Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

चंद्रपूर के धाबा गाँव में परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान को बी दर्जा मिलने दिवाली कैसे मनाई गई?

AAASHISH AMBADE
Mar 29, 2026 06:54:54
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या धाबा गावातील परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानाला तीर्थस्थळाला ब दर्जा मिळाल्याने गावकऱ्यांनी दिवाळी साजरी केली. महाराष्ट्रासह तेलंगणा-आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्री संत परमहंस कोंडय्या महाराज श्रद्धास्थान आहेत. यामुळे कोंडया महाराज देवस्थानाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू होते. राज्य सरकारने नुकतेचया देवस्थानाला ब दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी केला. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. गावातील अनेक कुटुंबानी घर आणि मंदिरापुढे रांगोळी काढत दिवे लावले. ब दर्जा मिळाल्याने मंदिर आणि गावाचा विकास होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Mar 29, 2026 08:16:17
Ahilyanagar, Maharashtra:आखाती देशात सुरू झालेल्या युद्धामुळे देशातील इंधनावर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे प्रामुख्याने एलपीजी गॅस बाबत देशभरात खबरदारी घेतली जात आहे घरगुती वापरासाठी एलपीजी गॅस मिळत असला तरी व्यावसायिक गॅस वितरण बंद करण्यात आला आहे याचा फटका प्रामुख्याने हॉटेल व्यवसायिकांना बसला आहे त्यामुळे हॉटेल व्यवसायिक असा जळाऊ लाकडाचा वापर करून व्यवसाय करत आहेत. अचानक जळाऊ लाकडाची मागणी वाढल्यामुळे सॉ मिल मध्ये चालकाचे व्यवस्थापन बिघडत आहे कारण ग्रामीण भागातून मिळणार जळावू लाकूड ग्रामीण भागातच विकला जात आहे आणि शहरातून देखील जळावू लाकडाची मागणी वाढत आहे सॉ मिल वरून याच वाढलेल्या जळाऊ लाकडाच्या मागणीचा आढावा घेऊन मालकाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 29, 2026 07:47:22
Beed, Maharashtra:बीड: चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा तुरुंगात; पंकजा मुंडेंचा अंबाजोगाईत कार्यकर्त्यांना सज्जड दम अंबाजोगाईत भाजपच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट आणि कठोर संदेश दिला आहे. चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा तुरुंगातच असते, असा थेट इशारा त्यांनी दिला. ज्याची ऐपत दहा पैशांची आहे त्याने पंधरा पैसे कमवावेत, पण दहा पैशांची ऐपत असताना शंभर रुपये कमवण्याचा मोह केला तर त्याचे ठिकाण तुरुंगातच असते, असेही त्या म्हणाल्या. चुकीची कामे सांगू नका, प्रामाणिकपणे काम करा आणि समाजासाठी कार्य करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. राजकारणात काही जण कारस्थाने करतात, पण ज्याच्या मनात पाप नसते त्याला देवाचा आशीर्वाद असतो, असे म्हणत त्यांनी विरोधकांनाही टोला लगावला.
1052
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 29, 2026 07:47:04
Buldhana, Maharashtra:खामगावात गॅस टंचाईचा गंभीर फटका; लग्न समारंभही अडचणीत.. सिलिंडर अभावी चुलीवर स्वयंपाक; आयोजकांसमोर वेळ, खर्च आणि व्यवस्थेचे मोठे आव्हान.. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका आता सर्वसामान्यांसोबतच लग्न समारंभांनाही बसू लागला आहे. शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या लग्न कार्यक्रमांमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत. १५०० ते २००० पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था असलेल्या समारंभांमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी, स्वयंपाक चुलीवर करावा लागत असल्यामुळे वेळ, श्रम आणि खर्च या तिन्ही बाबींवर मोठा परिणाम होत आहे. गॅस टंचाईमुळे केवळ घरगुती वापरच नव्हे, तर मोठ्या कार्यक्रमांच्या नियोजनावरही परिणाम होत असल्याचे चित्र सध्या खामगावमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे....
