Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

जायतपुर के स्कूल में बारहवीं की कॉपी लीक: तीन शिक्षकों को निलंबित

VKVISHAL KAROLE
Feb 14, 2026 03:30:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड तालुक्यतील जैतापूर येथील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या पेपरला पहिल्याच दिवशी सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला. केंद्रावर शिक्षकच कॉपी पुरवत असल्याचे समोर आले. यावर शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या ३ शिक्षकांवर त्वरित निलंबनाची कारवाई केली व गुन्हे नोंदवले. मात्र, संबंधित खासगी विद्यालयातील शिक्षक व देभेगाव येथील न्यू हायस्कूलमधील शिक्षकांवर शिक्षण विभागाने आदेश देऊनही कारवाई केली नाही. आता याप्रकरणी संस्थांनी संबंधितांवर २ दिवसांत कारवाई न केल्यास शिक्षण संस्थाचालकांवरच गुन्हे दाखल करा, असे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Feb 14, 2026 04:51:42
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सहा वर्ष वयाची मादी बिबट जेरबंद झाली असून गेली तीन महिन्यात पिंपरखेड परिसरात वनविभागाने हा 37 वा बिबट जेरबंद केलाय, त्यामुळे गेली तीन महिन्यात एवढ्या मोठ्या संख्येने बिबट्याला जेर बंद करण्यात वन विभागांना यश आल्याने वनविभागाच्या मोहिमेचं परिसरात कौतुक केलं जातंय. मात्र अद्यापही या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने या बिबट्यांना ही जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागा पुढे असणार असून एवढा मोठ्या संख्येने बिबटे जेरबंद करून हि अद्यापही या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याची संख्या किती मोठ्या प्रमाणात आहे आणि नागरिक किती भीतीच्या सावटाखाली जगत आहे हे यावरून लक्षात येत. प्रतिनिधी हेमंत चापुडे, झी मिडिया शिरूर पुणे
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 14, 2026 04:46:47
Washim, Maharashtra:वाशिम:\n\nFile:1402ZT_WSM_SEVALALA_FESTIVAL_WKT\nWSM_SEVALALA_FESTIVAL_SHOTS\nरिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम \n\nअँकर:बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज 287व्याजयंतीनिमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन विभाग आणि बंजारा विरासत संघ यांच्या संयुक्त उपक्रमातून हा कार्यक्रम होत असून देशभरातून बंजारा बांधव उपस्थित राहणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मंत्री संजय राठोड यांच्यासह लोकप्रतिनिधी व महंत उपस्थिती राहणार आहे.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जगदंबा माता देवी दर्शन घेऊन संत सेवालाल व संत रामराव महाराज समाधीचे दर्शन घेणार असून नगारा वाजवून कार्यक्रमाचा शुभारम्भ करणार आहेत.दिवसभर सेवा-प्रसाद,भजन-कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या Tourism विकासासाठी आयोजित करण्यात आला आहे.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 14, 2026 04:38:25
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... महापौर-उपमहापौरांच्या निवडीनंतर आता 'समित्यां' साठी फिल्डिंग....पक्षश्रेष्ठींच्या दरबारी भेटीगाठींचे सत्र वाढले.... AC -- लातूर महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष विषय समित्यांच्या निवडीकडे लागले आहे. विशेषतः स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता आणि स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या नगर विकास विभागाकडून या निवडींचा अधिकृत कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारीनंतर सभापती आणि विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होऊ शकते. या काळात महत्त्वाच्या निवडी होणार आहेत. निवडणूक लढवण्यास इच्छुक असूनही तिकीट न मिळालेल्या नाराजांसह अनेक निष्ठावंतांनी आता या पदासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे इच्छुकांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात असून, पक्षश्रेष्ठींच्या दरबारी भेटीगाठांचे सत्र वाढले आहे....
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 14, 2026 04:33:57
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून शिंदेसेनेत मतभेद; महायुतीतील सत्ता समीकरणे अधिक गुंतागुंतीची. सावंत अध्यक्ष पदासाठी आग्रही तर माजी खासदार रवींद्र गायकवाड भाजपा बरोबर जाण्यात उत्सुक. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून शिंदेच्या शिवसेनेत अंतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा रंगली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवरून वेगवेगळे दावे आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेत मतभेद समोर येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. माजी मंत्री तानाजी सावंत अध्यक्षपदावर ठाम असल्याचे सांगितले जाते, तर माजी खासदार रवींद्र गायकवाड भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिंदेची शिवसेना आणि ठाकरेसेना एकत्र येण्याच्या चर्चांना रवींद्र गायकवाड यांनी स्पष्टपणे फेटाळले आहे. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो, त्यामुळे महायुतीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. अध्यक्षपद भाजपकडे जाणार की शिवसेनेकडे, हे अद्याप निश्चित नसून त्यावर चर्चा सुरू असल्याची माहितीही गायकवाड यांनी दिली. अध्यक्षपदासाठी भाजपकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तर शिवसेनेकडून रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांचे नाव चर्चेत आहे. निकालानंतर सर्व प्रमुख नेते मुंबईत तळ ठोकून सत्ता स्थापनेच्या वाटाघाटींमध्ये व्यस्त असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, आमदार तानाजी सावंत यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नीच्या अध्यक्षपदाला विरोध दर्शविल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणुकीपूर्वी तानाजी सावंत महायुतीत नव्हते, त्यामुळे सावंतांना वगळून सत्ता स्थापन करण्याची भाजपची रणनीती असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 14, 2026 04:15:34
