Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423101

चांदवड के पंचशील नगर में रस्ते खोदाई के विरोध में ठिय्या प्रदर्शन

SKSudarshan Khillare
Mar 29, 2026 01:30:28
Chandvad, Maharashtra
अँकर :- चांदवड शहरातील पंचशील नगर ,बागवानपुरा, या परिसरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून नगरपरिषदेने रस्ता खोदून ठेवला आहे या ठिकाणी रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने खड्ड्यांमध्ये बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले या ठिकाणाहून विविध शोभायात्रा जात असतात त्यामुळे एखादा अपघात घडू शकतो याची गंभीर नगर परिषदेने घ्यावे अशी मागणी यावेळी करून निवेदन देण्यात आले
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Mar 29, 2026 03:18:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये जुना बाजार परिसरात राजकीय वर्चस्ववादातून माजी नगरसेवकावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने हल्ला झाला होता, त्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मेहराज खान यांच्यासह त्यांच्या भाऊ आणि इतर एकूण ११ जणांविरुद्ध शहर चौक पोलिस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला झालेले रफत यार खान हे यापूर्वी एमआयएमकडून नगरसेवक होते. मात्र, पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यात पराभव झाल्यानंतर त्यांनी मालेगाव येथील इस्लाम पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत कलीम कुरेशी यांनीही याच पक्षात प्रवेश केल्याने शहरातील एमआयएम विरुद्ध इस्लाम पार्टी असा हा राजकीय संघर्ष होत आहे. त्यातून मारहाणीचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगीतले आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 29, 2026 03:17:06
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 29, 2026 03:02:39
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या रंकाळा तलाव परिसरातील खेळण्याचे साहित्य लहान मुलांसाठी अक्षरशः धोकादायक ठरत असल्याचे समोर आले होते. खेळण्यांच्या साधनांकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक मुलांना दुखापत झाल्याच्या घटना घडल्या. हा गंभीर मुद्दा झी २४ तासने आपल्या बातमीतून ठळकपणे मांडल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिका आणि संबंधित ठेकेदार यांना अखेर जाग आली. त्यानंतर ठेकेदारामार्फत जावळाचा गणेश मंदिर परिसरातील रंकाळा तलावाजवळील तुटलेले आणि धोकादायक खेळण्याचे साहित्य तातडीने बदलण्यात आले. घसरगुंडीखाली आवश्यक असलेली वाळू टाकण्यात आली तसेच अनेक ठिकाणी गायब झालेले झोपाळे पुन्हा बसवण्यात आले. रंकाळा तलाव परिसराला दररोज हजारो पर्यटक भेट देतात. त्यामुळे अशा ठिकाणी मुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे. मात्र, महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता. झी २४ तासने यावर आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली, ही बाब सकारात्मक असली तरी भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी नियमित देखभाल गरजेची आहे.
934
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 29, 2026 02:33:48
Jalna, Maharashtra:जालना :मुख्य जलवाहिनीला आधार देणारे लोखंडी गर्डर चोरीला,नवीन जालना भागाचा पाणीपुरवठा दोन दिवस उशिरा जालन्यातील घाणेवाडी ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येणाऱ्या मुख्य जलवाहिनीला आधार देणारे लोखंडी गर्डर चोरी गेल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. गंभीर प्रकाराची दखल घेत चंदनझिरा पोलिसांनी केलेल्या सतर्क कार्यवाहीमुळे चोरीस गेलेले २० फुटी लोखंडी गर्डर हस्तगत करण्यात यश आले असून, प्रशासकीय स्तरावर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन जालना भागाचा पाणीपुरवठा दोन दिवस उशिराने करण्यात येणार आहे. कन्हैया नगर (नाला) परिसरातील जलवाहिनीचे २० फुटी लोखंडी गर्डर २४ फेब्रुवारी २०२६ रोजी अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. पालिका प्रशासनाने याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर, चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या पथकाने १४ मार्च रोजी सदर गर्डर जप्त करून प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, पुन्हा २५ मार्चच्या मध्यरात्री दोन २० पोलीस ठाण्यात जमा केले आहेत. या पालिकेने फुटी लोखंडी गर्डर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गर्डर चोरीला गेल्यामुळे संपूर्ण जलवाहिनी घसरण्याची भीती निर्माण झाली असून, मोठी दुर्घटना टाळण्यासाठी जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे आणि गर्डरच्या पुनर्स्थापनेच्या कामामुळे नवीन जालना भागातील पाणीपुरवठा नियमित वेळेपेक्षा दोन दिवस उशिराने होणार आहे
943
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 29, 2026 02:31:47
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या जोडमोहा शिवारातील तासलोट जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या 'त्या' तरुणीची ओळख पटली असून, तेरा दिवसांनी खुनाचे रहस्य उलगडले आहे. पतीपासून विभक्त राहणाऱ्या या महिलेचा तिच्या प्रियकराने संशयातून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी प्रियकर व खुनासाठी साथ देणाऱ्या एका विधी संघर्ष बालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मृतदेहाचा ओळखपटवणे कठीण होते. ४० हजार मोबाइल क्रमांकांची पडताळणी केली गेली. जिल्ह्यातील बेपत्ता महिलांचा शोध घेतला गेला. घटनास्थळाच्या परिसराची तपासणी करण्यात आली. १९६ सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. एकाच फुटेजमध्ये स्त्री व पुरुष जंगलाकडे जाताना दिसले, परंतु काही वेळाने परतताना फक्त पुरुषच दुचाकीवर दिसला. या धाग्यावरून तपास पुढे नेण्यात आला. लग्नाचा तगादा व संशय यांतून हा हत्याकांड घडला. आरोपीने शांत डोक्याने खुनाचा कट केला, परंतु पोलिसांनी चौफेर तपास केल्याने आरोपी पकडला गेला.
