Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad410203

खोपोली: 15.4 किग्रा गांजा 3.22 लाख रुपयांच्या व्यापारी रकमेसह पकड, NDPS मामला दर्ज

SMSamruddhi M Kolhe
Feb 13, 2026 06:51:41
Khopoli, Maharashtra
खोपोली | ब्रेकिंग न्यूज Anchor : खोपोलीत पोलिसांच्या मोठ्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिळफाट्यावरील नवनाथ कॉलनी परिसरात पोलिसांनी छापा टाकत तब्बल ३ लाख २२ हजार रुपयांचा १५ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. VO : या प्रकरणी श्रीपाद गणपत सूर्यवंशी, वय ६६ यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपी हे शिंदे गटाचे नगरसेवक हरीश काळे यांचे सासरे असल्याची चर्चा खोपोली शहरात पसरल्याने प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हरीश काळे हे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्तीय मानले जातात. सूत्रांच्या माहितीच्या आधारे मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. छाप्यात पोलिसांनी गांजासह मोबाईल फोन आणि वजन काटा जप्त केला आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
Feb 13, 2026 10:09:06
Vasai-Virar, Maharashtra:वसई तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागात काळाबाजाराचा खाजगी इसमांकडून राशन कार्ड कामे, चौकशीची मागणी. वसई तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागात सुरू असलेला काळाबाजार एका जागृत नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून उघडकीस आणला आहे. पुरवठा विभागात राशन कार्डची कामे करून देणारे कर्मचारी हे सरकारी नसून खाजगी इसमच नागरिकांच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचे दिसून येत आहे. वसई पुरवठा विभागात एकूण १० ते १२ जण खाजगी कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांचे मासिक वेतन नेमके कोणामार्फत केले जाते किंवा मासिक वेतनाचे पैसे नेमके कोणाच्या खिशातून दिले जातात हा प्रश्न नागरिकांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे. पैसे घेऊन हे कर्मचारी नागरिकांना राशन कार्ड बनवून देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे, त्यामुळे पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 13, 2026 10:07:43
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 13, 2026 10:07:30
Dhule, Maharashtra:राज्यात एकही महापालिका किंवा महापौर जिंकू न शकणाऱ्या संजय राऊत यांनी आता आपली बडबड बंद करावी अशी टीका राज्याची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये राज्यातील 29 पैकी एक तरी महापालिका उभाठाने जिंकून दाखवावी असं खुलं आव्हान मी संजय राऊत यांना दिलं होतं. प्रत्यक्षात एकही जागा एकही महापालिकेवर त्यांना त्यांचा महापौर बसवता आलेला नाही. भाषणात वाटेल तसं बोलणं, आमच्या नेत्यांवर टोकाची टीका करण मात्र महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. राज्यात उद्धव सेनेचा एकही महापौर बसवता आला नसून राज्यात उभाठाची अत्यंत दैनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे आत्ता तरी संजय रावतानी त्यांचा बोलबच्चन बोलघेवडापणा सोडावा व उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना थोडी समज द्यावी. असा उपरोधिक सल्ला गिरीश महाजन यांनी दिला आहे. नाहीतर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्हा परिषद तर सोडा किमान काही सदस्य तरी निवडून येतील का यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत असा तोलाही मंत्री महाजन यांनी यावेळी संजय राऊत यांना लगावला आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 13, 2026 10:04:30
