Back
अकोला में किसान ने कपास वजन में धोखाधड़ी पकड़ी, व्यापारी मौके से फरार
JJJAYESH JAGAD
Mar 10, 2026 11:10:10
Akola, Maharashtra
शेतकरी बंधूंनो, कापूस विक्री करताना सावधगिरी बाळगा, कारण काही व्यापारी मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात अशाच प्रकारे कापूस खरेदीत फसवणूक करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आसेगाव येथे कापूस खरेदी व्यवहारात एका शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कापूस खरेदीदरम्यान मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला.
कापूस खरेदी करणाऱ्या एका व्यापाऱ्याने ट्रकमध्ये कापूस भरण्यापूर्वी ट्रकच्या खाली वाळू भरलेली पोती ठेवून ट्रकचे वजन केले. उदाहरणार्थ ९०० किलो वजनाच्या ट्रकमध्ये १०० किलो वजनाची मातीची पिशवी ठेवून वजन केल्यास काट्यावर १००० किलोची पावती घेतली जाते. त्यानंतर ती माती काढून टाकली जाते आणि शेतकऱ्यांचा कापूस भरून पुन्हा वजन केले जाते. त्यामुळे आधीच्या वजनातील फरकामुळे व्यापाऱ्याला जास्त कापूस मिळतो आणि शेतकऱ्यांची फसवणूक होते.
मात्र शेतकरी संदीप धोंडे आणि गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची पाहणी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गावकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याला जाब विचारला. मात्र परिस्थिती पाहून व्यापारी आणि ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यापाऱ्याने इतर शेतकऱ्यांकडूनही अशा प्रकारे कापूस खरेदी केला आहे का याची माहिती घ्यावी आणि फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच संबंधित व्यापारी बाजार समितीत परवानाधारक असल्यास त्याचा परवाना रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान या घटनेमुळे कापूस विक्री करताना शेतकऱ्यांनी वजन काट्याची आणि वाहनाची नीट तपासणी करून व्यवहार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowMar 10, 2026 12:00:460
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 10, 2026 11:55:590
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 10, 2026 11:45:250
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 10, 2026 11:37:110
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 10, 2026 11:21:560
Report
KJKunal Jamdade
FollowMar 10, 2026 11:09:380
Report
KJKunal Jamdade
FollowMar 10, 2026 11:08:450
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 10, 2026 10:51:420
Report
SNSWATI NAIK
FollowMar 10, 2026 10:46:300
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 10, 2026 10:35:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 10, 2026 10:30:540
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 10, 2026 10:21:070
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 10, 2026 10:18:210
Report