Back
गुरुनाथ चिंचकर आत्महत्या मामले में एनसीबी के आला अधिकारियों पर केस दर्ज
SNSWATI NAIK
Mar 28, 2026 13:04:54
Navi Mumbai, Maharashtra
Belapur स्थित व्यवसायी गुरुनाथ चिंचकर यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणाला आता नाटयमय वळण आले आहे. याप्रकरणी NRIA सागरी पोलिसांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि Navi Mumbaiतील अमली पदार्थ विरोधी पथकाच्या (ANC) बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, यात 10 ते 15 कोटी रुपयांच्या खंडणीचा आणि कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याच्या धमक्यांचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाच्या तपास यंत्रणांच्या अधिकाऱयानवरच गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मृत गुरुनाथ चिंचकर यांच्या पत्नी डॉ. किरण चिंचकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2 फेब्रुवारी 2025 रोजी एनसीबीचे अधिकारी आकाश मलिक आणि त्यांच्या 15 ते 20 जणांच्या पथकाने कोणतीही पूर्वसूचना न देता चिंचकर यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी घरात कोणीही नसताना घरकामगाराला मारहाण करण्यात आली आणि घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर, 2 लाख रुपये रोख, महागडी घडयाळे व महत्त्वाची कागदपत्रे कोणत्याही अधिकृत पंचनाम्याशिवाय पळवून नेल्याचा आरोप झाला. एनसीबीचे विभागीय संचालक अमित घावटे यांनी चिंचकर यांच्या मुलांना खोटया अमली पदार्थांच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन 10 ते 15 कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा डॉ. चिंचकर यांनी केला आहे. पैसे दिले नाही तर संपूर्ण कुटुubalाला जेलमध्ये टाकू आणि देशोधडीला लावू, अशी भीती त्यांना सतत घातली जात होती. याच काळात नवी मुंबई एएनसीचे पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनीही एका गुह्यासंदर्भात चिंचकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना शिवीगाळ करत पैशांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. गुरुनाथ चिंचकर यांना वारंवार एनसीबी कार्यालयात बोलावून दिवसभर ताटकळत ठेवले जायचे. या मानसिक छळाला आणि खंडणीच्या दबावाला कंटाळून 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी चिंचकर यांनी आपल्या कार्यालयात स्वत:वर गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी छळ करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची नावे लिहून ठेवली होती. चौकट: पोलिसांच्या दाव्यानुसार, मृत गुरुनाथ चिंचकर यांचा मुलगा नवीन चिंचकर हा आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर असून तो थायलंडमध्ये हायड्रो गांजाचा पुरवठा करत होता. नवीन आणि धीरज चिंचकर हे दोघेही एनसीबी मुंबईच्या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी होते. नेरुळ येथील NDPS गुह्यातही त्यांच्या नाव आल्याने नवीन आणि धिरज हे दोघे भाऊ फरार होते. त्यामुळे पोलिसांकडुन गुरुनाथ चिंचकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून गुरुनाथ चिंचकर यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowMar 28, 2026 13:31:031086
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 28, 2026 13:04:341017
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 28, 2026 12:51:001075
Report
AKAMAR KANE
FollowMar 28, 2026 12:30:381093
Report
KJKunal Jamdade
FollowMar 28, 2026 12:02:031083
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 28, 2026 12:01:431082
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 28, 2026 11:45:27961
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 28, 2026 11:18:431042
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 28, 2026 11:18:331007
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 28, 2026 10:46:051079
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 28, 2026 10:38:331099
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 28, 2026 10:34:49950
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 28, 2026 10:18:481080
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 28, 2026 10:10:241035
Report