Back
शिरूर में बिबट्या आतंक: किसानों ने गोरे गोवंश मोकाट छोड़ने शुरू किए
HCHEMANT CHAPUDE
Nov 13, 2025 09:04:43
Shirur, Maharashtra
उत्तर पुणे जिल्हा बनला बिबट्याचा हॉटस्पॉट... १५०० पेक्षा जास्त बिबट्यांची संख्या.... परिसरातील 70 टक्के पेक्षा ऊस क्षेत्र....तर भक्ष म्हणून जर्सी गाईंचे गोरे खोंड सहज होतात उपलब्ध... शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात असून भर दिवसा बिबटे या परिसरात मनुष्यासह पाळीव प्राण्यांवरती हल्ले करू लागलेत,या परिसरात कुकडी प्रकल्पातील पाच धरणांमुळे बारमाई शेतीसाठी पाणी उपलब्ध असल्याने ऊस शेती मोठ्या प्रमाणात असून बिबट्यांना लपण्यासाठी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे तर भक्ष म्हणून शेतकऱ्यांकडून नुकतेच जन्मलेले जर्सी गाईचे गोरे खोड मोकाट सोडले जात असल्याने बिबट्या याचा भक्ष म्हणून उपयोग करतोय,एकीकडे दुधाला बाजार भाव नाही तर दुसरीकडे हे खोंड सांभाळून याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे शेतकरी हे खोंड मोकाट सोडून देत आहेत. सावित्रा थोरात (शेतकरी), माऊली ढोमे (शेतकरी), गोहत्या बंदीमुळे या गोऱ्यांना कत्तलीसाठी कोणी घेऊन जात नसल्याने शेतकरी असे मोकाट सोडून देत आहेत त्यामुळे या परिसरात बिबट्याची संख्या वाढली असून शासनाने या संदर्भात तातडीने उपाययोजना करून गोहत्या बंदी संदर्भातला विचार करून या गोय्रांना सांभाळण्यासाठी उपाय योजना कराव्यात अशी शेतकरी शासनाला विनंती करत आहेत. तर शेतकऱ्यांनी असे गोरे मोकाट सोडून देण्याऐवजी वन विभागाशी संपर्क केला तर या गोय्रांचा भक्ष्य म्हणून पिंजरामध्ये ठेवण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो बिबट्याला पकडण्यासाठी डार्ट चे इंजेक्शन देण्यासाठी भक्ष म्हणून या गोय्रांचा उपयोग केला जाऊ शकतो असं वनविभागाकडून स्पष्ट केलं गेलंय... त्यामुळे या पुढच्या काळात शासन गोहत्या कायद्यासंदर्भात आणि या मोकाट गोऱ्यांसंदर्भात काय निर्णय घेत आणि काय उपाययोजना करत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowNov 13, 2025 10:12:161
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 13, 2025 09:33:221
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 13, 2025 09:22:481
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 13, 2025 09:18:581
Report
UPUmesh Parab
FollowNov 13, 2025 09:00:591
Report
UPUmesh Parab
FollowNov 13, 2025 08:40:191
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 13, 2025 08:39:481
Report
KJKunal Jamdade
FollowNov 13, 2025 08:20:261
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 13, 2025 08:20:151
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 13, 2025 08:19:111
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 13, 2025 08:18:581
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 13, 2025 08:06:312
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 13, 2025 07:47:361
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 13, 2025 07:46:101
Report