Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

अलिबाग के होटलों में गैस-लकड़ी संकट, पर्यटन पर मंडरा रहा खतरा

PPPRAFULLA PAWAR
Mar 26, 2026 10:36:49
Varasoli, Maharashtra
अलिबागचे हॉटेल व्यवसाय दुहेरी कात्रीत गैस सिलेंडरचा तुटवडा, चुलीसाठी लाकडं नाहीत. उपलब्ध लाकडांचा दर वधारला. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पर्यटन नगरी अलिबाग मधील हॉटेलमध्ये चुली पेटल्या आहेत. हॉटेल चालकांनी चुलीचा पर्याय शोधला मात्र त्यासाठी लाकडे मिळेनाशी झाली आहेत. पूर्वी सॉमिल वर ५ रुपये किलो दराने मिळणाऱ्या लाकडांचा दर वधारला असून एका किलोसाठी १२ रुपये मोजावे लागत आहेत. ग्रामीण भागातील जंगलात मिळणारी लाकडे आणताना वनविभागाचा जाच सहन करावा लागतोय. अशा दुहेरी कात्रीत हॉटेल व्यावसायिक सापडले आहेत. याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होतेय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Mar 26, 2026 11:20:11
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : गारपीटमुळे मोहोळ तालुक्यातील पापरी गावात द्राक्षबागेचे मोठे नुकसान - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील गारपीटीमुळे मोठे नुकसान - मोहोळ तालुक्यातील पापरी गावात द्राक्षबागेचे मोठे नुकसान - गारपीटीने द्राक्षाचे घड जमिनीवर पडल्याने नुकसान - काल रात्री गारपीट आणि वाऱ्यासह मोठा पाऊस आला. - त्यामुळे काढणी सुरु असलेली द्राक्षबाग पूर्णपणे वाया गेलीय. - आम्ही एकरी 2 लाख प्रमाणे 7 एकरावर द्राक्षबाग केली होती. - त्यातून 50 ते 60 लाख उत्पन्न अपेक्षित होते मात्र आता हे सर्व नुकसान झालेय. - लवकरात लवकर पंचनामा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना कराव्यात अशी विनंती केली
903
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 26, 2026 11:01:45
Akola, Maharashtra:अकोल्यावरून मलकापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली. प्रवासादरम्यान अचानक एका वृद्ध प्रवाशाला भोवळ येऊन ते बसमध्येच कोसळले. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती.दरम्यान, बस चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थेट अकोळयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाच्या आवारात नेली. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर संबंधित वृद्धाचा उपचार होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे समोर आले.मृत वृद्धाचे नाव एकनाथ तात्या पवार असून त्यांचे वय अंदाजे ९० वर्षे असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवासी हादरले होते, तर रुग्णालय प्रशासनाकडूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
1090
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 26, 2026 11:01:15