993
comment0
Report
RMRavindra Manohar Kokate
Mar 29, 2026 07:33:47
1040
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 29, 2026 07:18:54
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - आष्टा येथील डांगे कॉलेजमधील गॅदरिंग वेळी वादळी वाऱ्याचा तडाखा,मंडप गेला उडून,व्हिडिओ व्हायरल अँकर - सांगलीच्या आष्टा येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्याकार्यक्रमा दरम्यान वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला.या घटनेचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून,त्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भव्य मंडप कशाप्रकारे पत्त्यासारखा उडून गेला आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेला कापडी मंडप व खुर्ची वाऱ्याच्या प्रचंड वेगाने आकाशात झेपावल्या होत्या. मंडपाचे कापड फाटून खांब जमिनीवरून उखडले,तसेच मैदानात धुरळ्याचे प्रंचड लोट देखील उठला होता. या वादळामुळे या ठिकाणी उपस्थित असणारे आडा ओरडा करत धावत सुटले होते. साधारणतः दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झालाय.
1098
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 29, 2026 07:18:25
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीमध्ये एका मद्यधुंद डॉक्टरकडून भरधाव गाडीने चार चाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याचा प्रकार घडला आहे.त्यामध्ये एका चार चाकी वाहनाचा मोठा नुकसान झाला आहे.सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.सांगली-कोल्हापूर मार्गावर आकाशवाणी केंद्रासमोर भरधाव बुलेरोने बाजूने जाणाऱ्या चारचाकी गाडीाला जोराची धडक दिली,अपघातानंतर चालक असणारे डॉक्टर हा पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र नागरिकांनी त्याला अडवून पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.संबंधित डॉक्टर हा मद्यधुंद अवस्थेत होता,यावेळी डॉक्टर सोबत गाडीमध्ये एक महिला डॉक्टर देखील असल्याचा समोर आला आहे,याप्रकरणी सांगली शहर पोलीस अधिक तपास करत आहेत
1033
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 29, 2026 06:53:28
996
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 29, 2026 06:16:58
Beed, Maharashtra:बीड पोलीस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक सीसीटीव्ही मोबाईल कंट्रोल व्हॅन दाखल झालीय. मोठ्या सभा, यात्रा तसेच गर्दीच्या ठिकाणी केला जाणार वापर. बीड पोलीस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली सीसीटीव्ही मोबाईल व्हॅन दाखल झालीय... या माध्यमातून एआय आधारित 25 सीसीटीव्ही कॅमेरे, सहा फेस रेकग्नेशन कॅमेरा तसेच वाहनाच्या नंबर प्लेटची पडताळणी करणे शक्य असेल. व्हॅन मधील सर्व कॅमेरे वायरलेस आणि इंटरनेटशिवाय दहा किलोमीटर अंतरापर्यंत कॅप्चरिंग करू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या सभा, यात्रा तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे.
1095
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 29, 2026 06:03:39
Ambegaon, Maharashtra:आखाती देशांमधील युद्धाची आग आता थेट महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पोल्ट्री फार्मपर्यंत पोहोचली आहे. ईराण इज्रायल अमेरिका यांच्यातील महायुध्दामुळे आखाती देशांतील अस्थिरतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विस्कळीत झाली असून, महाराष्ट्रातून होणारी अंड्यांची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, जे अंडे परदेशात जाणार होते, ते आता स्थानिक बाजारात साचले आहेत. बाजारात अंड्यांची आवक अचानक वाढल्याने दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना मिळणारा भाव हा त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षाही कमी झाला आहे. अंडा उत्पादक व्यवसायिकांना प्रति अंडा 4 रुपये 75 पैसे ते 85 पैसे पर्यंत खर्च येतोय मात्र सध्याच्या या परिस्थितीत बाजारभाव गडगडल्याने प्रति अंडा 3 रूपये 75 पैसे ते 85 पैशापर्यंतचा भाव मिळतोय, खाद्याचे वाढलेले दर आणि औषधांचा खर्च पाहता, प्रति अंडी 1 रुपया ते 1 रूपया 10 नुकसान सोसावे लागत असल्याने पोल्ट्री व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. सागर तापकीर (पोल्ट्री व्यावसायिक) संकट एवढ्यावरच थांबलेलं नाही. निसर्गानेही आता आपल्या Prकोप दाखवायला सुरुवात केली आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा पोल्ट्रीला बसतोय. तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार गेल्याने 'हीट स्ट्रोक'मुळे कोंबड्या दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. या मुक्या पाखरांना वाचवण्यासाठी व्यावसायिकांना आता फॉगर्स आणि कुलरचा सहारा घ्यावा लागताय. मारूती बढेकर (पोल्ट्री व्यावसायिक) उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्रोत आटले आहेत. कोंबड्यांना थंड ठेवण्यासाठी आणि पिण्यासाठी पाणी लागते, मात्र पाणी टंचाईमुळे टँकरवरचा खर्च अवाढव्य वाढला आहे. एकीकडे कवडीमोलाने विकली जाणारी अंडी आणि दुसरीकडे टँकर अन् विजेचा वाढलेला खर्च... अशा कात्रीत पोल्ट्री मालक सापडला आहे. मारूती बढेकर (पोल्ट्री व्यावसायिक) युद्ध हे सीमेवर लढलं जात असलं, तरी त्याची झळ महाराष्ट्राच्या या पोल्ट्री शेडपर्यंत पोहोचली आहे. जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि निसर्जाची अवकृपा यामुळे हा व्यवसाय आता व्हेंटिलेटरवर आहे. सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून पोल्ट्री व्यावसायिकांना वीज सवलत किंवा विशेष पॅकेज दिले नाही, तर हा व्यवसाय कायमचा बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया आंबेगाव पुणे...
