग आणि धर्माचे शिक्षण दिलं आहे. यातून नव्या पिढीला माहिती व्हावी हा उद्देश असतो. 42 वर्षापासून बलिदान मास साजरा केला जातो त्याला आपण व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करतोय. *ऑन छत्रपती शाहू महाराज टिपू सुलतान वक्तव्य* छत्रपतींच्या वंशजाने काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. पण छत्रपतींचे मावळे म्हणून आम्हाला तो विचार अजिबात पसंत नाही. आणि छत्रपतींच्या विचारांची आम्ही पाठराखण करत राहू. ज्या पद्धतीने टिपू सुलतानचा इतिहास लिहिला तो मुळातच चुकीचा लिहिला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जात असताना त्यांचेच विचार आपण मांडले पाहिजे. आणि त्याच विचारांचा पुरस्कार आपण केला पाहिजे. त्यापलीकडे जाऊन मला वाटतं, टिपू सुलतान आणि अशा व्यक्तींचं गुणगान करणे उचित नाही. अशा प्रकारचे बोलणं किमान त्यांच्या वंशातील लोकांकडून येऊ नये हीच भावना. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मी व्यक्त करतो. *ऑन इराण युद्ध* दहा ते पंधरा दिवसापासूनच इराण मधील भारतीय नागरिकांना इराण सोडा असे सांगितलं होते. भारत सरकारच्या विनंतीला मान देऊन काही लोकांनी इराण सोडून सुरक्षित ठिकाणी पोहचले. भारत देशाच्या प्रत्येक नागरिकाचा सुरेक्षेचा प्रश्न आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. प्रत्येक भारतीयाला परत आणण्याचा प्रयत्न भारत सरकार करत आहे. ऑन जिल्हापरिषद अध्यक्ष सोलापुरातील जनतेने विक्रमी बहुमत आम्हाला दिलं आहे. तीस ते पस्तीस वर्षात भारतीय जनता पार्टीला एवढं बहुमत कधी आलं नव्हतं. पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून 20 मार्चपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड झाली असेल.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 01, 2026 11:04:16
Akola, Maharashtra:अकोल्यात ज्येष्ठ विधिज्ञ बी. के. गांधी यांच्या विधी सेवेला तब्बल पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र एन्ड गोवाचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला. या प्रेरणादायी कार्यक्रमाला भारताचे माजी सरन्यायाधीश भाषण गवई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि बॉम्बे हाय कोर्टाचे न्यायमूर्ती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात भूषण गवई यांनी बी. के. गांधी यांच्या प्रदीर्घ आणि निस्वार्थ विधी सेवेचा गौरव करत नवीन पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी, असे आवाहन केले. प्रामाणिकपणा, निष्ठा आणि समाजसेवेची भावना हीच यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी बी. के. गांधी यांनीही आपल्या पन्नास वर्षांच्या प्रवासातील अनुभव सांगताना, “वकीली हा केवळ व्यवसाय नसून तो समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे,” असे सांगितले. सतत अभ्यास, संयम आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात उपस्थित विधिज्ञ, तरुण वकील आणि कायद्याचे विद्यार्थी यांच्यासाठी हा सोहळा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला. पाच दशकांची निष्ठावंत सेवा ही केवळ वैयक्तिक यशाची गोष्ट नसून संपूर्ण न्यायव्यवस्थेसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अशा कार्यकर्तृत्वातूनच समाजात न्याय, विश्वास आणि मूल्यांची पायाभरणी अधिक भक्कम होत असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 01, 2026 11:02:57
Yavatmal, Maharashtra:यवतमाल च्या दिग्र्रस तालुक्यातील मांडवा गावात होळीनिमित्त विद्यार्थ्यांकरिता पारंपरिक चाकोल्या तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. ग्रामीण संस्कृतीची परंपरा जपत पर्यावरण संरक्षणाचा संकल्प विद्यार्थ्यांनी घ्यावा या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्थेने चाकोली बनवा स्पर्धा व ‘प्लास्टिक निर्मूलन' स्पर्धेचे आयोजन केले. 'नवा ध्यास पर्यावरणपूरक होळी करू खास' या प्रेरणादायी संदेशातून प्लास्टिकमुक्त व स्वच्छ गावाचा संकल्प देखील यावेळी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी घेतला. गावातील प्लास्टिक कचरा संकलित करून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 01, 2026 10:50:37
Nala Sopara, Maharashtra:वसई–विरारमध्ये भव्य महास्वच्छता अभियान; आमदार राजन नाईक यांचा सहभाग वसईत ३,८४० स्वयंसेवकांकडून शहराची स्वच्छता मोहीम. ३९ टन कचरा संकलित डाॅ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज वसई–विरार महानगरपालिका क्षेत्रात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. नालासोपारा पश्चिम एसटी डेपो पासून सुरुवात केलेल्या स्वच्छता मोहिमेत नालासोपारचे आमदार राजन नाईक यांनी स्वतः सहभाग घेतला ..... सकाळी ८ वाजल्यापासून दुपारपर्यंत मुख्य व अंतर्गत रस्ते, बाजारपेठा, सरकारी कार्यालये, दवाखाने, पोलीस ठाणे, एसटी स्टँड व rail्वे स्थानक परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमात ३ हजार ८४० स्वयंसेवक सहभागी झाले. एकूण ३९ टन ओला व सुका कचरा संकलित करण्यात आला. पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेमुळे स्वच्छतेबाबत जनजागृती झाली. नागरिकांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 01, 2026 10:33:34