Kalyan, Maharashtra:डोंबिवली के जय भारत स्कूल में एक बेहद धक्केदार घटना सामने आई है. स्कूल के ट्रस्ट के बेटे ने एक शिक्षिका को अश्लील संदेश भेजकर शारीरिक संबंध बनाने के लिए दबाव डाला. इस मामले में मनसे ने स्कूल में जमकर हंगामा किया. कहा गया कि उसे हमारे हवाले कर दें. मानपाडा पुलिस ने मामले को संज्ञान लिया, ट्रस्ट के बेटे सरवना आय्यर को हिरासत में लिया गया. उसने कक्षा छह की छात्रा के साथ ऐसा किया था, पिडित शिक्षिका ने दावा किया है. पुलिस जांच जारी है. स्कूल के ट्रस्टी ने कहा है कि अगर मेरे बेटे ने ऐसा किया है तो उसे सजा मिलेगी. डोंबिवली के सागांव इलाके के जय भारत हाई स्कूल के ट्रस्ट शिवा आय्यर हैं. शिवा आय्यर का बेटा सरवना पर शिक्षिका ने गंभीर आरोप लगाए हैं. शिक्षिका की बेटी के बारे में सरवना ने अश्लील संदेश भेजे, अश्लील वीडियो भेजकर उसके साथ शारीरिक संबंध बनाने की मांग की, यह आरोप पिडित शिक्षिका ने किया है. इस पर शिक्षिका और उसकी माँ ने मनसे में शिकायत दर्ज करवाई. घटना के तुरंत बाद मनसे नेताओं ने स्कूल का घेराव किया. हंगामे के दौरान ट्रस्टी शिवा और उनकी पत्नी स्कूल उपस्थित थीं. कहा गया कि उन्हें हमारे अनुसार कार्यवाही के लिए लाओ, अन्यथा मनसे स्टाईल से उन्हें सजा देंगे. मानपाडा पुलिस मौके पर पहुंची. वरिष्ठ निरीक्षक संदीप शिंदे ने स्वयं मनसे नेताओं को स्कूल से बाहर निकाला और ट्रस्टी शिवा से उनके बेटे के बारे में जानकारी मांगी. शिवा ने बताया कि उनके घर पर उनसे जानकारी मिलने के बाद बेटे को लाया गया. पुलिस ने उसे थाना लाया. थाने में पिड़ित शिक्षिका, उसकी माँ और मनसे पदाधिकारी पहुंचे. पुलिस आगे की कार्रवाई शुरू कर दी है. शाळा ट्रस्टी शिवा आय्यर ने कहा कि यदि उनके बेटे पर गंभीर आरोप सही मिलते हैं, तो उसे सजा मिलेगी.
1052
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 26, 2026 10:32:56
1037
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 26, 2026 10:04:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यात सुमारे 14500 ग्रामपंचायतीच्या मुदत संपल्या आहेत, तिथं प्रशासक म्हणून सरपंच यांचीच निवड करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते, ज्या ठिकाणी सरपंच हाच प्रशासक आदेश लागू झाले नाहीत, तिथं आता सरपंच याना पदभार देऊ नये आणि जिथं चार्ज घेतला तिथं आर्थिक व्यवहार करण्यास मनाई आहे असे कोर्टाने सांगितले होते, त्यानंतर काही हस्तक्षेप अर्ज कोर्टात आले होते त्यानंतर कोर्टाने निकालात काही सुधारणा केल्या, सुधारित आदेशात कोर्टाने प्रशासक सरपंच याना दैनंदिन अत्यावश्यक व्यवहार करण्यास कोर्टाने मुभा दिली आहे, जिथं कारभार सरपंच यांनी हाती घेतले आहे तिथं करार करण्यात येऊ नये असे सांगितले तसेच दैनंदिन अत्यावश्यक कारभार करण्यास मुभा दिली आहे, पुढच्या सुनावणीत सगळे अर्ज एकत्र करून एक ठिकाणी मुख्य न्यायाधीश यांच्या समोर सुनावणी होईल असेही औरंगाबाद खंडपीठाने सुधारित आदेशात म्हटले आहे...
