Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413133

दत्तात्रय भरणे का फुगड़ी अंदाज़ इंदापुर में लोगों का ध्यान खींचा

JMJAVED MULANI
Nov 08, 2025 17:01:49
Baramati, Maharashtra
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे फुगडीत रंगले — इंदापूरकरांचे लक्ष वेधले... इंदापूर शहरात झालेल्या श्री गजानन विजय ग्रंथ पारायण मिरवणुकीत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. मिरवणुकीदरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासोबत पारंपरिक फुगडी खेळत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान नगरपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा रंगत असताना, या मिरवणुकीत आजी-माजी नगरसेवक आणि अनेक इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Nov 08, 2025 17:46:38
Chendhare, Alibag, Maharashtra:काशिद समुद्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू. एकाला वाचवण्यात यश. बुडालेले विद्यार्थी अकोला जिल्ह्यातील. मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. आयुष रामटेके आणि राम खुटे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर आयुष बोबडे याला वाचवण्यात यश आले आहे. अकोला येथील ३ शिक्षक आणि १२ विद्यार्थी रायगड जिल्ह्यात फिरायला आले होते. आज संध्याकाळी ते काशिद इथं पोहोचले. यातील तिघेजण पहायला उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. यातील एकाला वाचवण्यात यश आलं आहे तर दोघांचे मृतदेह हाती लागले असून ते शव विच्छेदनासाठी बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहेत. पर्यटन हंगामाच्या सुरुवातीच ही दुर्दैवी घटना घडली आहे.
4
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 08, 2025 16:49:27
Pandharpur, Maharashtra:सातारा गॅझेटियर मध्ये नोंदी हैदराबाद गॅझेटियर पेक्षा स्पष्ट आहेत. आकडेवारी आणि आडनावे याबाबत सुद्धा सुस्पष्टता आहे. त्यामुळे सातारा गॅझेटियर माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी नोंदी असणाऱ्यांना लवकर न्याय मिळेल असे संकेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले आहेत सातारा गॅझेटिअर बाबत लवकरच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल त्यासाठी करावयाचे शब्दांकन मांडणी तयार होईल आणि याबाबतचा मार्ग मोकळा होईल हैदराबाद गॅझेटीएरला न्यायालयात तीन वेळा आव्हान देण्यात आलं पण ते फेटाळून लावण्यात आलं नाही कारण या बाबींचा आधीच विचार करून हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला गेला. हे सर्व कायदेशीर प्रक्रिया आहे त्यामुळे वेळ लागतो गडबड करून आपण शासन आदेश काढला आणि जर तो न्यायालयात टिकला नाही त्याला अर्थ राहणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे न्यायालयात टिकणार आरक्षण मराठा बांधवांना देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे..असे मत भोसले यांनी व्यक्त केले
2
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 08, 2025 16:48:07
5
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 08, 2025 15:49:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उद्धव ठाकरे यांच्या 4 दिवसांच्या मराठवाडा दौरा ची आज संभाजी नगरात सांगता झाली... शेतकऱ्यां सोबत उद्धव ठाकरे यांनी संवाद साधत राज्य सरकार वर टीका केली, संभाजी नगरात त्यांनी कार्यकर्त्यांसोबत सांगता मेळावा घेत आगामी निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला.... उद्धव ठाकरे पॉइंटर्स 4 दिवस फिरतोय, म्हणून बसून बोलतोय, पाठ नाही दुखली पाठीशी तुम्ही आहात मला तुम्ही वचन दिले आहे महापालिका जिंकणार मात्र यासाठी आत्मविश्वास पाहिजे, मांडणी चांगली पाहिजे राजकारण म्हटले म्हणजे येणे जाणे सुरू