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहराजवळील शेरी फाट्याजवळ bhiषण अपघातात तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार दुचाकीला आयशर वाहनाची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला.मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये दर्शन रामेश्वर वैष्णव (वय अंदाजे १६ वर्ष),साई रामेश्वर वैष्णव (वय अंदाजे १२ वर्ष) आणि गणेश दीपक आपतुरकर (वय अंदाजे १६ वर्ष) यांचा समावेश आहे.अपघात इतका भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या गंभीर जखमी मुलाचा तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांपैकी दोघे सख्खे भाऊ असल्याचेही समजते.घटनेनंतर संबंधित आयशर वाहन ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई तेल्हारा पोलीस स्टेशन करत आहे. तिघांवरही तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.सदर तिन्ही अल्पवयीन मुले माळेगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. ते तेल्हारा येथे येत असताना हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.या दुर्दैवी घटनेमुळे वैष्णव व आपतुरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून माळेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 01, 2026 10:11:05
Ambernath, Maharashtra:आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली बदलापूर रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांबाबत माहिती घेतली, यावेळी रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृहे बांधणे, पिण्याच्या पाण्याची सोय, फलाटांवर छत बांधकाम, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, कल्याण स्थानकावर लोकल अनावश्यक थांबवल्याने होणारा विलंब कमी करणे, बदलापूर-सीएसएमटी दरम्यान 15 डब्यांच्या लोकलची संख्या वाढवणे, लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढवणे आणि कर्जत-कसारा दरम्यान मेल/एक्सप्रेस तसेच मालगाड्यांसाठी वेगळ्या मार्गिकेचे काम लवकर पूर्ण करणे अशा मागण्यां त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केल्या. तसेच स्वतः डी आर एम यांनी फलाटावरच्या सर्व व्यवस्थांची पाहणी तात्काळ करावी अशी मागणी केली.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 01, 2026 10:04:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - अजितदादांच्या विमान अपघाताचा धसका नेत्यांच्या मनात ! भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली भीती.. अँकर - अजितदादांच्या विमान अपघाताचा धसका राजकीय नेत्यांनी किती घेतला आहे, याची प्रचिती सांगली मध्ये आली आहे, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी, हेलिकॉप्टर प्रवासावरून मनात निर्माण झालेली भीती जाहीरपणे बोलून दाखवली. हेलिकॉप्टर बसायची भीती,पोटात गोळा आला होता,अशी भावना बोलुन दाखवली आहे.मिरज तालुक्यातील बेळंकी येथे आयोजित कार्यक्रमासाठी गोपीचंद पडळकर हे हेलिकॉप्टरने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत पोहोचले होते, तत्पूर्वी विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांच्यासोबत एका बैठकीमध्ये सुजय विखे पाटलांनी हेलिकॉप्टर आणि विमान प्रवास बंद केल्याचं सांगितल्यावर आपल्या पोटात गोळा आला,पण जतला पाणी मिळणार आहे म्हणून आपण हेलिकॉप्टरने आल्याचं सांगत अजितदादांच्या विमान अपघातानंतर राजकीय नेत्यांच्या मनात कशा पद्धतीची भीती निर्माण झाल्याचे पडळकर यांच्या वक्तव्यामुळे समोर आले आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 01, 2026 09:33:44
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 01, 2026 09:31:57
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग भाजपाचे नेते व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे,काँग्रेस सहयोगी खासदार विशाल पाटलांना भाजपात येण्याचे जाहीर आमंत्रण खासदार विशाल पाटलांना सल्ला देत राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतःला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचे केले आवाहन मिरज तालुक्यातल्या बेळंकी येथील जत विस्तारित सिंचन योजनेच्या कार्यक्रमात खासदार विशाल पाटील आणि राधाकृष्ण पाटील आले,एकाच व्यासपीठावर विशाल पाटील तुम्ही तरुण आहात,तुम्हाला छक्के-पंजे समजायचे आहेत,निरंतर आणि विकासाच्या प्रक्रियेत स्वतःला सामावून घ्या वसंतदादा पाटील व कुटुंबाशी जवळचं नाते असल्याचे सांगात,मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी खासदार विशाल पाटलांना भाजपात येण्याची दिले जाहीर आमंत्रण
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 01, 2026 09:18:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:जतच्या 65 गावांच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मिटणार ,म्हैसाळ विस्तारीत सिंचन योजनेच्या बोगदा ब्रेक-थ्रू चा जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या सांगलीच्या जत तालुक्यातील 65 गावांसाठी महत्वकांक्षी असणारया म्हैसाळ विस्तारीत सिंचन योजनेच्या बोगदा ब्रेक-थ्रू चा शुभारंभ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला आहे. मिरज तालुक्यातल्या बेळंक येथे कामाचं शुभारंभ झाला आहे, यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सदाभाऊ खोत, यांच्यासह जत तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या 65 गावांसाठी पाणी पुरवठा करणारी तुमचा सिंचन योजना आहे. या योजनेमुळे 65 गावांचा दुष्काळ कायमस्वरूपी मिटणार आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 01, 2026 09:09:16
Kalyan, Maharashtra:अंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर मासळी विक्री करणाऱ्या मच्छीमारांवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिलेकडून तब्बल पाच वेळा दगडफेक करण्यात आल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अंबिवली स्थानकाबाहेरच्या परिसरात रोजप्रमाणे मच्छीमार मासळी विक्री करत असताना अचानक एका महिलेने रेल्वे ब्रिज वरून लपून दगडफेक सुरू केली. तिचा नेम चुकल्याने सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. पण अचानक झालेल्या या प्रकारामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर संतप्त मच्छीमारांनी संबंधित महिलेला रंगेहात पकडून कल्याण खडकपाडा पोलीस यांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top