Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410502

जुन्नर से 20 बिबट गुजरात के वनतारा केंद्र पहुँचे

HCHEMANT CHAPUDE
Mar 07, 2026 11:51:15
Junnar, Pune, Maharashtra
मानव-बिबट संघर्षाच्या घटनांमध्ये मागील काही वर्षांत मोठी वाढ झाल्याने पकडण्यात आलेल्या बिबट्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आज पहिल्या टप्प्यात २० बिबट्यांना गुजरातमधील वनतारा केंद्रात हलविण्यात आले. मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर व शिरूर तालुक्यातील काही बिबट्यांना पकडून त्यांना माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे ठेवण्यात आले होते. मात्र या केंद्राची क्षमता ५० इतकी मर्यादित असल्याने अतिरिक्त बिबट्यांचे इतर योग्य ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक झाले होते. यासाठी प्रस्ताव Central Zoo Authority, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला २० डिसेंबर २०२५ रोजी मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानुसार गुजरातमधील Greens Zoological Rescue and Rehabilitation Center (Vantara) येथील २५ सदस्यीय पथक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली ६ मार्च रोजी जुन्नर येथे दाखल झाले. आज पहिल्या टप्प्यात १० नर व १० मादी अशा २० बिबट्यांना वातानुकूलित आणि सुसज्ज रेस्क्यू व्हॅनद्वारे सुरक्षितपणे वनतारा केंद्रात रवाना करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जुन्नर वनविभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच वाइल्डलाइफ SOS संस्थेच्या सहकार्याने पार पडली. मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Mar 07, 2026 13:04:58
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर वनविभागाने जेरबंद केलेल्या बिबट्यांपैकी जवळपास आठ बिबटे उन्हात असल्याने त्यांना त्रास होत असल्याचं वन्य जीवप्रेमी अमित गायकवाड यांनी म्हंटले होते...याबाबत माध्यमांमध्ये बातम्या प्रसारित होताच उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी प्रतिक्रिया देताना पारनेर तालुक्यातील नर्सरीत आठ बिबटे नसून केवळ एकच बिबट्टा होता असा दावा केलाय...मात्र हा दावा वन्यजीव प्रेमी गायकवाड यांनी खोडून काढलाय...आम्ही स्वतः संबंधित नर्सरीत गेलो त्यावेळी तिथे आठ बिबटे असल्याचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत...माध्यमात बातम्या येताच उपवनसंरक्षक यांनी आम्हाला बोलावून घेऊन तिथे सहा बिबटे होते आणि ते आजच जुन्नरला पाठवण्यात आल्याचे सांगितले...मतलब माध्यमांना एक बिबट्या असल्याचे सांगितले आणि आम्हाला सहा सांगितले म्हणजेच ते काहीतरी लपवा- छपवी करत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केलाय...शिवाय उपवनसंरक्षक यांनी बिबटे जुन्नरला सोडल्याबाबत एकही पुरावा दिला नसल्याचे गायकवाड यांनी म्हंटले आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 07, 2026 12:35:22
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरात बालगुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुनाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर बालसुधारगृहात पाठवण्यात आलेल्या दोन विधी संघर्षग्रस्त मुलांचा “किंग इज बॅक” असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मुक्तता होताच त्यांच्या मित्रांनी त्यांचा जल्लोष करत व्हिडिओ शूट केला. या पार्श्वभूमीवर वाढत्या बालगुन्हेगारीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. यादव नगर परिसरातील दोन्ही विधी संघर्षग्रस्त मुलांचा “किंग इज बॅक” हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खुनाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांना बालसुधारगृहात पाठवले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार