Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघर बोईसर पूर्व के दांडी पाड़ा में अतिक्रमण पर राजस्व विभाग ने तोड़फोड़ कार्रवाई की

HPHARSHAD PATIL
Feb 14, 2026 02:00:14
Palghar, Maharashtra
पालघरच्या बोईसर पूर्वेस असलेल्या दांडी पाडा येथील अनधिकृत बांधकामावर महसूल विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. पालघरचे तहसीलदार रमेश शेंगडे यांच्याकडे येथील अनधिकृत बांधकाम विरोधात स्थानिकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या, त्यानंतर महसूल विभागाने कायदेशीर पद्धतीने पोलिस बंदोबस्तात ही अतिक्रमणावर तोड़क कारवाई केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Feb 14, 2026 03:51:07
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 14, 2026 03:48:25
Kolhapur, Maharashtra:केडीसीसी बँकेत आम्हाला 30 ते 40 वर्षे झाली आहेत. नव्या नियमानुसार आता आम्हाला थांबावं लागणार आहे. मात्र या बदलामुळे केडीसीसी बँकेत नवीन, सळसळत रक्त जाणार आहे,” असे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहेत. कोल्हापुरात नूतन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हसन मुश्री बोलत होते. केंद्र सरकारने नव्या केंद्रीय सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थांच्या कारभारात मोठे बदलाव केले आहेत. या कायद्यात सलग अनेक वर्षे संचालक राहिलेल्या व्यक्तींना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही, त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही भूमिका मांडली. एका अर्थाने हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सलग संचालक असणारे नेते यापुढे बँकेत दिसणार नसल्याचं सांगून टाकलं.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 14, 2026 03:33:07
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि निवडणूक पूर्व आघाडी केलेल्या मित्र पक्षाच्या सदस्यांचा सत्कार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच होणार असून त्याचा फॉर्मुला ही त्यांनी सांगितला. तर गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी जणू रणशिंगही फुंकलं. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ भाषण मुद्दे कोल्हापूरात पुढच्या वेळी जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवू राष्ट्रवादीला बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत राज्यात सव्वा वर्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याचा फार्म्युला ठरला आहे कोल्हापूरात देखील सव्वा वर्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष होणार कोल्हापुरात राष्ट्रवादीला आठ पदं मिळणार जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी विनय कोरे यांना सहभागी करून घेणार. गोकूळ निवडणूक - गोकूळ दूध संघाची निवडणुंक Now सुरू होईल ठराव मागवण्याचं काम सुरू होईल कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त ठराव गोळा करण्यासाठी प्रयत्न करावा केडीसीसी बँकेत 30 - 40 वर्ष आम्हाला झाली आहे..नवीन नियमानुसार आम्हाला थांबावं लागणार आहे मात्र नवीन सळसळत रक्त केडीसीसी बँकेत जाईल.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 14, 2026 03:31:15
Navi Mumbai, Maharashtra:बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे शालार्थी आयडी बनवून शासनाचं तब्बल 1 कोटी 24 लाख 69 हजार रुपये अनुदान लाटल्याप्रकरणी माजी मुंबई शिक्षण मंडळ विभागीय आयुक्त आणि पाच शिक्षकांसह एकूण 19 जणांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अलिबाग येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे चार तर खोपोली तालुक्यातील के.एम.सी. शिक्षण संस्थेचा एक शिक्षक अशा पाच शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे वापरून हे अनुदान लाटलंय. शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे हे 2018 साली चर्नी रोड येथील विभागीय कार्यालयात शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या नावाचं बनावट पत्र आढळून आल्याने आपण असे कोणतेही पत्र दिले नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलेय. राजेंद्र अहिरे यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून वाशी पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 14, 2026 03:30:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड तालुक्यतील जैतापूर येथील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या पेपरला पहिल्याच दिवशी सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला. केंद्रावर शिक्षकच कॉपी पुरवत असल्याचे समोर आले. यावर शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या ३ शिक्षकांवर त्वरित निलंबनाची कारवाई केली व गुन्हे नोंदवले. मात्र, संबंधित खासगी विद्यालयातील शिक्षक व देभेगाव येथील न्यू हायस्कूलमधील शिक्षकांवर शिक्षण विभागाने आदेश देऊनही कारवाई केली नाही. आता याप्रकरणी संस्थांनी संबंधितांवर २ दिवसांत कारवाई न केल्यास शिक्षण संस्थाचालकांवरच गुन्हे दाखल करा, असे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 14, 2026 03:17:42
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 14, 2026 03:16:47
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर सरकार राज्यभरात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केला आहे. राज्यभरात २०२५ मध्ये अतिवृष्टी झाली होती. ज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मराठवाड्यात तर भीषण हानी झाली अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यदेखील वाहून गेले होते. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना अकृषी विद्यापीठे, परीक्षा मंडळे व सर्व महाविद्यालयांचे परीक्षा शुल्क माफीची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या सवलतीबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांना ही सुविधा असावी, असे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 14, 2026 03:16:35
