Back
बारामती नगराध्यक्ष पद के लिए जय पवार बनाम शरद पवार गुट की चर्चा तेज
JMJAVED MULANI
Nov 04, 2025 07:48:42
Baramati, Maharashtra
बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने मोठी चढाओढ निर्माण झाली आहे. अशात आता नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून जय पवार यांच्या नावाची चर्चा रंगू लागलीय . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यातून अंतर्गत हेवेदावे निर्माण होवू शकतात, परिणामी उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र जय यांनाच मैदानात उतरवले जाईल व हे हेवेदावे जाग्यावर थांबवले जातील, अशी अटकळ सध्या बांधली जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत नेमकी कोणती भूमिका जाहीर करतात याकडेही लक्ष लागले आहे.
दुसरीकडे त्याचवेळी शरद पवार गटाकडून मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला जाईल अशी चर्चा आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच बारामती नगराध्यक्षपदाच्या चर्चा झडू लागल्या आहेत. बारामती नगरपरिषदेची तब्बल नऊ वर्षांनंतर निवडणूक होणार आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून ही संधी आपल्यालाच मिळावी यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. बारामती नगरपरिषदेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाकडून नगराध्यक्षपदाची संधी मिळवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र ऐनवेळी अजित पवार यांनी काही निर्णय घेतला तर त्यांचे चिरंजीव जय पवार यांचेही नाव पुढे येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
बारामतीत आजवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वरचष्मा राहिला आहे. मात्र पक्षातील फुटीनंतर कार्यकर्त्यांचीही विभागणी झालेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार यांना नगराध्यक्षपदासह अन्य ठिकाणी योग्य आणि लोकांशी संपर्कात असणारा उमेदवार द्यावा लागणार आहे. अशातच त्यांनी जय पवार यांच्या नावाचा विचार केल्यास निवडणुकीत वेगळीच रंगत पाहायला मिळेल, अशीही चर्चा आहे.
जय पवार यांना उमेदवारी मिळाली तर इतराचा पत्ता आपोआप कट होणार आहे. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार तसा निर्णय घेतील का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. विशेष म्हणजे जय पवार यांचे मतदान बारामती नगरपरिषद कार्यक्षेत्रातच आहे. त्यांचे वडील अजित पवार व आई खा. सुनेत्रा पवार यांचे मतदान मात्र ग्रामीण भागात काटेवाडी येथे आहे. त्यामुळे नगरपरिषदेसाठी जय पवार यांना संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे.
दुसरीकडे शरद पवार गटाकडून मातब्बर असलेल्या नेत्यांना निवडणूक रिंगणात उतरू शकतात अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे तशी मागणीही पक्षातील कार्यकर्त्यांनी केलेली आहे. परंतु पवार यांनी मात्र नव्या चेहऱयाला संधी देणार असल्याचे सुतोवाच केले असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात महायुती म्हणून राष्ट्रवादीसोबत असलेल्या भाजपची बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीबाबतची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र लढतात की स्वतंत्र उमेदवार देतात याकडे लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीत पक्षीय स्थिती वेगवेगळी असल्यामुळे नगराध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवार देणे ही सर्व पक्षांसाठी महत्वाची बाब आहे. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीसह अन्य पक्षातून कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धक्कातंत्राचा अवलंब होणार का...? 
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एेन निर्णायक क्षणी स्वतःची उमेदवारी जाहीर करत विरोधकांना चारी मुंड्या चीत केले. कारखान्याचे अध्यक्षपद त्यांनी स्वतःकडे घेतले. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत जय पवार यांची उमेदवारी एेनवेळी जाहीर करून अजित पवार हे धक्कातंत्राचा अवलंब करू शकतात, अशी चर्चा शहरात सुरु आहे.
जावेद मुलाणी 
झी 24 तास बारामती 
(**महत्वाचे : राष्ट्रवादीकडून अजित पवार गटाकडून कोणतीही चर्चा नाही याला कोणताही आधार नाही कोणताही कार्यकर्ता बोलायला तयार नाही.**)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowNov 04, 2025 12:22:320
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 04, 2025 11:43:020
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 04, 2025 11:41:390
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 04, 2025 10:59:280
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:59:120
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 04, 2025 10:39:340
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:19:120
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:18:590
Report
PNPratap Naik1
FollowNov 04, 2025 10:06:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 04, 2025 10:04:080
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 09:51:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 04, 2025 09:51:000
Report
SNSWATI NAIK
FollowNov 04, 2025 09:50:40Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग
विश्वविजेता भारतीय महिला क्रिकेट संघ मुंबई कडे रवाना
कोर्ट यार्ड हॉटेल मधून हा महिला संघ बसमधून निघाला
खास पोलीस बंदोबस्तात हा संघ मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना
0
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 04, 2025 09:45:500
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 04, 2025 09:40:200
Report