1066
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 26, 2026 10:00:53
Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या एका व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने बाहेर काढला, असा सवाल पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. मिटकरी यांनी म्हटले की, या प्रकरणात अनेक लोकांचे फोटो त्या ट्रान्सजेंडर यादवसोबत आहेत. कॅप्टन खरात प्रकरण तापले असताना राज्यातील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आठ महिन्यांपूर्वीचा झिरवाळ यांचा व्हिडिओ मुद्दाम अधिवेशन संपल्यानंतर काही मिनिटांतच व्हायरल करण्यात आला. हा पूर्ण प्रकार कोणीतरी “ प्री प्लान” करूनच केला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय झिरवाळ प्रकरण हे लक्ष विचलित करण्यासाठीच उकरून काढण्यात आले असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, झिरवाळ यांनी सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली होती. त्यानंतरच त्यांच्या मागे अँटी करप्शन लावण्यात आले आणि त्यानंतर हा व्हिडिओ बाहेर काढण्यात आला. त्यामुळे ही सोची-समजी साजिश असून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, “कॅप्टन खरातच्या आश्रमात अघोरी पूजा करणाऱ्यांनी हा इशारा समजून घ्यावा,” असेही मिटकरी यांनी सांगितले. तसेच अजित पवार यांचा खरात यांच्यासोबत एकही फोटो नसल्याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सुनेत्रा पवार यांना असून, आपण पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्ड किंवा कोर कमिटीमध्ये नसल्याने या विषयाची अधिक माहिती नसल्याचेही अमोल मिटकरी यांनी सांगितले. मात्र झिरवाळ यांच्या व्हिडिओवरून सुरू झालेल्या या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून पुढील काही दिवसांत हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
1100
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 26, 2026 09:51:41
Dharashiv, Maharashtra:धाराशिव: रामनवमी के अवसर पर धाराशिव में भाजप की भगवा ध्वज यात्रा जिल्हाभर में रामनवमी के मौके पर शोभायात्रा का उत्साह धाराशिव शहर में भाजप के विधायक रणाजगजीतसिंह पाटील की उपस्थिति में यात्रा। महिला और युवा यात्राओं का सहभाग, हनुमान की भूमिका निभाने वाले कलाकार ने ध्यान खींचा; राम भक्तों में बड़ा उत्साह। रामनवमी के अवसर पर धाराशिव जिले भर में शोभा यात्रे का आयोजन किया गया। धाराशिव शहर में भाजप द्वारा भगवा ध्वज यात्रा काढी गई। यात्राओं में महिलाओं समेत युवाओं का सहभाग मिला। रामनवमीनिमित्त निघाले यात्रा में हनुमान की भूमिका निभाने वाले कलाकारों ने सर्वांचे ध्यान खींचा। श्रीराम के विचार और आचार प्रत्येकाने आचरण में लाने चाहिए— इस बात को भाजप विधायक राणाजगजीतसिंह पाटील ने व्यक्त किया।
1083
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 26, 2026 09:16:50
Khed, Maharashtra:आखाती युद्धाच्या पडसाद आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचताना दिसत आहेत. गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांसह घरगुती ग्राहकांनाही एलपीजी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी अनेकांनी पुन्हा पारंपरिक चुलीचा पर्याय स्वीकारला आहे. लाकडाच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली असून, या वाढत्या मागणीचा परिणाम थेट जंगलांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर मोठ्या प्रमाणात झाडतोड होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. म्हणजेच, हजारो किलोमीटर दूर सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता स्थानिक पातळीवर पर्यावरणीय संकटाच्या रूपाने समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गॅस पुरवठा सुरळीत करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे ही दुहेरी जबाबदारी प्रशासनासमोर उभी ठाकली आहे.
1085
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 26, 2026 09:16:34
Buldhana, Maharashtra:ज्वलनशील पदार्थ की मृत्यूचं आमंत्रण? पेट्रोल पंपावर नियमांची पायमल्ली, प्रशासन झोपेत आहे का? पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची केवळ एक 'अफवा' पसरली आणि संपूर्ण गाव जणू पेट्रोल पंपावर धावून गेला आहे. ही धक्कादायक घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातील आंबे टाकळी या गावची... पण धोकादायक बाब म्हणजे, इंधन भरण्याच्या नादात नागरिक आपल्या जीवाशी खेळ करत असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळतंय. बुलढाणा जिल्ह्यातील आंबे टाकळी येथे पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र, कहर म्हणजे अनेक नागरिक चक्क झाकण उघडे असलेल्या बॅरलमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरून ते उघड्यावर घरी घेऊन जात आहेत. ज्वलनशील पदार्थ अशा प्रकारे उघड्या बॅरलमध्ये नेणं म्हणजे चालत्या-फिरत्या बॉम्बला आमंत्रण देण्यासारखं आहे. किरकोळ ठिणगी पडली तरी भीषण स्फोट होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते, याचं भानही या नागरिकांना उरलेलं नाहीये.
1006
comment0
Report
Advertisement
Back to top