Nagpur, Maharashtra:नागपूर नाना पटोले, काँग्रेस नेते जळगाव पिक विमा घोटाळा या घोटाळ्यात सर्व सहभाग सरकारच आहे.. ज्या क्षेत्रात नुकसान होतं त्याचं परतावा मिळावा म्हणून पिक विमा भरल्या जातात.. प्रामाणिक शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा न मिळवून देता... बीड, जळगाव याठिकाणी सरकारचे हिस्सेदार बसले अशा लोकांना सरकारच्या माध्यमातून पिक विमा देण्याचं काम केलं जातं...ही वस्तुस्थिती आहे. याचा पुरावा मे विधानसभेत देणार... यामध्ये काही कृषिकाधिकारी देखील सहभागी आहेत... नरहरी झिरवाळ लाच प्रकरण.. सरकारमधील प्रत्येक विभागात असे भ्रष्टाचार सुरू आहे.. नरहरी झिरवळ हे आदिवासी असल्याने त्याच्यावर ट्रॅप लावला गेला.. आम्ही किती स्वच्छ असे दाखवण्याचं हे प्रयत्न करत आहे.. प्रत्येक विभागात पैसे घेतल्याशिवाय सही केली जाेत नाही.. हे उघड सत्य आहे.. चंद्रपूर काँग्रेस वाद.. पैसे घेतल्याचा आरोप.. यावर मला काही प्रतिक्रिया देणार नाही.. याबद्दल सर्व माहिती आमच्या हायकमांड कडे गेली.. मी काही चर्चा करणार नाही... बांगलादेश, फेरीवाले.. अतिक्रमण किरीट सोमया यांच्या आरोपांना किती महत्त्व द्यायچं.. अशोक चव्हाण यांच्यावर आरोप झाले.. त्याचे पुरावे दिले हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप झाले.. यामध्ये किती सत्यता आणि खोटे यावर काही सांगायची गरज नाही.... चंद्रपूर भाजप अंतर्गत वाद... अता चंद्रपुर नव्हे तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असे चित्र भाजपाचे पहायला मिळेल.. आणि देशात अशी परिस्थिती पाहायला मिळेल... सोयाबीनचे दर पडले, मोदी आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या करारामुळे शेतकऱ्याच मरण होणार.. भाजपच्या सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या गाजराची चर्चा प्रत्येक जिल्ह्यात होणार... भाजपाने बाहेरच्या लोकांना घेऊन आपली सत्ता चमकवण्याचा प्रयत्न केला हे सर्व चित्र दिसेल.. ही सुरुवात आहे.. यांचं शेवट फार वाईट असेल... नोटबंदी संजय राऊत आरोप.. ट्रम्प आपल्या देशाला चालवत आहे.. हे उघड डोळ्याने दिसत आहे.. त्यामुळे अगोदर समोर नव्हतं आता खुलेपणाने बघतो आहे.. आमदार नवीन आचारसंहिता.. आज सत्तापक्षाच्या आमदारातून निर्माण झाल.. त्याच आम्ही समर्थन करत नाही... भाजपच्या कडून धुळ्यात घटना होणे.. त्यावर आचारसंहिता कमिटी गठित होणे.. एकीकडे भ्रष्टाचार करून एकीकडे कमिटी स्थापन करतात.. मग निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले त्यावर का कमिटी नेमत नाही.. ही समिती नेमली त्याच स्वागत मात्र मत पैसे देऊन विकत घेतले त्या आचारसहितेंच का पालन करत नाही... परभणी मुस्लिम महापौर आपण सलमान खान यांना बनवून टाकू.. कारण ते आता rss कार्यक्रमात मध्ये गेलेत.. सलमान खानला बनवला असता तर त्याच्या छातीला थंडक पडली असती का..? जो संघाच्या कार्यक्रमात गेलेला मुस्लिम शुद्ध, आणि शिवसेनेचा मुस्लिम अशुद्ध.. असे यांच मत आहे का..?" नागपूरातील प्यारे खान याला मोठ्या पदावर बसवून मोठे ठेके दिलेत.. त्यामुळे दुसऱ्यावर बोट दाखवण्याआधी आपल्याकडे पहावं.. वंदे मातरम् नागपूर सुरुवात... ज्यांनी राष्ट्रगीताच विरोध केला त्यांनी वंदे मातरम् ने सुरुवात केली याच स्वागत.. त्यांनी तिरंगा फडकावला नाही.. त्याचं स्वागत.. मात्र देशाच्या एकात्मतेच काय... देशाला तोडा फोडा जी इंग्रजांची भूमिका होती. तेच rss भाजप करत आहे... यावर देशाच्या गृहमंत्रालयाने काहीतरी नियम बनविले पाहिजे.. परिषद , राज्यसभा निवड आम्हाला कोणताही फटका बसणार नाही..आता आमच्याकडे गमावण्यासाठी काही नाही. आता महायुतीला गमवायचं आहे.. महायुतीच घर फुटायला सुरुवात झाली आहे.. विधान परिषद राज्यसभा निवडणूक होतील तेव्हा सर्वात मोठा महायुतीमध्ये पाहायला मिळेल.. शशिकांत शिंदे गौप्यस्फोट पवार परिवार हा त्यांचा कुटुंब आहे... हा कुटुंब एकत्र आला तर काँग्रेस पक्षाने सुरुवातीला त्याचं स्वागत केलं आहे.. एकत्रीकरण होने किंवा नाही हे कुटुंबाने ठरवलं पाहिजे.... शंभूराज देसाई भाजप आरोप शंभूराज देसाई बोलत आहे.. ते भाजपवर बोलत आहे.. दिल्लीतील पोळा फुटला तर महाराष्ट्रातील माहितीत काय होणार असं चित्र आता सुरू झालाय.. दिल्लीचा पोळा फुटायचे परिस्थिती निर्माण झाली आहे.. पंतप्रधान लोकसभेत न बोलता ज्या पद्धतीने पळ काढत आहे.. ही गोष्ट समजण्यासारखी आहे.. त्यामुळे एका रात्रीत वाढलेल्या बीजेपीचा डोलारा आता खाली पडेल अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे...
