Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

महाड में आरपीआई के 68वें स्थापना दिवस की भारी बारिश के बावजूद सभा सफल

PPPRAFULLA PAWAR
Nov 04, 2025 02:32:19
Chendhare, Alibag, Maharashtra
धोधो पावसात आरपीआयचा वर्धापन दिन ........ महाडमध्ये संपन्न झाली वर्धापन दिनाची सभा अँकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा 68 वा वर्धापन दिन भर पावसात साजरा झाला. सोमवारी संध्याकाळी महाडच्या चांदे क्रीडांगणावर झालेल्या कार्यक्रमास धोधो कोसळणारा पाऊस आणि चिखलाची तमा न बाळगता कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरपीआयला महायुतीत हिस्सा, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत, गावा गावात आरपीआयच्या शाखा स्थापन करणे आदी मुद्यांवर राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मंत्रीभरत गोगावले यांनी यावेळी हजेरी लावून वर्धापन दिना निमित्ताने कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Nov 04, 2025 08:16:30
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन झाले असून टर्मिनल एक मध्ये साधारण 25 हजार नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. या नोकऱ्यांमध्ये स्थानिक मराठी तरुणांना डावलण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती मनसेने पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. माहितीच्या अधिकारातून सिडकोला किती मराठी तरुणांना रोजगार दिला, रोजगार देण्यासाठी कोणती धोरणं राबवली यासंबंधी माहिती विचारली असता यासंबंधी माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर सिडको कडून देण्यात आलेय. त्यामुळे राज्य सरकारच्या 80% स्थानिकांना रोजगार या शासकीय नियमाची पायमल्ली करण्यात आली असल्याचा आरोप मनसेने केलाय. तर दुसरी विमानतळावर नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून अनेक इन्स्टिटयूट उभे राहत असून पैसे घेऊन तरुणांची आर्थिक फसवणूक सुरु असल्याचा गंभीर आरोप मनसेने केलाय.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 04, 2025 08:02:22
Oros, Maharashtra:अँकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण राज्य मार्गांवर पडलेल्या खड्ड्याच्या निषेधार्थ उबाठाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी आंदोलन छेडण्यात आले. मागील काही दिवस या मार्गांवर पडलेल्या खड्ड्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेले रिल्स चर्चेचा विषय बनले होते. मात्र प्रशासनाने कोणतीही हालचाल न केल्याने उबाठा च्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात आले. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत. स्थानिक आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांनी आमच्यावर टीका करावी उद्धव ठाकरेंवर टीका करावी मत देखील चोरावीत पण वेळ मिळाला तर आपली लोक सुस्थितीत राहावीत असं वाटत असेल तर या रस्त्याने प्रवास करा आणि रस्त्याचा काम करा असा खोचक टोला देखील लगावालाय.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 04, 2025 07:48:42
Baramati, Maharashtra:बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने मोठी चढाओढ निर्माण झाली आहे. अशात आता नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून जय पवार यांच्या नावाची चर्चा रंगू लागलीय . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यातून अंतर्गत हेवेदावे निर्माण होवू शकतात, परिणामी उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र जय यांनाच मैदानात उतरवले जाईल व हे हेवेदावे जाग्यावर थांबवले जातील, अशी अटकळ सध्या बांधली जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत नेमकी कोणती भूमिका जाहीर करतात याकडेही लक्ष लागले आहे. दुसरीकडे त्याचवेळी शरद पवार गटाकडून मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला जाईल अशी चर्चा आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच बारामती नगराध्यक्षपदाच्या चर्चा झडू लागल्या आहेत. बारामती नगरपरिषदेची तब्बल नऊ वर्षांनंतर निवडणूक होणार आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून ही संधी आपल्यालाच मिळावी यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. बारामती नगरपरिषदेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाकडून नगराध्यक्षपदाची संधी मिळवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र ऐनवेळी अजित पवार यांनी