मुक्तता होताच त्यांच्या मित्रांनी त्यांनी स्वागत करत असा जल्लोष केला आणि इतकच नाही तर त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल केले. गुन्हेगारीचे समर्थन करणारा व्हिडिओ पाहिल्यानंतर बाल गुन्हेगारी कशाप्रकारे वाढीस लागत आहे हे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही विधी संघर्षग्रस्त मुलं कोल्हापुरातील यादव नगर परिसरातील असून ते तथाकथित “रावण ग्रुप”चे सदस्य असल्याची चर्चा आहे. या ग्रुपमधील अनेक सदस्यांनी आपल्या हातावर “रावण गँग” असे एकसारखे टॅटू काढले असल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या मुलांवर यापूर्वीही विविध गुन्ह्यांचे आरोप असल्याचे समोर येत आहे. एक गुन्हा केल्यानंतर जास्तीत जास्त काय होणार… बालसुधारगृहात काही काळ ठेवले जाईल आणि त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने मुक्तता होईल, अशी मानसिकता काही बालगुन्हेगारांमध्ये तयार होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालकांच्या दुर्लक्षामुळे वाढत्या बालगुन्हेगारीमागे एक मोठे कारण आहे. पालक आणि मुलांमधील संवाद कमी होणे, चुकीच्या संगतीत जाणे आणि सोशल मीडियाचा अतिरेकी वापर यामुळे अनेक मुले चुकीच्या मार्गाला लागतात. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या वर्तनाकडे, त्यांच्या मित्रपरिवाराकडे आणि सोशल मीडियावरील त्यांच्या हालचालींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. एकदा ka एखादा तरुण बालगुन्हेगारीच्या विळख्यात अडकला, तर त्यातून बाहेर पडणे अनेकदा कठीण ठरते. बालसुधारगृहातही अनेक बालगुन्हेगार एकत्र राहतात. त्यामुळे तेथेदेखील त्यांच्यात संपर्क वाढतो आणि बाहेर आल्यानंतर अशा मुलांच्या टोळ्या तयार होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच वाढत्या बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच समाज, पालक आणि प्रशासन यांनीही एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. एक अर्थाने बालगुन्हेगारी ही केवळ कायद्याची समस्या नसून ती समाज आणि कुटुंब व्यवस्थेसाठीही मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे मुलांच्या वर्तनाकडे वेळेवर लक्ष दिले तरच त्यांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखता येईल.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 07, 2026 12:20:54
Navi Mumbai, Maharashtra:इस्रायल अमेरिका और इराण च्या युद्धा मुळे फळ निर्यात ला मोठा फटका बसला आहे.... रमजान च्या महिन्यात आखाती देशात , द्राक्ष, कलिंगड, दाळिंब, आंबा, केळी, पपई, खरबूज सारख्या फळांना फार मोठ्या प्रमाणात मागणी असते... जे एन पी टी मध्ये केळी चे 200 कंटेनर, आणि द्राक्ष चे 200 कंटेनर बाहेर काढावे लागले आहेत... आता हा सगळा माल आपल्या देशात विकावा लागणार आहे स्ट्रेट ऑफ होर्मुज हा जो समुद्री मार्ग आहे तिथे इराण चा कबजा असल्यामुळे शिप पुढे जात नाही आहेत ...आखाती देशातील , इराण, इराक दुबई,मस्कत, बहरीन, सउदी अरेबिया या ठिकाणी माल जात असतो .. सध्या युद्ध परिस्थिती मुळे रस्त्यात सुद्धा 400 ते 500 कंटेनर अडकून पडले आहेत..येणाऱ्या 8 ते 10 दिवसात हापूस ची आवक पण होणार आहे आणि जर परिस्थिती नाही सुधारली तर हा सगळा माल लोकल मार्केट मध्ये विकावा लागणार आहे और शेकऱ्यांना जर यातून प्रोडक्शन कॉस्ट पण सुटली नाही तर फार मोठ नुकसान शेतकरयांच् होणार आहे...फक्त फळ नाही तर भाज्यांची देखील मोठ्या प्रमाणत निर्यात होत होती त्यामुळे जर येत्या 8 ते 10 दिवसात युद्ध शांत नाही झालं तर भाज्यांवर देखील परिणाम जाणवेल आखाती देशातून आपल्या देशात खजूर, सफरचंद  मोठ्या प्रमाणात येतात मात्र युद्ध परिस्थिती मुळे तिथे देखील हा माल अडकून पडला आहे आपण येत्या काही दिवसात जर हे संकट नाही संपलं तर फार मोठं नुकसान होणार आहे .
