Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

तुळजापुर में तुळजाभवानी के दर्शन के लिए लाखों भक्त पहुँचे, आज रात सिंहासन स्थापना

DPdnyaneshwar patange
Oct 06, 2025 08:07:42
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी चालत भावीक भक्त तुळजापुरात दाखल... तुळजाभवानी मंदिरात उद्या पौर्णिमा साजरी केली जाणार असून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापुरात येताना दिसत आहेत आज रात्री उशिरा मंचकावरील श्रमनिद्रा संपवून तुळजाभवानीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाणार देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर धार्मिक विधी स्नान आणि महाआरती करण्यात येणार उद्या सकाळी देवीजींची विधिवत पूजा देखील केली जाणार उद्या दुपारी सोलापूरच्या मानाच्याकाठ्या तुळजापुरात दाखल झाल्यानंतर रात्री काठ्यासह छबिना मिरवणूक काढण्यात येणार त्यानंतर तुळजाभवानीच्या मंदिरात महंत पुजारी यांच्याकडून आई राजाच्या उद घोषात जोगवा मागण्याचा कार्यक्रम जोगवा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर तुळजाभवानीच्या पोर्णिमा यात्रेची सांगता होते..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Oct 06, 2025 10:19:27
Parbhani, Maharashtra:बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी उद्या परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात 1 लाख समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती बंजारा आरक्षण संघर्ष समितीने सांगितलंय. परभणी शहरातील जिंतूर रोडवरील डीएड महाविद्यालयाच्या मैदानावरून मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्चात समाजाचे सर्व लोकप्रतिनीधी मंत्री उपस्थित राहणार आहेत. जरी आम्ही आरक्षण एसटी प्रवर्गातून माघत असलो तरी आम्हाला आदिवासींच आरक्षण नकोय,एसटी प्रवर्गात सेपरेट अबकड प्रवर्ग तयार करून मूळ आदिवासींना अ प्रवर्गातून त्यांचं 7 टक्के आरक्षण द्यावं आणि बंजारा समाजाला ब प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी आमची संविधानिक मागणी आहे, आदिवासीच आम्हाला आरक्षण नकोय,आम्हाला एसटी प्रवर्गातून वेगळं आरक्षण द्यावं अशी आमची मागणी असल्याचे महाराष्ट्र बंजारा आरक्षण संघर्ष समीतीचे प्रमुख डॉ. बबन पवार यांनी म्हटलंय. बाईट- डॉ. बबन पवार- प्रमुख- बंजारा आरक्षण संघर्ष समीती,महाराष्ट्र
2
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 06, 2025 10:15:42
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्ह्यातल्या राजकारणात भाजप विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष सुरू आहे. पडळकरांच्या प्रकरणानंतर आता जयंत पाटलांना घेरण्यासाठी भाजपाकडून जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली चालणारी जिल्हा मध्यवर्ती बँक टार्गेट करण्यात आली आहे, याला निमित्त जिल्हा बँकेकडून होणारी नोकर भरती आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेला 559 पदांच्या नोकर भरतीची परवानगी सहकार विभागाकडून मिळाली आहे. मात्र या परवानगीनंतर जिल्ह्यातील भाजप आक्रमक झाली आहे कारण जिल्हा बँकेवर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय सत्ता आहे. जयंत पाटलांचे समर्थक दिलीप पाटील यांच्या कार्यकाळात बँकेत विविध घोटाळे झालेले आरोप झाले, त्यानंतर चौकशी सुरू झाली होती, परंतु महाविकास आघाडीच्या काळात ती स्थगित झाली. पडळकरांचे प्रकरण शांत झालं तरी जयंत पाटील भाजपाच्या टार्गेटवर आहेत. चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांची सत्ता असणाऱ्या जिल्हा बँकेत आपला मोर्चा वळवला आणि बँकेच्या घोटाळ्यांची चौकशी लावण्यासाठी दबाव आणला. पालकमंत्री सांगली.