काही निर्णय घेतला तर त्यांचे चिरंजीव जय पवार यांचेही नाव पुढे येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. बारामतीत आजवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वरचष्मा राहिला आहे. मात्र पक्षातील फुटीनंतर कार्यकर्त्यांचीही विभागणी झालेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार यांना नगराध्यक्षपदासह अन्य ठिकाणी योग्य आणि लोकांशी संपर्कात असणारा उमेदवार द्यावा लागणार आहे. अशातच त्यांनी जय पवार यांच्या नावाचा विचार केल्यास निवडणुकीत वेगळीच रंगत पाहायला मिळेल, अशीही चर्चा आहे. जय पवार यांना उमेदवारी मिळाली तर इतराचा पत्ता आपोआप कट होणार आहे. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार तसा निर्णय घेतील का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. विशेष म्हणजे जय पवार यांचे मतदान बारामती नगरपरिषद कार्यक्षेत्रातच आहे. त्यांचे वडील अजित पवार व आई खा. सुनेत्रा पवार यांचे मतदान मात्र ग्रामीण भागात काटेवाडी येथे आहे. त्यामुळे नगरपरिषदेसाठी जय पवार यांना संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे. दुसरीकडे शरद पवार गटाकडून मातब्बर असलेल्या नेत्यांना निवडणूक रिंगणात उतरू शकतात अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे तशी मागणीही पक्षातील कार्यकर्त्यांनी केलेली आहे. परंतु पवार यांनी मात्र नव्या चेहऱयाला संधी देणार असल्याचे सुतोवाच केले असल्याचे बोलले जात आहे. राज्यात महायुती म्हणून राष्ट्रवादीसोबत असलेल्या भाजपची बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीबाबतची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र लढतात की स्वतंत्र उमेदवार देतात याकडे लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीत पक्षीय स्थिती वेगवेगळी असल्यामुळे नगराध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवार देणे ही सर्व पक्षांसाठी महत्वाची बाब आहे. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीसह अन्य पक्षातून कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धक्कातंत्राचा अवलंब होणार का...? बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एेन निर्णायक क्षणी स्वतःची उमेदवारी जाहीर करत विरोधकांना चारी मुंड्या चीत केले. कारखान्याचे अध्यक्षपद त्यांनी स्वतःकडे घेतले. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत जय पवार यांची उमेदवारी एेनवेळी जाहीर करून अजित पवार हे धक्कातंत्राचा अवलंब करू शकतात, अशी चर्चा शहरात सुरु आहे. जावेद मुलाणी झी 24 तास बारामती (**महत्वाचे : राष्ट्रवादीकडून अजित पवार गटाकडून कोणतीही चर्चा नाही याला कोणताही आधार नाही कोणताही कार्यकर्ता बोलायला तयार नाही.**)
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 04, 2025 07:46:36
Nanded, Maharashtra:भर पावसात डांबरी रस्ता करण्याचा प्रताप गुत्तेदाराने केल्याचा प्रकार उघड झालाय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील हा प्रकार आहे. नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखालून ते हदगाव शहराकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत होते. काल रात्री आठच्या सुमारास मुळधार पाऊस आला. त्यानंतर रिमाझीम पाऊस सुरु होता. पाऊणे नऊ वाजेच्या सुमरास रिमझिम पाऊस सुरु असतानाही डांबरीकरणाचे काम सुरुच होते. पाऊस सुरु असल्याने काम थांबावणे गरजेचे होते. पण गुत्तेदाराने काम उरकवून टाकण्यासाठी रिमाझीम पावसासाठी डांबरीकरणाचे काम सुरूच ठेवले. आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर संबंधित विभाग काय कारवाई करतो हे पाहावे लागणार आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 04, 2025 07:46:00
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 04, 2025 07:36:01
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच, जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या धानाचे मोठे नुकसान चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक पर्जन्य सरासरीच्या सुमारे 120% एवढा पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या धानाचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीच्या सुमारास हलके धान काढणीला येते. यंदा सतत बरसणारा पाऊस आणि त्यातच मोंथा वादळाच्या कहराने शेतशिवारात चक्क पाणी भरले आहे. जमिनीवर झोपून गेलेले धान पाण्यात बुडून राहिल्याने धानाला कोंब फुटले आहे. मातीमोल झालेल्या धानपिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असून मायबाय सरकारने तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी पुढे रेटली आहे. राकेश बिसेन, नुकसानग्रस्त शेतकरी