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 07, 2026 11:54:35
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम तालुक्यातील सावरगाव जिरे येथे गव्हाच्या पिकाला भीषण आग लागल्याची घटना घडली.शेतातून गेलेल्या महावितरणच्या वीज तारांमधील घर्षणामुळे पडलेल्या ठिणगीमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.या आगीत ४ एकरांतील उभे गव्हाचे पीक जळून खाक झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.ओंकार वानखेडे, दत्ता वानखेडे, सिताराम वानखेडे आणि दामोदर काळे यांच्या गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले,तर श्रीराम वानखेडे यांच्या शेतातील ड्रीप सिंचन पाईपलाईनही जळाली.परिसरातील शेतकऱ्यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 07, 2026 11:54:16
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 07, 2026 11:16:04
Chandrapur, Maharashtra:राज्य सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी चंद्रपुरात अन्नत्याग सत्याग्रह करणाऱ्या बंडू धोत्रे यांच्या उपोषण मंडपापुढे सद्बुद्धी महायज्ञाचे आयोजन, चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारडोंगरी लोहखाण रद्द करण्यासह मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी एकूण 17 मागण्यांसह सत्याग्रहाला बसले आहेत बंडू धोत्रे, आजचा तिसरा दिवस असूनही महाराष्ट्र शासन, वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाने चालविले आहे दुर्लक्ष चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या घनदाट जंगलात प्रस्तावित लोहारडोंगरी लोहखाण रद्द करा या मागणीसाठी चंद्रपूरचे वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाचा आजचा तिसरा दिवस असूनही महाराष्ट्र शासन, वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी इको प्रो संघटनेने गेली काही वर्षे प्रमुख मागण्यांसह पाठपुरावा चालवला आहे. या मागण्या त्वरित मान्य करा ,लोहारडोंगरी खाण रद्द करा यासाठी राज्य शासनाला सद्बुद्धी यावी म्हणून हा अन्नत्याग सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे. उपोषण मंडपापुढे सद्बुद्धी महायज्ञाचे आयोजन करून परमेश्वर राज्य शासनाला सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करण्यात आली. बाईट १) डॉ. योगेश्वर दूधपचारे, पर्यावरण अभ्यासक बाईट ३) प्रा. दिलीप चौधरी ,जिल्हाध्यक्ष ,संभाजी ब्रिगेड आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 07, 2026 11:10:10
Akola, Maharashtra:८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिवस , महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस. अशाच एका जिद्दीची आणि संघर्षाची प्रेरणादायी कहाणी अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथील अत्यंत सामान्य कुटुंबातील प्रज्ञा इंगळे हिची Indo‑Tibetan Border Police या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात निवड झाली आहे. तिचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून ती आता सिक्कीम येथे देशसेवे बजावणार आहे. हलाखीच्या परिस्थितीतही प्रज्ञाने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश मिळवले असून छोट्याशा डोंगरगावातून सैन्य दलात दाखल होणारी ती पहिली महिला ठरली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रज्ञाच्या वडिलांना तिचा अभिमान वाटत आहे तर मुलीचा यश पाहून वडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रज्ञा सैन्य भरतीसाठी सातत्याने प्रयत्न करत होती. अभ्यास आणि सराव यासाठी ती दररोज पहाटे पाच वाजता उठून रनिंग व व्यायाम करत असे. अनेक वेळा अपयश आले, पण “फौजी” होण्याचे स्वप्न तिने कधीच सोडले नाही. कठोर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आज तिचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण झाले आहे. प्रज्ञाचे वडील गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई मोलमजुरी करते. प्रज्ञाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे झाले, तर पुढील शिक्षण शहरात झाले. अत्यंत साध्या परिस्थितीतूनही प्रज्ञाने मिळवलेले हे यश संपूर्ण डोंगरगावसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. तिच्या कामगिरीबद्दल गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. शालिनी इंगळे, प्रज्ञाची आई. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रज्ञा इंगळेची ही यशोगाथा अनेक मुलींना प्रेरणा देणारी ठरली आहे. मनात जिद्द, मेहनत आणि देशसेवेची भावना असेल तर कोणतीही अडचण ध्येयाच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही, हे प्रज्ञाने सिद्ध करून दाखवले आहे. जयेश जगड, झी मिडिया, अकोला
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 07, 2026 10:48:51
Jalna, Maharashtra:जालना : सालगड्याच्या मुलानं मिळवलं UPSC मध्ये यश,812 वा रँक मिळवून मिळवलं यश अँकर : जालन्यातील एका सालगड्याच्या मुलानं यूपीएससी परीक्षा सर करत यश मिळवलं आहे.जालन्यातील जळगाव सपकाळ येथील भिकन रोजेकर असं यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.भिकनचे वडील जगन रोजेकर हे सालगडी म्हणून काम करतात तर आई बेबीताई यामोलमजुरी करतात.त्यांच्याकडे अवघी 2 एकर जमीन असून सध्या ते टिनपत्रांच्या शेडमध्ये राहतात.भिकनने याआधी 4 वेळा यूपीएससी परीक्षा दिली मात्र यश मिळालं नाही अखेर पाचव्या प्रयत्नात मात्र त्याने देशातून 812 वा रँक मिळवत यशाला गवसणी घातली.दरम्यान भिकने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानं त्याचं अवघ्या जिल्ह्यातून कौतुक होत असून त्याचा जळगाव सपकाळ वासियांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 07, 2026 10:18:14
