Back
भाजपा ने ठाकरे गट के 3 सदस्य पलटाए, छत्रपती संभाजीनगर पंचायत समिति चुनाव में सत्ता
NMNITESH MAHAJAN
Mar 10, 2026 11:21:56
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर | पंचायत समिती सभापती निवडणूकीत भाजप ,शिवसेना ठाकरे पक्षात राडा (पॅकेज) फोडले सदस्य,पकडली कॉलर,झाला राडा! भाजपने ठाकरे सेनेचे 3 पंचायत समिती सदस्य पळवल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. दानवेंनी पकडली भाजपच्या सभापती पदाच्या उमेदवाराची कॉलर,झाला राडा. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत मतदान होण्याआधी भाजपने ठाकरे सेनेचे 3 सदस्य पळवल्याचा आरोप ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी केलाय. निवडणुकीदरम्यान दानवेची मतदान केंद्राजवळ एन्ट्री झाली आणि भाजप शिवसेनेत राडा झाला. नेमकं झालंय काय या निवडणुकीत पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. छत्रपती पंचायत समितीत एकूण 20 सदस्य आहेत. सभापती पदासाठी 11 सदस्यांची गरज लागणार होती. यात भाजपकडे स्वतःचे भाजप 6 आणि 1 पुरस्कृत असे एकूण 7 सदस्य होते. एकनाथ शिंदे शिवसेनेचे 6, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 4, काँग्रेसचा 1, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा 1 तर प्रहारचा 1 सदस्य निवडून आला होता. शिवसेना शिंदे पक्षाचे 3 सदस्य भाजपसोबत असल्याची चर्चा होती. तर भाजपने ठाकरे गटाचे 3 सदस्य पळवून नेल्याचा आरोप दानवेंनी केला. ठाकरेच्या एकूण 4 पैकी 3 सदस्य भाजपने पळून नेल्याचा आरोप दानवेंनी केल्यानं ठाकरेकडे केवळ एकच सदस्य उरला. त्यामुळे दानवेंनी थेट भाजपच्या सभापती उमेदवाराची कॉलरच पकडली. या राड्यानंतर सभापती पदासाठी मतदान पार पडलं. या मतदानावेळी ठाकरे सेनेचे तीन सदस्य गैरहजर राहिले. तर शिंदे शिवसेनेतही एक खासदार संदीपान भुमरे यांचा तर दुसरा पालकमंत्री संजय शिरसाठ यांचा. त्यामुळे कल्याण गायकवाड (भाजप उमेदवार) एकूण मतदान 09 (भाजप 7+शिरसाट समर्थक शिवसेना सदस्य 2) अनुराग शिंदे (राष्ट्रवादी अजित पवार) मतदान 08 (ठाकरे गट 1+काँग्रेस 1+प्रहार 1+भुमरे समर्थक शिवसेना 4 आणि स्वतः 1). उपसभापती निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेत दोन गट झाले आणि शिवसेना शिंदे पक्षाचे दोन उमेदवार रिंगणात उतरले: बाळासाहेब गाडे, शिंदेसेना (सिरसाट समर्थक) 10; बाबासाहेब राठोड, शिंदेसेना (भुमरे समर्थक) 7 मत मिळाली. त्यामुळे या अटी तटीच्या निवडणूकीत भाजपने बाजी मारली. कल्याण गायकवाड, नवनिर्वाचित सभापती, पंचायत समिती, छत्रपती संभाजीनगर. अनुराधा चव्हाण, आमदार, फुलंब्री, भाजपा. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात वेगवेगळ्या संस्थांमधील सत्ता स्थापनेवरून चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळतोय. तर शिवसेना शिंदे पक्षातही अंतर्गत कलह दिसून येतोय. त्याचाच फायदा आजच्या निवडणूकीत भाजपने घेतल्याचं समोर आलं पण या निमित्ताने राडा देखील पाहायला मिळाला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowMar 10, 2026 12:37:210
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 10, 2026 12:35:100
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 10, 2026 12:00:460
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 10, 2026 11:55:590
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 10, 2026 11:45:250
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 10, 2026 11:37:110
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 10, 2026 11:10:100
Report
KJKunal Jamdade
FollowMar 10, 2026 11:09:380
Report
KJKunal Jamdade
FollowMar 10, 2026 11:08:450
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 10, 2026 10:51:420
Report
SNSWATI NAIK
FollowMar 10, 2026 10:46:300
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 10, 2026 10:35:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 10, 2026 10:30:540
Report