0
comment0
Report
Oct 06, 2025 10:00:04
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 06, 2025 09:21:41
0
comment0
Report
UPUmesh Parab
Oct 06, 2025 09:21:23
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग- दीपक केसरकर बाईट ऑन दोडामार्ग वनतारा दाखल वनतारा वनविभागाच्या वन्य प्राण्यांच्या संदर्भातल्या अटी शर्ती आहेत त्याला अधीन राहून प्राण्यांची योग्य ती काळजी घेते त्यामुळे या हत्तींचाही त्या ठिकाणी चांगले संगोपन करण्यात येईल. शेवटी शेतकऱ्यांचे नुकसानही पहावं लागतं त्याला सुद्धा एक मर्यादा आहेत. त्यामुळे या हत्तींना वनताराने लवकरात लवकर ताब्यात घ्यावे वनताराला त्यांच्या पद्धतीने काम करायला द्यायला हवे ज्यांचा शेवट गोड असतो ते सर्व गोड असतं त्यामुळे त्यांना काम करायला द्यायला हवे. ऑन राजन तेली जिल्हा बँक आरोप राजन तेली यांच्या आरोपाशी मी सहमत नाही. जिल्हा बँकेचे आदर्शवत काम सुरू आहे. राजन तेली यांना काही त्रुटी आढळल्या असतील तर जिल्हा बँकेचे नाव बदनाम होता कामा नये. लोकांच्या विश्वासावर बँका चालतात. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट बँकेच्या यादीत सिंधुदुर्ग बँकेचे नाव आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जनरल आरोप जर आपण करायला गेलो तर त्यामुळे बँकेचे नाव बदनाम होते. त्याचा थोडा भान राजन तेलींनी ठेवण्याची गरज आहे. राजन तेली यांना यापुढे कशा पद्धतीने सबुरीने बोलायचं याचा सल्ला पक्षाकडून देण्यात येईल. कोठलाही विषय असेल तर तो पब्लिकली मांडायचा नसतो अशी पद्धत पक्षतात आहे. असे आरोप करण्यापूर्वी आपण महायुतीत आहोत याचं भान सर्वांनी ठेवले पाहिजे. ऑन संजय राऊत जिल्हा बँकेची मुख्यमंत्र्यांना तक्रार करणार संजय राऊत यांच्या हातात काहीतरी हत्यार द्यावं लागतं. आता त्यामुळे विनाकारण त्यांच्या हातात हे आयत हत्यार मिळालय. जिल्हा बँक सर्व नियमांचे पालन करून चालवली जाते म्हणून त्या बँकेला आदर्श बँक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे अशा बँकेची कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात बदनामी होता कामा नये ऑन राजन तेली यांच्याशी जुळवून घेणार का कितीही खोटे आरोप केले तरी सत्य हे सत्यच असतं. मी त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केलेला नाही एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला राजन तेली यांचा पक्ष प्रवेश करावा तो त्यांचा अधिकार आहे. राजन तेली यांचा सावंतवाडी हा प्रदेशच नाही. निलेश राणे यांनी राजन तेली यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे बाईट- दीपक केसरकर आमदार
0
comment0
Report
UPUmesh Parab
Oct 06, 2025 09:20:17
Oros, Maharashtra:अँकर सिंधुदुर्ग जिल्ह्या बँकेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या दबावामुळे परप्रांती्यांना जमिनी लेने के लिए कर्ज दिए जाने का आरोप पूर्व विधायक राजन तेली ने लगाया है। सिंधुदुर्ग जिला बैंक घोटालों के आरोप-प्रत्यारोप शुरू हो गए हैं। राजन तेली को जिला बैंक घोटाला मामले में सीबीआई की नोटिस आने की चर्चा अब रंग ले रही थी, लेकिन तेली ने कहा कि ऐसी कोई नोटिस हमें नहीं मिली है और उन्होंने सीधे पालकमंत्री नितेश राणे पर आरोप लगाए। कुछ दिनों पहले तेली ने पत्रकारों से बातचीत में कहा था कि पालकमंत्री के दबाव के चलते परप्रांतियों को जमीन लेने के लिए बैंक ने कर्ज प्रदान किया। उन्होंने मुख्यमंत्र्य को भी पत्र के माध्यम से शिकायत करने की बात कही। 