Back
संस्कार भारती के अखिल भारतीय वार्षिक सम्मेलन में देवेंद्र फडणवीस का संबोधन: संस्कृति-सम्विधान का संगम
AKAMAR KANE
Nov 08, 2025 15:32:23
Nagpur, Maharashtra
برنامجाची लिंक असाइनमेंटच्या व्हॉट्सअप वर पाठवली आहे
नागपूर
- संस्कार भारतीच्या अखिल भारतीय वार्षिक साधारण सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हजेरी लावली होती.. रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात महर्षी व्यास सभागृहात ही सभा पार पडली... यावेळी देशभरातून संस्कार भारतीचे अनेक पदाधिकारी या दोन दिवसीय सभेत सहभागी झाले होते...
- माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. ही सभा नावाने ‘साधारण’ असली, तरी येथे उपस्थित असलेले सर्व लोक ‘असाधारण’ आहेत. कारण ते सर्व संस्कार भारतीच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची अखंड सेवा करत आहेत.
*भाषणातील मुद्दे....*
- संस्कार भारतीच्या अखिल भारतीय कार्यक्रमात ते प्रथमच आलो आहेत.... हे अगदी खरे आहे. मी ही संस्कार भारतीशी अनेक वर्षांपासून जोडलेलो आहे, पण अशा पद्धतीचा अखिल भारतीय कार्यक्रम, ज्यात देशभरातील संस्कार भारतीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत, यात मी प्रथमच सहभागी झालो आहे.
- आज इथे एक स्वयंसेवक म्हणून आलोय
- ही सभा फक्त संघटनेची सर्वसाधारण सभा बैठक नाही; यात तीन महत्त्वाच्या घटकांचा संगम आहे... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी, भारताच्या संविधानाचा अमृत महोत्सव आणि संस्कार भारतीचा वार्षिक सोहळा आहे...*
- काहींना प्रश्न पडेल की या तीन गोष्टींना एकत्र आणण्यामागचे कारण काय? संस्कार भारती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय संविधानने दिलेला विचार यांना पृथक करता येऊ शकत नाही... वेगळे करता येऊ शकत नाही .
- भारतीय संस्कृती जीवनपद्धती सर्वात जुनी पध्दतीने आहे...आपण ज्यांना जुनी संस्कृती म्हणतो त्यांच वय 3 ते 4 हजार वर्षापेक्षा जास्त नसून ती आता नष्ट झालेली आहे
- सातत्याने होणारं आक्रमणांनंतर पण आजही हजारो वर्षांचा अखंड प्रवाह जर कुठे टिकून आहे, तर तो भारतीय संस्कृतीचा आहे.
- आपली सभ्यता केवळ चार-पाच हजार वर्षांची नाही, तर त्यापेक्षाही प्राचीन आहे. तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला या विद्यापीٹھांतून आपली ज्ञानपरंपरा जगभर पोहोचली. आपल्या मंदिरांमध्ये स्थापत्यकलाच नव्हे सर्व कलांचा समन्वय दिसतो.
- इतक्या आक्रमणांनंतरही आपली संस्कृती टिकून राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘देव, देश आणि धर्म’ यासाठी लोकांना संघटित करून त्यांच्यात आत्मभान जागृती करत संस्कृती पुनर्स्थापित केले.
- मात्र, इंग्रजांच्या काळात पुन्हा एकदा आपण गुलामीत गेलो. तेव्हा डॉ. हेडगेवारजींना जाणवलं की “आपल्या राष्ट्रीय आणि सांस्कृतिक मूल्यांची रुजवल्याशिवाय, आत्मभान असलेली पिढी घडणार नाही, तर राष्ट्र म्हणून आपण उभे राहू शकत नाही.” आणि म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली.मानसिक गुलामीतून बाहेर पडल्यावर आपण राष्ट्र म्हणून उभे राहू
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी हाच विचार पुढे नेला “विकासही आणि विरासतही”. फक्त विकास करून चालत नाही; जोपर्यंत आपली सांस्कृतिक विरासत ओळखत नाही, तोपर्यंत राष्ट्र प्रगत होऊ शकत नाही. आणि ही विरासत भारतीय संविधानात प्रतिबिंबित होते.