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 04, 2025 07:15:39
Navi Mumbai, Maharashtra:अँकर -- प्राथमिक शाळेपासूनच हिंदी भाषा शक्ती करण्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा आंदोलन केला होता या आंदोलनाला यश असल्याचे प्राथमिक माहिती मिळते आहे या आंदोलनानंतर राज्य सरकारने नरेंद्र जाधव यांची समिती स्थापन केली होती या समितीने राज्यभरातील लोकांचं मत जाणून घेण्यासाठी एक वेबसाईटही तयार केली तर राज्यातल्या आठ महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन अनेकांशी संवाद साधला या समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी राज ठाकरे यांची ही भेट घेतली आणि जवळपास एक तास चर्चाही केली त्यानंतर नरेंद्र जाधव यांनी या सर्व चर्चेदरम्यान प्राथमिक निरीक्षणात 90 ते 95 टक्के पालकांचा पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध असल्याचे सांगितले आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 04, 2025 07:15:12
Baramati, Maharashtra:बारामती माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार पत्रकार परिषद ऑन_संशोधन प्रकल्पांना अनुदानाची घोषणा मोदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान जगाने स्वीकारले आहेत.. ते उद्योगासाठी आहे शेतीसाठी आहे केंद्र आणि राज्य सरकारने ही उपयुक्तता लक्षात घेऊन निकाल घेतले पाहिजेत. महाराष्ट्र सरकारने मध्यंतरी बारामतीला येऊन पाहणे केल्यानंतर 500 कोटी रुपये उपलब्ध करून निर्णय जाहीर केला परंतु अजून माझ्यापर्यंत एक सुद्धा क्लिप आली नाही की राज्य सरकारने या 500 कोटी तून कोणाला अर्थसहाय्य केले. अर्थात माझी याबद्दल काही तक्रार नाही केंद्र आणि राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय हे जाहिरातीच्या द्वारे प्रसिद्ध केला आहे तोचा मी स्वागत करतो ऑन_पिक विमा योजनातून दोन ते पाच रुपये शेतकऱ्यांना जमा यंदाच्या वर्षी निसर्गाचा प्रकोप शेतीच प्रचंड नुकसान झालं अशा वेळेला ज्यांचं नुकसान झालं त्यांना मदत करून पुन्हा उभा करणे हे काम निश्चित आहे राज्य सरकारने काही या संदर्भातील पॅकेज जाहीर केले. पॅकेज एक भाग आहे दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांनी विमा उचलला होता नुकसान झाल्यानंतर विम्याची रक्कम त्यांना तातडीने मिळायला हवी काही तक्रारी माझ्याकडे आले की पाच रुपये तीन रुपये दोन रुपये अशी मदत मिळाली आहे एक गोष्ट लक्षात आली की ही जी विम्याची चुकीची नीती आहे ती देशाच्या शेतीमंत्र्यांच्या लक्षात आला... चौकशी काय करायची ती करा पण आता शेतकरी संकटात आहे लवकरात लवकरच त्याला उभा करा ऑन_निवडणूक आयोगाचे पत्रकार परिषद मला या संदर्भात माहित नाही ऑन_राज ठाकरे आक्षेप दुबार मतदार राज्यात सामाजिक ऐक्य कसं राहील ही खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि विशेषता सरकारमध्ये जे आहेत त्यांच्या कर्तव्य याच्यात जास्त आहेत. जर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील एक सीनियर मंत्री धार्मिक आणि जातीयवाद वाढेल अशा प्रकारचं निवेदन करत असेल तर ते राज्याच्या हिताचं नाही
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 04, 2025 07:03:19
Dhule, Maharashtra:सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झूलेलाल यांच्याविषयी जोहर पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांच्या केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ धुळ्यात सकल सिंधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी सिंधी समाज बांधवांनी अमित बघेल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. छत्तीसगड राज्यातील जोहर पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी भगवान झुलेलाल यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यामुळे सिंधी समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमित बघेल यांनी जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावून समाजात सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वक्तव्याची गंभीर आणि दखल घेऊन बघेल यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी समस्त सिंधी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 04, 2025 06:55:01