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 13, 2026 09:17:26
Akola, Maharashtra:Anchor : अकोला शहरातील वाशिम बायपास रोडवरील पेट्रोल पंपासमोर आज सकाळी मॅक्झिमो आणि दुचाकी यांच्यात भीषण धडक झाली.या अपघातात दोन जणांची जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये निखिल विश्वनाथ ताजाने (वय 30, रा. चातोंडी, ता. पातूर) यांचा समावेश आहे. त्यांच्या सोबत असलेल्या एका महिलेचाही घटनास्थळी मृत्यू झाला.धडक इतकी जोरदार होती की दोघांनाही गंभीर दुखापती झाल्या. अपघातानंतर मॅक्झिमो चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिका सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले,मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.या अपघातामुळे काही काळ वाशिम रोडवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास जुने शहर पोलीस ठाणे करीत आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 13, 2026 09:17:07
Akola, Maharashtra:व्हॅलेंटाइन डे.. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. पाश्चात्य देशातून आलेला हा दिवस आज भारतातही मोठ्या प्रमाणावर साजरा होताना दिसतो.पण यावर्षी हा दिवस काहींसाठी फक्त प्रेमाचा नाही, तर विरहाच्या वेदनेचाही ठरला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून निघालेली नाही. प्रेम, आपुलकी आणि आधार देणारा नेता हरपल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे.याच भावनिक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने दादांना उद्देशून एक हृदयस्पर्शी पत्र लिहिले आहे. “दादा… आय लव्ह यू!” “आदरणीय दादा, आज व्हॅलेंटाइन डे! आपल्या प्रिय व्यक्तीप्रती भावना व्यक्त करण्याचा दिवस. तुम्ही असताना प्रेम व्यक्त करण्याची हिंमत झाली नाही, पण तुम्ही नसताना हे शब्द मनातून ओघळत आहेत…” मिटकरी आपल्या पत्रात लिहितात की, दादांच्या निधनावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नाही. २०१९ मध्ये पक्षात घेतले, जबाबदारी दिली, आमदार केले, राजकीय प्रतिष्ठा दिली – हे सर्व आयुष्यभराचं ऋण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. “मी अनेकांना अप्रिय होतो, पण तुम्हाला प्रिय होतो. चुका केल्या, पण तुम्ही दुरुस्त केल्या. वाढदिवसाला पहिला फोन तुमचा,सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे फक्त तुम्हीच!” मिटकरींच्या शब्दांत दादांबद्दलची कृतज्ञता आणि प्रेम स्पष्ट जाणवतं. “तुमच्या नावावर माझी दादागिरी चालायची,” असं सांगताना ते भावूक होतात. गाव, परिवार, समाज यांच्यावर प्रेम करायला शिकलो ते तुमच्यामुळेच,असंही ते नमूद करतात. भीमाकोरेगावला जाऊन अभिवादन करणारा तो करारी ‘जयभीम’चा आवाज आता ऐकू येणार नाही, याची सल त्यांच्या शब्दांत उमटते. शिवशाहू-फुले-आंबेडकर विचारांवरील श्रद्धा, सर्वधर्मीयांबद्दलचा जिव्हाळा – हे दादांचं वेगळेपण त्यांनी अधोरेखित केलं आहे. “आज एकादशी आहे, तुमच्यामुळे विठ्ठलाच्या अधिक प्रेमात पडलो. पण त्यानेच तुम्हाला हिरावून घेतलं. त्या विठ्ठलाशी आयुष्यभर भांडण राहील,” अशी अंतर्मुख वेदना त्यांनी व्यक्त केली आहे. पत्राच्या शेवटी एकच आर्त हाक – “लव्ह यू दादा… दादा आय लव्ह यू… आज खूप मिस करतोय दादा…” जय शिवराय… जयभीम… जय महाराष्ट्र… व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी व्यक्त झालेलं हे प्रेम केवळ एका नेत्यासाठी नाही, तर एका मार्गदर्शक, आधारवड आणि आपुलकीच्या व्यक्तीसाठी आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन नात्यांची जपणूक करणाऱ्या दादांप्रती व्यक्त झालेली ही भावना अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरते आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 13, 2026 09:16:47