'आप पालकमंत्री को डराकर शिकायत नहीं करेंगे तो मर्डर होगा और हम इसके लिए तैयार हैं' जैसी धमकी भी उन्होंने दी थी। राजन तेली के आरोपों के बाद संजय राऊत ने भी राणे पर निशाना साधा। दसरा सभा में राजन तेली ने ठाकरे गुट के साथ रामराम कर शिंदे की शिवसेना में प्रवेश किया और उनकी युति धर्म की उपस्थिति बताई। युति में रहते हुए उन्होंने आरोपों पर चुप रहने को कहा, लेकिन अब उन्होंने पलटी मारी है। जिल्हा बैंक घोटालों के आरोपों के बीच शिवसेना के वरिष्ठ विधायक दिपक केसरकर ने राजन तेली को सम्मन सुनाने का धमकी दी। एक समय नारायण राणे के समर्थक राजन तेली ने राणे से दूरी बनाकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, भाजपा और फिर उबाठा तक का सफर तय कर शिंदे की शिवसेना में शामिल हो गए हैं। उन्होंने पालकमंत्री नितेश राणे पर गंभीर आरोप लगाए और पलटी की तो क्या मुख्यमंत्री क्या निर्णय लेते हैं यह देखने लायक होगा। राजन तेली के आरोपों पर नितेश राणे क्या जवाब देंगे और उनके बहनों पर किए गए आरोपों का शिंदे गट के विधायक निलेश राणे समर्थन करते हैं या भाई की तरफ़दारी लेंगे, यह भी अब देखने लायक होगा।
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 06, 2025 09:02:54
Nashik, Maharashtra:नाशिक - *माणिकराव कोकाटे बाईट पॉईंट्स* *ऑन मानहानी दावा* - मी या अगोदर ही सगळी घटना घडली, त्यावेळी मीडियासमोर माझी भूमिका स्पष्ट केली होती - की अशा प्रकारची कुठलीही जंगली रमी खेळत नव्हतो, मला खेळता येत नाही - त्यानंतर देखील रोहित पवार यांनी ट्विट करतच राहिले - रोहित पवार यांना नोटीस पाठवली - अशा प्रकारचा कुठलाही कृत्य मी केलेला नसताना तुम्ही माझी बदनामी केली आहे - शेतकऱ्यांची बदनामी झाली आहे, माझ्या पक्षाची बदनामी झाली आहे, माझी प्रतिमा तुम्ही समाजात डागाळली आहे, तुम्ही माफी मागावी - मात्र त्या नोटीसीची त्यांनी खिल्ली उडवली - माझी बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी कोर्टासमोर फिर्याद करण्याशिवाय पर्याय नव्हता - फिर्यादी म्हणून न्यायालयासमोर जबाब मांडला - रोहित पवार विधान परिषदेत सदस्य नाही, त्यांना आता येण्याची परवानगी नाही - मग त्यांना फोटो कुणी काढला, त्याचं नाव काय? ते अद्याप गुलदस्त्यात - त्याची चौकशी पोलीस खात्यामार्फत सुरू आहे - या संदर्भात रोहित पवारांनी जाहीर केलं पाहिजे - त्यांनी फोटो कसा मिळवला? कुठून मिळवला? कसा मिळवला? मीडियामध्ये कसा सादर झाला, हे त्यांनी त्यांच्याजबाबत नोंदवणं गरजेचं आहे याची सखोल पोलिस चौकशी झाली पाहिजे *पिंगळे वकील* - आम्ही कोर्टाला विनंती केली आहे, शिक्षा व्हावी - जी गोष्ट केली नाही, त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर बदनामी झाली - तो व्हिडिओ काढला कोणी, हॅक करून केलाय का? समोर येणं गरजेचं - याप्रकरणी पुढील सुनावणी ९ तारखेला *माणिकराव कोकाटे* - ज्या कुणी व्हिडिओ काढला आहे, उद्या माझे अकाउंट डिटेल्स आहेत, कोडवर्ड आहेत ते हॅक झाले, माझा मोबाईल हॅक झाला तर माझे, माझ्या कुटुंबीयांचे फोटो, व्हिडिओ, खासगी रेकॉर्ड धोक्यात कुठेही पब्लिकमध्ये जाऊ शकतात - कायद्याने कुणालाही मोबाईल विधान परिषदेत आतमध्ये नेता येत नाही - सवलत देऊन मोबाईल आत आणला जातो - अशा पद्धतीची प्रवृत्ती वाढवणे म्हणजे तुमच्या खाजगी रेकॉर्ड पळवण्यामध्ये मदत केली असं होऊ शकतं - मात्र हे बेकायदेशीर
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 06, 2025 08:48:15
