Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

टमाटर की कीमत गिरने से किसानों को संकट, सड़क पर टमाटर फेंक कर विरोध

SMSATISH MOHITE
Mar 10, 2026 12:35:10
Nanded, Maharashtra
Anchor - टोमॅटोला किरकोळ बाजारात केवळ पाच ते दहा रुपये किलो भाव मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. टोमॅटो लागवडीचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यानी टोमॅटो रस्त्यावर फेकून त्याचा लाल चिखल केला. शेतकऱ्याचा टोमॅटो कोणी फुकटही घेऊन जात नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. किरकोळ बाजारात पाच ते दहा रुपये किलो टोमॅटो विक्री होत आहे. टोमॅटो तोडणीचा खर्च देखील परवडत नसल्याने आणि व्यापारी देखील टोमॅटो घेऊन जात नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लहान येथे टोमॅटो रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी लाल चिखल केला. सरकारने टोमॅटोसह शेतीमालाला भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Mar 10, 2026 14:16:08
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात सुरू असलेल्या पर्यावरण अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाचा सहावा दिवस, आज शहरातील विविध महिला संघटनांनी मागण्यांच्या समर्थनार्थ थाळी वाजवा आंदोलन, रुग्णालयात दाखल असलेल्या बंडू धोत्रे यांनी आपण उपोषण सोडले नसून पुन्हा एकदा उपोषण मंडपात परत येणार असल्याचे सुचित चंद्रपुरात सुरू असलेल्या पर्यावरण अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाचा आज सहावा दिवस आहे. पोलिसांनी मध्यरात्री बळजबरीने धोत्रे यांना वाहनात बसवून रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र उपोषण स्थळी साखळी पद्धतीने आंदोलन सुरू आहे. आज शहरातील विविध महिला संघटनांनी मागण्यांच्या समर्थनार्थ थाळी वाजवा आंदोलन केले. रुग्णालयात दाखल असलेल्या बंडू धोत्रे यांनी आपण उपोषण सोडले नसून पुन्हा एकदा उपोषण मंडपात परत येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. लोहारडोंगरी खाण रद्द करा यासह 17 प्रमुख मागण्यांसाठी आपला लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 10, 2026 14:00:51
Vasai-Virar, Maharashtra:वसई अंबाडी रेल्वे उड्डाणपुलावर भर राहदारीत टेम्पो नादुरुस्त वसई पुर्व पश्चिम अंबाडी रेल्वे उड्डाण पुलावर मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास एक आयशर टेम्पो भर रस्त्यात बिघाड झाल्याने जागीच थांबल्याची घटना घडली. ऐन राहदاريच्या सुमारास पूर्वेकडून पश्चिमेकडे उड्डाणपुलावरुन येत असताना आयशर टेम्पोच्या सायलेंसरमधून मोठ्या प्रमाणात पांढ-या रंगाचा धुरी येऊ लागल्याने ड्रायव्हरने टेम्पो जागीच थांबवला. मात्र टेम्पो काही केल्या बंद करायचा प्रयत्न करुनही तो बंद होत नव्हता. उड्डाणपुलावर मोठा पांढरा धुर जमा झाल्याने उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. या वेळी ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत टेम्पोचे डोनेट खोलून बॅटरीच्या वायर तोंडुन काढल्यानंतरच टेम्पोची घरघर बंद झाली आणी धुरी येणे बंद झाले. या घटनेनंतर काही काळ लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. वाहनाला आग लागल्यामुळे काही जणांनी अग्निशमन दलाच्या आपत्कालीन नंबरवर देखील काॅल करायचा प्रयत्न केला. काही टेम्पोला आग लागली नसल्याचे लक्षात येताच नागरीकांनी सुटकेचा श्वास घेतला.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 10, 2026 13:46:30
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 10, 2026 13:34:50
Chandrapur, Maharashtra:अन्नत्याग सत्याग्रहाला बसलेल्या पर्यावरण अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसने चंद्रपुरात काढली बाईक रॅली, बाईक रॅलीच्या माध्यमातून लोहारडोंगरी लोहखनिज प्रकल्पाला रद्द करण्यासाठी करण्यात आली जनजागृती, सेव लोहारडोंगरी- सेव ताडोबा- सेव चंद्रपूर या मोहिमेत काँग्रेसची प्रत्यक्ष उडी अन्न त्याग सत्याग्रहाच्या पाचव्या दिवशी पोलीस प्रशासनाने या आंदोलनात हस्तक्षेप करत बंडू धोत्रे यांना उपोषण स्थळावरून बळजबरीने वाहनात बसवत रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र तरीही आंदोलन साखळी पद्धतीने सुरू आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या बाईक रॅलीच्या माध्यमातून लोहारडोंगरी लोहखनिज प्रकल्पाला रद्द करण्यासाठी करण्यात जनजागृती करण्यात आली. सेव लोहारडोंगरी- सेव ताडोबा- सेव चंद्रपूर या मोहिमेत काँग्रेसने प्रत्यक्ष उडी घेतल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 10, 2026 13:21:09
