Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

भंडारा मोहाड़ी में घरपट्टी थकबाकी के चलते दुकाने सील, व्यापारियों में नाराज़गी

PTPRAVIN TANDEKAR
Mar 29, 2026 06:53:28
Bhandara, Maharashtra
घरपट्टी थकबाकी के कारण भंडाऱ्याच्या मोहाडीत स्थानिक दुकानदारांच्या दुकानदारांच्या दुकानांना सील लगाने की كارवाई शुरू की गई ہے. इस كارवाई से व्यापारियों में तीव्र नाराज़गी फैल गई है और प्रशासन پر मनमानी व अन्यायकारक व्यवहार के आरोप लग रहे हैं. संबंधित मामले की सुनवाई अभी लंबित है और राज्य शासन के पास मामला न्यायप्रविष्ट होने के बावजूद नोटिस देकर 10 से 15 दुकानों پر सील लगाई गईं, ऐसा दुकानदारوں کا कहना है. इससे नागरिकों ने स्थानीय विधायक राजू कारेमोरे से शिकायत की है, जिस पर विधायक ने घटनास्थली पहुँचकर स्थिति देखी.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 29, 2026 08:33:09
Pune, Maharashtra:Headline : कामकाज करत असताना दादांची उणीव भासत आहे. - सुनील शेळके Anchor : -दादांच अपघाती निधन झालं. त्यांनतर शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी चर्चा झाली सांगितलं. दादांसोबत भेट झाली सांगितलं. दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत. -dदादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सन्मान मिळायला हवा. -ती भूमिका वरिष्ठ नेत्यांनी पार पाडली. -उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, आनंद आहे. -राष्ट्रवादी काँग्रेस मोठा होईल -व्यक्तिगत स्वार्थ असलेला विरोध करेल. -सुनेत्रा पवार यांचा नेतृत्व मान्य असेल तर एकसंघ होतील. नेतृत्व मान्य नसेल तर दुसऱ्या पक्षाचा पर्याय शोधला जाईल. -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित दादांच्या अपघातच सत्य सर्वांसमोर आणतील. बाईट : सुनील शेळके, आमदार, मावळ (file no.01)
935
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 29, 2026 08:31:59
Varasoli, Maharashtra:रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून सुनेत्रा पवार, अजित पवारांसह पक्ष श्रेष्टींचे फोटो गायब झाल्याचे समोर आले आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघांतील इंदापुर येथे माणगांव तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपिठावरील बॅनरवर खा. सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो लावण्यात आले मात्र या बॅनरवर स्वर्गीय अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो लावण्यात आले नाहीत. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब होत असल्याने राजकिय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
838
comment0
Report
RMRavindra Manohar Kokate
Mar 29, 2026 08:21:53
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीतील आरे वारे समुद्रात दोन पर्यटक बुडाले. एकाचा मृत्यू, दुसऱ्याला वाचविण्यात यश. घटनेची माहिती आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या sुमारास झाली. स्थानिक ग्रामस्थ आणि येथील पोलिस पाटील आदेश कदम यांनी दोघांना बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. संतोष शशिकांत भानुशाली असं मृत व्यक्तीचं नाव असून ते पालघरचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सुयोग राजेश भानुशाली असं बचावलेल्या तरुणाचं नाव आहे. पालघर येथून हे कुटुंब रविवारी सकाळी आरे वारे येथे दाखल झाले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दोघे समुद्रात बुडाले. यातील एकाचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आलं.
896
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 29, 2026 08:20:52
915
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 29, 2026 08:16:17
Ahilyanagar, Maharashtra:आखाती देशात सुरू झालेल्या युद्धामुळे देशातील इंधनावर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे प्रामुख्याने एलपीजी गॅस बाबत देशभरात खबरदारी घेतली जात आहे घरगुती वापरासाठी एलपीजी गॅस मिळत असला तरी व्यावसायिक गॅस वितरण बंद करण्यात आला आहे याचा फटका प्रामुख्याने हॉटेल व्यवसायिकांना बसला आहे त्यामुळे हॉटेल व्यवसायिक असा जळाऊ लाकडाचा वापर करून व्यवसाय करत आहेत. अचानक जळाऊ लाकडाची मागणी वाढल्यामुळे सॉ मिल मध्ये चालकाचे व्यवस्थापन बिघडत आहे कारण ग्रामीण भागातून मिळणार जळावू लाकूड ग्रामीण भागातच विकला जात आहे आणि शहरातून देखील जळावू लाकडाची मागणी वाढत आहे सॉ मिल वरून याच वाढलेल्या जळाऊ लाकडाच्या मागणीचा आढावा घेऊन मालकाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
931
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 29, 2026 07:47:22
Beed, Maharashtra:बीड: चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा तुरुंगात; पंकजा मुंडेंचा अंबाजोगाईत कार्यकर्त्यांना सज्जड दम अंबाजोगाईत भाजपच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट आणि कठोर संदेश दिला आहे. चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा तुरुंगातच असते, असा थेट इशारा त्यांनी दिला. ज्याची ऐपत दहा पैशांची आहे त्याने पंधरा पैसे कमवावेत, पण दहा पैशांची ऐपत असताना शंभर रुपये कमवण्याचा मोह केला तर त्याचे ठिकाण तुरुंगातच असते, असेही त्या म्हणाल्या. चुकीची कामे सांगू नका, प्रामाणिकपणे काम करा आणि समाजासाठी कार्य करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. राजकारणात काही जण कारस्थाने करतात, पण ज्याच्या मनात पाप नसते त्याला देवाचा आशीर्वाद असतो, असे म्हणत त्यांनी विरोधकांनाही टोला लगावला.
