Back
चार दिन बाद जन्म के बावजूद शीतल चित्ते ने बारहवीं की परीक्षा दी; प्रेरणादायक मिसाल
SMSATISH MOHITE
Feb 25, 2026 07:49:08
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Mother Feed on - 2C ----------------------------------- Anchor - नवजात बाळाची जबाबदारी आणि शिक्षणाची ओढ याची प्रचिती देणारे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. प्रसूतीच्या अवघ्या चार दिवसानंतर एक माता बारावीची परीक्षा देत आहे. Vo - प्रसूती अवघ्या चार दिवसात शरीराची साथ नसताना केवळ प्रबळ इच्छाक्तीच्या जोरावर एक माउली बारावीची परीक्षा देऊन शिक्षण थांबणार नाही असा संदेश देत आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर बाळंतीन महिलेने किमान सात दिवस तरी घराबाहेर पडू नये असे म्हणतात. परंतु शिक्षण घेण्याची तळमळ, शिक्षणाची प्रबळ जिद्द आणि परिस्थितीवर मात करण्याची ताकद असेल तर कोणतेही स्वप्न अपूर्ण राहत नाही याचे प्रेरणादायी उदाहरण नांदेडमध्ये पाहायला मिळत आहे. नांदेडमधील बसवेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शीतल चित्ते या तरुणीने प्रसूतीनंतर अवघ्या चार दिवसांत बारावीच्या बोर्ड परीक्षेला हजेरी लावून अनेकांसमोर आदर्श निर्माण केलाय. 6 फेब्रुवारी रोजी शीतलची प्रसूती झाली. 10 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षा कशी द्यावी असा प्रश्न शीतल समोर होता. पण नुकत्याच प्रसूती झालेल्या अवस्थेतही शीतल ने परीक्षा देण्याचा ठाम निर्णय घेतला. अवघ्या चार दिवसांच्या बाळाला सोबत घेऊन त्या परीक्षा केंद्रावर दाखल झाल्या. परीक्षा केंद्रावर उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. पती, कुटुंबीयांनीही त्यांना भक्कम साथ दिली. शीतल यांचे स्वप्न पुढे शिक्षण पूर्ण करून शिक्षक होण्याचे आहे.
Byte - शीतल चित्ते
Vo - शीतलची जिद्द पाहून परीक्षा केंद्र असलेल्या पीपल्स महाविद्यालयानेही पुढाकार घेत परीक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. लहान बाळासाठी एक खोलीत पाळणा ठेवला. शीतल साठी स्वतंत्र्य कक्षात पेपर देण्याची व्यवस्था केली.
Byte - शिवशंकर भानेगावकर, प्रभारी प्राचार्य, पीपल्स महाविद्यालय.
Vo - शीतलची शिक्षणासाठीची अफाट जिद्द, शिक्षणासाठीची तळमळ समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 11:03:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 25, 2026 10:21:310
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 25, 2026 10:20:170
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 25, 2026 10:01:490
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 25, 2026 10:00:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 25, 2026 09:52:280
Report
PNPratap Naik1
FollowFeb 25, 2026 09:43:080
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 09:36:410
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 25, 2026 09:32:450
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 25, 2026 09:19:030
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 08:51:120
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 25, 2026 08:50:490
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 25, 2026 08:50:350
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 25, 2026 08:50:050
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 08:34:190
Report