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरात भाजप नेते बोराळकरांना साडेपाच लाखांचा गंडा ब्लिस्टर पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने कंपनीची फसवणूक गुजरातमधील क्रिष्णम फार्मा मशिनरी कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील के-११७ येथे शिरीष बोराळकर यांची यूनिव्हरल प्रोफिलॅक्टीक प्रा. लि. ही कंपनी असून येथे विविध कंपन्यांचे कंडोम तयार करून निर्यात केली जाते. कंपनीसाठी कंडोम पॅकिंगसाठी ब्लिस्टर पॅकिंग मशीन खरेदी करण्यासाठी अहमदाबाद येथील क्रिष्णम फार्मा मशिनरी कंपनीशी संपर्क साधण्यात आला होता. कंपनीचे संचालक आदित्य पांचाल व नितीन पांचाल यांनी २०२५ मध्ये कंपनीत येऊन मशीनबाबत माहिती देत व्यवहार ठरवला. त्यानुसार पूर्णपणे स्वयंचलित केपीएम-एएलव्ही ब्लिस्टर पॅकिंग मशीन आणि डीफॉइलिंग मशीनसाठी ११ लाख ७५ हजार रुपयांची ऑर्डर देण्यात आली. यासाठी अॅडव्हान्स म्हणून रक्कमही देण्यात आली होती. मात्र ४५ दिवसांत मशीन देण्याचे आश्वासन देऊनही मशीन न देता सुमारे साडेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुजरात येथील क्रिष्णम फार्मा मशिनरी कंपनीचे संचालक आदित्य पांचाल आणि नितीन पांचाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 10, 2026 13:18:40
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- मार्च महिन्यात वाढलेल्या तापमानाचा पहिला परिणाम, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील धोपटाळा ओपन कास्ट कोळसा खाणीत लागली आग, लगतच्या सास्ती गावातील ग्रामस्थ संतप्त कोलबेंच व कोलस्टॉकला लागलेल्या आगीमुळे प्रदूषण वाढले अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात असलेल्या सरकारी कोळसा कंपनी वेकोली च्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत धोपटाळा ओपन कास्ट कोळसा खाण परिसरात कोलबेंच व कोलस्टॉकला आग लागली आहे. आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे सास्तीगावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून संपूर्ण गाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. दोन दिवसांपासून येथे धूर व आगीचे प्रकार घडत असताना स्थानिक वेकोली प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सास्तीगाववासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी संतप्त होत चक्काजाम आंदोलन केले. या प्रदूषणामुळे सास्तीगावासह परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ, तसेच इतर आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. गावावर सतत धुराचे सावट असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने आग विझवून प्रदूषणावर नियंत्रण मिळवावे, तसेच गावकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे。
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 10, 2026 13:16:25
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 10, 2026 13:16:14
Malegaon, Maharashtra:मालेगाव स्थायी समिती सभापतीपदी एजाज बेग यांची बिनविरोध निवड.. सत्ता स्थापनेत बेग यांनी सेक्युलर फ्रंटला दिली साथ.. सर्वांना सोबत घेऊन सर्वागीण विकास करणार नूतन सभापती बेग यांचे आश्वासन... नाशिकच्या मालेगाव महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे एजाज बेग यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकाअधिक तसेच पीठासन अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभापती निवडीसाठी स्थायी समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. सभापती पदासाठी बेग यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. मालेगाव महापालिकलकेत काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडवून आले होते. सत्ता स्थापनेत सेक्युअर फ्रंटला पाठींबा दिला होता. त्यामुळे बेग यांना स्थायी समिती सभापती संधी देण्यात आली. सर्वांना सोबत घेऊन मालेगाव शहराच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना नूतन सभापती एजाज बेग यांनी बोलून दाखविली. यावेळी आयुक्त रवींद्र जाधव, नगरसचिव साजिद हसन अब्बास आदी उपस्थित होते. Byte:- एजाज बेग, स्थायी समिती सभापती..