1096
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 29, 2026 07:47:04
Buldhana, Maharashtra:खामगावात गॅस टंचाईचा गंभीर फटका; लग्न समारंभही अडचणीत.. सिलिंडर अभावी चुलीवर स्वयंपाक; आयोजकांसमोर वेळ, खर्च आणि व्यवस्थेचे मोठे आव्हान.. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका आता सर्वसामान्यांसोबतच लग्न समारंभांनाही बसू लागला आहे. शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या लग्न कार्यक्रमांमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत. १५०० ते २००० पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था असलेल्या समारंभांमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी, स्वयंपाक चुलीवर करावा लागत असल्यामुळे वेळ, श्रम आणि खर्च या तिन्ही बाबींवर मोठा परिणाम होत आहे. गॅस टंचाईमुळे केवळ घरगुती वापरच नव्हे, तर मोठ्या कार्यक्रमांच्या नियोजनावरही परिणाम होत असल्याचे चित्र सध्या खामगावमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे....
1092
comment0
Report
RMRavindra Manohar Kokate
Mar 29, 2026 07:33:47
1046
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 29, 2026 07:18:54
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - आष्टा येथील डांगे कॉलेजमधील गॅदरिंग वेळी वादळी वाऱ्याचा तडाखा,मंडप गेला उडून,व्हिडिओ व्हायरल अँकर - सांगलीच्या आष्टा येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्याकार्यक्रमा दरम्यान वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला.या घटनेचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून,त्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भव्य मंडप कशाप्रकारे पत्त्यासारखा उडून गेला आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेला कापडी मंडप व खुर्ची वाऱ्याच्या प्रचंड वेगाने आकाशात झेपावल्या होत्या. मंडपाचे कापड फाटून खांब जमिनीवरून उखडले,तसेच मैदानात धुरळ्याचे प्रंचड लोट देखील उठला होता. या वादळामुळे या ठिकाणी उपस्थित असणारे आडा ओरडा करत धावत सुटले होते. साधारणतः दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झालाय.
1098
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 29, 2026 07:18:25
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीमध्ये एका मद्यधुंद डॉक्टरकडून भरधाव गाडीने चार चाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याचा प्रकार घडला आहे.त्यामध्ये एका चार चाकी वाहनाचा मोठा नुकसान झाला आहे.सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.सांगली-कोल्हापूर मार्गावर आकाशवाणी केंद्रासमोर भरधाव बुलेरोने बाजूने जाणाऱ्या चारचाकी गाडीाला जोराची धडक दिली,अपघातानंतर चालक असणारे डॉक्टर हा पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र नागरिकांनी त्याला अडवून पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.संबंधित डॉक्टर हा मद्यधुंद अवस्थेत होता,यावेळी डॉक्टर सोबत गाडीमध्ये एक महिला डॉक्टर देखील असल्याचा समोर आला आहे,याप्रकरणी सांगली शहर पोलीस अधिक तपास करत आहेत
1074
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 29, 2026 06:54:54
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या धाबा गावातील परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानाला तीर्थस्थळाला ब दर्जा मिळाल्याने गावकऱ्यांनी दिवाळी साजरी केली. महाराष्ट्रासह तेलंगणा-आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्री संत परमहंस कोंडय्या महाराज श्रद्धास्थान आहेत. यामुळे कोंडया महाराज देवस्थानाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू होते. राज्य सरकारने नुकतेचया देवस्थानाला ब दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी केला. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. गावातील अनेक कुटुंबानी घर आणि मंदिरापुढे रांगोळी काढत दिवे लावले. ब दर्जा मिळाल्याने मंदिर आणि गावाचा विकास होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
1087
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 29, 2026 06:16:58
Beed, Maharashtra:बीड पोलीस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक सीसीटीव्ही मोबाईल कंट्रोल व्हॅन दाखल झालीय. मोठ्या सभा, यात्रा तसेच गर्दीच्या ठिकाणी केला जाणार वापर. बीड पोलीस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली सीसीटीव्ही मोबाईल व्हॅन दाखल झालीय... या माध्यमातून एआय आधारित 25 सीसीटीव्ही कॅमेरे, सहा फेस रेकग्नेशन कॅमेरा तसेच वाहनाच्या नंबर प्लेटची पडताळणी करणे शक्य असेल. व्हॅन मधील सर्व कॅमेरे वायरलेस आणि इंटरनेटशिवाय दहा किलोमीटर अंतरापर्यंत कॅप्चरिंग करू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या सभा, यात्रा तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे.
1095
comment0
Report
Advertisement
Back to top