Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

Ajit Pawar के निधन पर महाराष्ट्र शोक, Amol Mitkari ने लिखा भावुक पत्र

JJJAYESH JAGAD
Feb 13, 2026 09:17:07
Akola, Maharashtra
व्हॅलेंटाइन डे.. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. पाश्चात्य देशातून आलेला हा दिवस आज भारतातही मोठ्या प्रमाणावर साजरा होताना दिसतो.पण यावर्षी हा दिवस काहींसाठी फक्त प्रेमाचा नाही, तर विरहाच्या वेदनेचाही ठरला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून निघालेली नाही. प्रेम, आपुलकी आणि आधार देणारा नेता हरपल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे.याच भावनिक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने दादांना उद्देशून एक हृदयस्पर्शी पत्र लिहिले आहे. “दादा… आय लव्ह यू!” “आदरणीय दादा, आज व्हॅलेंटाइन डे! आपल्या प्रिय व्यक्तीप्रती भावना व्यक्त करण्याचा दिवस. तुम्ही असताना प्रेम व्यक्त करण्याची हिंमत झाली नाही, पण तुम्ही नसताना हे शब्द मनातून ओघळत आहेत…” मिटकरी आपल्या पत्रात लिहितात की, दादांच्या निधनावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नाही. २०१९ मध्ये पक्षात घेतले, जबाबदारी दिली, आमदार केले, राजकीय प्रतिष्ठा दिली – हे सर्व आयुष्यभराचं ऋण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. “मी अनेकांना अप्रिय होतो, पण तुम्हाला प्रिय होतो. चुका केल्या, पण तुम्ही दुरुस्त केल्या. वाढदिवसाला पहिला फोन तुमचा,सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे फक्त तुम्हीच!” मिटकरींच्या शब्दांत दादांबद्दलची कृतज्ञता आणि प्रेम स्पष्ट जाणवतं. “तुमच्या नावावर माझी दादागिरी चालायची,” असं सांगताना ते भावूक होतात. गाव, परिवार, समाज यांच्यावर प्रेम करायला शिकलो ते तुमच्यामुळेच,असंही ते नमूद करतात. भीमाकोरेगावला जाऊन अभिवादन करणारा तो करारी ‘जयभीम’चा आवाज आता ऐकू येणार नाही, याची सल त्यांच्या शब्दांत उमटते. शिवशाहू-फुले-आंबेडकर विचारांवरील श्रद्धा, सर्वधर्मीयांबद्दलचा जिव्हाळा – हे दादांचं वेगळेपण त्यांनी अधोरेखित केलं आहे. “आज एकादशी आहे, तुमच्यामुळे विठ्ठलाच्या अधिक प्रेमात पडलो. पण त्यानेच तुम्हाला हिरावून घेतलं. त्या विठ्ठलाशी आयुष्यभर भांडण राहील,” अशी अंतर्मुख वेदना त्यांनी व्यक्त केली आहे. पत्राच्या शेवटी एकच आर्त हाक – “लव्ह यू दादा… दादा आय लव्ह यू… आज खूप मिस करतोय दादा…” जय शिवराय… जयभीम… जय महाराष्ट्र… व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी व्यक्त झालेलं हे प्रेम केवळ एका नेत्यासाठी नाही, तर एका मार्गदर्शक, आधारवड आणि आपुलकीच्या व्यक्तीसाठी आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन नात्यांची जपणूक करणाऱ्या दादांप्रती व्यक्त झालेली ही भावना अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरते आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Feb 13, 2026 10:47:35
Bhandara, Maharashtra:भंडारा शहर के लिए अत्यंत महत्त्वपूर्ण वैनगंगा नदी पर पुल की स्थिति बेहद खराब हो चली है। Ashoka Buildcon द्वारा निर्मित इस पुल की रखरखाव में कमी के कारण जीर्ण-शीर्ण हो रहा है। टेंडर अवधि समाप्त होने के बाद संबंधित विभागों ने ध्यान नहीं दिया। पुल के बीच में लोहे की जॉइंट की वेल्डिंग टूट चुकी है, जिससे बड़े बोल्ट बाहर निकल रहे हैं। इससे वाहनों की आवाजाही करते समय खतरा बढ़ रहा है। शाम के समय पुल पर प्रकाश व्यवस्था भी नहीं रहती, जिससे अंधेरे में लोगों को यात्रा करनी पड़ती है। नगर परिषद प्रशासन को तुरंत दखल लेकर मरम्मत और प्रकाश व्यवस्था शुरू करनी चाहिए, स्थानीय नागरिकों की मांग है.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 13, 2026 10:33:36
