Back
सोलापुर में मावा के व्यसन से युवाओं की जिंदगी खतरे में
AAABHISHEK ADEPPA
Feb 25, 2026 08:50:35
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील युवक मावा खाण्याच्या आहारी, माव्यामुळे होतोय कॅन्सर सारखा भयंकर आजार ( PKG )
- सोलापुरातील हजारो युवक अडकले मावा खाण्याच्या व्यसनात
- शहरात पावलोपावली 10-15 रुपयांमध्ये मिळतोय मावा
- मावा खाल्ल्याने कॅन्सर होऊन अनेक युवकांचे आयुष्य उध्वस्त
- अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सुपारी पासून बनलेल्या माव्याची तरुणांना भुरळ
Anchor - सोलापुरात मावा हा व्यसनाचा प्रकार अत्यंत गंभीर बनला आहे. हजारो युवकांचा दिवस हा मावा न खाता जाणे अशक्य झाले आहे. सोलापुरात अगदी टप्प्याटप्प्यावर अगदी सहज रीतीने हा मावा उपलब्ध होतो.
मावा म्हणजे काय ?
मावा म्हणजे अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सुपारीपासून बनवलेला अत्यंत शरीराला घातक असणारा घटक आहे. हा मावा बनवताना चुना, कात, पाणी, विशिष्ट प्रकारचे द्रव्य वापरले जाते. इतकेच काय तर अनेक ठिकाणी माव्यामध्ये गांजाचे पाणी देखील वापरले जात असल्याची माहिती पुढे येतेय.
राज्यात एकीकडे गुटखा विक्रीसाठी बंदी असताना दुसरीकडे सोलापुरात मात्र हा मावा तरुणांसाठी प्रिय बनलाय... मावाचे व्यसन ज्याला जडले आहे तो तरुण दिवसातून कमीत कमी दोन ते तीन पाकीट तरी संपवतोच. काही कारणाने मावा न मिळाल्यास तरुण अक्षरशः चलबिचल होतात हे वास्तव आहे. त्यामुळे मावा विक्री करणाऱ्यांवर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
बाईट -
महेश धाराशिवकर ( सामाजिक कार्यकर्ते )
सोलापुरातील एका युवकाला वर्षानुवर्षे मावा खाल्ल्याने त्याला कॅन्सर सारख्या गंभीर आजार झाला आहे. सध्या योग्य उपचार घेतल्याने हा युवक मरणाच्या दारातून परत आलाय. याच युवकांनी आता मावा प्रेमींसाठी प्रेमाचा संदेश दिलाय... मावा खाल्ल्याने त्याचा शरीरावर किती वाईट परिणाम होतो कशा पद्धतीने कॅन्सर सारखा आजाराचा सामना करावा लागतो याबाबत युवकाच्या तोंडूनच आपबीती जाणून घेऊयात....
बाईट -
संतोष हवीनाळ ( मावा खाल्याने कॅन्सर झालेला युवक )
मावा खाल्ल्याने कॅन्सर सारखा भयंकर आजार होऊ शकतो याची कल्पना असताना देखील हजारो तरुण माव्याची साथ सोडायला तयार नाही. या मावळ्यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट सारखे भयंकर घटक असल्याने ते कॅन्सर शरीरात जगण्यासाठी मदत करतात अशी माहिती тज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.
बाईट -
डॉ. सचिन पुराणीक ( तज्ञ डॉक्टर )
End P2C
सोलापुरात सहज रितीने मिळणारा मावा तितक्याच सहजरतीने तरुणांचे आयुष्य बरबाद करतोय... त्यामुळे तरुणांनी वेळीच सावध होणं हे काळाची गरज आहे....
अभिषेक आदेप्पा, सोलापूर प्रतिनिधी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 25, 2026 10:21:310
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 25, 2026 10:20:170
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 25, 2026 10:01:490
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 25, 2026 10:00:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 25, 2026 09:52:280
Report
PNPratap Naik1
FollowFeb 25, 2026 09:43:080
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 09:36:410
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 25, 2026 09:32:450
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 25, 2026 09:19:030
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 08:51:120
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 25, 2026 08:50:490
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 25, 2026 08:50:050
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 08:34:190
Report
AKAMAR KANE
FollowFeb 25, 2026 08:30:390
Report