Navi Mumbai, Maharashtra:Anchor: नवी मुंबई महानगरपालिकेची पहिलीच महासभा मोठी विस्फोटक होण्याची शक्यता आहे. कारण आमदार मंदा म्हात्रे यांचा ड्रीम प्रकल्प असलेल्या बेलापूर येथील प्रस्तावित शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी प्रस्तावित जागेत फेरबदल अथवा सदर प्रकल्प रद्द करण्यासंबंधीचा ठराव पहिल्याच महासभेत मांडला जाणार आहे. Vo1: वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्यातील वैर आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पहायला मिळणार आहे. मनपाच्या पहिल्याच महासभेत आमदार मंदा म्हात्रे यांचा ड्रीम प्रकल्प असलेल्या बेलापूर येथील प्रस्तावित शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी प्रस्तावित जागेत फेरबदल अथवा सदर प्रकल्प रद्द करण्यासंबंधीचा ठराव मांडण्यात येणार आहे. या ठरावा विरोधात आमदार मंदा म्हात्रे यांच्यासाठी शिवसेना शिंदे गट मैदानात उतरलाय. शिवसेना जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहत सदर ठराव रद्द करण्याची मागणी केली असून महासभेत हा ठराव पारित करूनच दाखवा आम्ही 4 दिवसात हा ठराव विखंडित करू असा आव्हान किशोर पाटकर यांनी दिलाय. Byte: किशोर पाटकर (शिवसेना जिल्हाध्यक्ष) Vo2: हे रुग्णालय गोरगरीब जनतेसाठी आणले होते. नवी मुंबईच्या जनतेने एकहाती सत्ता दिली त्याच हे गिफ्ट देत आहात काय रुग्णालय रद्द करुन असा सवाल उपस्थित करत शेरनी लंगूर का शिकार नही करती हे लक्षात ठेवून माझ्या नादी लागा असा सज्जड दम आमदार मंदा म्हात्रे यांनी भरलाय. Byte: मंदा म्हात्रे (आमदार) Vo3: 20 तारखेला होणाऱ्या महासभेत या ठरावा वरून सभागृहात मोठा गदारोळ होणार असून याला वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्यातील राजकीय वैराची किनार आहे. त्यामुळे महासभेत रुग्णालय रद्द करण्याचा ठराव संमत होतो का आणि झाल्यास हा राजकीय संघर्ष किती टोकाला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 14, 2026 03:51:07
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 14, 2026 03:48:25
Kolhapur, Maharashtra:केडीसीसी बँकेत आम्हाला 30 ते 40 वर्षे झाली आहेत. नव्या नियमानुसार आता आम्हाला थांबावं लागणार आहे. मात्र या बदलामुळे केडीसीसी बँकेत नवीन, सळसळत रक्त जाणार आहे,” असे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहेत. कोल्हापुरात नूतन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हसन मुश्री बोलत होते. केंद्र सरकारने नव्या केंद्रीय सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थांच्या कारभारात मोठे बदलाव केले आहेत. या कायद्यात सलग अनेक वर्षे संचालक राहिलेल्या व्यक्तींना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही, त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही भूमिका मांडली. एका अर्थाने हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सलग संचालक असणारे नेते यापुढे बँकेत दिसणार नसल्याचं सांगून टाकलं.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 14, 2026 03:33:07
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि निवडणूक पूर्व आघाडी केलेल्या मित्र पक्षाच्या सदस्यांचा सत्कार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच होणार असून त्याचा फॉर्मुला ही त्यांनी सांगितला. तर गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी जणू रणशिंगही फुंकलं. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ भाषण मुद्दे कोल्हापूरात पुढच्या वेळी जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवू राष्ट्रवादीला बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत राज्यात सव्वा वर्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याचा फार्म्युला ठरला आहे कोल्हापूरात देखील सव्वा वर्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष होणार कोल्हापुरात राष्ट्रवादीला आठ पदं मिळणार जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी विनय कोरे यांना सहभागी करून घेणार. गोकूळ निवडणूक - गोकूळ दूध संघाची निवडणुंक Now सुरू होईल ठराव मागवण्याचं काम सुरू होईल कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त ठराव गोळा करण्यासाठी प्रयत्न करावा केडीसीसी बँकेत 30 - 40 वर्ष आम्हाला झाली आहे..नवीन नियमानुसार आम्हाला थांबावं लागणार आहे मात्र नवीन सळसळत रक्त केडीसीसी बँकेत जाईल.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 14, 2026 03:31:15
Navi Mumbai, Maharashtra:बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे शालार्थी आयडी बनवून शासनाचं तब्बल 1 कोटी 24 लाख 69 हजार रुपये अनुदान लाटल्याप्रकरणी माजी मुंबई शिक्षण मंडळ विभागीय आयुक्त आणि पाच शिक्षकांसह एकूण 19 जणांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अलिबाग येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे चार तर खोपोली तालुक्यातील के.एम.सी. शिक्षण संस्थेचा एक शिक्षक अशा पाच शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे वापरून हे अनुदान लाटलंय. शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे हे 2018 साली चर्नी रोड येथील विभागीय कार्यालयात शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या नावाचं बनावट पत्र आढळून आल्याने आपण असे कोणतेही पत्र दिले नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलेय. राजेंद्र अहिरे यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून वाशी पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 14, 2026 03:17:42
0
comment0
Report
Advertisement
Back to top