Back
अकोला-वाशिम रोड हादसे की फर्जी खबर से प्रशासन का समय बर्बाद, आरोपी की तलाश
JJJAYESH JAGAD
Oct 06, 2025 08:09:32
Akola, Maharashtra
अकोला-वाशिम रोडवर भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवरून देण्यात आली.या माहितीवरून उपमुख्यमंत्री कार्यालयातून अकोल्याचे संपर्क प्रमुख आणि माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांना तात्काळ संपर्क करण्यात आला. बाजोरिया यांनी जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांच्यासह तत्काळ घटनास्थळी रवाना होत तब्बल ४२ किलोमीटर अंतरावरील पातुर परिसरात पाहणी केली. मात्र,त्यांना या ठिकाणी कोणताही अपघात झाल्याचे आढळून आले नाही.सुमारे दोन तासांच्या कालावधीत फोन करणारा व्यक्ती वारंवार वेगवेगळ्या ठिकाणांहून नवी माहिती देत राहिला. इतकेच नव्हे तर त्याने फोनपे द्वारे पैसे मागितल्याने संशय अधिक गडद झाला. अखेर हा कॉल फसवा असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी तो नंबर बंद करून ठेवला.सूत्रांच्या माहितीनुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव प्रमोद फसाले असे सांगितले होते. उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईलवर अशा प्रकारे खोटी माहिती देणे ही गंभीर बाब ठरली आहे.अशा खोट्या कॉलमुळे प्रशासन आणि कार्यकर्त्यांचा वेळ वाया जातोच, पण खऱ्या गरजूंना रुग्णवाहिका आणि मदत पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो ही बाब अशाप्रकारे फेक कॉल करणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, खोटा कॉल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.अकोल्याचे पोलीस अधीक्षक आता ॲक्शन मोडवर येत या प्रकरणी कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. मात्र एका फेक कॉल मुळे यंत्रणेला आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किती मनस्ताप सहन करावा लागतो हे यातून दिसून येत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 06, 2025 10:19:272
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 06, 2025 10:15:420
Report
2
Report
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 06, 2025 09:21:410
Report
UPUmesh Parab
FollowOct 06, 2025 09:21:230
Report
UPUmesh Parab
FollowOct 06, 2025 09:20:170
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 06, 2025 09:02:540
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 06, 2025 08:48:150
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 06, 2025 08:36:030
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 06, 2025 08:32:080
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 06, 2025 08:18:220
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 06, 2025 08:15:500
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 06, 2025 08:09:462
Report