Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213
जालना में नार्को टेस्ट की मांग: मनोज जरांगे का आवेदन, 10–12 लोग शामिल
NMNITESH MAHAJAN
Nov 08, 2025 13:23:17
Jalna, Maharashtra
जालना ब्रेकिंग: मनोज जरांगे यांचा नार्को टेस्टच्या परवानगीकरिता एसपींकडे अर्ज. जरांगे यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षकांना दिले निवेदन. माझ्यासह धनंजय मुंडे यांच्यासह सगळ्यांची नार्को टेस्ट करावी. अँकर- मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी नार्को टेस्टला परवानगी मिळावी असा अर्ज जालना पोलीस अधीक्षकांकडे सादर केलाय.. जरांगे यांचा घातपात घडवून आणणारा मुख्यसूत्रधार हा धनंजय मुंडे असल्याचं जरांगेंनी म्हंटलं होतं. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी केली होती. त्यासाठी मनोज जरांगे तयार असून त्यांच्यावतीनं नार्को टेस्टला परवानगी मिळावी असा अर्ज शिष्टमंडळावे जालना पोलीस अधीक्षकांकडे दिला आहे... माझ्यासह धनंजय मुंडे आणि कटात सामील असणा-या दहा ते बारा जणांचीही नार्को टेस्ट करावी असं जरांग यांनी या अर्जात म्हंटलं आहे..
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Nov 08, 2025 14:02:17
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात ऊसदराच्या प्रश्नावर आज आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दत्त साखर कारखान्याबाहेर तीव्र आंदोलन छेडले. आंदोलकांनी ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या अडविल्याने कारखाना कामगार और शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की और राडा झाला. या गोंधळात पोलिस और आंदोलकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी कारवाई दरम्यान संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे और माजी आमदार उल्हास पाटील यांना पोलिसांनी अडवल्याने परिस्थिती अधिक तणावग्रस्त बनली. सध्या घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 08, 2025 13:25:33
1
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 08, 2025 13:23:57
Jalna, Maharashtra:बीड ब्रेक - परळीतील शासकीय विश्रामगृहात आरोपी आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा कालच्या पत्रकार परिषदेतून दावा, बैठक झाल्याची कबुली देतानाचा व्हिडिओ आला समोर. - आरोपी दादा गरुड हा कबुली देताना तेथ आयबीचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती. AC- मनोज जरांगे पाटील यांनी माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी रचला याबाबत पत्रकार परिषदेत खुलासा केला. या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे आणि आरोपींची परळीतील शासकीय विश्रामगृहात बराच वेळ बैठक झाल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला होता. याबतचा कबुली देतानाचा आरोपी दादा गरुड याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ही कबुली देतावेळी त्या ठिकाणी आयबीचे (INTELLIGENCE BURO) अधिकारी उपस्थित असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. यामध्ये दादा गरुड सांगत आहे परळीतील शासकीय विश्रामगृहात परळीतील अनेक रथी महारथी बसलेले होते मात्र तेथे अमोल खुणे आणि कांचन साळवे गेल्यानंतर त्यांच्यासोबत धनंजय मुंडे 25 मिनिटे दुसऱ्या खोलीत बसले होते.
3
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 08, 2025 13:23:45
Pune, Maharashtra:अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील नान्नज परिसरात 24 ऑगस्ट रोजी वैयक्तिक वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली होती. या प्रकरणात कुख्यात गुंड निलेश गायवळवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी म्हंटले आहे. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाला होता; त्यामध्ये सुनील साळवे यांचा मुलगा अनुप साळवे आणि इतर 6 जण गंभीर जखमी झाले होते. अनुप साळवे आपल्या मित्रांसह नान्नज येथे गेला असता जुन्या वादातून आरोपींनी अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. या प्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अटक केलेल्या 9 आरोपींच्या जबाबांवरून निलेश गायवळ याचाही या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यालाही या प्रकरणात भविष्यात अटक करण्यात येईल असं पोलीस अधीक्षक घार्गे यांनी म्हंटले आहे.