908
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 29, 2026 01:46:04
Bhandara, Maharashtra:चिचोलीत रानगव्याचा शेतशिवारात धुमाकूळ. व्हिडिओ व्हायरल, बळीराजा धास्तावला. गेल्या काही दिवसांपासून परिसरात रानटी प्राणीांचा वावर वाढला असून, भंडारा जिल्ह्याच्या चिचोली येथील शेतशिवारात एका महाकाय रानगव्याने अक्षरशः हैदोस घातल्याची घटना समोर आली आहे. अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे वळलेल्या या रानगव्याने शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून, त्याला पाहताच परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी या घटनेचे चित्रीकरण केले असून, गव्याच्या मुक्त संचाराचा हा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिवसाढवळ्या रानगवा शेतात फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने तात्काळ दखल घेऊन या वन्यप्राण्याचा बंदोबस्त करावा आणि शेतीचे नुकसान टाळावे अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
1095
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 28, 2026 13:31:03
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावरील चर्चेच्या महासभेत 'नो पार्किंग' दंड वसुली वरून नगरसेवकांनी गोंधळ घातला... नो पार्किंग झोन मधील वाहनांवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडून दंड वसुलीसाठी खाजगी संस्थेला ठेका देण्यात आला आहे... मात्र संबंधित संस्थेकडून वसूल केली जात असलेली दंडाची रक्कम जास्त आहे आणि वसूल करणारे कर्मचारी कारवाईदरम्यान वाहनचालकांसोबत असभ्य वर्तवणूक करतात , असा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे...सोबतच मनपाने ठरवून दिलेल्या ठिकाणी कारवाई न करता इतर ठिकाणीच कारवाई करतात...संबंधित संस्थेकडून मनपाला एक लाख रुपये मिळतात, मात्र प्रत्यक्षात संबंधित संस्था वाहन चालकांकडून अवाजवी रक्कम वसूल करतात, संबंधित संस्थेचे वाहनचालक अनधिकृत पणे सायरन वाजवत टोइंग व्हॅन चालवतात असा देखील आरोप होत आहे... त्यामुळे संबंधित संस्थेचा ठेका रद्द करावा अशी मागणी नगरसेवकांकडून होत आहे... रुग्णालय , धार्मिक स्थळ, शैक्षणिक संस्था या ठेक्यातून वगळाव्यात अशी देखील मागणी नगरसेवकांकडून होत आहे.
1086
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 28, 2026 13:04:54
Navi Mumbai, Maharashtra:Belapur स्थित व्यवसायी गुरुनाथ चिंचकर यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणाला आता नाटयमय वळण आले आहे. याप्रकरणी NRIA सागरी पोलिसांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि Navi Mumbaiतील अमली पदार्थ विरोधी पथकाच्या (ANC) बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, यात 10 ते 15 कोटी रुपयांच्या खंडणीचा आणि कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याच्या धमक्यांचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाच्या तपास यंत्रणांच्या अधिकाऱयानवरच गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मृत गुरुनाथ चिंचकर यांच्या पत्नी डॉ. किरण चिंचकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2 फेब्रुवारी 2025 रोजी एनसीबीचे अधिकारी आकाश मलिक आणि त्यांच्या 15 ते 20 जणांच्या पथकाने कोणतीही पूर्वसूचना न देता चिंचकर यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी घरात कोणीही नसताना घरकामगाराला मारहाण करण्यात आली आणि घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर, 2 लाख रुपये रोख, महागडी घडयाळे व महत्त्वाची कागदपत्रे कोणत्याही अधिकृत पंचनाम्याशिवाय पळवून नेल्याचा आरोप झाला. एनसीबीचे विभागीय संचालक अमित घावटे यांनी चिंचकर यांच्या मुलांना खोटया अमली पदार्थांच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन 10 ते 15 कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा डॉ. चिंचकर यांनी केला आहे. पैसे दिले नाही तर संपूर्ण कुटुubalाला जेलमध्ये टाकू आणि देशोधडीला लावू, अशी भीती त्यांना सतत घातली जात होती. याच काळात नवी मुंबई एएनसीचे पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनीही एका गुह्यासंदर्भात चिंचकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना शिवीगाळ करत पैशांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. गुरुनाथ चिंचकर यांना वारंवार एनसीबी कार्यालयात बोलावून दिवसभर ताटकळत ठेवले जायचे. या मानसिक छळाला आणि खंडणीच्या दबावाला कंटाळून 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी चिंचकर यांनी आपल्या कार्यालयात स्वत:वर गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी छळ करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची नावे लिहून ठेवली होती. चौकट: पोलिसांच्या दाव्यानुसार, मृत गुरुनाथ चिंचकर यांचा मुलगा नवीन चिंचकर हा आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर असून तो थायलंडमध्ये हायड्रो गांजाचा पुरवठा करत होता. नवीन आणि धीरज चिंचकर हे दोघेही एनसीबी मुंबईच्या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी होते. नेरुळ येथील NDPS गुह्यातही त्यांच्या नाव आल्याने नवीन आणि धिरज हे दोघे भाऊ फरार होते. त्यामुळे पोलिसांकडुन गुरुनाथ चिंचकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून गुरुनाथ चिंचकर यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
1067
comment0
Report
Advertisement
Back to top