Back
युद्ध के असर से महाराष्ट्र के पोल्ट्री कारोबार पर चोट, अंडों के दाम गिरे
HCHEMANT CHAPUDE
Mar 29, 2026 06:03:39
Ambegaon, Maharashtra
आखाती देशांमधील युद्धाची आग आता थेट महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पोल्ट्री फार्मपर्यंत पोहोचली आहे. ईराण इज्रायल अमेरिका यांच्यातील महायुध्दामुळे आखाती देशांतील अस्थिरतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विस्कळीत झाली असून, महाराष्ट्रातून होणारी अंड्यांची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, जे अंडे परदेशात जाणार होते, ते आता स्थानिक बाजारात साचले आहेत.
बाजारात अंड्यांची आवक अचानक वाढल्याने दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना मिळणारा भाव हा त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षाही कमी झाला आहे. अंडा उत्पादक व्यवसायिकांना प्रति अंडा 4 रुपये 75 पैसे ते 85 पैसे पर्यंत खर्च येतोय मात्र सध्याच्या या परिस्थितीत बाजारभाव गडगडल्याने प्रति अंडा 3 रूपये 75 पैसे ते 85 पैशापर्यंतचा भाव मिळतोय, खाद्याचे वाढलेले दर आणि औषधांचा खर्च पाहता, प्रति अंडी 1 रुपया ते 1 रूपया 10 नुकसान सोसावे लागत असल्याने पोल्ट्री व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
सागर तापकीर (पोल्ट्री व्यावसायिक)
संकट एवढ्यावरच थांबलेलं नाही. निसर्गानेही आता आपल्या Prकोप दाखवायला सुरुवात केली आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा पोल्ट्रीला बसतोय. तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार गेल्याने 'हीट स्ट्रोक'मुळे कोंबड्या दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. या मुक्या पाखरांना वाचवण्यासाठी व्यावसायिकांना आता फॉगर्स आणि कुलरचा सहारा घ्यावा लागताय.
मारूती बढेकर (पोल्ट्री व्यावसायिक)
उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्रोत आटले आहेत. कोंबड्यांना थंड ठेवण्यासाठी आणि पिण्यासाठी पाणी लागते, मात्र पाणी टंचाईमुळे टँकरवरचा खर्च अवाढव्य वाढला आहे. एकीकडे कवडीमोलाने विकली जाणारी अंडी आणि दुसरीकडे टँकर अन् विजेचा वाढलेला खर्च... अशा कात्रीत पोल्ट्री मालक सापडला आहे.
मारूती बढेकर (पोल्ट्री व्यावसायिक)
युद्ध हे सीमेवर लढलं जात असलं, तरी त्याची झळ महाराष्ट्राच्या या पोल्ट्री शेडपर्यंत पोहोचली आहे. जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि निसर्जाची अवकृपा यामुळे हा व्यवसाय आता व्हेंटिलेटरवर आहे. सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून पोल्ट्री व्यावसायिकांना वीज सवलत किंवा विशेष पॅकेज दिले नाही, तर हा व्यवसाय कायमचा बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया आंबेगाव पुणे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 07:32:290
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 29, 2026 07:18:54325
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 29, 2026 07:18:39579
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 29, 2026 07:18:25448
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 29, 2026 06:54:541075
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 29, 2026 06:53:28986
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 29, 2026 06:16:581095
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 29, 2026 05:47:091069
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 29, 2026 05:17:521099
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 29, 2026 05:00:571080
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 29, 2026 04:32:121072
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 29, 2026 04:17:351042
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 04:01:101049
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 04:00:521087
Report