4
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 08, 2025 13:22:12
Jalna, Maharashtra:जालना : ब्रेकिंग मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांची नोटीस चौकशीसाठी आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस मुंबईत परवानगी नसताना उपोषण केल्याप्रकरणी नोटीस 2 सप्टेंबर रोजी जरांगे यांनी केलं होतं मुंबईत उपोषण 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी विनापरवानगी उपोषण केल्यानं जरांगे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल झालेल्या गुन्हयाच्या चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस 2 सप्टेंबर रोजी जरांगे यांनी केलं होतं मुंबईत उपोषण अँकर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना जरांगे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना या नोटीसीच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी विनापरवानगी उपोषण केल्यानं जरांगे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल झालेल्या गुन्हयाच्या चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे.2 सप्टेंबर रोजी जरांगे यांनी मुंबईत उपोषण केलं होतं.त्या उपोषणाला परवानगी देण्यात न आल्यानं जरांगे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान पोलिसांच्या या नोटीसीनंतर जरांगे मुंबईत हजेरी लावतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 08, 2025 13:16:04
Jalna, Maharashtra:जालना :उद्धव ठाकरे पॉइंटर 4 दिवस मि दौरा करत आहे.तुमच्या व्यथा जाणून घेऊन माडायला आलो आहे दगाबाज सरकारची लफ्टरं वेशीवर टांगण्यासाठी माझा हा दौरा आहे.जनतेचा कौल हा अंतिम आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत हे सरकार येउच शकत नव्हता असे लोक म्हणतायत.आधी पक्ष चोरला आणि आता मतचोरी आणि जमीन चोरी सुरू आहे पंतप्रधान म्हणतात भारत आत्मनिर्भर होणार ,तुमचा पक्ष अजून आत्मनिर्भर झाला नाही.देश कधी करणार.? उध्दव यांचा सवाल या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला.पण नवीन पोरं उभी राहिली.यालाच शिवसेना म्हणतात.या झाडाची मूळ आणि खोड खोल गेलेली आहेत.ये 50 खोके का जोड है.शिवसेना मजबुत आहे. माझ्या काळात शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितलीली नसताना देखील मी कर्जमुक्ती दिली फडणवीस यांच्या सोबत आम्ही असतानाही मी कर्जमाफी करायला लावली. कर्जमाफीसाठी अभ्यास करू नका।समिती पाठवू नका।आता पंचनामे काय करणार। आता काय दाखवणार, केंद्राचे पथक दाखवा आणि हजार रुपये मिळवा या पथकाने रात्रीची पाहणी केली अशी माहिती आहे काय पाहणी केली.रात्रीस खेळ चाले या प्रमाणे यांचं आहे जूनमध्ये कर्जमुक्ती नको.तेव्हा तुम्हाला करायची असेल तर आताचे हप्ते कुणी भरायचे,बँकेचे तगादे सुरु आहे शेतकरी आत्महत्या सुरू आहे.फडणवीस सांगत होते भाजपचे सरकार आल्यावर सातबारा कोरा करू ,मग हे शेतकरी आत्महत्येचे पाप कुणाच्या डोक्यावर टाकायचे.? फडणवीस सरकारच्या नादान पणामुळे शेतकरी कुटुंब उघड्यावर पडले मुलगी शिकली प्रगती झाली कुठे गेली घोषणा.पंतप्रधान मोदी म्हणाले होते शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करू झालं का दुप्पट ,कुठे गेल.? शेती साहित्यावर जीएसटी का ठेवला आहे,माफ का केला नाही.?सरकारच्या अंगावर जात नाही तोपर्यंत सरकार ऐकत नाही. मोर्चे काढून दगाबाज सरकारचा पंचनामा करा,उध्दव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आदेश पीकविम्याचे पैसे एक रुपया मिळाला आहे इंग्रजांच्या काळात देखील थट्टा झाली नाही एवढी आता सुरू आहे शिवसेना पीकविमा कंपन्या कशा सरळ होत नाही ते बघेल. गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही 50 खोके देता आणि इमानदारांना कमी मदत करता.वंदे मातरम म्हणण्याचा भाजप वाल्यांना अधिकार नाही निवडणुकीत हे मधाच बोट लावतील पण यांच्या भुल थापांना बळी पडू नका जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत भाजप युतीला मतदान नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जशी नोटबंदी केली तशी यांना वोट बंदी करा
3
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 08, 2025 13:03:19
Nashik, Maharashtra:राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी सर्व विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेत सर्व परिस्थितीचा आढावा घेत त्यांना सूचना केल्यात. कुंभसाठी जवळपास 25 हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार असून आचारसंहितेच्या कामांना अडथळा ठरू नये यासाठी उपाययोजनाही आखल्या जातायत. दरम्यान बैठक आटोपताच राजेश कुमार यांनी रामकुंड, गोदाघाट परिसराची पाहणीही केली यावेळी त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि ईतर अधिकारी उपस्थित होते.