Akola, Maharashtra:अकोला शहरातील उड्डाणपुलावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. National Highways Authority of India (NHAI) आणि शहर वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे प्रथमच ‘स्पाइक स्पीड ब्रेकर’ बसवले आहेत. या उपाययोजनेमुळे विरुद्ध दिशेने पुलावर चढणाऱ्या वाहनांना प्रभावीपणे रोखता येणार आहे. मागील काही महिन्यांत उड्डाणपुलावर उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अनेक गंभीर अपघात झाले होते. काहींना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि घाईच्या वेळेत नियम मोडून वाहन चालवणाऱ्यांमुळे धोका वाढत होता. या पार्श्वभूमीवर NHAI आणि वाहतूक पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेत हा निर्णय घेतला. स्पाइक स्पीड ब्रेकर हे असे उपकरण आहे की, योग्य दिशेने येणाऱ्यास अडथळा होत नाही; मात्र विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांचे टायर पंक्चर होऊन वाहन पुढे जाऊ शकत नाही. वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि जीव धोक्यात घालणारे प्रकार टाळावेत. या नव्या उपाययोजनेमुळे उड्डाणपुलावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 13, 2026 09:00:17
Mira Bhayandar, Maharashtra:मीरा भाईंदर ब्रेक महापौर डिंपल मेहतांच्या पत्रात शुद्धलेखनाच्या चुका, मराठी भाषेवरून रंगले राजकारण मराठी महापौर हवा' म्हणत मनसे आक्रमक मिरा-भाईंदर: महापौर डिंपल मेहता यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात अनेक शुद्धलेखनाच्या चुका आढळल्याने मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दुसऱ्यांदा महापौर होऊनही साध्या शब्दांच्या वेलांटीत चुका होत असल्याने, महापौरांना मराठी येत नसल्याची टीका मनसेने केली आहे. "आम्ही म्हणूनच मराठी महापौराची मागणी केली होती," असे सांगत राणे यांनी केवळ सही करणाऱ्या महापौरांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकारामुळे आता शहरात 'मराठी अस्मिता' आणि 'मराठी महापौर' या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 13, 2026 08:52:28
Ambernath, Maharashtra:गर्दीत धक्का लागल्याच्या वादातून प्लॅटफॉर्मवरच प्रवाशांमध्ये हाणामारी बदलापूर रेल्वे स्थानक मधील घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद बदलापूर रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांची हाणामारी झाल्याची घटना घडली आहे बदलापूर स्थानकातून सीएसटीएमकडे जाणारी ७.३३ ची लोकल स्थानकात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी गर्दीमुळे प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि त्या रागातून दोघांमध्ये प्लॅटफॉर्म नंबर तीन वरच हाणामारी सुरू झाली. दरम्यान प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी दोन्ही प्रवाशांना शांत करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुढचा अनर्थ टाळला. बदलापूर स्थानकात दररोज सकाळच्या सुमारास लोकल ट्रेनला मोठ्या गर्दी असते आणि त्यामुळे अनेकदा क्षुल्लक कारणांवरून प्रवाशांमध्ये वाद होतात चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 13, 2026 08:34:54
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात बनावट हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट तयार करणाऱ्या कारखान्यावर कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हातकणंगले तालुक्यातील साजणी गावात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकत बनावट HSRP नंबर प्लेट तयार करणारा संपूर्ण बेकायदेशीर कारखाना उघडकीस आणला आहे. या कारवाईत four लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल चार लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ३३ नंबर प्लेट डाय, दोन मशीन, स्टिकर, पत्रे तसेच तयार बनावट नंबर प्लेट्स असा मोठा साठा हस्तगत केला. या बनावट नंबर प्लेट्स नियमबाह्य