1037
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 29, 2026 05:47:09
Satara, Maharashtra:सातारा: माण तालुक्यातील मोगराळे गावच्या हद्दीत सोलर कंपनीच्या जवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन झाले आहे बिबट्याच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहेत. याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिसराची पाहणी केली याबाबत याआधीही बिबट्याचा वावर असल्याची माहिती सोलर कंपनी परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती मात्र कोणताही पुरावा नसल्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले होते मात्र पुन्हा एकदा सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये हा बिबट्या दिसल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून कोणीही रात्रीच्या वेळी सोलर कंपनी जवळ असणाऱ्या डोंगर पट्ट्यात एकटे फिरू नये असे आवाहन करण्यात आले आहे
1069
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 29, 2026 05:17:52
1099
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 29, 2026 05:00:57
Akola, Maharashtra:वडत्या उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे शरीरावर विविध त्रासही वाढताना दिसत आहेत. मात्र या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अकोल्यातील म्हैसपूर येथे एक वेगळी आणि प्राचीन पद्धत वापरली जात आहे. आदर्श गौ सेवा केंद्रात दर रविवारी गोमय शाही स्नानाचे आयोजन करण्यात येत आहे. काय आहे ही पद्धत आणि त्याचे फायदे काय, पाहूया या रिपोर्टमधून… हे दृश्य पाहून तुम्हाला वाटत असेल की ही रंगपंचमी आहे की काय ? पण नाही, हे आहे ‘गोमय शाही स्नान’. अकोल्यातील म्हैसपूर येथील आदर्श गौसेवा केंद्रात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक रविवारी गोमय स्नानाचे आयोजन केले जाते. अनेक वर्षांपासून येथे शहरासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्वचेच्या संरक्षणासाठी गायीचे शेण आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. अंगाला शेण लावून त्या त्यात सचैल स्नान केल्याने त्वचेला चमक येते, असा दावा येथे येणारे नागरिक करत आहेत. साबण आणि शॅम्पूपेक्षा गायीचे शेण आणि गोमूत्र अधिक फायदेशीर असल्याचेही यावेळी सांगितले जात आहे. या केंद्रात सुमारे २८०० गायींचे संगोपन केले जाते. यामधील बहुतांश गायींना कत्तलीसाठी नेले जात असताना गौरक्षक आणि पोलिसांनी त्यांना वाचवले होते. येथे मोठ्या प्रमाणात गायीचे शेण आणि गोमूत्र उपलब्ध असल्यामुळे गौभक्त अंगाला शेण-गोमूत्र लावून त्यात सुमारे तासभर खेळतात आणि त्यानंतर साध्या पाण्याने आंघोळ करतात.या स्नानाचे अनेक फायदे असल्याचा दावा केला जात असून दिवसेंदिवस सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. बदलत्या काळात गायीच्या शेण-गोमूत्राचा वापर कमी झाला असला तरी शास्त्रीयदृष्ट्या त्याचे महत्त्व अजूनही कायम असल्याचे येथे सांगितले जात आहे. मोठ्या शहरांमध्ये अशा स्नानासाठी मोठे शुल्क आकारले जाते, मात्र या केंद्रात हे पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जात आहे.
1080
comment0
Report
Advertisement
Back to top