असते, जिंकण्यासाठी थोड्याफार गोष्टी इकडे तिकडे होतात मात्र आता आयातीवर लक्ष देऊ नका, आणि निर्यात थांबवा, नवी पालवी फुटू द्या... सोडलेली पान झडली पाहिजे ते झडले की नवे कोंब फुटतात अमित शाह राज्यात आल्यावर उद्वव ठाकरे नाव घेतल्या शिवाय घास गळ्यात उतरत नाही ईव्हीएम घोटाळा केलाय आता दुबार मतदार नोंदणीची भांडी फुटताय... एक घरात 100 नाव आहेत हे शक्य आहे कारण एक घरात 100 कौरव होते ना त्या ब्राझील मॉडेल चे नाव 22 वेळ ही भाजप आहे मी ब्राझील जनता पार्टी आहे आजूनही फक्त आयात करतात, लुटून खातात आता जमिनी लुटणे सुरुय, भ्रष्टाचार सुरुय, कंत्राटदार मार्फत पैसे खाताय, पुण्यात गुंडगिरी वाढली आहे, त्यात भाजप ने संभ्रम घोटाळा बुद्धी भ्रष्ट घोटाळा केलाय, हेच हिंदुत्ववादी आल्याचं दाखवतात, एक बाजूला भारतमातेच्या लूट करतात हे वंदे मातरम म्हणू शकतात का ज्याने अतिरेकी पाठवले त्या देशा सोबत अमित शाह च्या मुलांसाठी क्रिकेट खेळले आपल्या राज्यात आपत्ती आणि आपले मुख्यमंत्री बिहार मध्ये आहे उद्या दाऊद जरी आला तरी त्यावर गोमूत्र शिंपडून पवित्र करतील भाजप हिंदुत्ववादी म्हणते ना तर झेंड्यातील हिरवा रंग काढून दाखवा, एक भगवा आहे म्हणून त्यांनी आपला पक्ष फोडला त्यांच्या अपप्रचाराचा बळी पडू नका मुंबई महापालिका त्यांनी लुटली, संभाजी नगरात काही ठेवले का माहिती नाही ठाण्यात बाहेर बोर्ड शिवसेना प्रमुख आपला दवाखाना बोर्ड आणि आत साड्यांचे दुकान अरे इतका भ्रष्टाचार करू नका महाराष्ट्र चा मुख्यमंत्री नंबर सध्या 10 वा आहे, लाज वाटते, हे फक्त भ्रष्टाचार मध्ये नंबर 1 आहे आता मी पण ज्येष्ठ च्या यादीत आलोय, आपण आता नव्या रक्ताला वाव देऊ
6
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 08, 2025 15:32:23
Nagpur, Maharashtra: برنامجाची लिंक असाइनमेंटच्या व्हॉट्सअप वर पाठवली आहे नागपूर - संस्कार भारतीच्या अखिल भारतीय वार्षिक साधारण सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हजेरी लावली होती.. रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात महर्षी व्यास सभागृहात ही सभा पार पडली... यावेळी देशभरातून संस्कार भारतीचे अनेक पदाधिकारी या दोन दिवसीय सभेत सहभागी झाले होते... - माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. ही सभा नावाने ‘साधारण’ असली, तरी येथे उपस्थित असलेले सर्व लोक ‘असाधारण’ आहेत. कारण ते सर्व संस्कार भारतीच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची अखंड सेवा करत आहेत. *भाषणातील मुद्दे....* - संस्कार भारतीच्या अखिल भारतीय कार्यक्रमात ते प्रथमच आलो आहेत.... हे अगदी खरे आहे. मी ही संस्कार भारतीशी अनेक वर्षांपासून जोडलेलो आहे, पण अशा पद्धतीचा अखिल भारतीय कार्यक्रम, ज्यात देशभरातील संस्कार भारतीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत, यात मी प्रथमच सहभागी झालो आहे. - आज इथे एक स्वयंसेवक म्हणून आलोय - ही सभा फक्त संघटनेची सर्वसाधारण सभा बैठक नाही; यात तीन महत्त्वाच्या घटकांचा संगम आहे... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी, भारताच्या संविधानाचा अमृत महोत्सव आणि संस्कार भारतीचा वार्षिक सोहळा आहे...* - काहींना प्रश्न पडेल की या तीन गोष्टींना एकत्र आणण्यामागचे कारण काय? संस्कार भारती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय संविधानने दिलेला विचार यांना पृथक करता येऊ शकत नाही... वेगळे करता येऊ शकत नाही . - भारतीय संस्कृती जीवनपद्धती सर्वात जुनी पध्दतीने आहे...