वाहनांसाठी पाचशे ते हजार रुपयांपर्यंत विकल्या जात होत्या. घटनास्थळी पोलिसांना एका मशीनवर डाय तयार करून त्यावर ‘INDIA’ असलेले स्टिकर लावून या बनावट HSRP नंबर प्लेट्स तयार केल्या जात असल्याचे दिसून आले. या प्रकरणी ३१ वर्षीय संतोष बबन यादव याच्याविरोधात हातकणंगले पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बनावट नंबर प्लेट्स नेमक्या कोणत्या वाहनांना बसवण्यात आल्या आहेत, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. अशा प्रकारच्या बनावट नंबर प्लेट्स बनवून घेणाऱ्या वाहनधारकांवरही कारवाई केली जाणार असल्याचे पोलيسांनी स्पष्ट केले आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 13, 2026 08:34:43
Amravati, Maharashtra:हे टक्केवारीचे सरकार असून नरहरी झिरवाळ यांना बदनाम करण्याचे भाजपचा षडयंत्र असू शकतं; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा खळबळ जनक दावा यशोमती ठाकूर, माजी मंत्री व काँग्रेस नेत्या यांनी प्रतिक्रिया देत खळबळजनक दावा केला भाजपचे हे षडयंत्र असू शकत मंत्री नरहरी झिरवाळ यांना बदनाम करण्याचा असा दावा त्यांनी केला. आता मंत्रालयामध्ये याच गोष्टी चालू आहे. कुठल्याही ऑफिसमध्ये जा टक्केवारी टक्केवारीचा हिशोब आहे. आता ते उघड झाला आहे. प्रत्येक मंत्र्याच्या ऑफिसमध्ये टक्केवारी मागितले जाते असा आरोप त्यांनी केला तर हे टक्केवारीचा सरकार हे आहे अशी टीका देखील यशोमती ठाकूर यांनी केली.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 13, 2026 08:21:04
Nanded, Maharashtra:राजकीय वैमनास्यातून भावकीच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. लाठ्या काठ्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. यात दोन्ही गटातील पाच ते सहा जखमी झाले. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसीमध्ये काल ही घटना घडली. माजी सरपंच असलेल्या दोन कुटुंबांत ही तुफान हाणामारी झाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीतच दोन्ही गटांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला केल्याचे मोबाईल व्हिडिओत कैद झाले आहे. या घटनेत शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रवींद्र भिलवंडे आणि काँग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष संभाजी भिलवंडे यांच्यासह पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून परस्पर विरोधी तक्रारीनंतर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 13, 2026 08:19:59
Kalyan, Maharashtra:आजही जीव मुठीत धरून डोंबिवली वर करतात जीवघेणा प्रवास.. लोकल च्या बाहेर लटकून करत आहे प्रवास व्हिडिओ वायरल. Anc.. दोन दिवसांपूर्वी मुंब्रा और कळवा दरम्यान दुर्दैवी अपघातात डोंबिवलीतील सोहम कठरे या विद्यार्थ्यांचा जीव गेल्याची घटना ताजी असतानाच आजही डोंबिवली रेल्वे स्थानकावर सकाळच्या वेळेस गाड्या वेळेवर न आल्यााने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतं आहे दोन दिवसही उलटले नसताना परिस्थितीत कोणताही बदल दिसून न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकल गाड्यांची संख्या कमी त्यातच अनेक लोकल गाड्या उशिराने धावतात . परिणामी प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी उसळली. प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. डब्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी चढल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अजून किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. वारंवार होणारे उशीर, तांत्रिक बिघाड आणि नियोजनाचा अभाव यामुळे कल्याण डोंबिवलीसारख्या गर्दीच्या स्थानकावर प्रवाशांचे हाल सुरूच आहेत रेल्वे प्रशासन आणखी किती बळी घेणार असा सवाल रेल्वे प्रवासी करत आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top