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले आपले संविधान हे भारतीय मूल्यांवर आधारित आहे. काही लोक म्हणतात की, हे संविधान जगातील विविध देशांचे वाचून करून तयार झाले.. पण हे अधुरे ज्ञान आहे. हमारे संविधानातील प्रत्येक मूल्य समता, swatntra, bhandhuta, हे आपल्या भारतीय परंपरेतून, भगवान बुद्धांच्या आणि सनातन संस्कृतीच्या विचारांतून आले आहे.
- बाबासाहेब आंबेडकर यानी संस्कृतीतील शाश्वत मूल्य संविधानच्या माध्यमातून प्रस्थापित केले....आपल्या समाजात वेगवेगळ्या काळात भेदभाव झाला, त्यामुळे विखंडीत होऊन गुलामीत गेलो.. या सर्वाला समाप्त करत जे शास्वत मूल्य आहे जे सनातन पण आहे घेऊन संविधानाची रचना झाली.. संविधानाच्या माध्यमातून मूळ प्रतीतील प्रत्येक अध्यायाच्या चित्रांमधूनही हे दिसते...त्यात रामायण, महाभारत आहे..
-- भारताच्या आजूबाजूच्या देशात लोकतंत्र टिकू शकल नाही...भारतीय संविधानामुळे भारतात लोकशाही टिकून आहे.. याच मूल्यावर मजबूत संविधान है.
- *आजच्या काळात आपली स्पर्धा व्यक्तीशी नाही, तर यंत्रांशी आहे. गुगलवर सगळं मिळायच.. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) या युगात माहिती सहज उपलब्ध आहे. 45 सेकंदात प्रॉम्प्ट टाकून देवेंद्र फडणवीस यांच्यावर कविता येईल...आता स्पर्धा व्यक्ती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेत आहे..
पण यंत्राला संवेदना नसतात. माणूस मात्र ‘संवेदनशील’ अभिव्यक्ती असते, आणि हीच खरी मानवतेची ओळख आहे.
- जोपर्यंत व्यक्तीमध्ये मानवी संवेदना जिवंत आहे तोपर्यंत ह्या संसार जिवंत राहील ज्या दिवशी या संवेदना समाप्त होतील माणूसही हा मशीन मध्ये परिवर्तन होईल. माणसाने जी कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केली, त्याचा पलीकडे गेली जग वाचेल
- विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. AI ही एक घोड्यासारखी शक्ती आहे. जर आपण त्यावर नियंत्रण ठेवले, तर ती आपल्याला जलदगतीने पुढे नेईल... पण दिशा हरवली, तर ती धोकादायक ठरू शकते.
- आज अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर डीपफेक, चुकीची माहिती आणि संस्कृतीविरोधी प्रवाह वाढत आहेत. या सर्वांचा मुकाबला करताना संस्कार भारतीसारख्या संस्थांनी नवे तंत्रज्ञान स्वीकारून त्याला भारतीय संस्कारांची दिशा द्यावी लागेल.
- भारतीय संस्कृतीची ताकद म्हणजे ‘नवीनतेतून प्राचीनतेचे पुनरुज्जीवन’. म्हणून हे नवतंत्रज्ञान स्वीकारत, सकारात्मकतेकडे वळवत भारतीय मूल्यांची जोपासना करावी लागणार आहे.... हेच ताकद संस्कार भारतीचे खरे कार्य आहे.
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
APAMOL PEDNEKAR
FollowNov 08, 2025 17:15:40Navi Mumbai, Maharashtra:भांडुपच्या व्हिलेज रोड येथे एका अल्पवयीन मुलाकडून हातात तलवार घेत फिरवतानाचा व्हिडिओ समोर
एक अल्पवयीन मुलगा हातात भर रस्त्यात तलवार भिरकवत जाताना
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अल्पवयीन मुलगा ताब्यात
0
Report
JMJAVED MULANI
FollowNov 08, 2025 17:01:490
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 08, 2025 16:49:271
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 08, 2025 16:48:074
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 08, 2025 15:49:253
Report
ABATISH BHOIR
FollowNov 08, 2025 15:16:478
Report
KPKAILAS PURI
FollowNov 08, 2025 14:09:056
Report
PNPratap Naik1
FollowNov 08, 2025 14:02:175
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:25:336
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:23:578
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 08, 2025 13:23:458
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:23:175
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:22:126
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:16:044
Report