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 10, 2026 12:00:46
Nasik, Maharashtra:लवासा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले आहे. नाशिकचे विधीज्ञ नानासाहेब जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेत शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे, त्यांच्या पती सदानंद सुळे आणि Hindustan Construction Company के अजित गुलाचंद यांच्यावर सीबीआय चौकशीची मागणी आहे. प्रकल्पासाठी हजारो कोटींची मुद्रांक शुल्क माफी, 141.15 हेक्टर शासकीय जमीन कमी दरात देणे आणि 5,000 एकर जमीन खरेदीतील कथित अनियमितता हे आरोप आहेत. उच्च न्यायालयाने याचिका उशिरा दाखल झाल्याचे कारण देत फेटाळली होती. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांचे नाव याचिकेतून वगळण्यात आले आहे. नानासाहेब जाधव याचिकारता
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 10, 2026 11:55:59
Dhule, Maharashtra:इराण-अमेरिका तणावाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे..... युद्धामुळे केळीच्या दरात मोठी घसरण गेल्या आठवड्याभरात २٢٠० वरून १२०० वर केळीचे दर आलेत...... नंदुरबार जिल्ह्यात केळी उत्पादक अडचणीत; बाजारभाव घसरल्याने नुकसानाची भीती.....उत्पादन खर्च वाढला, पण दर घसरले केळी उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले..... इराण-अमेरिका तणावाच्या परिणामांचा फटका आता नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही होत असून केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी बाजारात सुमारे २२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असताना सध्या तो घसरून जवळपास १२०० रुपयांपर्यंत आला आहे. दरातील या मोठ्या घसरणीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 10, 2026 11:45:25
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 10, 2026 11:37:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग स्लग - मिरज पंचायत समिती सभापती निवडीत भाजपाला धक्का,महाविकास आघाडीने मारली बाजी.. सांगली जिल्हा परिषदेच्या तोंडावर पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपाला मिरज पंचायत समिती मध्ये धक्का देत महाविकास आघाडी सोबत राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे.केवळ 3 जागा असणाऱ्या काँग्रेसने पंचायत समिती सभापती पदी बाजी मारली आहे.तर शिवसेना शिंदे गटाला उपसभापती पद मिळाले आहे.मिरज पंचायत समितीच्या 22 पैकी दहा जागावर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते,त्यामुळे भाजपाचा मिरज पंचायत समितीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सोबत सभापती होईल आणि सत्ता येईल, अशी दाट शक्यता असताना,अत्यंत नाट्यमय्यारित्या घडलेल्या घडामोडीनंतर महाविकास आघाडीने राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आहे,सभापती म्हणून काँग्रेसची तन्वी कमलेकर,ही 21 वर्षीय तरुणी सभापतीपदी निवडून आली आहे,तर शिवसेना शिंदे गटाच्या ललिता शेजुळ या उपसभापती म्हणून विजयी झाल्या आहेत. खासदार विशाल पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन भाजपाला सत्तेपासून रोखठ मिरज पंचायत समितीवर सत्ता मिळवली आहे. बाईट - विशाल पाटील - खासदार बाईट - तन्वी कमलेकर - नुतून सभापती- मिरज पंचायत समिती बाईट --अजित घोरपडे -माजी मंत्री,राष्ट्रवादी अजित पवार
0
comment0
Report
Advertisement
Back to top