Ahilyanagar, Maharashtra:जिव्ह जिहाद , धर्मांतर विरोधी कायदा बनवण्यासाठी गेल्यावर्षी 13 फेब्रुवारीला एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते... मात्र त्याबाबत कोणत्याही प्रकारची करावाई झाली नाही... त्यामुळे आज राज्यभर अनेक ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला...जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला स्मरण पत्र देण्यात आले...अहिल्यानगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन देण्यात आले...जवळपास एक लाखांहून अधिक हिंदू महिला मुली बेपत्ता झाल्या आहेत, दररोज लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत आहेत...मग या विरोधात कायदा का केला जात नाही...इतर राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्यात आला आहे , मग महाराष्ट्राचे सरकार पूर्ण बहुमतात असताना हा कायदा का होत नाही? असा सवाल मोर्चेकऱ्यांनी उपस्थित केलाय...यावेळी शहराच्या महापौर ज्योती गाडे यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 13, 2026 10:33:06
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Feb 13, 2026 10:32:43
Wardha, Maharashtra:वर्ध्यात न्यू इंग्लिश कॉन्वेंटसमोर कचऱ्याचे ढीग; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. अँकर- वर्धा शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या न्यू इंग्लिश कॉन्व्हेंट व प्राथमिक शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सध्या कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे हा कचरा बाहेरील व्यक्तींनी नव्हे, तर परिसरातील काही प्रतिष्ठित व सुशिक्षित व्यावसायिकांनी टाकल्याचे समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेच्या मुख्य गेटलगतच दररोज कचरा टाकला जात असल्याने तो आता रस्त्यावर पसरू लागला आहे. परिणामी, शाळेत येणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना व पालकांना दररोज या अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 13, 2026 10:32:27
Akola, Maharashtra:अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. Government Medical College and Hospital, Akola येथे पाहणीदरम्यान एका महिला परिचारिकेशी अर्वाच्य भाषेत बोलल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील परिचारक संघटना आक्रमक झाली असून त्यांनी आमदारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,आमदार पठाण यांनी रुग्णालयातील सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी भेट दिली होती. महिला वार्डात कर्तव्यावर असलेल्या एका महिला परिचारिकेसोबत संवाद साधताना त्यांचा पारा चढला आणि त्यांनी अयोग्य शब्दांत सुनावले, असा दावा परिचारक संघटनेने केला आहे. लोकप्रतिनिधीकडून महिला कर्मचाऱ्याशी अशा प्रकारचे वर्तन होणे अत्यंत निंदनीय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.या प्रकरणी परिचारक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून आमदारांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित महिला परिचारिकेचा सन्मान अबाधित राखला जावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.दरम्यान, आमदारांनी जाहीर माफी मागितली नाही तर ‘काम बंद’ आंदोलन पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. “आमदार साजिद खान पठाण यांनी आपल्या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागावी; अन्यथा जिल्ह्यातील परिचारक काम बंद आंदोलन करतील,"असा अल्टिमेटम संघटनेतर्फे देण्यात आला आहे.या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आमदारांकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याची प्रतीक्षा आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 13, 2026 10:24:59
Chandwad, Maharashtra:चांदवड (नाशिक) में मंत्री छगन भुजबळ के बयानों पर प्रकाश Rare points सामने आए। इन्होंने विंचूर जिला परिषद शाळा जागा विक्री के बारे में कहा—कळाल्यानंतर ताबडतोब मैंने फोन किया। पुराने कागदपत्रों में थोड़े बदलाव बचे थे। सरकार इसे नहीं बदलेगी, शाळा वही रहेगी। यह किसी ने मूर्खपणा किया है और इसका दुरुस्त किया जाएगा। भुजबळ ने बाहेरील एजेंसी द्वारा चौकशी की मांग को लेकर कहा—मेरा किसी से संबंध नहीं, अगर पुरावे हों तो दें, मुख्यमंत्री ने भी चौकशी की आदेश दिए। डीजीसीआय के लोग चौकशी करेंगे। शंका-पुरावे दें ताकि वे जांच कर सकें। भुजबळ ने कहा कि दोनों राष्ट्रवादी की विलीनिकरण के बारे में उन्हें कुछ भी जानकारी नहीं है।