आपण ज्यांना जुनी संस्कृती म्हणतो त्यांच वय 3 ते 4 हजार वर्षापेक्षा जास्त नसून ती आता नष्ट झालेली आहे - सातत्याने होणारं आक्रमणांनंतर पण आजही हजारो वर्षांचा अखंड प्रवाह जर कुठे टिकून आहे, तर तो भारतीय संस्कृतीचा आहे. - आपली सभ्यता केवळ चार-पाच हजार वर्षांची नाही, तर त्यापेक्षाही प्राचीन आहे. तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला या विद्यापीٹھांतून आपली ज्ञानपरंपरा जगभर पोहोचली. आपल्या मंदिरांमध्ये स्थापत्यकलाच नव्हे सर्व कलांचा समन्वय दिसतो. - इतक्या आक्रमणांनंतरही आपली संस्कृती टिकून राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘देव, देश आणि धर्म’ यासाठी लोकांना संघटित करून त्यांच्यात आत्मभान जागृती करत संस्कृती पुनर्स्थापित केले. - मात्र, इंग्रजांच्या काळात पुन्हा एकदा आपण गुलामीत गेलो. तेव्हा डॉ. हेडगेवारजींना जाणवलं की “आपल्या राष्ट्रीय आणि सांस्कृतिक मूल्यांची रुजवल्याशिवाय, आत्मभान असलेली पिढी घडणार नाही, तर राष्ट्र म्हणून आपण उभे राहू शकत नाही.” आणि म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली.मानसिक गुलामीतून बाहेर पडल्यावर आपण राष्ट्र म्हणून उभे राहू - प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी हाच विचार पुढे नेला “विकासही आणि विरासतही”. फक्त विकास करून चालत नाही; जोपर्यंत आपली सांस्कृतिक विरासत ओळखत नाही, तोपर्यंत राष्ट्र प्रगत होऊ शकत नाही. आणि ही विरासत भारतीय संविधानात प्रतिबिंबित होते. - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले आपले संविधान हे भारतीय मूल्यांवर आधारित आहे. काही लोक म्हणतात की, हे संविधान जगातील विविध देशांचे वाचून करून तयार झाले.. पण हे अधुरे ज्ञान आहे. हमारे संविधानातील प्रत्येक मूल्य समता, swatntra, bhandhuta, हे आपल्या भारतीय परंपरेतून, भगवान बुद्धांच्या आणि सनातन संस्कृतीच्या विचारांतून आले आहे. - बाबासाहेब आंबेडकर यानी संस्कृतीतील शाश्वत मूल्य संविधानच्या माध्यमातून प्रस्थापित केले....आपल्या समाजात वेगवेगळ्या काळात भेदभाव झाला, त्यामुळे विखंडीत होऊन गुलामीत गेलो.. या सर्वाला समाप्त करत जे शास्वत मूल्य आहे जे सनातन पण आहे घेऊन संविधानाची रचना झाली.. संविधानाच्या माध्यमातून मूळ प्रतीतील प्रत्येक अध्यायाच्या चित्रांमधूनही हे दिसते...त्यात रामायण, महाभारत आहे.. -- भारताच्या आजूबाजूच्या देशात लोकतंत्र टिकू शकल नाही...भारतीय संविधानामुळे भारतात लोकशाही टिकून आहे.. याच मूल्यावर मजबूत संविधान है. - *आजच्या काळात आपली स्पर्धा व्यक्तीशी नाही, तर यंत्रांशी आहे. गुगलवर सगळं मिळायच.. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) या युगात माहिती सहज उपलब्ध आहे. 45 सेकंदात प्रॉम्प्ट टाकून देवेंद्र फडणवीस यांच्यावर कविता येईल...आता स्पर्धा व्यक्ती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेत आहे.. पण यंत्राला संवेदना नसतात. माणूस मात्र ‘संवेदनशील’ अभिव्यक्ती असते, आणि हीच खरी मानवतेची ओळख आहे. - जोपर्यंत व्यक्तीमध्ये मानवी संवेदना जिवंत आहे तोपर्यंत ह्या संसार जिवंत राहील ज्या दिवशी या संवेदना समाप्त होतील माणूसही हा मशीन मध्ये परिवर्तन होईल. माणसाने जी कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केली, त्याचा पलीकडे गेली जग वाचेल - विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. AI ही एक घोड्यासारखी शक्ती आहे. जर आपण त्यावर नियंत्रण ठेवले, तर ती आपल्याला जलदगतीने पुढे नेईल... पण दिशा हरवली, तर ती धोकादायक ठरू शकते. - आज अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर डीपफेक, चुकीची माहिती आणि संस्कृतीविरोधी प्रवाह वाढत आहेत. या सर्वांचा मुकाबला करताना संस्कार भारतीसारख्या संस्थांनी नवे तंत्रज्ञान स्वीकारून त्याला भारतीय संस्कारांची दिशा द्यावी लागेल. - भारतीय संस्कृतीची ताकद म्हणजे ‘नवीनतेतून प्राचीनतेचे पुनरुज्जीवन’. म्हणून हे नवतंत्रज्ञान स्वीकारत, सकारात्मकतेकडे वळवत भारतीय मूल्यांची जोपासना करावी लागणार आहे.... हेच ताकद संस्कार भारतीचे खरे कार्य आहे.