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात ५४५ गावांत संभाव्य पाणीटंचाई; १९ कोटींचा टंचाई निवारण आराखडा तयार, मेळघाटला सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनतो. यंदाही जिल्ह्यातील तब्बल ५४५ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईचा धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १९ कोटी ७ लाख ५५ हजार रुपयांचा टंकाई निवारण कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात तब्बल ७२२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नळयोजनांची दुरुस्ती, जलस्त्रोतांचे अधिग्रहण, खासगी विहिरींचे अधिग्रहण तसेच गरज भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजनांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात ५३७ नळयोजना, १ हजार ७७२ हातपंप, ३९९ विद्युत पंप तसेच १ हजार १७० सार्वजनिक आणि २ हजार ५६ खासगी विहिरींच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र उन्हाळा तीव्र होत असताना पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आधीच तयारी सुरू केली आहे. दरम्यान मेळघाटातील संपूर्ण पाणीटंचाईवर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली असून या संपूर्ण पाणीटंचाईला शासन जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटला आहे. गेल्या अनेक वर्षापासून मेळघाटात योजना राबवल्या जात आहेत मात्र तरीही इथे पाणीटंचाई कायम असून गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी मी मेळघाटच्या पाणीटंचाईचा दौरा केला असून तिथे पाणीटंचाई असल्याचं आदिवासी बांधवांनी सांगितला आहे. मेळघाटातील जलजीवन मिशनच्या योजना पैसे नसल्याने कंत्राटदारांनी बंद केल्याने मेळघाटात अजून भीषण पाणीटंचाई झाली असल्याचा गंभीर आरोप बळवंत वानखडे यांनी केला आहे. तसेच जलजीवन मध्ये सातत्याने भ्रष्टाचार होत असल्याचंही खासदार बळवंत वानखडे यांनी म्हटला. Upcoming काळात जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये १४३ खासगी विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय २८६ ठिकाणी नळयोजनांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. दरम्यान, सर्वाधिक संभाव्य टंचाई चिखलदरा आणि धारणी या मेलघाटातील तालुक्यांमध्ये भासण्याची शक्यता आहे. चिखलदरा तालुक्यातील ८३ तर धारणी तालुक्यातील ७५ गावांचा टंचाईग्रस्त गावांमध्ये समावेश आहे. विशेषतः चिखलदऱ्यातील १५ गावांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकूणच, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने १९ कोटी ७ लाख ५५ हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता देत ७२२ उपाययोजना राबविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना होणारी पाण्याची गैरसोय काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मेळघाटात सध्या विहिरीत आणि हॅन्ड पंपला पाणी नसल्याचं आदिवासी बांधव सांगत असून महिलांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वन वन फिरावं लागत असल्याचं आदिवासी बांधव सांगत आहे तसेच सिंगल फेज विद्युत पुरवठा असल्याने थ्री फेज विद्युत पुरवठ्याची मागणी आदिवासी बांधवत करत आहेत त्यामुळे आदिवासींना पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो. दरम्यान मेळघाटातील आदिवासींच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि मेळघाटातील समस्या समोर आणण्यासाठी बच्चू कडू यांनी मेळघाटात संघर्ष यात्रेचा आयोजन केले आहे. वनविभागाच्या जाचकटीमुळे मेळघाटातील आदिवासींना पाणी मिळत नसल्याचं बच्चू कडू यांनी म्हटला आहे त्यामुळे प्रशासनाने आमच्या डोक्यात फक्त गांधी आहे अस समजू नका, छत्रपतींची तलवारही निघू शकते असे म्हणत बच्चू कडूंनी प्रशासनाला ईशारा दिला आहे. फक्त बैठक घेऊन चालणार नाही असेही कडू म्हणाले आहे. उन्हाळा तीव्र होण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईचा अंदाज घेत ७२२ उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे. मात्र या योजना प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे राबवल्या जातात यावरच ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी धावपळ कमी होणार कि वाढणार हे अवलंबून असेल.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 07, 2026 09:45:20
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास काही केल्या कमी होताना दिसत नाही... शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडलीय. रस्त्यावरून जाणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने पुन्हा एकदा एका व्यक्तीवर हल्ला करत त्याचा पायाचा चावा घेतला आहे. भटक्या कुत्र्याचे टोळकं व्यक्तीवर हल्ला करून त्यांच्या पायाचा चावा घेत असतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील भटक्य कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिकेने भटक्या कुत्र्यांची नसबंदी योग्य प्रकारे केली नसल्याने शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न लवकर मार्गी लावावा असा अशी मागणी पिंपरी चिंचवडकर करत आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top