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 13, 2026 10:19:09
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात सूत्रे हाती घेताच महापौर- उपमहापौर ॲक्शन मोडवर ,शहरातील गर्दीच्या गोल बाजार परिसरातील अपूर्ण प्रसाधनगृहाचे बांधकाम महिन्याभरात पूर्ण करण्याचा दिला शब्द ,या भागातील महिला भाजीविक्रेत्यांनी प्राधान्याने पुढे केला होता प्रश्न अँकर:-- सुमारे साडेतीन वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर चंद्रपुरात मनपा सत्ता स्थापना झाली आहे. काल महापौर -उपमहापौर यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर आज स्वतः महापौर संगीता खांडेकर आणि उपमहापौर प्रशांत दानव यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह शहरातील गोल बाजाराची पाहणी केली. या गोल बाजारातील भाजीविक्रेत्या महिलांनी परिसरातील प्रसाधनगृहांची कमतरता व अपूर्ण बांधकाम असलेल्या प्रसाधनगृहाबाबत प्राधान्याने समस्या मांडली होती. महापौर स्वतः या भाजीविक्रेत्या महिलांची संवाद साधताना दिसल्या. त्यांनी येत्या महिनाभरात प्रसाधनगृहाचे बांधकाम पूर्ण करून ते सेवेत आणण्याचा शब्द दिला आहे. येत्या काळात शहरातील इतरही ठिकाणी सुरू असलेली अशा प्रकारची लोकोपयोगी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बाईट १) संगीता खांडेकर, महापौर, चंद्रपूर बाईट २) प्रशांत दानव, उपमहापौर, चंद्रपूर
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 13, 2026 10:09:06
Vasai-Virar, Maharashtra:वसई तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागात काळाबाजाराचा खाजगी इसमांकडून राशन कार्ड कामे, चौकशीची मागणी. वसई तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागात सुरू असलेला काळाबाजार एका जागृत नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून उघडकीस आणला आहे. पुरवठा विभागात राशन कार्डची कामे करून देणारे कर्मचारी हे सरकारी नसून खाजगी इसमच नागरिकांच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचे दिसून येत आहे. वसई पुरवठा विभागात एकूण १० ते १२ जण खाजगी कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांचे मासिक वेतन नेमके कोणामार्फत केले जाते किंवा मासिक वेतनाचे पैसे नेमके कोणाच्या खिशातून दिले जातात हा प्रश्न नागरिकांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे. पैसे घेऊन हे कर्मचारी नागरिकांना राशन कार्ड बनवून देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे, त्यामुळे पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 13, 2026 10:07:43
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 13, 2026 10:07:30
Dhule, Maharashtra:राज्यात एकही महापालिका किंवा महापौर जिंकू न शकणाऱ्या संजय राऊत यांनी आता आपली बडबड बंद करावी अशी टीका राज्याची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये राज्यातील 29 पैकी एक तरी महापालिका उभाठाने जिंकून दाखवावी असं खुलं आव्हान मी संजय राऊत यांना दिलं होतं. प्रत्यक्षात एकही जागा एकही महापालिकेवर त्यांना त्यांचा महापौर बसवता आलेला नाही. भाषणात वाटेल तसं बोलणं, आमच्या नेत्यांवर टोकाची टीका करण मात्र महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. राज्यात उद्धव सेनेचा एकही महापौर बसवता आला नसून राज्यात उभाठाची अत्यंत दैनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे आत्ता तरी संजय रावतानी त्यांचा बोलबच्चन बोलघेवडापणा सोडावा व उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना थोडी समज द्यावी. असा उपरोधिक सल्ला गिरीश महाजन यांनी दिला आहे. नाहीतर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्हा परिषद तर सोडा किमान काही सदस्य तरी निवडून येतील का यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत असा तोलाही मंत्री महाजन यांनी यावेळी संजय राऊत यांना लगावला आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 13, 2026 10:04:30