Kolhapur, Maharashtra:बिबट्याच्या हल्ला नव्हे, कोल्हापूर जिल्ह्यातील वृद्ध दाम्पत्याचा जेवण न दिल्याने खून, कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात काही दिवसांपूर्वी बिबट्याने वृद्ध दाम्पत्यावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. पण बिबट्याच्या हल्ल्यात नव्हे तर जेवण न दिल्याने अट्टल गुन्हेगारांने वृद्ध दांپत्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. वृद्ध कंक दांपत्य बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले की त्यांच्या हत्या झाली याबाबत सुरुवातीपासून शंका उपस्थित केली जात होती. त्याचबरोबर वनविभागाच्या अधिकाऱ्यानी देखील बिबट्याच्या हल्ल्यात कंक दांपत्याचा खून झाल्याचे नाकारले होते. त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूच्या रिसॉर्ट वरील सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून रेकॉर्डवरील गुन्हेगाराने थंड डोक्याने रचलेला दुहेरी खून उघडकीस आणला आहे. याप्रकरणी आरोपी विजय मधुकर गुरव याला शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विजय गुरव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा, बाललैंगिक अत्याचारासह 20 हून अधिक मोटरासायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हा गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर डोंगराळ भागात लपत होता. याबाबत अधिक माहिती अशी, शाहूवाडी तालुक्यातील परळे निनाईपकी गोळीवणे वसाहतीमध्ये 19 ऑक्टोबर 2025 रोजी 75 वर्षांचे निनू यशवंत कंक आणि 69 वर्षांची पत्नी रखूबाई कंक यांच्यावर बिबट्यांना हल्ला केल्यामुळे मृत्यू झाला अशी माहिती वाऱ्यासारखी पसरली. कडवी धरणाजवळ सापडलेल्या मृतदेहावर अनेक वर्मी घावाच्या जखमा होत्या, त्यामुळे वनविभागाने बिबट्याच्या हल्ल्यात कंक दामत्याचा मृत्यू झाला नाही असा निष्कर्ष काढला. त्यानंतर शाहूवाडी पोलिसांनी यासंदर्भात अधिक तपास करून कंक यांच्या शेताजवळ शेळी, मेंढ्या, कुत्रे असताना फक्त या दाम्पत्यांवरच प्राण्यांचा हल्ला कसा झाला ? मृतदेहांवर प्राण्यांच्या पंजांचे ठसे किंवा ओरबडल्याच्या खुणा का नव्हत्या? तसेच दोन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळले, याचे कारण शोधायला सुरुवात केली, त्यावेळी जंगलात लपलेले असताना जेवण न दिल्याच्या रागातून रेकॉर्डवरील गुन्हेगार विजय गुरव यानेच कंक दाम्पत्याचा फोन केला तर समोर आले आहे. आणखी काही खुणा मागे कारण आहेत का ? दुसऱ्या व्यक्तीचा देखील यामध्ये सहभाग आहे का ? याचा तपास शाहूवाडी पोलीस स्थानिक गुन्हे अनुमेन्शन शाखेच्या मदतीने करत आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 04, 2025 06:49:01
Nashik, Maharashtra:आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे भाव वाढले.... गवार तब्बल १५० रुपये किलो अँकर चार ते पाच दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक कमी झाल्याने दोन ते तीन भाज्या वगळता इतर सर्वच भाज्यांचे दर कडाडले. गवारचे भाव चक्क दुप्पट झाले शेवगा 150 रुपये किलो, तर गावठी कोथंबीर 50 प्रति जुडी रुपयांला मिळतीये.... दिवाळीच्या सुटीनंतर अनेक कुटुंब घराकडे परतल्याने मागणीतही वाढ झालीये तर गेल्या काही दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे शेतीमालाचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा देखील फटका बसलाय...किरकोळ बाजाराशिवाय बाजार समितीतदेखील भाज्यांची आवक कमी झाली आहे. भेंडी, शेवगा, गवारची आवक थेट ४০ टक्क्यांनी कमी झाल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे.. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीतून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 04, 2025 06:37:03
Washim, Maharashtra:वाशिम जिल्हा परिषदेच्या मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची घटना घडली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घटली असून, सकाळी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला कळविण्यात आले. अग्निशमन दलाने घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत जिल्हा परिषदेच्या मीटर रूममधील काही साहित्य जळून खाक झाले असून, आगीमुळे जिल्हा परिषदेच्या अर्ध्या विभागाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, विजपुरवठा बंद झाल्यामुळे कार्यालयीन कामकाज काही काळ विस्कळीत झाले आहे. विज विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top