7
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 08, 2025 15:16:47
Kalyan, Maharashtra:महापालिका निवडणूकीपूर्वी भाजप देणार उद्धव ठाकरे यांना झटका... ठाकरे गटाचे जिल्हाअध्यक्ष आणि केडीएमसीचे माजी सभापती दीपеш म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करणार... उद्या डोंबिवली जिमखाना येथे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक आणि माजी केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश.. दीपेश म्हात्रे, त्याचे भाऊ जयेश म्हात्रे सह पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उद्या प्रवेश करणार दीपेश म्हात्रे हे सर्वात पहिले शिवसेनेत होते, नंतर शिंदे गट आणि मग ठाकरे गटात केले... दिपेश म्हात्रे यांनी डोंबिवली विधानसभेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.... तर गेले वर्षभरापासून विविध विषय हाताळून आणि आंदोलन करून विरोधी पक्षाची भूमिका मांडत होते... दीपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर ठाकरे गटाला मोठा झटका दीपेश्य म्हात्रे याचे वडील पुडलिक म्हात्रे हे केडीएमसी मध्ये महापौर राहून गेले आहेत.
12
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 08, 2025 14:02:17
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात ऊसदराच्या प्रश्नावर आज आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दत्त साखर कारखान्याबाहेर तीव्र आंदोलन छेडले. आंदोलकांनी ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या अडविल्याने कारखाना कामगार और शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की और राडा झाला. या गोंधळात पोलिस और आंदोलकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी कारवाई दरम्यान संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे और माजी आमदार उल्हास पाटील यांना पोलिसांनी अडवल्याने परिस्थिती अधिक तणावग्रस्त बनली. सध्या घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे.
7
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 08, 2025 13:25:33
6
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 08, 2025 13:23:57
Jalna, Maharashtra:बीड ब्रेक - परळीतील शासकीय विश्रामगृहात आरोपी आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा कालच्या पत्रकार परिषदेतून दावा, बैठक झाल्याची कबुली देतानाचा व्हिडिओ आला समोर. - आरोपी दादा गरुड हा कबुली देताना तेथ आयबीचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती. AC- मनोज जरांगे पाटील यांनी माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी रचला याबाबत पत्रकार परिषदेत खुलासा केला. या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे आणि आरोपींची परळीतील शासकीय विश्रामगृहात बराच वेळ बैठक झाल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला होता. याबतचा कबुली देतानाचा आरोपी दादा गरुड याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ही कबुली देतावेळी त्या ठिकाणी आयबीचे (INTELLIGENCE BURO) अधिकारी उपस्थित असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. यामध्ये दादा गरुड सांगत आहे परळीतील शासकीय विश्रामगृहात परळीतील अनेक रथी महारथी बसलेले होते मात्र तेथे अमोल खुणे आणि कांचन साळवे गेल्यानंतर त्यांच्यासोबत धनंजय मुंडे 25 मिनिटे दुसऱ्या खोलीत बसले होते.
8
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 08, 2025 13:23:45
Pune, Maharashtra:अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील नान्नज परिसरात 24 ऑगस्ट रोजी वैयक्तिक वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली होती. या प्रकरणात कुख्यात गुंड निलेश गायवळवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी म्हंटले आहे. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाला होता; त्यामध्ये सुनील साळवे यांचा मुलगा अनुप साळवे आणि इतर 6 जण गंभीर जखमी झाले होते. अनुप साळवे आपल्या मित्रांसह नान्नज येथे गेला असता जुन्या वादातून आरोपींनी अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. या प्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अटक केलेल्या 9 आरोपींच्या जबाबांवरून निलेश गायवळ याचाही या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यालाही या प्रकरणात भविष्यात अटक करण्यात येईल असं पोलीस अधीक्षक घार्गे यांनी म्हंटले आहे.
8
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 08, 2025 13:23:17
Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग: मनोज जरांगे यांचा नार्को टेस्टच्या परवानगीकरिता एसपींकडे अर्ज. जरांगे यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षकांना दिले निवेदन. माझ्यासह धनंजय मुंडे यांच्यासह सगळ्यांची नार्को टेस्ट करावी. अँकर- मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी नार्को टेस्टला परवानगी मिळावी असा अर्ज जालना पोलीस अधीक्षकांकडे सादर केलाय.. जरांगे यांचा घातपात घडवून आणणारा मुख्यसूत्रधार हा धनंजय मुंडे असल्याचं जरांगेंनी म्हंटलं होतं. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी केली होती. त्यासाठी मनोज जरांगे तयार असून त्यांच्यावतीनं नार्को टेस्टला परवानगी मिळावी असा अर्ज शिष्टमंडळावे जालना पोलीस अधीक्षकांकडे दिला आहे... माझ्यासह धनंजय मुंडे आणि कटात सामील असणा-या दहा ते बारा जणांचीही नार्को टेस्ट करावी असं जरांग यांनी या अर्जात म्हंटलं आहे..
5
comment0
Report
Advertisement
Back to top