2
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 08, 2025 13:03:04
Chendhare, Alibag, Maharashtra:शिवसेना के चंद्रकांत कळंबे यांची सुनील तटकरे यांच्यावर बोचरी टीका नाव न घेता तटकरे यांचा गब्बर असा उल्लेख गरिबी ओळखून पैसे देऊन लाचार केले अँकर रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद शिगेला पोहोचला असतानाच शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर बोचरी टीका केलीय श्रीवर्धन तालुक्यातील रानवली येथील पक्ष प्रवेश सोहळ्यात नाव न घेता सुनील तटकरे यांचा उल्लेख गब्बर असा केला श्रीवर्धन मधील लोकांची गरिबी ओळखून पैसे देऊन त्यांना लाचार केल्याचा आरोप कळंबे यांनी केला पैशामुळे गरजू सामान्य कार्यकर्ते बाद झाल्याचे ते म्हणाले
4
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 08, 2025 12:36:50
Akola, Maharashtra:शरद पवार और प्रकाश आंबेडकर यांच्यातील राजकीय संघर्ष हा काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे नेते परस्परविरोधी भूमिकांमुळे चर्चेत राहिले आहेत. मात्र, अकोल्यातील एका कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू भीमराव आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) प्रमुख शरद पवार हे एकाच मंचावर दिसल्याने राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगू लागली आहे. हे जरी राजकीय व्यासपीठ नसले तरी, या दोन नेत्यांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांबाबत कयास बांधले जात आहेत. अकोल्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते पत्रकारिता महाविद्यालाची इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 30 फूट उंच पुतळा, तसेच 24 तास फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवार आणि भीमराव आंबेडकर एकत्र मंचावर दिसले, आणि त्यानंतर राजकीय चर्चांना ऊत आला. मात्र, माध्यमांशी बोलताना भीमराव आंबेडकर यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे सामाजिक आणि शैक्षणिक स्वरूपाचा होता. यात कोणतेही राजकीय समीकरण किंवा राजकीय संदेश शोधण्याचे काही कारण नाही.
2
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 08, 2025 12:35:38
Baramati, Maharashtra:इंदापूर पोलिसांची मोठी कामगिरी — दोन मोटरसायकल चोरटे अटकेत दोन चोरीच्या दुचाकींसह ८० हजारांचा मुद्देमाल जप्त इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोन सराईत चोरट्यांना अटक करत दोन चोरीच्या मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. इंदापूर परिसरात वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पेट्रोलिंगदरम्यान बाबा चौक येथे संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मोटरसायकल चोरीची कबुली दिली. सलीम महबूब शेख आणि नितीन सखाराम हरिहर अशी आरोपींची नावे असून त्यांच्या ताब्यातून ८० हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
2
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 08, 2025 12:30:59
3
comment0
Report
Advertisement
Back to top