Nagpur, Maharashtra:नागपूर नाना पटोले, काँग्रेस नेते जळगाव पिक विमा घोटाळा या घोटाळ्यात सर्व सहभाग सरकारच आहे.. ज्या क्षेत्रात नुकसान होतं त्याचं परतावा मिळावा म्हणून पिक विमा भरल्या जातात.. प्रामाणिक शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा न मिळवून देता... बीड, जळगाव याठिकाणी सरकारचे हिस्सेदार बसले अशा लोकांना सरकारच्या माध्यमातून पिक विमा देण्याचं काम केलं जातं...ही वस्तुस्थिती आहे. याचा पुरावा मे विधानसभेत देणार... यामध्ये काही कृषिकाधिकारी देखील सहभागी आहेत... नरहरी झिरवाळ लाच प्रकरण.. सरकारमधील प्रत्येक विभागात असे भ्रष्टाचार सुरू आहे.. नरहरी झिरवळ हे आदिवासी असल्याने त्याच्यावर ट्रॅप लावला गेला.. आम्ही किती स्वच्छ असे दाखवण्याचं हे प्रयत्न करत आहे.. प्रत्येक विभागात पैसे घेतल्याशिवाय सही केली जाेत नाही.. हे उघड सत्य आहे.. चंद्रपूर काँग्रेस वाद.. पैसे घेतल्याचा आरोप.. यावर मला काही प्रतिक्रिया देणार नाही.. याबद्दल सर्व माहिती आमच्या हायकमांड कडे गेली.. मी काही चर्चा करणार नाही... बांगलादेश, फेरीवाले.. अतिक्रमण किरीट सोमया यांच्या आरोपांना किती महत्त्व द्यायچं.. अशोक चव्हाण यांच्यावर आरोप झाले.. त्याचे पुरावे दिले हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप झाले.. यामध्ये किती सत्यता आणि खोटे यावर काही सांगायची गरज नाही.... चंद्रपूर भाजप अंतर्गत वाद... अता चंद्रपुर नव्हे तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असे चित्र भाजपाचे पहायला मिळेल.. आणि देशात अशी परिस्थिती पाहायला मिळेल... सोयाबीनचे दर पडले, मोदी आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या करारामुळे शेतकऱ्याच मरण होणार.. भाजपच्या सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या गाजराची चर्चा प्रत्येक जिल्ह्यात होणार... भाजपाने बाहेरच्या लोकांना घेऊन आपली सत्ता चमकवण्याचा प्रयत्न केला हे सर्व चित्र दिसेल.. ही सुरुवात आहे.. यांचं शेवट फार वाईट असेल... नोटबंदी संजय राऊत आरोप.. ट्रम्प आपल्या देशाला चालवत आहे.. हे उघड डोळ्याने दिसत आहे.. त्यामुळे अगोदर समोर नव्हतं आता खुलेपणाने बघतो आहे.. आमदार नवीन आचारसंहिता.. आज सत्तापक्षाच्या आमदारातून निर्माण झाल.. त्याच आम्ही समर्थन करत नाही... भाजपच्या कडून धुळ्यात घटना होणे.. त्यावर आचारसंहिता कमिटी गठित होणे.. एकीकडे भ्रष्टाचार करून एकीकडे कमिटी स्थापन करतात.. मग निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले त्यावर का कमिटी नेमत नाही.. ही समिती नेमली त्याच स्वागत मात्र मत पैसे देऊन विकत घेतले त्या आचारसहितेंच का पालन करत नाही... परभणी मुस्लिम महापौर आपण सलमान खान यांना बनवून टाकू.. कारण ते आता rss कार्यक्रमात मध्ये गेलेत.. सलमान खानला बनवला असता तर त्याच्या छातीला थंडक पडली असती का..? जो संघाच्या कार्यक्रमात गेलेला मुस्लिम शुद्ध, आणि शिवसेनेचा मुस्लिम अशुद्ध.. असे यांच मत आहे का..?" नागपूरातील प्यारे खान याला मोठ्या पदावर बसवून मोठे ठेके दिलेत.. त्यामुळे दुसऱ्यावर बोट दाखवण्याआधी आपल्याकडे पहावं.. वंदे मातरम् नागपूर सुरुवात... ज्यांनी राष्ट्रगीताच विरोध केला त्यांनी वंदे मातरम् ने सुरुवात केली याच स्वागत.. त्यांनी तिरंगा फडकावला नाही.. त्याचं स्वागत.. मात्र देशाच्या एकात्मतेच काय... देशाला तोडा फोडा जी इंग्रजांची भूमिका होती. तेच rss भाजप करत आहे... यावर देशाच्या गृहमंत्रालयाने काहीतरी नियम बनविले पाहिजे.. परिषद , राज्यसभा निवड आम्हाला कोणताही फटका बसणार नाही..