Bhandara, Maharashtra:धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी धान खरेदी संस्थाचालकांचा जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन... Anchor :- भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र शासन मार्फत चालू असून खरेदी केंद्राची लिमिट न वाढविली त्या कारणास्तव 70 टक्के शेतकरी धान विक्रीपासून वंचित आहेत अश्या धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा त्यांच्या घरी असलेले धान आधारभूत धान खरेदी केंद्रावर लवकरात लवकर मोजमाप करावे.. शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मार्फत शासकीय खरेदी केंद्रांना धान खरेदी करण्याकरिता दिलेली लिमिट वाढवून धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा. म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, व जिल्हा पणन अधिकारी यांना निवेदन दिले आहे... आठ दिवसात धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा या ठिकाणी संघटनेकडून निवेदनात देण्यात आला.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 14, 2026 03:03:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराचे दर्शन गाभाऱ्यातून घेता येणार असल्याचे छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वेरुळ येथे झालेल्या बैठकीत जाहीर केले. यापूर्वी त्यांनीच होणारी गर्दी लक्षात घेता गाभारा दर्शन बंद करण्याचे आदेश दिले होते. घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त होणारी भाविकांची गर्दी पाहता, जिल्हाधिकारी स्वामी यांनी या दिवशी गाभाऱ्यात प्रवेश न देता बाहेरून दर्शन देण्याबाबतचे निर्देश विश्वस्त समितीला ३ फेब्रुवारीला झालेल्या आढावा बैठकीत दिले होते. मात्र, यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. लोकप्रतिनिधीही ही नाराज होते अखेर जिल्हाधिकारी यांनी निर्णय मागे घेतलाय त्यामुळं भाविकांना आता थेट गाभाऱ्यात जाउन परंपरे प्रमाणे दर्शन घेता येणार आहे...
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 14, 2026 03:01:02
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरात भाजपच्या वतीने प्रभाग चलो अभियानाला सुरुवात, समस्या जाणून घेण्यासाठी आमदार, महापौर नागरिकांच्या दारात - सोलापुरात भाजपच्या प्रभाग चलो अभियानाला उस्फूर्त प्रतिसाद - सोलापूरकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापौर आणि आमदार थेट नागरिकांच्या दारात - भाजप आमदार देवेंद्र कोठेंचा प्रभाग चलो अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांची थेट सोडवणूक करण्याचा उपक्रम - अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अपेक्षित विकासकामांची माहिती घेत समस्यांचे तत्काळ निवारणाला सुरुवात - सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात हे प्रभाग चलो अभियान राबवले जात आहे - आमदारांनी प्रभागात जाऊन त्या भागातील विकास कामांबाबतच्या समस्या ऐकून घेतल्या. - तसेच यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना या समस्यांच्या तत्काळ निवारणासाठीच्या सूचना दिल्या. - बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना स्थानिक विकासकामे आणि अडथळे माहिती असतात. त्यामुळे त्यांनी सुचवलेली विकासकामे प्राधान्याने करण्यासाठी हा उपक्रम आहे. - शहरातील एका भागात 3 वर्षे रस्त्यावरील दिवे बसवले होते मात्र दिवे बंदच होते. - या अभियानात याबाबत कल्पना दिल्यानंतर आम्ही ते तात्काळ चालू करुन घेतले.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 14, 2026 02:30:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एमआयएम ने जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. पक्षाचे नेते इम्तियाज जलील हे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन हैदराबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. या दौऱ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इम्तियाज जलील यांच्यासोबत एमआयएमचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवकही हैदाबादला निघाले आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एमआयएमला मिळालेल्या घवघवीत यशानंतर हे नगरसेवक आता पक्ष नेतृत्वाची भेट घेणार आहेत. एमआयएम नेते आणि सर्व नगरसेवक हैदराबाद येथील पक्षाचे मुख्यालय असलेल्या दारूसलाम येथे पोहोचतील. तिथे ते महाराष्ट्रातील विजयानिमित्त दारूसलाम डे साजरा करणार आहेत. हे यशाचे सेलिब्रेशन थेट पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 14, 2026 02:00:32
Malegaon, Maharashtra:Breaking... विशाल मोरे, नाशिक - नाशिक जिल्ह्यातील गाळणे किल्ला परिसरात परधर्मियांचे अतिक्रमण - सकल हिंदू समाजाकडून आंदोलनाचा इशारा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुकयातील गाळणे येथील वनविभागाच्या जमिनीवर तसेच ऐतिहासिक गाळणे किल्ला परिसरात अनाधिकृत परधर्मियांचे अतिक्रमण होत असल्याचा आरोप करत, सदर अतिक्रमण तातडीने हटविण्याच्या मागणीचे निवेदन सकल हिंदू समाजातर्फे वन विभाग प्रशासनाकडे देण्यात आले आहे. संबंधित वन क्षेत्रातील प्रतिबंधीत भागात विनापरवानगी बांधकाम करण्यात येत असून यांना पांढरा रंग देवून रंगीबेरंगी झेंडे लावण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान व वनजमिनी वरील अतिक्रमण तातडीने हटविण्याचे निर्देश असतांना देखील संबंधित भागात कारवाई होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सात दिवसांत कारवाई न झाल्यास सकल हिंदू समाज मालेगाव यांच्या वतीने वन विभाग कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top