Back
कोल्हापुर में नाबालिग अपराधियों का वीडियो वायरल, कोर्ट के आदेश के बाद स्वागत
PNPratap Naik1
Mar 07, 2026 12:35:22
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर शहरात बालगुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुनाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर बालसुधारगृहात पाठवण्यात आलेल्या दोन विधी संघर्षग्रस्त मुलांचा “किंग इज बॅक” असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मुक्तता होताच त्यांच्या मित्रांनी त्यांचा जल्लोष करत व्हिडिओ शूट केला. या पार्श्वभूमीवर वाढत्या बालगुन्हेगारीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. यादव नगर परिसरातील दोन्ही विधी संघर्षग्रस्त मुलांचा “किंग इज बॅक” हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खुनाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांना बालसुधारगृहात पाठवले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार मुक्तता होताच त्यांच्या मित्रांनी त्यांनी स्वागत करत असा जल्लोष केला आणि इतकच नाही तर त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल केले. गुन्हेगारीचे समर्थन करणारा व्हिडिओ पाहिल्यानंतर बाल गुन्हेगारी कशाप्रकारे वाढीस लागत आहे हे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही विधी संघर्षग्रस्त मुलं कोल्हापुरातील यादव नगर परिसरातील असून ते तथाकथित “रावण ग्रुप”चे सदस्य असल्याची चर्चा आहे. या ग्रुपमधील अनेक सदस्यांनी आपल्या हातावर “रावण गँग” असे एकसारखे टॅटू काढले असल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या मुलांवर यापूर्वीही विविध गुन्ह्यांचे आरोप असल्याचे समोर येत आहे. एक गुन्हा केल्यानंतर जास्तीत जास्त काय होणार… बालसुधारगृहात काही काळ ठेवले जाईल आणि त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने मुक्तता होईल, अशी मानसिकता काही बालगुन्हेगारांमध्ये तयार होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालकांच्या दुर्लक्षामुळे वाढत्या बालगुन्हेगारीमागे एक मोठे कारण आहे. पालक आणि मुलांमधील संवाद कमी होणे, चुकीच्या संगतीत जाणे आणि सोशल मीडियाचा अतिरेकी वापर यामुळे अनेक मुले चुकीच्या मार्गाला लागतात. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या वर्तनाकडे, त्यांच्या मित्रपरिवाराकडे आणि सोशल मीडियावरील त्यांच्या हालचालींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. एकदा ka एखादा तरुण बालगुन्हेगारीच्या विळख्यात अडकला, तर त्यातून बाहेर पडणे अनेकदा कठीण ठरते. बालसुधारगृहातही अनेक बालगुन्हेगार एकत्र राहतात. त्यामुळे तेथेदेखील त्यांच्यात संपर्क वाढतो आणि बाहेर आल्यानंतर अशा मुलांच्या टोळ्या तयार होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच वाढत्या बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच समाज, पालक आणि प्रशासन यांनीही एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. एक अर्थाने बालगुन्हेगारी ही केवळ कायद्याची समस्या नसून ती समाज आणि कुटुंब व्यवस्थेसाठीही मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे मुलांच्या वर्तनाकडे वेळेवर लक्ष दिले तरच त्यांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखता येईल.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 07, 2026 13:17:310
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 07, 2026 13:04:580
Report
SNSWATI NAIK
FollowMar 07, 2026 12:45:49Navi Mumbai, Maharashtra:उरण-पेण एसटी बस में टिकट के विवाद के कारण यात्री और महिला कंडक्टर के बीच हाथापाई हुई; वीडियो वायरल हो रहा है।
0
Report
SNSWATI NAIK
FollowMar 07, 2026 12:20:540
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 07, 2026 11:54:350
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 07, 2026 11:54:160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 07, 2026 11:51:150
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 07, 2026 11:47:300
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 07, 2026 11:16:040
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 07, 2026 11:10:100
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 07, 2026 10:48:510
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 07, 2026 10:18:140
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 07, 2026 10:05:410
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 07, 2026 09:48:140
Report