आता आमच्याकडे गमावण्यासाठी काही नाही. आता महायुतीला गमवायचं आहे.. महायुतीच घर फुटायला सुरुवात झाली आहे.. विधान परिषद राज्यसभा निवडणूक होतील तेव्हा सर्वात मोठा महायुतीमध्ये पाहायला मिळेल.. शशिकांत शिंदे गौप्यस्फोट पवार परिवार हा त्यांचा कुटुंब आहे... हा कुटुंब एकत्र आला तर काँग्रेस पक्षाने सुरुवातीला त्याचं स्वागत केलं आहे.. एकत्रीकरण होने किंवा नाही हे कुटुंबाने ठरवलं पाहिजे.... शंभूराज देसाई भाजप आरोप शंभूराज देसाई बोलत आहे.. ते भाजपवर बोलत आहे.. दिल्लीतील पोळा फुटला तर महाराष्ट्रातील माहितीत काय होणार असं चित्र आता सुरू झालाय.. दिल्लीचा पोळा फुटायचे परिस्थिती निर्माण झाली आहे.. पंतप्रधान लोकसभेत न बोलता ज्या पद्धतीने पळ काढत आहे.. ही गोष्ट समजण्यासारखी आहे.. त्यामुळे एका रात्रीत वाढलेल्या बीजेपीचा डोलारा आता खाली पडेल अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे...
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 13, 2026 09:17:26
Akola, Maharashtra:Anchor : अकोला शहरातील वाशिम बायपास रोडवरील पेट्रोल पंपासमोर आज सकाळी मॅक्झिमो आणि दुचाकी यांच्यात भीषण धडक झाली.या अपघातात दोन जणांची जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये निखिल विश्वनाथ ताजाने (वय 30, रा. चातोंडी, ता. पातूर) यांचा समावेश आहे. त्यांच्या सोबत असलेल्या एका महिलेचाही घटनास्थळी मृत्यू झाला.धडक इतकी जोरदार होती की दोघांनाही गंभीर दुखापती झाल्या. अपघातानंतर मॅक्झिमो चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिका सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले,मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.या अपघातामुळे काही काळ वाशिम रोडवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास जुने शहर पोलीस ठाणे करीत आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 13, 2026 09:16:47
Akola, Maharashtra:अकोला शहरातील उड्डाणपुलावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. National Highways Authority of India (NHAI) आणि शहर वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे प्रथमच ‘स्पाइक स्पीड ब्रेकर’ बसवले आहेत. या उपाययोजनेमुळे विरुद्ध दिशेने पुलावर चढणाऱ्या वाहनांना प्रभावीपणे रोखता येणार आहे. मागील काही महिन्यांत उड्डाणपुलावर उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अनेक गंभीर अपघात झाले होते. काहींना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि घाईच्या वेळेत नियम मोडून वाहन चालवणाऱ्यांमुळे धोका वाढत होता. या पार्श्वभूमीवर NHAI आणि वाहतूक पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेत हा निर्णय घेतला. स्पाइक स्पीड ब्रेकर हे असे उपकरण आहे की, योग्य दिशेने येणाऱ्यास अडथळा होत नाही; मात्र विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांचे टायर पंक्चर होऊन वाहन पुढे जाऊ शकत नाही. वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि जीव धोक्यात घालणारे प्रकार टाळावेत. या नव्या उपाययोजनेमुळे उड्डाणपुलावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 13, 2026 09:00:17
Mira Bhayandar, Maharashtra:मीरा भाईंदर ब्रेक महापौर डिंपल मेहतांच्या पत्रात शुद्धलेखनाच्या चुका, मराठी भाषेवरून रंगले राजकारण मराठी महापौर हवा' म्हणत मनसे आक्रमक मिरा-भाईंदर: महापौर डिंपल मेहता यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात अनेक शुद्धलेखनाच्या चुका आढळल्याने मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दुसऱ्यांदा महापौर होऊनही साध्या शब्दांच्या वेलांटीत चुका होत असल्याने, महापौरांना मराठी येत नसल्याची टीका मनसेने केली आहे. "आम्ही म्हणूनच मराठी महापौराची मागणी केली होती," असे सांगत राणे यांनी केवळ सही करणाऱ्या महापौरांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकारामुळे आता शहरात 'मराठी अस्मिता' आणि 'मराठी महापौर' या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top