Back
मुंबई से ट्रेक पर आई 19 वर्षीय युवती का ड्यूक्स नोज के पास निधन
CRCHAITRALI RAJAPURKAR
Feb 03, 2026 06:34:29
Pune, Maharashtra
लोणावळ्याच्या टायगर पॉईंट दरीत घडलेली ही घटना प्रत्येकाला सुन्न करणारी ठरली मुंबईहून ट्रेकसाठी आलेल्या एका १९ वर्षीय तरुणीचा ड्युक्स नोज परिसरात अपघाती मृत्यू झाला. ड्रोन, डॉग स्क्वॉड आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर ३९० फूट खोल दरीतून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. धोकादायक दरी, अंधार आणि वेळेशी झुंज देत हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्यात आले.. दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथील श्रेया पती (वय १९) ही तरुणी लोणावळ्याला ट्रेकसाठी आली होती. ड्युक्स नोज परिसरात ट्रेक करण्यासाठी ती गेली; मात्र संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नाही. रात्री नातेवाईकांनी शोध घेत लोणावळ्यात चौकशी केली. त्यावेळी ती परिसरात आलेली होती व परत गेल्याची माहिती मिळाली. दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी नातेवाईकांनी लोणावला ग्रामीण पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली. त्याचवेळी टायगर पॉईंट परिसरात सापडलेली बॅग ही श्रेयाचीच असल्याचे स्पष्ट झाले. सकाळी ११.३० वाजता रेस्क्यू टीमला शोध मोहिमेसाठी पाचारण करण्यात आले. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने घटनास्थळी पोहोचून दुपारी २.३० वाजता शोध मोहीम सुरू केली. डॉग स्क्वॉड, पोलीस ड्रोन आणि नंतर लाइटनिंग ड्रोनच्या सहाय्याने शोध सुरू असतानाच दुपारी ४.४५ वाजता सुमारे ३९० फूट खोल दरीत मुलीचा मृतदेह आढळून आला. अंधार असतानाही अत्यंत कठीण परिस्थितीत दोरी, स्ट्रेचर आणि वॉकी-टॉकीच्या सहाय्याने मृतदेह सुरक्षितपणे वर काढण्यात आला. रात्री ९.३० वाजता मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ही संपूर्ण शोध मोहीम पोलीस प्रशासनाच्या आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या धाडसाने यशस्वी झाली. पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 11:16:210
Report
SKShubham Koli
FollowMar 18, 2026 11:04:42786
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 10:25:121021
Report
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 10:24:231050
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 10:24:041089
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 10:02:44937
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 09:39:181032
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 09:38:53929
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 18, 2026 09:31:59998
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 09:31:08966
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 09:20:401092
Report
ABATISH BHOIR
FollowMar 18, 2026 08:50:411092
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 18, 2026 08:50:06951
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 18, 2026 08:49:461062
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 08:37:111059
Report