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून महापालिकेत आयुक्तांच्या कार्यालय बाहेर आंदोलन करण्यात आलाय. नाशिकच्या खड्ड्यांच्या प्रश्नांवरती आंदोलन करण्यात आलं. शिंदे गटाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालच नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी देखील काल खड्ड्यांच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्या नाहीतर अधिकाऱ्यांचे निलंबन करू अशा प्रकारची तंबी दिली होती. त्यानंतर आज शिंदे गटाकडून महापालिकेत आयुक्तांच्या दालनाबाहेर बसून आंदोलन शहर अभियंता यांच्या पोस्टरला थोडे मारून आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात आंदोलकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 06, 2025 08:32:08
Akola, Maharashtra:नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात काढण्यात येत आहे.भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत लॉटरी पद्धतीने ही सोडत जाहीर केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी ही सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.मात्र या निर्णयावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे मतचोरीसारखा प्रकार असल्याची अशी टीका त्यांनी केली. लोकांपासून चोरून आरक्षण काढलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.सपकाळ पुढे म्हणाले, “आनंदाचा शिधा देताना यामागचा राजकीय हेतू स्पष्ट दिसून आला होता. हे सत्ताधारी सण आणि धर्मावरही राजकारण करत आहेत. हे सरकार शेतकरीविरोधी असून, फक्त कुणाला किती खोके द्यायचे आणि कुणाला मंत्री करायचे याचाच विचार करते,” अशी टीका त्यांनी केली.राज्यातील राजकीय समीकरणांवर बोलताना सपकाळ म्हणाले, “ठाकरे बंधू भेटत असतील, पण आम्ही महाविकास आघाडीत एकसंघ आहोत. मोदी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हेच आमचं प्रमुख धोरण आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 06, 2025 08:15:50
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 06, 2025 08:09:32
Akola, Maharashtra:अकोला-वाशिम रोडवर भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवरून देण्यात आली.या माहितीवरून उपमुख्यमंत्री कार्यालयातून अकोल्याचे संपर्क प्रमुख आणि माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांना तात्काळ संपर्क करण्यात आला. बाजोरिया यांनी जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांच्यासह तत्काळ घटनास्थळी रवाना होत तब्बल ४२ किलोमीटर अंतरावरील पातुर परिसरात पाहणी केली. मात्र,त्यांना या ठिकाणी कोणताही अपघात झाल्याचे आढळून आले नाही.सुमारे दोन तासांच्या कालावधीत फोन करणारा व्यक्ती वारंवार वेगवेगळ्या ठिकाणांहून नवी माहिती देत राहिला. इतकेच नव्हे तर त्याने फोनपे द्वारे पैसे मागितल्याने संशय अधिक गडद झाला. अखेर हा कॉल फसवा असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी तो नंबर बंद करून ठेवला.सूत्रांच्या माहितीनुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव प्रमोद फसाले असे सांगितले होते. उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईलवर अशा प्रकारे खोटी माहिती देणे ही गंभीर बाब ठरली आहे.अशा खोट्या कॉलमुळे प्रशासन आणि कार्यकर्त्यांचा वेळ वाया जातोच, पण खऱ्या गरजूंना रुग्णवाहिका आणि मदत पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो ही बाब अशाप्रकारे फेक कॉल करणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, खोटा कॉल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.अकोल्याचे पोलीस अधीक्षक आता ॲक्शन मोडवर येत या प्रकरणी कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. मात्र एका फेक कॉल मुळे यंत्रणेला आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किती मनस्ताप सहन करावा लागतो हे यातून दिसून येत आहे.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top